Adrushya - 4 books and stories free download online pdf in Marathi

अदृश्य - 4

अदृश्य भाग ४

केस संपली,पण विभा बैचेन होत होती,तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला,सायली तिच्या घरी आली.सायली म्हणाली की विभा काय झालंय?,आता तर सगळं तुझ्या मनासारखं झालं ना.विभा म्हणाली" नाही,१ महिना उलटून गेलाय अजून सेहेम आली नाही मला भेटायला.ती कधीच एवढा वेळ नाही लावत ".सायली म्हणाली "विभा,मी किती समजावू तुला,तू तुझ्या गोळ्या घेणे बंद का केलेत?".सायली मनोचिकित्सक होती,आणि विभा ची मैत्रीण होती.विभा या शहरात जेव्हा सेहेम ला सोडून आली होती तेव्हा सायली नेच तिला सांभाळलं होत.नंतर सायली सेहेम ची हि खूप छान मैत्रीण झाली.विभा ला मानसिक आजार होता,म्हणून तिला अटॅक हि येत होते,त्या साठीच ती गोळ्या घ्यायची.विभा एक हि केस जिंकली नव्हती म्हणून ती थकून गेली होती.
बघूया केस च्या सुनावणीच्या आधी काय घडलं.विभा ने सगळी चौकशी केली होती त्या माणसाचं नाव होत विभूर देव.विभा जेहेन ला भेटायला गेली,तिला वाटलं की जेहेन ला हि खूप आनंद होईल की तिला अखेर तो माणूस सापडला.विभा जेहेन ला म्हणाली "जेहेन बघ,मी शोध लावला त्या माणसाचा त्याच नाव आहे विभूर देव".जेहेन खुश होती,आता तिला वाटलं सगळं नीट होईल,एकदा का तो विभूर आला सगळं खरं सांगायला मग झालं.पण झालं काही तरी वेगळंच.
केस चालू असताना जेव्हा विभा ने विभूर देव ला बोलविण्याची मागणी केली तेव्हाच जेहेन अरोरा जोरजोरात किंचाळत होती.देवच जानो काय झालेलं तिला.विभा आता सेहेम च्या आठवणीत गुंत होती,ती सायली ला म्हणाली" तुला माहित हा सायली सेहेम ला कुत्र्यांची खूप भीती वाटायची.पण मला मात्र कुत्रे खूप आवडायचे"."सेहेम सोबत राहून तर मला आई ला अम्मी बोलायची सवय लागली होती,कसलं चोपलेलं मला आईनी".
सायली म्हणाली"विभा, किती वेळ तू सेहेम च्या आठवणीत राहशील,ती या जगात नाही आहे,तुला तिचे भास होतात फक्त बस"."तू तिच्या बरोबर फिरते,बोलते,हे सगळं खरं नाही आहे".विभा म्हणाली"हो,पण मी कसा विसरू,मी नाही विसरू शकत,आणि मी विभूर ला हि विसरू देणार नाही.सायली ला वाटलं की आज तिने विभा सोबत थांबायला हवय.सायली म्हणाली" जेहेन ला रिमांड होम मध्ये ठेवण्यात आलंय ,तिला थेरपी ची गरज आहे,मला बोलावलंय". विभा म्हणाली" हो,माहित आहे मला ,बिचारी आता कधीच ठीक होऊ शकणार नाही.सायली म्हणाली" ते तर आहेच,पण आता मात्र विभूर ला आपल्याला लपवून च ठेवायला लागेल".
विभा-"तसं हि त्या जेहेन अरोरा ला जगण्याचा हक्क नव्हता,तिने माझ्या सेहेम ला मारलंय".
सायली-"हो,ते तर आहेच पण विभा तू तुझ्या गोळ्या घे,तू हि तुझी काळजी घ्यायला हवी"."पण मला सांग विभा कि त्या डायरीत तू लिहिलेलं तर ते सगळं गायब कस झालं कोणी केलं ते?"
विभा-"मी,मीच त्या डायरी मधले कागद मृदुल ला दिले",कि जेहेन ला आपल्यावर अजून विश्वास होईल म्हणून".
सायली-"वाह वाह विभा, हि केस मात्र तू हारून जिंकली आहेस".विभा-"हो,मग काय चल मग पार्टी करूया,विभूर ला बोलवू का?"
सायली-"हो,हो, का नाही, मी सगळं मस्त स्वयंपाकाचं बघते ,काय होत ते सेहेम ला आवडायचं ते?"
विभा-"बिर्याणी,आणि रायता",विसरलीस?
सायली-"काय करू सेहेम गेल्या पासून खाल्लच नाही ना पण आज दिवस आलाच".
विभा-"हो,एक काम कर जेहेन ला हि हि बिर्याणी घेऊन जा आणि सांग विभूर ने पाठवलीये".
सायली-"अरे काय तू पण थोडं तर जगू दे बिचारी ला"
विभा-असच एक दिवस खरं खर ची पागल होऊन मरेल ती.
सायली-"पण,सेहेम च्या कुटुंबाला काहीच पडलेली नाही,मी ऐकलं तिचा नवरा तो परत लग्न करतोय".
विभा-हो , सेहेम ला तर लग्न करायचं नव्हतंच,पण तिचे घरचे,मला ते आधीपासूनच काही आवडत नाही.
सायली-हो रे पण त्यांनी तर प्रयत्न सुद्धा केला नाही खूनी शोदायचा.
विभा-ते आहे,सोड,त्यांना फरक पडलाच नाही आहे तर काय.
सायली-"चला , तू खूप अदृश्याचा खेळ खेळलीस आता मी खेळणार".
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED