Human v s Robot - 2 books and stories free download online pdf in Marathi

ह्यूमन v s रोबोट-पार्ट-२

"हॅलो स्टुडेंट..., मी या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि आजपासून आपल्याला जॉईन होत आहेत मिस्टर राविश देशमुख." त्यांनी त्या मुलाची स्वतः ओळख करून दिली. सगळे त्याला बघतच राहिले. सकाळी नीट दिसला नाही म्हणून मी देखील त्याला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत होते.त्याने घातलेले ब्लॅक लॉंग जॅकेट, हातात ब्रॅण्डेड घड्याळ, पायात इंपोर्टेड शूज, आणि हातात आय-फोन. दिसायला एकदम गोरा.., डोळ्यांवर महागातल सनग्लासेस, जे त्याने नुकतंच काढलं आणि त्याच्यात त्याचे ते हिरवे गरीरे डोळे. कोणी ही प्रेमात पडतील असेच होते.तो चालत येऊन माझ्या बाजूच्या एका सीटवर बसला. त्याच माझ्याकडे लक्ष जाताच त्याने स्वतःची मान लगेच फिरवली. हे बघुन मला ही राग आला. आधीच त्याच्यामुळे सकाळी आमच ऍकसिडेंट होता होता राहील होत. आणि त्यात आता अस वागणं. मी देखील लगेच स्वतःच नाक मुरडत समोर पाहिलं. आज पहिलाच दिवस म्हणुन जास्त काही लेक्चर नव्हते. टीचर येत आणि ओळख करून द्यायला सांगत. या सर्वांत तो मात्र काहीच बोलत नव्हता की, त्याला कोणी काही विचारत होतं. हे जरा विचित्र होत पण, काय माहित मोठ्या माणसांमध्ये होत असाव अस समजून मी दुर्लक्ष केलं.
काही वेळाने मी आणि रिया कॅन्टीनमध्ये आलो. तिथल्या श्रीमंतांच्या मुली आम्हाला बघुन सारख्या नाक मुरडत होत्या. हे बघून मला भारीच राग येत होता.. "अरे आपण काही माणसं नाही आहोत का.?? जे अस वागणुक देत आहेत इथले सगळे." मी जरा रागातच रिया ला बोलले. तिने स्वतःचे हात वर करत जाऊदे एवढंच काहीस केलं आणि समोरच्या डिश मधलं लंच संपवत बसली. "अरे.., माझी खीर संपली आहे मी आलेच घेऊन." अस बोलून मी गेले आणि घेऊन येताना रागिश समोर आला आणि माझी सगळी खीर त्याच्या कपड्यावर पडली. "हेय.. यु., दिसत नाही का..?" तो जरा रागातच बोलला.. "सॉरी सॉरी माझ्याकडून चुकून झालं." मी त्याची माफी मागत होते. त्याने एक जळजळीत कटाक्ष टाकत तिथून निघून गेला.मी पळत रिया बसली होती तिथे आली आणि घडलेले तिला सांगितलं. "अरे रेवती यार.., तुला माहित आहे ना..,हे इथले सगळे जरा अकडु आहेत सांभाळून रहा." एवढं बोलत ती निघून गेली. मी देखील जास्त विचार न करता निघाले.
असेच आमचं नवीन कॉलेजमधले दिवस ठीक जात होते. तिथले श्रीमंत मुलं आणि सोबत मुली आमच्यासारख्या मध्यम वर्गीय मुलांना त्रास द्यायचे. सगळे सहन करत, पण मी नाही.. मला माझ्या घरच्यांनी कराटे शिकवलं असल्याने मी त्यांना उत्तर देत होती. त्यामुळे खुप कमी जण माझ्याशी पंगे घेत. अशाच एका दिवशी कॉजेलवरून घरी जाताना मी माझी स्कुटी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेले असता काही मुलांनी माझ्यासोबत रॅगिंग करून माझा व्हिडिओ बनवायचा ठरवून आले होते.


पण मला कराटे येत असल्याने मी त्यांना चांगलाच मारलं. पण एकाने मागून वार केला आणि मी खाली कोसळले. त्यामुळे मी खाली बेशुद्ध पडले असता, एकाने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो पुढे आला. हे रागिशने पाहिलं. आधी तो काही गाडीबाहेर येत नव्हता, पण त्यानंतर समोरच दृष्य बघून तो आला आणि त्याने त्या मुलांना चांगलीच अद्दल घडवली. मी बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यानेच मला उचलुन स्वतःच्या घरी आणल.मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी एक आलिशान बेडरूममध्ये झोपले होते. माझे कपडे ही कोणी तरी बदलले बघून मी चांगलीच ओरडली. माझं ओरडणं ऐकून रागिश बाहेर आला. "काय झालं ओरडायला. ?" त्याने आत येत विचारल. "माझे कपडे कोणी बदलले.???" मी स्वतःच्या अंगाभोवती चादर लपेटून बोलले. "डोन्ट वरी.., मी काही नाही केलं आहे. आमच्याकडच्या एका गर्लने तुझे कपडे चँगे केले आहेत." आणि त्याने पार्किंगमध्ये घडलेला प्रकार सांगितला.

To be continued

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED