yogayog(marathi natak) books and stories free download online pdf in Marathi

योगायोग (मराठी नाटक)

पात्रे :-

कृतिका

साधना(कृतिकाची आई)

गीरीष(कृतिकाचे वडील)

आलाप(बघायला आलेला मुलगा)

विदया(आलापची आई)

विश्वास(आलापचे वडील)

जोशी काकु(शेजारच्या काकु)

विराज(वधु-वर सुचक केंद्राच्या संचालिकांनी सुचवलेल स्थळ)

जयश्री कुलकर्णी(वधु-वर सुचक केंद्राच्या संचालक)

वेदश्री(विराजची आई)

विवेक(विराजचे वडील)

सौरभ(कृतिकाच्या ऑफिसमधला कलीग)

प्रवेश :- १ला

(रंगमंचावर एक घर दाखवल आहे घरात मधोमध एक सोफा ठेवला आहे सोफ्यावर एक मुलगी चॅटिंग करत बसली अहे तेवढयात जोशी काकुंचा प्रवेश होतो.)

कृतिका (चॅटिंग करतीये):- “ ”

बेल वाजते.(नम: शिवाय नम: शिवाय हरिहर बोलो नम: शिवाय)

साधना (किचन मधुन):- “कृतिका कोण आलय बघ”

कृतिका:- “हो आई बघते”

(दार उघडताच)

कृतिका:- “अय्या! जोशी काकु तुम्ही? या न खुप दिवसानी आलात.(सोफ्यावर बसवत)थांबा हं पाणी आणते आई जोशी काकु आल्या आहेत गं”

साधना(हॉलमध्ये येत):-“अगं बाई जोशी काकु तुम्ही? काय म्हणता कशा आहात? आणि खुप दिवसानी आमची आठवण झाली”(कृतिका पाणी आणून देते)

जोशी काकु:- “हो, अगं तुला तर माहितच आहे आपल्याला घरात किती काम असतात घरातली काम संपली तर थोडासा बाहेर जायला वेळ मिळतो पण तो पर्यंत संध्याकाळ झालेली असते. मग संध्याकाळची काम थोडी म्हणून उसंत नाही जीवाला.”

साधना:- “अहो काकु पण आता सुन आलीये की घरात तिच्याकडे काम सोपवायचीत की किती दिवस अस तुम्हीच सगळ करत बसणार. बर काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, सरबत काय सांगु करायला,”

जोशी काकु:- “काही नाही गं, तु फक्त बैस इथ मी तुझ्याकडे काही मागायला आले नाही तुला भेटायला आले आहे. तु आहेस म्हणून सांगते हं साधना. ह्या आत्ताच्या मुली की नाही ह्यांना कशाच म्हणून ताळतंत्रच राहील नाहीये बघ. बाहेर जाउन काम करतात याचा अर्थ असा तर नाही की घराकडे दुर्लक्ष करायच तुम्ही, घरातली काम करा न मग जा कुठ जायच ते. ऑफिसला आम्ही ही जायचोच की पण घरातल सगळ करुन पण आत्ताच्या मुली त्याना सगळ हाताल्या हातात लागत. पण तुझी मुलगी नाही हो तशी कृतिका अगदी चुणचूणीत झालीये आणि लाघवी सुध्दा पाहिलन आम्ही आमच्या मुलाच्या लग्नात किती मदत करत होती अगदी घरातल्या सारखच. बरं तिच्यासाठी बघायला सुरुवात केली की नाही अजुन. हे बघ ज्या-ज्या वयात त्या-त्या गोष्टी झालेल्याच ब-या असतात नंतर एकदा वय निघुन गेल तर काय करणार आहात?”

साधना(चिंतेत):-“तुमच पटतय हो काकु मला पण ही गोष्ट आत्ताच्या मुलींना कोण सांगणर आता ही कृतिकाच पहा लग्नच नाही करायच म्हणती पोरगी मी तर अगदी हात टेकले हिच्यापुढे”

जोशी काकु:- “अग, मुल असच म्हणत असतात पण म्हणून आई-वडीलांनी आपली जबाबदारी अशी सोडुन दयायची का? आता माझाच मुलगा बघ लग्ना आधी किती म्हणत होता मी लग्नच करणार नाही म्हणून पण रेवतीला बघायला गेलो आणि लगेच होकार दिला न पठयान तु शोधायला तर सुरुवात कर बाकी सोड न तिच्यावर.”

साधना:- “हो खरय काकु तुमचं पण तसा मुलगाही पाहिजे न आज-काल चांगली मुल मिळतात कुठे? आणि अपेक्षा म्हणाल तर इतक्या, विचारुच नका मुलगी शीकलेली हवी जॉब हवा घर सांभाळणारी हवी गोरी सुंदर हवी त्यातुन पैसेवाली हवी. स्वत:ला काही येत असो वा नसो बायकोला मात्र सगळ यायलाच हवं जग बदललय आता.तुम्हीच सांगा(थोडस थांबत)तुमच्या नजरेत कुणी आहे का?”

जोशी काकु:- “सांगायला मी सांगेलच गं पण तुला कृतिकाला आणि गीरीष भौजींना पटल पाहिजे न खास करुन कृतिकाला आवडला पाहिजे तसही मुलींच्या आवडी नीवडी आता बदलल्या आहेत. तिच्याही काही अपेक्षा असतीलच न एवढ सांगु शकते मुलगा अगदी लाखात एक आहे आणि कृतिकाला साजेसा आहे मुख्य म्हणजे कुठलीही जबाबदारी नाही अगदी सुखात ठेवेल तो तीला बघ विचार कर”

साधना:- “अरे! छान पण मुलगा कुठला आहे?”

जोशी काकु:- “अगं तु ओळखतेस की त्यांना तुला माझ्या मधल्या जाउबाइ माहिती आहेत न यु.एस वाल्या त्यांचा मुलगा. बघ आपण एकाच जातीतले आहोत तेही देशस्थ. त्यातुन पक्के शेजारी एकमेकांना चांगले ओळखणारे अजुन काय हवय.”

साधना:- “अगं बाई हो का? ते सगळ ठीक आहे पण मला एकदा ह्यांच्याशी बोलाव लागेल मी ह्यांच्याशी बोलुन तुम्हाला कळवते.”

जोशी काकु(घडयाळाकडे बघत):- “ठीक आहे कळव. अरे बाप रे गप्पांच्या नादात वेळ कसा गेला कळलच नाही खुप उशीर झालाय मी येते हं”

साधना:- “या, सावकाश जा हं”(साधना दार लावते)

कृतिका(चिडुन):- “काय आई मी इतकी जड झालीये का तुला? का बर तु प्रत्येका समोर अस माझ्या लग्नाचा विषय काढत असतेस तुला माहितीये न माझे काही ऍम्बीशन्स आहेत मला आत्ता लग्न करायच नाहीये”

साधना:- “अरे, मी काय केलय दार तु उघडलस काकुना आत तु घेतलस त्याला मी काय करणार आणि तसही काय चूक बोलत होत्या त्या हेच वय असत लग्नाच त्या-त्या गोष्टी त्या-त्या वयातच व्हायला पाहीजेत लग्न काय चाळीशी ओलांडल्यावर करणार आहेस आत्ताच एकोणतीसाव लागलय तुला”

(कृतिका रागातच निघुन जाते.)

ब्लॅक आउट

प्रवेश:- २रा

(दिवा लावणीची वेळ. रंगमंचावर साधना तुळशीवृंदावन समोर दिवा लावतीये तेवढयात गीरीषचा प्रवेश होतो.)

साधना:- “शुभंकरोति कल्याणम,

आरोग्यम धनसंपदा,

शत्रुबुध्दी विनशाय,

दिपकजोति नमस्तुते,

अरे! आलात तुम्ही खुपच थकलेले दिसताय काम होत का खुप.”

गीरीष(शुज काढत):- “हो अगं, आज अचानकच बॉसनी सेल्स डिपार्टमेंटची मीटींग बोलावली त्यामुळे आज खुपच काम होत ऑफिसमध्ये म्हणून थकलोय जरा पाणी आणतेस प्लीज.”

साधना:- “हो, कृतिका बाबांना पाणी घेउन ये बेटा. ऐका न एक बोलायच होत जरा. आज घरी जोशी काकु आल्या होत्या त्यांनी कृतिकासाठी एक स्थळ आणलय. म्हणत होत्या मुलगा छान आहे बघ विचार करुन.”

कृतिका(पाण्याचा ग्लास आणत):- “झाल का परत तुझ सुरु अगं बाबांना थोडा श्वास तर घेउ दे. बाबा पाणी.”

साधना:- “बघितलत ही नेहमी अशी वागते काय बोलायच आता हिला मी काही चूकीच बोलतीये का एकदा मुलाला भेटल तर कुठे बिघडणार आहे शेवटी निर्णय तीलाच घ्यायचा आहे न आणि परत मुलगा यु.एसचा आहे.”

कृतिका:- “ठिक आहे, तुला इतकच वाटतय न तर बोलाव त्यांना पण शेवटचा निर्णय माझा असेल हं जर तुम्हाला हे मान्य असेल तर मी तयार आहे.”

साधना:- “शहाणी ग बाळ माझी ती मी लगेच काकुंना फोन करते तु खुप मोठ टेन्शन कमी केलस बघ माझ.”

गीरीष(स्मीत हास्य करत):- “अहो उतावीळ सासुबाई वाजले किती बघा आधी इकडे तुमचे अहो उपाशी आहेत त्यांना साधा चहा सुध्दा मिळाला नाही अजुन.”

साधना:- “अगं बाई. विसरलेच कि मी सॉरी हं आत्ता चहा करते.”(गीरीष आणि कृतिका हसु लागतात)

रात्री जेवणाच्या टेबलावर...

गीरीष(खुर्चिवर बसत):- “चला आज काय बेत आहे मग. साधनाची खुप मोठी इच्छा पुर्ण झालीये बाबा.”

कृतिका(हसत):- “इच्छा नाही बाबा टेन्शन कमी झालय तीच अस म्हणा.”

गीरीष:- “हो...हो विसरलोच की मी.”

साधना(वाढत):- “करा माझी नेहमी चेष्टाच करा तुम्ही दोघ बाप-लेक. मी काय इथे एकटीच न तुला माझी काळजी काय कळणार आहे बेटा. जेव्हा तु आई होशील न तेव्हा तुला एका आईची काळजी काय असते ते कळेल मग तेव्हा मी तुला बघेल.”

कृतिका(मिठी मारत):- “बाबा आईला जरा जास्तच माझ्या लग्नाची घाई झालीये हं, अग आधी माझ लग्न तर होउ देत मग बघुत की पुढच.”

साधना:- “चल... चल आता नाटकीपणा नको करुस जेउन घे.”

(सगळे जेवायला बसतात.)

ब्लॅक आउट

प्रवेश:- ३रा

(सकाळची वेळ. रंगमंचावर गीरीष आणि कृतिका ऑफिसला जायच्या तयारीत आहे आणि साधना जोशी काकुंना फोन करत आहे)

साधना(हॉलमध्ये फेरी मारत):- “ट्रिंग... ट्रिंग... ट्रिंग...ट्रिंग”

जोशी काकु:- “हॅलो, कोण बोलतय?”

साधना:- “काकु मी साधना बोलतीये बिझी आहात का जरा बोलायच होत”

जोशी काकु:- “अगं नाही. बोल काय म्हणतेस”

साधना:- “काकु अहो काल आपल स्थळा संदर्भात बोलण झाल होत न मी ह्यांच्याशी त्यासंदर्भात बोलले आणि ते बघुयात म्हणालेत विशेष म्हणजे कृतिका ही तयार झाली आहे तेव्हा आपल्याला भेटता येईल का?”

जोशी काकु:- “हो. तु म्हणशील तेव्हा. अगदी आज सुध्दा भेटु शकतो आपण फक्त एकदा मला जाउबाईंशी बोलाव लागेल मी तुला पंधरा मिनीटानी कॉल केला तर चालेल का?”

पंधरा मिनीटानी...

जोशी काकु:- “ट्रिंग... ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग”

साधना:- “हॅलो, बोला काकु.”

जोशी काकु:- “हं, अग माझ जाउबाईंशी बोलण झालय तुला आज सहा वाजता जमेल का भेटायला कारण उदया परत त्यांना यु.एस. ला जायच आहे म्हणून.”

साधना:- “हो, चालेल न आज सहा वाजता भेटुत आपण सगळे.”

जोशी काकु:- “ठीक आहे मग भेटुत.”

साधना(फोन ठेवत):- “अहो, ऐकलत का?”

गीरीष:- “हो, येईन मी लौकर घरी आज पाहुणे येणार आहेत न घरी. पण साधना हे जरा लौकर होत नाहीये? कुणीतरी सांगितल म्हणून लगेच घरी बोलाउन घ्यायच का अग कोण आहे मुलगा काय करतो शिक्षण काय झालय आपल्या मुलीला नीट सांभाळेल की नाही बघायला नको एकुलती एक लाडाकोडात वाढलेली पोर आहे आपली असच तीला कुणाच्या ही हातात सोपवायची का?”

साधना:- “तुमच न आपल काहितरीच असत हं, कृतिका माझी सुध्दा मुलगी आहेच न मी तिच्यासाठी कधी चुकीचा निर्णय घेईल का? मला ही तीची काळजी आहे.”

कृतिका:- “अरे...अरे.. आई बाबा भांडताय कशाला संध्याकाळी येणार आहेत न सगळे तेव्हा बघुत न त्यासाठी तुमची सकाळ का खराब करताय.”

साधना:- “हे तुझ्या बाबांना सांग आणि हो संध्याकाळी लौकर ये सहा वाजता सगळे येणार आहेत.”

(सगळे आपापल्या कामाला निघुन जातात)

ब्लॅक आउट

प्रवेश:- ४था

(संध्याकाळची वेळ. रंगमंचावर कृतिकाच्या घरात बघण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरु आहे. तेवढयात पाहुण्यांचा प्रवेश होतो.)

गीरीष(हॉल आवरत):- “साधना झाल की नाही अजुन अग किती उशीर मी तुला बघायला येणार नाहीये आपल्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत.”

साधना(खोलीतुन बाहेर येत):- “हो... हो आले आज पहिल्यांदा पोरीला बघायला पाहुणे येणार आहेत चांगल नको दिसायला काय म्हणतील सगळे.”

गीरीष(हसुन):- “काय म्हणणार. हेच म्हणतील बाकी गीरीषला बायको मोठी गोड मिळाली आहे. खरच साधना आज मला न आपला बघण्याचा कार्यक्रम आठवतोय. तेव्हा सुध्दा तु इतकीच गोड दिसत होतीस. तुला आठवतय तु सगळयांना चहा घेउन आली होतीस आणि मी तुला बघतच राहीलो होतो आजचा दिवस सुध्दा अगदी तसाच वाटतोय.”

साधना(लाजत):- “अहो, जरा भानावर या, आज आपला नाही पोरीचा दिवस आहे म्हणल. आज तीला बघायला येणार आहेत आपली मुलगी आता लग्नाची झालीये म्हणल.”

गीरीष:- “तर.. तर.. मग काय झाल? मी माझ्या बायकोची स्तुती सुध्दा करु नाही. तुला सांगतो अजुनही मी तसाच आहे एकदम एवरग्रीन. बर ते जाउ दे आपली परी कुठे आहे. झाली की नाही अजुन तयार आत्ता पाहुणे येतील.”

साधना(हसुन):- “अहो लागुदया आज तीला थोडा वेळ येईल ती. आज तीचा दिवस आहे तीला वेळ लागणार नाही तर कुणाला लागेल.”

कृतिका(खोलीतुन बाहेर येत):- “बाबा”

(दोघे ही मागे वळतात)

साधना(मानेला टिका लावत):- “बघा आहे न माझ्या पेक्षा ही गोड अगदी नक्षत्रासारखी.”

गीरीष(डोळयात पाणी येत):- “माझी पोर कधी इतकी मोठी झाली मला कळलच नाही.”

(कृतिका बाबांना मिठी मारते)

कृतिका(पाया पडत):- “आई... बाबा. नमस्कार करते.”

गीरीष:- “खुप खुश रहा पोरी तुझी सगळी स्वप्ने पुर्ण होवो, तुला उदंड आयुष्य मिळो.”

साधना:- “सुखी रहा तुझ्या सगळया मनोकामना पुर्ण होवो.”

(दोघ ही कृतिकाला जवळ घेतात. तेवढयात पाहुण्यांचा प्रवेश होतो.)

बेल वाजते.(ओम नम: शिवाय ओम नम: शिवाय हरिहर बोलो नम: शिवाय.)

साधना:- “अगं बाई आले वाटत पाहुणे कृतिका आता जो पर्यंत आम्ही बाहेर बोलवत नाही तो पर्यंत बाहेर यायच नाही हं बेटा जा आपल्या खोलीत जा. अहो दार उघडा न मी खाण्याच बघते.”

गीरीष(दार उघडत):- “या..या.. कशा आहात काकु या..या. अगं ऐकलस का पहुणे आले बघ बाहेर ये काय करतेस आत.”

साधना(बाहेर येत):- “हो. आले आले अगं बाई आलात सगळे बसा न काय बेटा कसा आहेस.”

आलाप(हसत):- “मी ठीक आहे काकु”

(सगळे बसतात)

विदया:- “मोठया जाउबाईंकडुन तुमची मुलगी लग्नाची आहे कळाल. आणि तीला आत्ता लग्नात पण पाहील होत म्हणून विचार केला एकदा प्रत्यक्ष भेटून बघुत शेवटी लग्नाच्या गाठी वरुनच बांधुन येतात आपण फक्त निमीत्तमात्र असतो. काय हो.”

विश्वास:- “हो. न. बाकी तुमच्या कडे कोण-कोण आहे.”

साधना:- “अगं बाई मी ओळख करुन दयायचेच विसरले. हे माझे मिस्टर गीरीष कुलकर्णी फार्मास्युटिकल कंपनीत आहेत, माझी मुलगी कृतिका इवेंट मॅनेजर आहे आणि मी साधना गीरीष कुलकर्णी आम्ही तिघच घरात राहातो. कृतिका आमची एकुलती एक मुलगी आहे.”

विश्वास:- “छान. म्हणजे आमच्या आलापला अगदी अनुरुप मुलगी मीळाली आहे तर. पण त्याच बरोबर मुलीचे संस्कार सुध्दा महत्वाचे आहेत बरं का आम्हाला. म्हणजे घराला सांभाळून घेईल की नाही, आल्या गेल्याच करेल की नाही, लहानांवर प्रेम मोठयांचा आदर करेल की नाही हे महत्वाच. राग मानु नका मी जरा स्पष्टवक्ताच आहे म्हणून. तस आमच्या घरात मी, विदया, आमचा मोठा मुलगा सारंग, धाकटा मुलगा आलाप, आमच्या सुनबाई स्वराली, आणि घरातली सगळयात लाडकी आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे आमचा नातु आदित्य. हयांच तिने आनंदान केल पाहीजे इतकीच अपेक्षा बस.”

आदित्य(चिडुन):- “आबा माझ नाव आदित्य नाहीये आदि आहे मला आदि म्हणत जा बरं तुम्ही आदि सारंग जोशी.”

विश्वास(हसुन):- “हा...हा... बघीतलत ही आहे आत्ताची जनरेशन. हो... हो... विसरलोच हं बेटा. बरं ते सोडा पण तुमची मुलगी कुठे आहे तिला बोलवा की”

साधना:- “हो आत्ता घेउन येते. तो पर्यंत तुम्ही काही तरी घ्या की. आलेच हं मी”

काही वेळानंतर....

साधना कृतिकाला घेउन येते.

कृतिका(खोलीतुन बाहेर येते आणि सगळयांना नमस्कार करते):- “ ”

विदया(हसुन):- “ये बाळ आमच्या जवळ बैस काय काय येत तुला? आणि तुझ्या हॉबीज काय आहेत?”

कृतिका:- “काकु माझ ग्रॅज्युएशन झाल आहे. मी एका इवेंट कंपनीत जॉब करते. हॉबीज म्हणाल तर जे इतरांना आवडत ते सगळ म्हणजे वाचन करायला आवडत रिकाम्या वेळेत मित्र-मैत्रींणीबरोबर आपल्या लोकांबरोबर फिरायला आवडत स्वयंपक देखील करते.”

विदया:- “वा! छान बरं लग्ना बद्दल तुला काय वाटत?”

कृतिका(हसुन):- “मी खोट नाही सांगणार खर तर सध्या माझ्या मनात लग्न जोडीदार हे विषयच नाहीये हे खरय की आता माझ वय एकोणतीस अहे त्यामुळे आता मी लग्नाचा विचार करायला हवा पण माझी काही स्वप्ने आहेत मला आई – बाबांसाठी करायच आहे. तुम्हीच सांगा मी माझीच स्वप्ने जगु शकले नाही तर मी दुसर्यांच्या अपेक्षा कशा पुर्ण करु शकणार आहे. पण जेव्हा मला सांगितल गेल की आता तुला मुल बघायला सुरवात करायला हवी तेव्हा मी ही एक विचार केला जे नात आई बाबानी माझ्यासाठी स्वत: निवडलय त्याचा विचार करुन मी त्यांच्याच इच्छेचा मान ठेवतीये आणि हे करताना मी येणा-या नात्याला पुर्ण समर्पणतेने निभवेन. माझ्यासाठी लग्नाची हीच परिभाषा आहे. कारण आपले आई वडील नेहमी आपल्या भल्याचाच विचार करत असतात. मी थोडी स्पष्टवक्ती आहे काही चुकीच बोलुन गेले असेल तर सॉरी हं.”

विश्वास:- “अरे! नाही बेटा बिलकुल नाही मोठयांचा मान ठेवण ही चांगली गोष्ट आहे. आणि स्पष्टवक्ता असण ही सुध्दा चांगली गोष्ट आहे अश्याच व्यक्ती खर्या असतात बर का, तु आपल्या मनातल शेअर केलस हे आवडल मला पण तुला लग्न करायच आहे की नाही मग बेटा.”

आलाप(मध्येच अडवत):- “आई बाबा तुमची हरकत नसेल तर मी कृतिकाला एकटयात भेटु का? मला जरा तीच्याशी बोलायच आहे.”

विदया(रागात):- “तुला काही आहे की नाही हे इंडिया आहे युएस नाही मोठे बोलत आहेत ना.”

साधना:- “वहिनी आहो इंडिया सुध्दा आता आधुनिक बनलाय भेटु दया त्यांना. त्यांना ही बोलायच असेल आपल काय चालुच राहणार. जा बेटा आलापला आपल घर दाखव.”

कृतिका:- “या.”

(दोघ तिथुन निघुन जातात. आणि मुला कडचे एक मेकांकडे बघतच राहतात)

कृतिका(चालता चालता):- “या ही आई बाबांची रुम. मग तुम्ही काय करता?”

आलाप:- “मी एका सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे.”

कृतिका:- “ओह नाईस आणि हॉबीज तुमच्या.”

आलाप:- “हॉबीज बाप रे.. माझ्याकडे इतका वेळच नसतो की मी स्वत:साठी काही वेळ काढु शकेन पण कधी असलाच तर मित्रांबरोबर ट्रेकींगला जात असतो कधी कधी.”

कृतिका:- “छान. तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि तुम्ही वेगळा अर्थ घेउ नका हं काय असत लग्नाआधी थोडस का होइना पण एक मेकांना समजुन घेतल तर पुढे प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि ही तसही फॉरमॅलीटी आहे बस ऍज फ्रेंड समजा.”

आलाप(हसुन):- “वा! फॉरमॅलीटी आणि मैत्रीच कॉम्बीनेशन मी पहिल्यांदाच ऐकतोय. म्हणजे मैत्रीत फॉरमॅलीटी सुध्दा असते हे पहिल्यांदाच कळाल मला. छान.”

कृतिका:- “मला तस म्हणायच न्हवत हो मी ते असच बोलुन गेले.”

आलाप:- “मी मजा घेत होतो ग तुझी असच एनीवेज खर सांगु का मला तुझा स्पष्टवक्ते पणा खुप आवडला माझ्यात नाहीये पण स्पष्टवक्तेपणा आपल्या मनातल शेअर करायला हिम्मत लागते.”

कृतिका:- “हिम्मत तर लागते पण आपल्यात खरेपणा असेल न तर मनातल सांगायला शेअर करायला अवघड जात नाही आणि शेवटी आपण कुणा जवळ शेअर करतो आपल्या माणसांजवळच न.(थोडस थांबत)... मला अस का वाटतय तुम्हाला माझ्याशी काही तरी शेअर करायच आहे.”

आलाप:- “शेअर तर करायच आहे पण विचार करतोय तु कस रिऍक्ट करशील. पण सांगाव तर लागणारच आहे”

कृतिका:- “मी अस मानते की जे होत असत ते तोच करवत असतो तुमच्या मनात जर काही असेल तर अगदी निसंकोच होउन सांगा उदया आपल्याला एका नवीन आयुष्याला सुरुवात करायची आहे तेव्हा ती सुरुवात एका चागंल्या नात्याने व्हायला नको?”

आलाप:- “तुझं म्हणण बरोबर आहे पण मला मैत्रीच्या नात्या बद्दल नाही तर लग्नाच्या नात्या बद्दल बोलायच आहे. तुझ्याशी आय होप तु मला समजुन घेशील.”

कृतिका:- “अगदी निसंकोच पणे बोला काय बोलायच होत तुम्हाला?”

आलाप(थोड थांबत):- “अं, ॲक्चुली माझ एका मुलीवर प्रेम आहे. पण ही गोष्ट मी आई बाबांना सांगु शकत नाही कारण आई बाबांना इथलीच मुलगी हवी आहे ते माझ्या प्रेमाचा कधीच स्वीकार करणार नाहीत. मी जेव्हा तुझ बोलण ऐकल तेव्हा तु मला समजुन घेशील अस मला वाटल म्हणून मी तुला हे सगळ क्लीअर केल मला माहीतीये हे सांगुन मी तुझ्या मनाला दुखवतोय पण तुच सांग जर मी माझ्या खर्या प्रेमाला साथ देउ शकलो नाही तर आपल्या नात्याला ही साथ कसा देउ शकणर आहे आणि हयात एक नाही तीन आयुष्य बरबात होतील ते वेगळच. मला साथ देशील न मग देशील मला नकार?”

कृतिका(विचार करत):- “तुम्ही तर मला धर्मसंकटात टाकलतं जर हे लग्न तुम्हाला करायचच नव्हत तर आधी सांगता येत न्हवत का पण इट्स ओके मी बघते काय सांगायच ते डोंट वरी चलायच खुप वेळ झालाय”

(दोघ हॉलमध्ये येतात...)

साधना:- “या दोघ... कस वाटल बेटा आमच घर तुला? तुमच्या इतक मोठ नाहीये पण आहे आपल छोटस घर.”

विदया:- “घर लहान किंवा मोठ आहे हे महत्वाच नसत हो घरातली माणस कशी आहेत हे महत्वाच आणि त्यात तुम्ही खुपच मोठे ठरलात.”

जोशी काकु:- “हे खरय हं, विदया साधना गीरीष आणि कृतिका हयांचा स्वभाव खुप साधा आहे हे कुटूंबच खुप साध आहे.”

विश्वास:- “मग.. तुमचा दोघांचा काय निर्णय आहे बेटा. आमचा आलाप आवडला की नाही मग.”

कृतिका(एकदम सांगते):- “नाही, सॉरी काका पण मला हे लग्न मान्य नाही.”

साधना(मधेच अडवत):- “तु काय बोलतीयेस कळतय न तुला, शुध्दीत आहेस न तु चक्क इतक्या चांगल्या स्थळाला तु नाही कस म्हणू शकतेस.”

कृतिका:- “आई माझ अजुन बोलण झाल नाही आहे. मी बोलु का की सगळे निर्णय तुम्हीच घेणार आहात. तर मला माफ करा मी हे लग्न करु शकत नाही कारण तुम्हीच सांगा ज्याच पहिलेच एका मुलीवर प्रेम आहे अश्या मुलाबरोबर मी कस खुश राहु शकणार आहे काका काकु तुम्ही सगळे चांगले आहात यात काहीच वाद नाही मी नशीबवान असते जर मी तुमच्या घरी कायमची रहायला आले असते तर. पण तो हक्क माझा नाही दुसर्या मुलीचा आहे आणि जर मी त्यांच्या आयुष्यात आले तर आमच तीघांच आयुष्य बरबात होईल त्यामुळे हे लग्न न झालेलच बर आलाप मित्र म्हणून चांगला आहे पण मी नवरा म्हणून त्याच्याकडे नाही पाहु शकत माफ करा मला अरे आलाप आता तरी बोलणार आहेस की नाही ती कोण आहे ते?.”

आलाप:- “अस एकदम विचारलस तर कस सांगणार आहे मी.”

कृतिका:- “जस मला सांगीतलस तस आत्मविश्वासाने. बघ आज बोललास तरच पुढे काही तरी होउ शकेल नाही तर असच चालु राहणार आहे काय करायच काय नाही ते तु ठरव आणि कधी न कधी तु सांगणारच आहेस न मग आजच सांग सगळयांसमोर”

आलाप(थोड कचरत):- “आई... बाबा... कृतिका जे सांगतीये ते खरय, माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे आणि माझ तीच्यावर खुप प्रेम आहे. ती इकडचीच आहे इंडियातली फक्त तीचा जन्म तिकडचा आहे. मला वाटल तुम्ही माझ प्रेम स्वीकारणार नाहीत म्हणून बोलायला घाबरत होतो इतक्या दिवस सॉरी मी तुम्हाला आधी नाही सांगितल.”

विदया(चिडून):- “तु घरी चल आधी मग आम्ही बोलतो.(तीघांची माफी मागत) आम्हाला अशी आशा नव्हती आमच्या मुला कडुन आम्हाला माफ करा येतो आम्ही भेटू परत.”

(सगळे बाहेर पडतात. आणि संध्या स्तब्ध होउन सोफ्यावर बसते)

ब्लॅक आउट

प्रवेश:- ५वा

(सोफ्यावर संध्या आणि गीरीष विचारमग्न बसले आहेत. कोणीच कुणाशी बोलत नाहीत तेवढयात कृतिका बोलु लागते.)

कृतिका:- “माझ लग्न म्हणजे दोन देशांमधील वादाचा मुद्दा झालेला आहे.(चिडुन). आई –बाबा काय चालु आहे तुमच मला जरा कळणार आहे का? म्हणून मी सांगत होते सारख हा घाट नको मला माहीत होत नकार आल्या वर तुमची तोंड ही अशीच पडणार आहेत जर याच वाईट मला वाटत नाहीये तर तुम्ही का इतक मनाला लाउन घेतलय संपली आहेत का सगळी मुल आता कुणीच नाही का काय झालय तुम्हाला इतक प्लीज आता हा रडवेला चेहरा सोडा आणि पहिले माझी काळजी करण सोडा बर. जे माझ्या नशीबात आहे ते होईल आता चला हे सगळ संपवायच आहे हे खायला सुध्दा कोणी येणार नाही आपल्यालाच संपवायच आहे.”

(सगळे हसतात. आणि खाउ लागतात.)

संध्या(खाता खाता):- “काहो एक जयश्री कुलकर्णी होत्या न तुमच्या ओळखीच्या अजुन आहे का त्यांच्याशी ओळख?”

गीरीष(मधेच थांबत):- “हं... तरीच म्हणल अजुन विचारलस कस काय नाही अगं कस कळत नाही तुला आजच एक मुलगा तीला नकार देउन गेला आहे आणि लगेच तु परत मुलगा शोधायला लागणार? डोक्यावर तर पडली नाहीस न तु.”

संध्या:- “अस काय म्हणताय तुम्ही, मी फक्त विचारल तुम्हाला अस काय चुकीच विचारल आहे मी आपल्याला काय लगेच तीच लग्न लाउन दयायच आहे का पण शोधे पर्यंत तरी वेळ जातोच न.”

कृतिका(दोघांना थांबवत):- “आई बाबा कीती वेळा सांगतिलय भांडत जाउ नका म्हणून एक मिनीट बाबा. हं बोल तुझ्या मनात काय आहे नाव नोंदवुन ठेवायच अस मनात आहे का तुझ्या?”

संध्या:- “बेटा राग मानु नकोस पण मला सांग मी तुझ्यासाठी कधी चुकीचा निर्णय घेईल का? तुझ्या सगळया मैत्रीणींना बघ सगळयांची लग्न झालीयेत. ती शेजारची दीपा तीला आता चौथा महीना सुरू आहे आहे. तुझ्याच वयाची आहे न ती तुझी क्लासमेट आहे. मग मला सांग मला ही कुठे तरी वाटत असणार न आपण ही मीरवाव चार लोकांना जावयाच कौतुक सांगाव मग मी चुकते कुठे”

कृतिका(हसुन):- “अग वेडाबाई बाबांचा सांगण्याचा तो अर्थ नव्हता त्यांच एवढच म्हणण आहे की लगेच नको थोडा वेळ जाउ देत बस.”

संध्या:- “अस म्हणत म्हणत तर इतके दिवस गेले ठीक आहे चालु दया तुमच आता या विषयावर मी अजुन नाही बोलणार.”

गीरीष(वैतागुन):- “ठीक आहे बाई त्यांच्या कडे जाउन यायच आहे न येइन मी सकाळी जाउन आता जरा निवांत खाउन घेउ किती ही हयांच्या मना सारख करा तरी जीवाला काही चैन नाही.”

(संध्या शांत होते. आणि सगळे जेउ लागतात)

ब्लॅक आउट

प्रवेश:- ६वा

(सकाळी... रंगमंचावर वधु वर सुचक केंद्राच ऑफिस आहे. ऑफिस मध्ये संचालीका जयश्री कुलकर्णी वधु वरांच्या फायली चेक करत बसल्या आहेत. तेवढयात गीरीषचा प्रवेश होतो.)

गीरीष:- “येउ का आत, म्हणल बघाव ओळख आहे का की विसरले या गरिबाला.”

जयश्री कुलकर्णी:- “अरे बाप रे, अलभ्यलाभ अलभ्यलाभ तुम्हाला कस विसरु आम्ही या..या कसे आहात? आणि आमची कशी काय आठवण आली तुम्हाला.”

गीरीष:- “पोरीच लग्न काढलय करायला, म्हणल एकदा तुमची भेट घ्यावी काही चांगली स्थळ असतील तर तुमची मदत होईल म्हणून आलो. कुणी आहे का तुमच्या नजरेत सुटेबल.”

जयश्री कुलकर्णी:- “म्हणजे काय अहो हे कामच आहे माझ. तुम्ही एक काम करा हा एक फॉर्म आहे तो भरुन नाव नोंदवा कुणी इच्छूक असेल तर मी तुम्हाला कळवते. हे काय सध्या माझ तेच काम सुरु आहे”

(गीरीष कृतिकाचा फॉर्म भरतो.)

गीरीष:- “हं, हे घ्या मी फॉर्म भरलाय अजुन काही माहीती लागली तर नक्की कळवा येउ मी.”

जयश्री कुलकर्णी:- “हो, या. पण तुम्ही काहीच घेतल नाहीत मी चहा मागउ का? की अजुन काही घेणार.”

गीरीष:- “अरे नको नको आपल्यात कसली फॉर्मेलिटी चालु दया तुमच काम मी ही येतो आता पण तेवढ मुलाच मात्र बघा.”

जयश्री कुलकर्णी:- “तुम्ही काळजीच करु नका हो अगदी तीच्या मनासारखा बघते या.”

(गीरीष घरी येतो. हॉलमध्ये कृतिका फोनवर बोलत असते तेवढयात तीच लक्ष गीरीष कडे जात.)

कृतिका(फोन ठेवत):- “अरे बाबा आलात तुम्ही थांबा हं, पाणी आणते बसा” (पाणी आणत, बरय इथे आत्ता आइ नाहीये नाही तर प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली असती. चहा घेणार तुम्ही)

गीरीश:- “अगदी थोडासा”

कृतिका:- “आत्ता आणते.”(तेवढयात फोन वाजतो.)

(फोन उचलत.):- “ हॅलो. कोण बोलतय.”

सौरभ:- “कृतिका, आम्हाला पार्टी पाहीजे बरं का, तुझ प्रमोशन झालय आता”

कृतिका:- “आयला, तुला कोणी सांगितल. आणि पार्टी कसली माझ अजुन ठरायच आहे झाल नाही.”

सौरभ:- “अबे, कशा बद्दल बोलतीयेस तु लग्न ठरलकी काय तुझ”

कृतिका:- “तु कशा संदर्भात बोलत होतास मी खर तर तेच समजले.”

सौरभ:- “काय? खरच , म्हणजे डबल पर्टी चला आजच्या जेवणाची सोय झाली एकदाची. आता सगळयांना लगेच सांगतो. शुभश्च शिघ्रम.”

कृतिका(वैतागुन):- “तु शांत होण्याच काय घेशील? सांगशील मला”

सौरभ(मजेच्या स्वरात):- “काही नाही फक्त पार्टी. कधी देतेस बोल”

कृतिका:- तु मुदयाच बोलल्या नंतर. आता बोलशील”

सौरभ:- “ठीक आहे बाई. ईथे आमची कुणाला कदरच नाहीये जाउ दे.

कृतिका(मधेच थांबवत):- “सौरभ. बोलतोस”

सौरभ:- “तुझ प्रमोशन झाल आहे. आणि तुला कंपनी कडुन यु. एस. ला जायची संधी मिळाली आहे. आता तरी पार्टी होईल का?”

कृतिका(आनंदुन):- “दिली, पण जायच कधी सांगितलय”

सौरभ:- “आजच्या आठा दिवसानी मग पार्टी कधी”

कृतिका:- “देते रे, पण आता तुझ्याशी मी नंतर बोलते. आणि भेटुत नंतर आपण थँक्स ही बातमी देण्यासाठी बाय”

(कृतिका फोन ठेवते. आणि वडिलांना न्युज सांगते.)

कृतिका(फोन ठेवत):- “बाबा सौरभचा फोन होता. (आईचा प्रवेश) मला प्रमोशन मिळालय मि ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते तो दिवस आलाय आई बाबा.(दोघांना आनंदुन फिरवत) आय एम सो हॅपी.”

गीरीश(खुश होउन):- “काय? पण कधी जायच आहे बेटा. मी तुझ्या साठी खुप खुश आहे आशीच मोठी हो खुप नाव कमव.”

कृतिका:- “बाबा, आजच्या आठा दिवसानी जायच आहे. मला आता खुप तयारी करावी लागेल. आणि काय माहीत मला तीथलाच कुणीतरी आवडेल ही.”(लगेच तीच लक्ष आई कडे जात. संध्या मात्र ऐकुन शांत कृतिका आणि गीरीशमध्ये इशारे होतात)

कृतिका:- “आई तुला चालणार आहे न फॉरेनर मुलगा? की आपला शुध्द देसी बॉयच हवा.”

(गीरीष आणि कृतिका हसु लागतात. संध्या मात्र आपली मुलगी इतक्या दुर जाणार हया विचारानेच शांत)

कृतिका:- “आई. (भानावर आणत) जॉबसाठी जात आहे. कायमची लग्न करुन जात नाहीये. आता ही हालत आहे लग्न करुन गेले तर हीच काय होणार आहे देवच जाणे. बाबा एक ऑप्शन देते तुम्हाला घर जावईच शोधा ठरल. एकदम ठरल”

संध्या(भानावर येत):- “गप्प बैस. तुम्हा लोकांना माझ्या भावना कधीच समजणार नाहीत न. जाउ दे तयारी काय करावी लागेल.”

कृतिका(मिठी मारत):- “आई, अशी कशी ग तु. मला कळतय तुला कस वाटत असणार पण जॉब आहे न हा करावा तर लागणारच न डोंट वरी ओके.”

ब्लॅक आउट

प्रवेश:- ७वा

दोन दिवसानंतर

दुपारची वेळ

(रंगमंचावर. ऑफिसचा सेट उभा केला आहे. ऑफिसमध्ये गीरीश काम करत बसलाय तेवढयात जयश्री कुलकर्णींचा फोन वाजतो.)

गीरीश(काम करतोय तेवढयात फोन वाजतो):- “ट्रिंग... ट्रिंग... (फोन उचलत)कोण बोलतय?”

जयश्री कुलकर्णी(हसुन):- “माझा नं कॉन्टॅक्ट लीस्ट मध्ये ठेवा आता भाउजी त्याची खुप गरज पडणार आहे आता.”

गीरीश:- “अरे! सॉरी सॉरी... मी थोड बीझी होतो. बोला काय म्हणता.”

जयश्री कुलकर्णी:- “तुम्ही कृतिकाच आमच्याकडे प्रोफाइल बनवल होत न त्याला रीस्पॉन्स आलाय एक स्थळ आहे त्यांना कृतिका आवडली आहे . मुलगा यु.एस. चा आहे त्याच्या घरचे विचारत आहेत भेटू शकतो का म्हणून. काय सांगायच.”

गीरीश:- “हो का, छान आमची कृतिका सुध्दा जणार आहे यु.एस. ला. तुम्ही एक काम करा मला त्याची माहीती आणि एक फोटो व्हॉट्सअप करा मी एकदा घरी बोलतो मग कळवतो.”

जयश्री कुलकर्णी:- “ठीक आहे, मी तुम्हाला त्याची मीहीती आणि फोटो सेंड करते काय होतय मला कळवा म्हणजे त्यांना सांगायला बर होइल.”

(जयश्री कुलकर्णी माहीती सेंड करतात.)

घरी आल्यावर...

हात-पाय धुत...

गीरीश:- “अग ऐकलस का, आज जयश्री मॅडमचा फोन आला होता ऑफिस मध्ये. त्यांनी एक स्थळ सुचवलय काय सांगायच आहे त्यांना.”

संध्या:- “आता कसली स्थळ आपली पोरगीच सोडुन चालली आहे आपल्याला नको म्हणून सांगा त्यांना.”(दोघ ही हसतात.)

कृतिका(मजा घेत):- “माहीत असत माझ्या यु. एस. जाण्याने एवढा परिणाम होणार आहे तर आधीच सरांशी बोलले असते मी.”

संध्या:- “हो तु तर तस ठरउनच बसली आहेस न काय बोलणार मग मी.”

कृतिका:- “काय झालय आई आता तुला, अशी काय वागतीएस आणि उदया मला खरच यु.एस चा मुलगा बघायला आला आलाप सारख तर करणार नाहीस का तु माझ लग्न तेव्हा तर अगदी उत्साही मुर्ती होतीस तु मग आता काय झाल. परत एकदा सांगते काळजी करु नकोस होईल सगळ ठीक.”

संध्या(विषय बदलत):- “कुठला आहे मुलगा. बघु फोटो आणि माहीती.”

गीरीश(फोन देत हळुच सांगतो):- “मुलगा यु.एस चा आहे.”

(परत दोघ हसु लागतात. संध्या मात्र गप्प होउन माहीती बघु लागते. कृतिकाला ही दाखवते.)

कृतिका(फोटो बघत):- “श्शी... किती काळा आहे हा, बाबा जयश्री काकुंना माझ्या साठी दुसर कुणी सापडल नाही का? नो वे... लगेच पसंद नाही म्हणून सांगा प्लीज.”

गीरीश:- “बेटा, अस कुणाला ही नाव ठेवत नसतात. हीच शिकवण दिलीये का आम्ही तुला. आणि रंगरुपा वरुन तर कुणाला ही जज करायचच नसत काय माहीत तीच व्यक्ती उदया तुझ्या कामी येई. मुलगा चांगला आहे शिकलेला आहे तुझ्या फिल्ड मधला आहे विशेष म्हणजे यु.एस. चा आहे. बघायला काय हरकत आहे.”

कृतिका:- “बाबा आता तुम्ही आईसारख वागायला लागलात बरं का”

(साधना आणि गीरीश दोघ ही गप्प होतात. गीरीश जयश्री कुलकर्णींना नकार कळवतो.)

ब्लॅक आउट

प्रवेश :- ८वा

सकाळची वेळ...

(रंगमंचावर. एअरपोटचा सेट उभा केलाय. कृतिका सगळयांना यु.एस. ला जाण्यासाठी निरोप देतीये. तीचे सहकारी आई वडील तीला सीऑफ करत आहेत.)

ब्लॅक आउट

प्रवेश :- ९वा

सकाळची वेळ...

(रंगमंचावर परत एअरपोर्टचा सेट उभा केलाय. कृतिका लगेज घेउन वाट बघत उभी आहे. तेवढयात विराजचा प्रवेश होतो.)

विराज(धावत येउन):- “सॉरी.. सॉरी.. मला जरा उशीर झाला ऑफिसच काम होत म्हणून. अं वेलकम.. या”

(विराज फुलांचा बुके देउन तीच लगेच उचलतो. आणि कृतिका मात्र गोंधळलेल्या स्थीतीतच.)

विराज:- “मग, इथे पोहचताना काही त्रास तर नाही झाला न. पहिल्यांदा आलीस का यु.एस. ला. ओह अगेन सॉरी मी तुला विचारलच नाही. मी तुला अग तुग करू शकतो न.”

(कृतिका गोंधळलेल्या अवस्थेत.)

कृतिका:- “हो, चालेल न.”

विराज(चालता चालता):- “ग्रेट. हाय, मी विराज. विराज जोशी. तुझी इथली सगळी व्यवस्था बघण्याची जबाबदारी सरांनी माझ्यावर सोपवली आहे. इथे तुला कुठलीही मदत लागली तर मला सांग मी करेल. म्हणजे अगदी तु ऑफिस मध्ये सुध्दा माझी असीस्टंट आहेस त्यामुळे काळजी करु नकोस. ये बैस गाडीत”

(सगळ ऐकुन कृतिका अजुनच गोंधळुन जाते. आणि तशीच गाडीत बसते.)

रुमवर पोहोचल्यावर....

(दोघ रुम वर पोहोचतात. विराज लगेज हॉलमध्ये ठेवतो.)

विराज(रुम दाखवत):- “ये तुला तुझी रुम दाखतो. तशी रुम छोटीच आहे इथे सगळी घर किंवा नुसत्या रुम्स सुध्दा लहानच असतात. काय मोठी घर घ्यायला परवडणारी नसतात न. तरी बरय ही रुम तरी अवलेबल होती इथे खुप पटकन घर जातात म्हणून. अरे बघ मीच कीती वेळच बोलतोय तु सांग की काही प्रमोशन झालय तुझ कस वाटतय आता तुला.”

कृतिका(भानावर येत):- “थँक्स, आज मला खुप मदत केलीस अश्या परक्या शहरात कुणी पटकन मदत करत नाही.”

विराज:- “त्यात काय, ते कामच आहे माझ. परक्या देशात आपली माणसच कामी येतात न. बर मी आता येतो इथे तुला लागणार सगळ आणुन ठेवलय काही लागल तर मला फोन कर खुप थकली आहेस आता आराम कर मी तुला उदया भेटतो बाय.”

कृतिका(विचारमग्न अवस्थेतच):- “बाय. सावकाश जा”

(कृतिका आपल्याच विचारात मग्न असते. आणि तसच स्मीत हास्य करते.)

ब्लॅक आउट

प्रवेश :- १०वा

सकाळची वेळ....

(रंगमंचावर.. मधोमध एक बेंच ठेवलाय आणि बेंचवर कृतिका विराजची वाट बघत बसलीये तेवढयात विराजचा प्रवेश होतो.)

कृतिका(वाट बघत बसलीये):-‍ “ ”

विराज:- “हाय, सॉरी अग एक काम आल होत म्हणून उशीर झाला बोल काय म्हणतेस अस एकदम तातडीने बोलवलस. ऑल ओके न.”

कृतिका:- “कीती वेळा मला सॉरी बोलणार आहेस विराज. मी जे तुझ्याशी वागलीये त्या साठी मी तुला एकदा पण सॉरी नाही म्हणाले.”

विराज:- “तु कशा बद्दल बोलत आहेस मला नाही समजल.”

कृतिका:- “बघ अजुन सुध्दा तु विसरल्याच नाटकच करतोएस. मी एक बोलु”

विराज:- “बोल”

कृतिका:- “विराज मी तुला नीट ओळखुच शकले नाही. आणि तु मात्र ओळखलेल असुन देखील न ओळखल्या सारख करुन मला मदत करत गेलास मी मात्र तुला न भेटताच नकार दीला तु चांगला नसण्याची परीक्षा मी तुझ्या रंगाने केली त्यासाठी सॉरी. पण माझ्या आता लक्षात आलय रंगाने कुणाची ही परीक्षा होउ शकत नाही. तु एक व्यक्ती म्हणून खुप चांगला आहेस. बाबा म्हणाले होते रंगावरुन जज करु नकोस कदाचीत तोच तुला पुढे मदत करेल. एक बोलु मान्य आहे कदाचीत होण शक्य नाही पण आता तु मला आवडु लागला आहेस माझ्याशी लग्न करशील.”

विराज(गोंधळून):- “काय, कृतिका मी तुला हा विचार करुन मदत नाही केली. माझ्या तर मनात पण नाही अस काही. हा राहीला प्रश्न त्यावेळेला तु नकार देण्याचा तर ते अपेक्षीतच होत मला त्या गोष्टीच काहीच वाटल नाही. सोड तु इतक मनाला लाउन घेउ नकोस”

कृतिका:- “पण मग मी तुझ उत्तर काय समजु, मी आवडले नाही तुला.”

विराज:- “तस नाही.(मधेच थांबत)मला जरा वेळ देशील विचार करायला मी तुला कळवतो चल येउ मी.”

कृतिका(मान हलवत):- “हं.”

ब्लॅक आउट

प्रवेश :- ११वा

संध्याकाळची वेळ...

(रंगमंचावर. कृतिकाचे आई वडील कृतिका विराजचे आई वडील सगळे आनंदात बसलेले आहेत आणि लग्नाची बोलणी सुरु आहेत.)

ब्लॅक आउट

पडदा पडतो...


इतर रसदार पर्याय