Sarthak - 1 books and stories free download online pdf in Marathi

सार्थक भाग १

सार्थक
ज मला सकाळी सकाळी फोन आला की तुम्हाला बेलापूर गावा ला जायचं आहे. बेलापूर गाव ऐकले आणि जुन्या आठवणी चालू झाल्या. तो विचार करत असताना. आई समोरून आली म्हणाली काय झाले. मी काय नाही बोलत तिचे दर्शन घेतले. आणि म्हणलो आज मला बाहेर जायचं आहे. येण्या साठी उशीर लागेन. ती म्हणाली जेवण कर वेळे वर आणि ती प्रिया प्रिया आवाज देते. प्रिया ही माझी बायको आहे. प्रिया बाहेर येते आणि म्हणते काय.

आई बोलते याचा डब्बा झाला का? प्रिया हो बोलते आणि माझा डब्बा आणून देते. आज प्रिया ला सुट्टी च होती ती मराठी शाळा मध्ये शिक्षिका आहे. सुट्टी असल्या कारणाने आज डब्बा तिनी बनवला होता. नाही तर नेहेमी सकाळी आमच्या दो घा नाचा डब्बा आई बनवते. तो पर्यंत प्रिया माझ्या मुला चे आवरत असते. आई ला सकाळी लवकर उटायची सवय पहिल्या पासून होती. तेवढ्यात ड्रायव्हर दरवाज्यातून आवाज दिला साहेब आवरलं का??? मी हो बोलून तो बाहेर निघाला.
आई ने त्याला विचारले प्रदीप चहा घे ना. तू नाही म्हणाला च हा घेऊन च निघलो होतो. प्रदीप हा माझा ड्रायव्हर आहे गेल्या पाच वर्षे पासून माझ्या इथे काम करतो. मी एक पाट बंधारे अधिकारी आहे. आणि याच काम साठी मी बेलापूर ला निघलो होतो. मी बेलापूर या दिशेने जात असताना मध्ये च प्रदीप ने ब्रेक दाबले आणि गाडी थांबली समोरून एक माणूस गाडी समोर आला होता. तेवढ्या माझं लक्ष हे बाहेर असणाऱ्या हॉटेल वर गेले.
हॉटेल आशीर्वाद .... हे खूप जुने हॉटेल पैकी एक होते. आणि त्या ठिकाणी मी वयाचे पंधरा वर्ष काम केले होते. मला ते आजून ही दिवस आठवत आहे खूप भयानक होते ते दिवस. त्या दिवसा मधुन बाहेर पडू की नाही हे एक प्रश्न चिन्ह होते. आमची परिस्थि खूप गरीब होती. वडील नुसते दारू पीत असे आणि आई ला मारत असे. माझी एक बहीण पण होती. ती

माझ्या पेक्षा मोठी होती. मी तिला ताई बोलायचो. आणि घरातले पण तिला ताई बोलायचे. घरात पैसे यावा आणि सावकार च कर्ज दूर व्हावं म्हणून आई लोकांच्या घरी काम करायची. माझ्या आई ची खूप ईच्छा होती की मी मोठा अधिकारी बनाव खूप शिकावं. म्हणून तिने चार पाच घरचे काम पण वाढवले होते. मी शाळा सुटली की घरी न जाता आई कडे जायचो. माझी आई ही नदी वर धून धूत असे. आणि मी तिथे आई च धून धोई पर्यंत शाळा मधल्या

कविता म्हणत असे. वाळू मध्ये काटी नि चित्र काढत असे. असा वेळ घालवत असे जो पर्यंत आई चे धून होत नाही तो पर्यंत. एक दिवस नेहमी प्रमाणे मी नदी कडे निघलो आणि आमच्या शाळा मधल्या बाई पण माझा सोबत तिकडे निघाल्या. बाई च घर तिकडे च होत. बाई नि माझ्या आई ला बघितलं आणि थांबल्या व म्हणाल्या अभि खूप उशार आहे, सगळ्या उशार आहे. सगळ्या कविता आणि धडे हे त्याचे तोंड पाट आहे. माझी आई खूप खुश झाली होती बाई नि माझी स्तुति केली म्हणून.

माझी आई बोली हा उशार च आहे तो. त्याला खूप शिकवायचं आहे. बाई बोल्या हा खूप शिकवा तुम्ही त्याला. आई बोली हा तोच आमची गरिबी दूर करेल. आणि मग बाई काही वेळा नि निघून गेल्या. आई च पण धून झालं आणि आणि आम्ही पण निघलो. तेवढ्या एक गाडी धूळ उडवत आमच्या शेजारून गेली. ती मोठी गाडी पाहून मी आई ला विचारले. " आई ...आई कोणाची गाडी ग ही... आई ने सांगितले की ती साहेबांची आहे. मी यांच्या घरचे पण भाडे घासायला जाते. हे एक मोठे साहेब आहे, रोज त्याच्या कडे मोठे मोठे लोक येतात. आणि ते

तालुक्या ला काम करतात. माझ्या आईला ला त्यांचे शिक्षण माहीत नव्हते. पण खूप लोक त्यांना साहेब साहेब म्हणून बोलतात, म्हणून ते मोठे साहेब असेल असे वाटत होते. मी ही त्या वेळेस आई ला म्हणालो की मी पण मोटा होऊन साहेब बनेल. मग तुला असे लोकांच्या घरी काम नाही करावे लागणार. आई बोली हो रे राजा खूप मोठा साहेब बन. आम्ही बोलत बोलत घरी आलो. घरी बाहेर आई कपडे वाळ त घालत होती. तेवढ्या त मागून आमच्या शेजारील समीर नि आवाज दिला काय क्या भाभी क्या चल राहा है! समीर आमच्या शेजारी राहत होता काही वर्षांपासून तो शहरात काम करत होता. आणि कधी कधी सुट्टी ला येत असे. आई बोली ठीक आहे सगळं तुम्ही कसे आहेत आणि कधी आले??? समीर बोला

रात्री च आलो होतो. थोडा उशीर झाला होता. आई बोली मग कधी लग्न करतो आता. समीर बोला करेंगे शादी .... पर अभी नही. समीर ने माझ्या कडे पाहून म्हंटला येतो कारे मुबंई ला.. आई बोली आता नाही शिक्षण झाले की कामा ला येईन .त्याला खूप शिकवायचं आहे. समीर बोला शिक्षण साठी पैसा तो चाहीये ना. आई म्हणाली त्या साठी मी आता जास्त काम करते सकाळी 5 ला जाते तर संध्याकाळी 5 ला येते. समीर बोला सावकार च कर्ज फिटले का??? आई बोली नाही ना आजून... पैसा टिकत नाही आणि हे पण मदत करत नाही एवढा खोकला येतो तर दारू सुटत नाही. पोरी च लग्न करायचं पैसे तर पाहिजे.

तेवढ्या वेळात माझे बाबा आले , चालता येत न्हवय तर चालत चालत आले आणि ताई ला आवाज देऊन म्हणाले जेवण आण मला. आणि बादली मध्ये हाथ धुवून, बादली ला एक लाथ मारून बादली पाडून दिली. आणि समीर ला म्हणाले कब आया तू????? आणि जेवायला ये. समीर बोला खाना हो गया है मेरा. आप खाओ. आणि बाबा आत जेवायला गेले, ताई ने ताट वाडून ठेवलं होतं. आई म्हणाली रोज च हेच आहे. जेवन झाल्या वर झोपणं आणि पुन्हा पायाला जाईल.

पैसे नसेल तर मारून माझ्या कडून घेऊन जाईल. तेव्हा समीर म्हणतो मग अभि ला पाठवा माझ्या सोबत शाळा पण शिक्षण आणि चार पैसे पण कमवण. आई काही बोलण्या आधी बाबा आत मधून खोकत खोकत बोले पाठव .... पाठव ..त्याला शिकून कोणाचे भले झाले.


पण आई नाही बोली नाही त्या ला शिकवायचं आहे

कथा पुढे आहे आवडली तुम्हाला ही कथा तर लवकर दुसरा भाग येईल याचा

@𝑠𝑢𝑑ℎ𝑖𝑟 𝑜ℎ𝑜𝑙


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED