Adrushya - 1 books and stories free download online pdf in Marathi

अदृश्य - 1

अदृश्य भाग १

कधी कधी आपण चुकून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो,ज्या मुळे सुद्धा कधी कधी खूप मोठा प्रसंग आपल्या रोजच्या जीवनात आढळू शकतो. असाच एक प्रसंग , जेहेन च्या आयुष्यामध्ये हि आला ज्या मुळे तिला त्याची खूप मोठी शिक्षा मिळाली.
आज ची मोठी बातमी समोर येत आहे...."जेहेन अरोरा हिला,२६ एप्रिल रोजी,आपल्या मुलाचा ,अर्णव चा, खूनेच्या आरोपाखाली अटक झाली आहे.",असं म्हटलं जातं आहे की तिने स्वतः खूनेची कबुली दिली आहे....
विभा च्या हातातून रिमोट खाली पडला,आणि ती तशीच तिथून त्वरित निघाली.विभा पोलीस स्टेशन ला पोहचली,....विभा.."सर,जेहेन?!!!!! "मी तिला भेटायला आली आहे"."अरे, विभा मॅडम, हा केस तर सोडा जा घरी आराम करा,सगळे केस तर तुम्ही हरताय, तस हि त्या जेहेन ने खून केलाय,तिला आता कोणी वाचवू शकणार नाही,तिने कबुली दिली आहे",असं खडसे म्हणाले.विभा म्हणाली, "मला माहित आहे,मला एकदा तर भेटू द्या,भेटून निघून जाईन".विभा ला जेहेन च्या सेल कडे घेऊन गेले,तिथून ती एकटी आत गेली,"जेहेन मी विभा, मला माहित आहे तू खून नाही केलाय "असं विभा म्हणाली.जेहेन म्हणाली...."मीच केलाय,मी सांगितलं ना ,मी केलाय".विभा म्हणाली," माझ्यावर थोडा विश्वास ठेव,बरं सांग तरी,तुला हि शिक्षा का भोगायची आहे,तू थोडा वेळ घे,मी उद्या येईन"."तुला यायची काय गरज नाही आहे,मी माझा निर्णय नाही बदलणार,मी चूक केली आहे,तर केली आहे" असं जेहेन म्हणाली.विभा-"ठीक आहे,एकदा विचार कर फक्त"." तुला का माझी केस हवी आहे" -जेहेन."मी उद्या सांगते,तुला हे लोकं एक कागद देतील त्यावर सही करायला सांगतील , नको करुस ऐक माझं,जास्त वेळ नाही थांबू शकत निघते मी"-विभा.थोड्या वेळाने एक खूप मोठी वजनदार बाई आली आणि तिने कागद दिला,काही सांगितलं नाही.तिला काही सुचत नव्हतं,काय करायचं.तिने सही न करण्याच निर्णय केलं.तिच्यावर जोर जबरदस्ती हि केली तरी तिने सही नाही केली.त्यावर हे लिहलं होत की जेहेन ने खून केलाय आणि तिची मनस्तिती ठीक नसल्या मुळे आम्हाला हव तसं आम्ही तिच्या बरोबर वागू शकतो,तिने हल्ला केला तर आम्हाला हि तसाच व्यवहार करावा लागेल.जेहेन ला आता भीती वाटू लागली होती.तिने कशी बशी रात्र काढली,रात्री तर तिच्या सेल मध्ये एक माणूस घुसला तर त्याला बाहेर काढलं,पोलीस हवालदार होता तो,बाकीचे लोक म्हणाले "सोड तिला,साली ने सही केली नाही आहे,पण लवकरच करेल तो पर्यंत धीर धर रे मित्रा"आणि हसायला लागले.जेहेन रात्र भर झोपली नाही.अखेर पहाट झाली,आणि समोर तिला पुन्हा जगण्याची आशा दाखवत विभा उभी होती.विभा म्हणाली"जेहेन,ठीक आहेस ना?! ".जेहेन ला तर काहीच सुचे ना तीने विचारलं"तुला कस समजलं की हे लोक माझ्या बरोबर काही वाईट करणार आहे?!".शांत हो,सगळं सांगते तुला पण प्रश्न च उत्तर प्रश्न नव्हे,काय ठरवलंय तू ,इथे नीट बोलणं होणार नाही जेहेन मला तुझी बेल करावी लागेल"असं विभा म्हणाली.जेहेन म्हणाली" ठीक आहे मला तू चालशील माझी वकील म्हणून".विभा-"शाब्बास जेहेन". विभा ने कागदोपत्री काम पूर्ण करून जेहेन ला सोडविले.पोलीस स्टेशन मध्ये तर सगळे विभा ला रागाने पाहत होते असे जसे जणू कोणी त्यांची सोन्याची चिमणी उडवली असेल.खडसे म्हणाले"बघ ह्या बाई ला कसली खाज आहे हिला दाखवतोच मी".विभा जेहेन ला तिच्या घरी घेऊन गेली,ते घरी पोहचले,जेहेन म्हणाली "आता तरी सांग मला तू का माझी मदत करतेस".विभा-"कारण मी एक हि केस जिंकली नाही आहे म्हणून ही केस माझ्यासाठी खूप गरजेची आहे".जेहेन म्हणाली"एवढंच?!".हो-विभा.विभा म्हणाली की" तू सगळं काही सांगण्याच्या आधी आपण जरा एक मेकांशी नीट ओळख करून घेऊ"."मी विभा निगम,एक हि केस नाही जिंकली आहे त्याच एकच कारण आहे,माझी मैत्रीण सेहेम मलिक"-विभा.जेहेन- कसं??.सेहेम आणि मी आम्ही लहानपणा पासूनचे घट्ट मैत्रिणी आहोत.आता आम्ही सोबत नाही आहोत.१९७५ मध्ये आम्ही जन्मलो त्या काळी, जातपात खूप होता.मी हिंदू ती मुस्लिम,आम्ही हे कधी आमच्या मैत्रीत येऊ दिलंच नाही.पण लोकांनी आमच्या पालकांना खूप सूनवून लावले.आम्हला वेगळे राहावे लागले.काही वर्षांनी ती मुंबईत आली, आणि माझा हि नंबर मुंबईत लागला.पण अजून आम्ही भेटलोच नाहीये.विभा हे सांगत असताना तिचे अश्रू भरले.मी खूप शोधले तिला,माझं लक्ष कुठल्याही केस मध्ये नीट लागलच नाही.पण आता या केस मध्ये मी पूर्ण लक्ष लावेल.सेहेम सोबत ची मैत्री मी नाही वाचवू शकले,पण तू जेहेन तुझ्यात मला माझी सेहेम दिसते.विभा थांबली,जेहेन म्हणाली पण माझीच केस का ,विभा-"कारण तुझी केस,२६ जून रोजी सेहेम चा वाढदिवस"."ओह, ठीक आहे,धन्यवाद विभा"-जेहेन.विभा-बरं मला सांग सुरुवाती पासून नीट आठवून नक्की काय झालं.जेहेन-त्या रात्री मी खूप पेंगत होते,अर्णव साठी औषध घ्यायची म्हणून मेडिकल स्टोर मध्ये गेले,आणि तिथून औषध घेतली घरी गेले अर्णव ला दिली,आणि आणि.विभा-रडू नकोस,सांग पाणी घेऊन नीट वेळ घे.जेहेन-मग मी दिली आणि झोपली मला नीट शुद्ध नव्हती तर आणि सकाळी पाहते तर मी अर्णव ला कफ सिरप च्या ऐवजी विष दिलेलं.विभा-तू कुठल्या मेडिकल मध्ये गेलेलीस?.जेहेन-पारिजात,मी नीट सांगितलं होतं की मला कफ सिरप हवंय तर मग काय समजत नाहीये.विभा-ठीक आहे मी विचारपूस सुरु करते,बघते मेडिकल मध्ये जाऊन ,होईल नीट तू झोपून घे आता.जेहेन झोपून गेली.विभा ला आता सेहेम ची आठवण येत होती,खिडकीत बसून ती त्यांच्या लहानपणात केलेली गंमत आठवत होती.विभा मनात म्हणाली काय दिवस होते ते कुठे अशील तू सेहेम इथे असतीस तर किती गप्पा मारले असते आपण.विभा सेहेम च्या आठवणीत मग्न होती,आयुष्याची चुकामुक तिला सहन होत नव्हती.विभा ला जेहेन शी एक वेगळं नातं वाटत होत, कधी कधी अनोळखी व्यक्ती हि ओळखीची वाटते,तसच काहीतरी.विभा म्हणाली की मी जेहेन ची मदत करते आहे हे बघून तर सेहेम ला हि खूप आनंद होईल.जेहेन उठली ती विभा ला शोधायला लागली,सगळ्या खोलीत पाहूनही तिला विभा दिसेना. जेहेन ला विभा च्या खोलीत एक फाईल दिसली, विभा चे रिपोर्ट्स विभा ला मानसिक त्रास होता ज्या साठी ती डॉक्टर कडे जायची. जेहेन ला पायांच्या चालण्याचा आवाज आला आणि ती घाबरली. विभा म्हणाली , "हो,मी लपवल".जेहेन म्हणाली नाही नाही ठीक आहे, तू माझी आधीच खूप मदत करते आहे माझ्यावर विश्वास दाखवून.विभा म्हणाली "हो".जेहेन म्हणाली मी एक विचारू का?!. विभा "हो हो विचार ना".जेहेन" सेहेम च पूर्ण नाव काय?" विभा "सेहेम मलिक". जेहेन म्हणाली "ओह ठीक आहे मला वाटलं मी तुझी काही मदत करू शकेल तर".विभा म्हणाली" ते तर तू करत आहेस".दसऱ्या दिवशी कोर्टात जाताना, विभा ला खूप लोकांनी टोमणे दिले, विक्षिप्त बाई, आणि खूप काही तिला ऐकावं लागलं.विभा वर याचा परिणाम झाला.तिला एक पत्र आलं.घरी जेहेन होती तर तिनेच ते घेतलं, जेहेन ने नाव वाचलं आणि तिला काही समजे ना ती तिथून निघून गेली.विभा घरी पोहचली, तिला समोर एक पत्र पडलेलं दिसलं. तिने जेहेन ला हाक मारली पण नंतर तिला समजलं की ती निघून गेली आहे.विभा घरात गेली,पत्र पाहिलं आणि पाहते तर काय तिची शुद्धच हरवली.थोड्या वेळाने तिने ते पत्र फेकून दिलं.सकाळ झाली, विभा उठली, दरवाज्यावर कोणीतरी होत, ती पाहायला गेली. ये ये जेहेन,ये असं विभा म्हणाली. विभा चहा बनवायला गेली, जेहेन च्या डोक्यात खूप विचार संचार करत होते.विभा आली, घे जेहेन मी मस्त मसालेदार बनवलाय असं विभा म्हणाली. जेहेन ने हि कप उचलला आणि म्हणाली की विभा मी न सांगता निघून गेले,मला खरंच माफ कर.विभा ने विचारलं पण कारण काय होत, चल सोड आता आपल्याला केस वर लक्ष द्यायला हवं.मी माझी डायरी आणते हे म्हणत विभा उठली.विभा ने डायरी आणली, आणि ती म्हणाली बघ जेहेन मला जे हि काही तुझ्या आयुष्यात झालं असेल सगळं सांग म्हणजे अंदाज बांधता येईल. जेहेन म्हणाली हो, पण ते पारिजात मेडिकल, त्याच काय?!. विभा- मी गेली होती तिथे पण पारिजात नावाचं कोणतंच मेडिकल तिथे नाही.
जेहेन- पण असं कसं
विभा- जेहेन तुला दारू प्यायची खूप सवय आहे, तू सिगारेट हि पिते,आजून खूप काही वाईट सवयी आहे तुला ज्या मुळे आपल्या केस वर याच परिणाम काहीसा बरा होणार नाही.
जेहेन-हो पण मी खरं सांगते आहे, मी नीट पाहिलं होत .
विभा-ठीक आहे त्याच बिल तर असेल ना.
जेहेन-हो हे बघ
विभा-हे काय, हे बिल आहे पण यावर तर मेडिकल लिहिलंय पारिजात नाही, दिसायला अगदी बिल सारखंच आहे.
जेहेन-शीट, मी तर खरच लक्ष दिलं नाही.पण त्या पत्त्यावर कोण राहत मग.
विभा-त्या पत्त्यावर तर कोणी राहत नाही एक घर आहे बंद पडलेलं.जेहेन तू आजून एक खोट बोली आहेस. त्या दिवशी पोलीस स्टेशन ला तुला एक फोन आला होता तू बोली तो अर्णव च्या वडिलांचा होता पण तो तर नायब अरोरा च होता.
जेहेन- हो नायब माझाच भाऊ आहे.मी सांगते सगळं. तेवढ्यात विभा च फोन वाजला आणि विभा ला एक कामा साठी जावं लागलं.जेहेन म्हणाली कोणतं काम आहे केस आहे का तर विभा म्हणाली नाही नाही सेहेम ने बोलावलं आहे.जेहेन च्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

विभा घरून निघाली, आनंदात,अथांग क्लिनिक मध्ये शिरली. समोर सेहेम होती तिची वाट पाहत दोघांनी खूप गप्पा मारले.सेहेम म्हणाली"विभा मला ही जेहेन ला भेटायचं आहे" त्यावर विभा म्हणाली हो नक्की .आणि तिथून निघून गेली.विभा विचार करत होती की सेहेम पण ना असच कोणत्याही ठिकाणी भेटायला बोलावते मग महिने होऊन जातात भेटत नाही बोलत नाही,बरोबर आहे तिच्या घरचे आहेच तसे त्याला काय करणार.विभा आज आनंदात होती , मस्त घरी गेली आणि छान जेवण करून झोपायला गेली.रात्रीचे ३ वाजले होते विभा ची झोप अचानक मोडून गेली.तिला आठवलं नायब अरोरा, तिने डायरी उघडून बघितलं.त्याच शोध घायच ठरवलं.विभा ला माहित होत की जेहेन अरोरा खूप गोष्टी लपवून बसली आहे.एवढं झालं जेहेन बरोबर पण नायब एकदाहि तिला भेटला नाही.या जेहेन आणि नायब यांच्यात काहीतरी आहे.पण काय या विचारात ती टेबल वरच झोपी गेली.विभा समोर खूप प्रश्न उभे होते, अर्णव चा खून कोणी केला?!, जेहेन काय लपवते आहे आणि का?! नायब आणि जेहेन यांच्यात नक्की काय झालंय?! ज्यांचे उत्तर अजूनही अदृश्य आहेत, सगळं समोर असून ही कधी कधी दिसत नाही,तसच काहीसं झालंय.पण एक दिवस सूर्य उगवतो त्याचा प्रकाशात नक्की सगळं दिसतं.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED