चिनू - 3 Sangita Mahajan द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चिनू - 3

चिनू

Sangita Mahajan

(3)

इकडे पोलिसांचा तपास वेगाने सुरु झाला. सगळ्यात आधी त्यांनी चिनुच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. मैत्रिणींनी सांगितले चिनू आणि रकमा आमच्यासोबतच निघाल्या होत्या. यांच्यासोबत निघाल्या होत्या त्याअर्थी रस्त्यातच काहीतरी झालं असलं पाहिजे. पोलीस विचार करत होते. पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेली जिथे चिनू पिकनिकला गेली होती. तिथे त्यांनी चिनु आणि रकमाचा फोटो दाखवून सगळीकडे चौकशी केली. पण तिथे काहीच सुगावा लागला नाही. पिकनिक स्पॉटच्या जवळ इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी शोधून झाले. सर्व पोलीस स्टेशनला खबर देऊन ठेवण्यात आली होती. सगळ्या खबरी लोकांना पण कामाला लावलं. पोलिसांना हेच समजेना कि घरी यायला निघालेल्या मुली मधेच गायब कशा झाल्या. तपास करता करता आता ८ दिवस निघून गेले, पण चिनू आणि रकमाचा काहीच पत्ता लागला नाही. एवढी गोंडस पोर कुठे गेली असेल? काय झाले असेल त्यांच्यासोबत? रागिणीला तर वेड लागायची पाळी आली. शेजारी पाजारी सगळे तिला समजावत होते. चिनुच्या आठवणीने ती आजारी पडली.

पोलीस स्टेशनमध्ये देशपांडे साहेब बसले होते आपलं काम करत आणि बाकी पोलिसांना सूचना देत. त्यांचा चांगलाच धाक होता पोलीस स्टेशनमध्ये. बाकी सगळे त्यांना घाबरून असायचे. खूप बहाद्दूर, प्रामाणिक आणि थोडे स्ट्रिक्ट असे ते होते. ते एक हुशार आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस होते. सगळे कामात दंग होते इतक्यात फोनची रिंग वाजली. फोन त्यांच्या खबरीचा होता. त्याने ताबडतोब भेटायला सांगितले, याचा अर्थ काहीतरी महत्वाची खबर नक्कीच. फोन आला तसे इन्स्पेक्टर देशपांडे ताबडतोब जीप घेऊन निघाले. इन्स्पेक्टर देशपांडेच चिनूचा तपास लावत होते. माळावरच्या खंदारवर रामा खबरी त्यांची वाट बघत उभा होता. १/२ तासात देशपांडे तिथे पोचले. "बोल रामा काय खबर आहे?" देशपांडे म्हणाले. "साहेब माझ्या गावाकडून एका मित्राचा फोन होता, त्याने रकमाला जवळच्याच एका गावात बघितलं आहे तिच्यावर नजर ठेवायला मी त्याला सांगितलं आहे, आपल्याला निघायला हवं लगेच तिकडे." रामा म्हणाला. "well done रामा, गुड जॉब. चांगली बातमी दिलीस." देशपांडे म्हणाले." त्याला काही पैसे पण त्यांनी दिले बक्षीस म्हणून. लगेच देशपांडेंनी पोलीस स्टेशनला फोन करून पूर्ण तयारीनिशी निघण्याची तयारी करायला सांगितले. लागलीच रामा, देशपांडे आणि सोबत २ कॉन्स्टेबल असे मिळून पालेगावला निघाले जिथं रकमा दिसली होती. गाव थोडं दूर होतं. १० तासाचा प्रवास करून सगळे पोचले, रामाचा मित्र त्यांची वाटच बघत होता. रामाने विचारले " कुठं आहे रकमा"? त्यानं रकमेचं घर दाखवलं. "इथेच राहते रकमा" तो बोलला. देशपांडे आणि बाकी पोलीस साध्या वेशात आले होते, कारण कोणाला संशय आला असता तर सर्व प्लॅन बिघडला असता, शिवाय रकमावर कुणीतरी पाळत ठेऊन असण्याची शक्यता होती. साधारण २ तासांनी रकमा आली, निस्तेज आणि एकदम कृश दिसत होती ती. अगदी आजारी असल्यासारखी वाटत होती. कुलूप काढून जशी ती घरात गेली, बाकी सर्व जण लगोलग घरात शिरले. रकमा तर त्यांना बघून बावरून गेली, असे अचानक सगळ्यांना समोर बघून ती अवाक झाली, तिला काहीच सुचेना. तिला बसायला सांगून देशपांडेंनी आपली ओळख सांगितली. आपल्या गावाचं नाव ऐकून रकमा घाबरली आणि कावरी बावरी झाली. तिने लगेच घराची खिडकी बंद केली. ती जोरजोराने रडू लागली. जणू आज ती मोकळी होत होती, तिचं रडणं थोडं कमी झाल्यावर देशपांडेनि विचारायला सुरुवात केली. "सांग चिनू कुठं आहे? का पळवून आणलं तिला?" चिनूचं नाव ऐकून तर ती आणखीच रडायला लागली. थोड्या वेळाने ती सांगू लागली, "मी नाही पळवलं साहेब तिला उलट मीच गेल्या १ महिन्यापासून पूर्ण धक्यात होते आता थोडी सावरली आहे, मी आणि चिनू त्या दिवशी ट्रिप वरून घरी जात होतो, दोघी पण खूप खुश होतो, घरापासून थोड्या अंतरावर होतो इतक्यात एक गाडी जवळ अली आणि आम्हा दोघींना त्यात जबरदस्तीने बसवलं आणि गाडी लगेच वेगाने सुरु पण झाली. दोघींच्या तोंडाला त्यांनी कापड बांधलं आणि हाथ पण बांधले, चारजण होते ते, एकदम धिप्पाड आणि दिसायला भयानक. त्यांनी माझा मोबाइल पण काढून घेतला आणि त्याचं कार्ड लगेच काढून ते कापून टाकलं. त्यांनी आम्हाला खूप खूप लांब कुठेतरी नेलं. २ दिवस तर काही खायला-प्यायला पण नाही दिलं. तिसऱ्या दिवशी एक माणूस आला आणि त्यानं चिनुला जबरदस्तीने माझ्यापासून दूर नेलं. ती खूप रडत होती आणि घाबरली पण होती. नंतर आतल्या खोलीत नेऊन तिला या लोकांनी उशी तोंडावर दाबून मारून टाकलं साहेब" एवढं सांगून रकमा जोरजोरात रडू लागली, आक्रोश करू लागली. "लहान असल्यापासून मी तिला बघत आले, एवढी लाडात वाढलेली पोर तिच्या आई-बाबानी तिला एका राजकुमारीसारखी ठेवलेली, आणि या राक्षसांनी तिला एवढ्या कऱूरपणे मारून टाकली, वाटोळं होईल साहेब त्यांचं. आणि तिला नंतर चौघे मिळून कुठेतरी घेऊन गेले. मला तिथेच कोंडून गेले. ते परत आल्यावर मला त्यांनी या गावात आणून सोडले आणि धमकी दिली कि यातलं काही मी कोणाला सांगितलं तर मलाही ते मारून टाकतील. ते खूप भयंकर लोक आहेत. त्यांची माझ्यावर नेहमी नजर असेल असंही त्यांनी सांगितलं." हे सर्व ऐकून सगळे सुन्न झाले. थोडा वेळ तिथे शांतता पसरली, नंतर देशपांडे बोलू लागले, "त्या लोकांना तू ओळखू शकतेस का?" "नाही साहेब त्यांनी मास्क घातले होते." रकमा. काहीतरी असं आठवून सांग त्यांच्याबद्दल, शरीरावरचा डाग किंवा काही वेगळी style किंवा त्यांनी काही नाव वगैरे कुणाचं उच्चरला होतं का?" देशपांडे. थोडा वेळ आठवून रकमा म्हणाली "जो माणूस बाकीच्यांना ऑर्डर करत होता त्याच्या हातावर गरुडाचं गोंदण होतं साहेब. बाकी तर जास्त काही सांगता नाही येणार. हा आणि त्यांना कुणाचा तरी फोन येत होता. पण काय बोलत होते ते नाही सांगता येणार कारण ते बाहेर जाऊन बोलत होते. पण त्यांची एक-दोन माणसं इथे जवळ-पास राहत असतील असं वाटतं कारण माझ्यावर नजर ठेऊन असतील असं ते म्हणाले होते आणि त्यांनीच मला हे घर घेऊन दिलं होतं भाड्याने. आणि जाताना मला धमकी पण देऊन गेलेत कि आम्ही इथेच राहतो या गावात, तुझ्यावर कायम आमची नजर असेल, त्यामुळं पळून जाण्याचा प्रयत्न करशील तर याद राख तुझी पण तीच हालत होईल जी त्या दुसऱ्या पोरीची झाली. एक दोन वेळा तर मी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण कसं माहित नाही पण त्यांना लगेच माहित झालं होतं." "घराचं भाडं तू कुणाकडे देतेस?" देशपांडेंनी विचारलं. "घरमालक महिन्याला येऊन घेऊन जातात." रकमा बोलली. "ओके मग या घरमालकाला नक्कीच माहित असेल त्यांच्याबद्दल. तो कुठे राहतो माहित आहे का?" देशपांडे. "नाही साहेब ते स्वतःच येतात महिन्याला." रकमा. "आता कधी येणार आहेत?" देशपांडे. "२ दिवसांनी येतील." रकमा. "ओके, मग ते आले कि आम्हाला लगेच इशारा कर, आम्ही इथेच जवळपास लपून असणार आहोत, आणि काही काळजी करू नकोस. नेहमी जशी राहतेस तशी नॉर्मलच राहा, त्यांना संशय यायला नको." देशपांडे. सगळे निघून जातात.

******