ह्युमन v s रोबोट- पार्ट-१ Hemangi Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ह्युमन v s रोबोट- पार्ट-१

वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मी खितकीतून बाहेर त्या भरलेल्या आभाळाला बघत उभी होते आणि तो पहिला दिवस डोळ्यासमोर आला. आमची पहिली भेट....


"आधीच खुप लेट झाला आहे आणि त्यात या स्कुटीच्या टायरची हवा पण आताच निघायची होती.." मी स्वतःच्या डोक्यावर हात मारत बोलले. आजू बाजूला नजर टाकली आणि समोर एक सायकल रिपेअर करायचं दुकान दिसलं. तशी मी गेली आणि टायर ठीक करून घेतला. त्याचे पैसे देत निघाली... खरतर आज पहिलाच दिवस होता माझा, त्या महागड्या नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन जे मिळालं आहे...

मी रेवती नाईक..मध्यम वर्गीय घरातील... मला एका नामांकित कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळाली आहे... आमच्या इथल्या मोठया, हायफाय लोकांचं कॉलेज.. आज माझा पहिलाच दिवस होता आणि त्यात मी या जुन्या झालेल्या स्कुटीमुळे लेट झाल होत..



स्कुटी पळवत मी निघाले असता समोरून आलेल्या एका कारचा धक्का मला लागला आणि मी खाली कोसळले... ते बोलतात ना आपण जेव्हा सर्वांत जास्त घाईत असतो तेव्हाच या अशा घटना घडतात... "ओ हॅलो..., दिसत नाही का..???" मी रस्त्यावरून उठत त्या गाडीच्या मागच्या काचेमध्ये जाऊन विचारलं. त्या गाडीचा ड्राइव्हर बाहेर आला.. "मॅडम सॉरी.. आम्ही जरा घाईत आहोत." तो ड्राईव्हर बोलला. पण मी काही ऐकायला तय्यार नव्हते.. "तुमच्या आत बसलेल्या सरांना बोलवा. दिसत नाही का एक मुलगी खाली पडली तरी बाहेर येऊन सॉरी बोलावसं वाटत नाहीये ते..." मी जरा रागातच बोलते झाले.



मी त्या ब्लॅक काचेमधून कोणी आत आहे का बघत होते. पण तो ड्राइव्हर काही मला आत बघू देत नव्हता. "मॅडम.,बोललो ना तुम्हाला सॉरी.. सरांकडून मीच माफी मागतो." एवढं बोलुन तो आत जायला लागला.. हे बघून मी त्याच्या कॉलरला पकडले.. "एवढा कसला माज.. पैशाचा का..?? हे घे माझ्याकडून तुमच्या सोकॉल्ड पॉश गाडीला काही झालं असेल तर ठीक करून घ्या." मी माझ्याकडचे काही पैसे त्या ड्राइव्हरच्या हातात देत बोलले. एवढं बोलून सुद्धा मागच्या सीटवरची व्येक्ती काही बाहेर यायला बघत नाही बघून तर मी चांगलेच भडकले आणि काचेवर आपले हात बडवू लागले.



हे बघून तो ड्राइव्हर मात्र चांगलाच वैतागला. हे सगळं चालू असताना गाडीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि एक वीस वर्षांतील मुलगा बाहेर आला.. त्या मुलाचं पूर्ण शरीर झाकलेल. एवढं ऊन असतानाही त्याने ब्लॅक कपडे घातले होते. "एक्सक्युज मी... किती नुकसान झाल आहे." अस बोलत तो पुढे आला माझ्या हातात काही पैसे ठेवत काही न बोलता गाडीमध्ये जाऊन बसला. माझ्या डोळ्यादेखत त्याची ती महागडी गाडी निघून गेली.


मी रागात पाहिलं. नंतर लक्षात आलं की., मी कॉलेजमध्ये जायला लेट होतेय. स्वतःची स्कुटी घेऊन मी देखील निघाले.. जरा लेटच झालेला. मोठं कॉलेज.., तिथे येणारे सगळे श्रीमंत होते. आम्हच्या सारख्या काही मध्यम वर्गीय मुलांना दरवर्षी स्कॉलरशिप मिळायची आणि त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन. यावर्षी त्या लिस्टमध्ये मी देखील होते..




मी गेटमधून आत जाताच तिथल्या काही सिनिअर मुलांच्या ग्रुपने माझी रॅगिंग करायला सुरुवात केली.. त्यातल्या एका मुलाने माझ्या जवळ येऊन एक जोरदार खानाखाली लगावली. हे बघून मात्र माझं डोकच फिरलं आणि मी काहीही विचार न करता त्या मुलाच्या कानाखाली लावली. त्यामुळे सगळीकडे आवाज पसरला. मी केलेल्या कृत्याने सगळेच अवाक होऊन बघत होते. मी त्या ग्रुपला न बघताच त्यांच्यासमोरून पळुन स्वतःच्या क्लासरूमध्ये निघुन आले.


एका बेंचवर एक साधीशी मुलगी बसलेली बघून मी तिच्या बाजूला जाऊन बसले. "हॅलो.., मी रेवती नवीन स्टुडेंट आहे." मी स्वतःचा हॅट पुढे केला. "हॅलो.., मी रिया. मी पण इथे नवीन आहे." तिनेही स्वतःचा हात पुढे करत स्वतःचा परिचय करून दिला. आम्ही लगेच चांगले फ्रेंड्स झालो., कारण ती देखील माझ्याच सारखी स्कॉलरशिप मिळवून आलेली होती. हे सगळं चालू असताना अचानक प्रिन्सिपल सर आले आणि सोबत तोच मुलगा. सगळे उभे राहून आम्ही त्यांना गुड मॉर्निंग विश केलं.


To be continued