स्वप्नाचा पाठलाग!-----भाग ३ suresh kulkarni द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वप्नाचा पाठलाग!-----भाग ३

डॉ. मुकुलनी भडक रंगाच्या वटवाघूळीच्या चित्राचे पुस्तक निनाद आणि स्वराली समोर टाकले.
"हे वटवाघूळीच्या लाईफ सायकलवरचे पुस्तक आहे. निसर्गात अनेक प्राणी असतात त्यातलाच हा एक. हा निशाचर प्राणी आहे. म्हणजे आपले भक्ष रात्री शोधतो. त्यात घाबरण्या सारखं काहीच नाही. घोडा, कुत्रा, मांजर असते तसाच हा हि एक प्राणी आहे!" डॉ. मुकुल एकी कडे माहिती सांगत होते, तर दुसरीकडे त्यांचे लक्ष निनाद बसला होता त्याच्या मागच्या भिंतीवरील मॉनिटरवर होते. निनादच्या तर्जनीला लावलेल्या सेन्सरमुळे त्याचे बीपी, प्लस, ईसीजी डॉ. मुकुलना दिसत होते.
डॉक्टरांनी वटवाघुळीनची संपूर्ण लाईफ सायकल समजावून सांगितली. बीपी -प्लसमध्ये धोकादायक फरक पडला नव्हता. डॉक्टरांसाठी तो सकारात्मक संकेत होता.
मग त्यांनी लॅपटॉपवर लाईव्ह वटवाघुळे, त्यांची पिलं, उलट टांगून घेऊन झोपण्याची किंवा विसावा घेण्याची पद्धत, त्यांची भक्ष्य शोधन पध्द्त, निवासस स्थाने. सगळा जीवनक्रम दाखवला. निनादने तो शांतपणे पहिला.
" निनाद, पहा किती सामान्य प्राणी आहे हा! तुम्ही उगाच याला भिता! आता हेच पहा आपण हि वटवाघूळांची चित्रे गेली तासभर पहातोय, तुम्हास काही वाटले का?"
"नाही! तस काही वाटलं नाही. कारण, तुम्ही आणि स्वराली सोबत होताना! म्हणून मला सेफ वाटत होत!"
क्षणभर डॉ. मुकुल विचार मग्न झाले.
" ओके. निनाद, आम्ही बाहेर बसतो. आता पाहिलेली व्हिडीओ क्लिप तुम्ही एकटे पहा! मला खात्री आहे, तुम्ही ती पाहू शकाल. फक्त ती आता तुम्हास समोरच्या लार्ज टीव्हीस्क्रीन वर दिसेल! घाबरू नका, आम्ही खूप जवळ आहोत!"
निनादने धडधडत्या अंतकरणाने ती क्लिप पहिली. त्याचा बीपी आणि प्लस शूट झालं होत. पण ते अपेक्षितच होत. त्याच्या मनाने आणि शरीराने हा प्रयोग चांगलाच पेलला होता. डॉ. मुकुल समाधानी होते.
"ओके निनाद! ब्रेव्ह! हा तुमचा गृहपाठ समजून हि क्लिप तुम्ही घरी जमेल त्या वेळेला, जमेल तितके वेळा पहात जा. पहाण्याच्या वेळेत बदल करत रहा. कधी सकाळी, कधी मध्यरात्री, कधी पहाटे. त्याने तुमची भीती कमी होत जाईल! जेव्हा तुम्हास असे वाटेल कि यात भिण्यासारखे काही नाही, तेव्हा माझ्या कडे या. रोजचे औषध मात्र चुकू देऊ नका!"
ती व्हिडीओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह घेऊन स्वराली आणि निनाद क्लीनिक बाहेर पडले. आपण उगाच त्या वटवाघळींना भीत होतो! बेसलेस! बरे झाले स्वरालीचे ऐकले ते. शी इज आलवेज राईट! मग --शकी म्हणते ते कसे खोटं असेल? ती आपल्याला कधीच खोटं बोलत नाही! खूप दिवस झाले शकी भेटली नाही. भेटली तर या बाबतीत तिच्याशी चर्च्या करता येईल. निनादने आपल्याच विचारात असताना त्याने कारचे ड्राइव्हिंग व्हील जवळचे दार उघडले. स्टियरिंगवर बसलेले काहीतरी पंख, फडफडत उघड्या दारातून बाहेर आकाशात झेपावले! बेसावध निनाद भीतीने दचकला!
"मम्मी, ते बघ त्या समोरच्या कारच्या नंबर प्लेटवर एक बॅट, खाली डोकं वर पाय करून लोंबकळतींयय! आणि तिचे डोळे टेललाईट सारखे डार्क रेड आहेत!" निनादच्या मागल्या कारमधील ती चुणचुणीत मुलगी आपल्या आईला काहीतरी दाखवत होती, पण मम्मा मोबाईल मध्ये गुंतली होती.
०००
हवेत गारवा चांगलाच जाणवत होता.मध्य रात्र उलटून गेली होती. जाड रजईत लपेटून निनाद गाढ झोपला होता. खोलीत गच्च अंधार दाटला होता. पण तो निर्जीव नव्हता. त्यातली वळवळ जाणवत होती. काहीतरी तरी तेथे दाटीवाटीने बसले होते. इतका अंधार असूनही निनादला ते भिंतीवरचे घड्याळ आणि त्यात रात्रीचे दोन वाजून काही मिनिटे झाल्याचे दिसत होते. अंधारातली हि वळवळ, असंख्य लाल भडक डोळ्यांच्या वटवाघुळीची असल्याची, निनादला खात्री होती! पंखांची फडफड राहून राहून त्याच्या कानात धडका मारत होती. खोलीतला सारा आसमंत त्यांनीच व्यापला असावा! कुठल्याही क्षणी हि धाड आपल्यावर हल्ला करणार, आधी रक्त पिऊन टाकणार, म्हणजे रक्ताचा थेंबही कोणास दिसणार नाही! मग मांसासाठी लचके तोडणार, शेवटच्या कणा पर्यंत! सकाळी फक्त पांढरा फेक हाडानचा, कोरडा सांगाडा लोकांच्या हाती लागणार! हि --हि सगळी वटवाघूळ, त्या लहानपणी आपल्या हाताने जखमी झालेल्या वटवाघुळीचे अनुयायी आहेत! ते असाच बदला घेणार!! शकी नेहमी हेच सांगते. निनादच्या मनात अशा विचारांचे काहूर माजले असतानाच, खाड्कन खोलीचे दार उघडले. त्या आवाजाने त्याची विचार शृंखला तुटली. उघड्या दारात एक मानवी आकृती त्याला स्पष्ट दिसत होती. तिच्या हाताच्या जागी पंख होते, फोल्ड केलेले, वटवाघुळी सारखे! आणि ती एका स्त्रीची आकृती होती! तिने निनादकडे पहिले पाऊल टाकले. भीतीने निनादच्या तनामनावर केव्हाच अंमल सुरु केला होता!
निनादच्या घशाला कोरड पडली होती. मदतीसाठी ओरडण्याची त्याची इच्छा होती, पण घशातून आवाज निघत नव्हता! त्या स्त्रीची काळी आकृती, डौलदार पावले टाकत सावकाश त्याच्या दिशेने येत होती!
आणि अचानक लक्ख उजेड पडला!
"निनाद! जागा हो! काय होतंय?" स्वराली त्याला हलवून जागे करत होती.
निनाद जागा झाला. स्वरालीने दिलेले पाणी पिल्यावर त्याला बरे वाटले.
" काय झालं, निनाद?"
" पुन्हा तेच स्वप्न?"
"निनाद, तुझ्या मनातल्या भीतीने हे स्वप्न पडतंय. आपण खरेतर हि बाब डॉक्टरांना सांगायला हवी होती. "
"पण अशात या स्वप्नाचा त्रास होत नव्हता! त्या हिप्नॉटिझमच्या सेशन पासून पुन्हा सुरु झालाय! आणि हे त्या मुकुलमुळे झालाय! आताशा ते स्वप्न दिवसेन दिवस भयानक होत चालयय! "निनाद स्वरालीवरच चिडला.
"स्टुपिड! डॉ. मुकुल यातला तज्ज्ञ माणूस आहे! त्याच्या मुळे काहीही झालेले नाही!"
"स्वरा, मला या वटवाघुळीची दहशत वाटायला लागली आहे! ती मला नकोय! सांग तुझ्या त्या बोकूड दाढीला!"
"सांगणारच आहे!"
०००
निनाद एकटाच त्या सिसिडेच्या कोपऱ्यातल्या सोफ्यावर कोल्डकॉफ़ीचा ग्लास घेऊन बसला होता. हे स्वप्न असच पडत राहील तर? तीन शक्यता होत्या. एक तर आपल्याला वेड लागेल! दोन भीतीने हार्टअट्याक येईल! किंवा आपणच आत्महत्या करू! निनाद आपल्या विचारात असताना कोणीतरी आल्याचे त्याला जाणवले.
"वाव! सर्पराईज! तू पुन्हा भेटशी असे वाटले नव्हते! आणि अजून एक, कसली सुंदर दिसतीयस या ब्लॅक आऊट फिट मध्ये, शके!?"
"निन्या! नुसताच वयाने वाढलास, अजून तसाच ठोंब्या आहेस! कस त्या पांढऱ्या पालीन तुला पसंत केलं कोणास ठाऊक? तुझ्या सारखी मीही वयाने वाढली आहे! आणि मला माझ्या फिगरचा मला अभिमान आहे!"
"शके, तू आपल्यात स्वरालीला आणू नकोस!"
"निन्या, मलाही ती आपल्या दोघात नकोच आहे!"
"इतके दिवस कोठे होतीस? अन आज कशी अचानक उगवलीस?"
"तुमने पुकारा और हम चले आये!"
"हे मात्र खरय! तुझी आठवण येत होती!"
"का रे?"
" अग, ते लहानपणच वटवाघुळंच स्वप्न! स्वराली म्हणते ते सायकिक आहे! या हि पुढे, ती मला त्या बोकूडदाढी मुकुल कडे उपचारासाठी नेतीयय! काय करू?"
"निन्या, एक गोष्ट लक्षात ठेव! ते वटवाघूळ खरं होत! त्याचा तो बदला घेणारच! हेही खरय! "
"म्हणजे मी मरणार?"
"नाही! मी तुला मरू देणार नाही! तू मला हवा आहेस!"
"माझ्या स्वप्नात कशी येशील?"
"नाही! मी तुझ्या जागेपणी येत जाईन!"
"अन स्वरालीला कळलं तर?"
"मी नाही कळू देणार!"
"उपचारच काय करू?"
"नको! त्याचा उपयोग होणार नाही!"
"तुला काय माहित?"
"मला ती 'वटवाघूळ' कानात सांगून गेलीयय! निन्या, माझ्यासाठी पण कॉफी आण मी वॉश रूम मधून येतेतोवर!"
निनादने अजून एक कॉफी घेताना पाहून तो काऊन्टरवरील पोरगी विचित्र नजरेने पहात होती. अजून कॉफी शिल्लक असताना, हा वेडा दुसरी कॉफी का घेतोय, हे तिला कळत नव्हते. काही का असेना, पैसे देतोय ना, मग झाले तर.
निनाद कॉफी घेऊन आला आणि शकीची वाट पहात होता. आणि मेन एंट्रीतून स्वराली येताना दिसली!
"निनाद तू इथे? होऊ स्वीट? माझ्या साठी कॉफि घेऊन ठेवलीस? पण तुला कसे माहित मी येणार म्हणून?" स्वरालीने जवळ येत विचारले.
" तुझी गाडी पार्किंग लॉट मध्ये जाताना पहिली. आणि कॉफी घेऊन आलो! आता तुला फोन करून सांगणारच होतो, कि तुझ्या साठी कॉफी आणली आहे म्हणून!"
"बरे झाले तू प्रत्यक्षच भेटलास ते, मी तुझ्या स्वप्नाबद्दल डॉ. मुकुलला फोनवर बोलले. त्यांनी आपल्याला भेटी साठी बोलावलंय! आता चार वाजलेत, पाच नंतर केव्हाही या, म्हणालेत. आपण जरा फोरम मॉल मध्ये खरेदी करू आणि मग क्लिनिकला जावूत! चालेल ना?" स्वराली आधीच निर्णय घेऊन टाकते. तेथे जाण्यात काहीच अर्थ नाही. 'उपयोग होणार नाही!' म्हणून आत्ताच शकी म्हणाली होती! अरे बापरे, कुठल्याही क्षणी शकी येण्याची शक्यता होती! तशी काळजी नव्हती म्हणा! कारण स्वराली शकीला ओळखत नव्हती, आणि शकी ओळख दाखवणार नव्हती!
कॉफी संपवून निनाद आणि स्वराली निघून गेले. शकी कोठेच दिसत नव्हती. पण शकीची फिगर निनादच्या नजरेसमोरून जात नव्हती! आज पहिल्यांदा त्याला तिच्यातल्या सेक्स आपीलची जणीव झाली होती!
सिसिडेच्या पोर्चच्या कोपऱ्यात छताला एक लाल भडक डोळ्याचे वटवाघूळ लटकत होते!

(क्रमशः )