सार्थक भाग 2 Bunty Ohol द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सार्थक भाग 2

सार्थक भाग २

(मागील भागात आपण पाहिले की अभि त्या ची आई सोबत नदी वरून घरी येतात. तिथे समीर येतो आणि बोलतोय की याला माझ्या सोबत पाठवा. पैसे पण कमवण आणि शाळा पण शिकेल. पण त्याची आई तयार नाही होत. )
आता पुढे......
समीर आणि अभि च्या आई चे बोलणं चालू असताना. समीर ची आई त्याला चहा घायला बोलावते. आणि आवाज देता ती पण तिथे येत आणि बोलते चार पैसे येणार असेल तर पाठव तिकडे समीर आहे लक्ष दयाला. आणि शाळा पण आहे ना??? समीर बोलतो आहे ना शाळा रात्री ची आहे. समीर आई बोलते मग काही सवाल च नाही तू पाठव त्याला.आईच त्यांचं बोलणं चालू असताना बाबा आतून गुजबुज करत होते. आणि मला पाठव असे म्हणत होते. पण माझ्या आई ची इच्छा होत न्हवती.
आई रात्र भर हाच विचार करत होती की मला पाठवू का नको??? ती जो निर्णय घेते हा बरोबर आहे का नाही, ह्याच गोंधळ होती. मी झोपलो तरी आई झोपली न्हवती,मला मध्ये जाग आली तेव्हा ही आई विचार करत होती. मला ही आई ला सोडून नव्हतं जायचं... दुसऱ्या दिवशी रविवार होता मला तर सुट्टी होती. मी सकाळी आंघोळ करून बाहेर उन्हात पुस्तक घेऊन बसलो होतो. आई घरात स्वयंपाक करत होती. समीर दादा ची आई आली म्हणाली मग काय अभि ला पाठव व्याचे आहे का??? मला सगळे ऐकला येत होतं. तेव्हा मी नवीन पुस्तका चा वास घेत होतो. मला अजून आवडतो. आई नि माझा कडे पाहिले काही समजत नव्हतं तिला. समीर सकाळी जाणार होता सात ला दुधा च्या गाडी मध्ये मुबंई ला. आई स्वयंपाक आवरून कामाला गेली. होती पण तिच्या मनात विचार च चालू होते. के करू के नाही ते ... कारण पैसा तर लागत होता. आणि मला ही शिकवायचं होत. संध्याकाळी आई आली आणि बाहेर च वट्टा वर बसली आणि मला आवाज दिला अभि पाणी आन. मी पाणी घेऊन बाहेर जात होतो तर ताई बोली चहा पण घेऊन जा आई ला. संध्याकाळी ताई जेवण बनवायची. मी पाणी घेऊन बाहेर आलो तर आई पाणी पेली आणि मला जवळ घेतले आणि बोली तू तिकडे शिक आणि पैसे पण कमव आपल्या ताई च लग्न पण करायचं आहे. आई असे बोली तर मला काय पुढे बोलू समजलं नाही. आई चे डोळे भरून आले होते. तिकडून ताई च चहा घेऊन आली. आणि आई ला बोली काय ग आई तू का रडतेस... आणि नसेल पाठवायचं तर नको पाटू आत पर्यंत जे चाले तसे च चालू दे ना.. आणि हा कसे राहील तिकडे तुझ्या वाचून त्याला करमत नाही. इतर दिवशी शाल्यात राहतो म्हणून काय नाही, सुटली की लगेच तुझा कडे नदी वर येतो. आणि रविवारी सतरा वेळा बाहेर येऊन तुला पाहतो. आणि मला विचारतो पाच वाजले ताई, पाच वाजून पाच मिनिटं पण झाले का येत नाही आई. मी जाऊ का नदीवर... आई ला घेऊन येतो...
आई चे डोळे फार भहरून आले होते म्हणू ताई आणि मी पण रडत होतो. पण आई लगेच म्हणाली आपल्या तर थोडं सहन तर करावे लागेन ना. अभि आता पाच वी मध्ये आहे. आजून पाच वर्षे तरी काम करून आपले शेत सावकार कडून सोडवेल आणि तुझं लग्न पण करायचं आहे.
रडून रडून सगळ्या चे घशे पण बसले आई तशीच आम्हाला घरात घेऊन आली आणि... आणि आम्हाला गप करून ती समीर दादा दादा च्या घरी गेली....
मित्रांनो मी आशा करतो तुम्ही पहिला भाग वाचला असेल... हा दुसरा भाग कसा वाटला ते नक्की सांगा
तिसरा भाग लवकरच येईल