कोरोना आणि बदलते जग ( भाग - १ ) Komal Mankar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

कोरोना आणि बदलते जग ( भाग - १ )

कोरोना आणि बदलते जग ( भाग - १ )


चीनच्या वुआँन शहरापासुन सुरवात झाली....कोरोना ह्या साथीच्या आजाराला . जगाच्या दृष्टीने ही बातमी चीनने जागतिक आरोग्य संघटने पासून
लपवून ठेवली .... जेव्हा हा आजार तीव्र वेग धारण करीत आपले पाय पसरू लागला , आधी पाच, पन्नास तर मग शतक गाठत मृत्यूचा आकडा वाढीत गेला .
कोरोनाने जण जीवन विस्कळीत झालं . चीनच्या बाहेर प्रवासी इतर प्रांतीय आपल्या देशात स्थलांतरित होऊ लागले तेव्हा तर ह्या आजाराने कहर केला .
ज्या देशात कोरोना मुळात नव्हताच त्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले . देशात रुग्णांचा दर अधिक वाढू नये म्हणून भारत सरकारने 25 मार्च 2020 – 14 एप्रिल 2020 (२१दिवस ) चा लॉकडाऊन केला .

चीन नंतर लोकसंख्येच्या यादीत जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर . इथे त्रेपन्न टक्के मजुरांच पोट हातावरच्या कामावर भागतं . त्यासाठी मजूर दुसऱ्या राज्यातही जातात .

मुंबई म्हणजे माया नगरीच.... इथे कोणी ऍक्टर बनावं म्हणून डोळ्यात स्वप्न घेऊन येतात , तर कोणी पोट भरण्यासाठी उराशी स्वप्नांचं गाठोडं बांधून मुबंईत स्थायी होण्यासाठी.... आपलं शहर , गावं , कुटुंब सोडून ते नवी उमेद घेऊन जगतात .


लॉकडाऊन नंतर त्या मजुरांची खरी फरफक्ट झाली . लॉकडाऊन पंधरा दिवसाचं होतं म्हणून स्वतःला समजवत ते तिथे थांबलेही . वाटलं आता उघडेल लॉकडाऊन पण लॉकडाऊन वाढतच गेलं .

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर राज्याच्या मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांतील मजुरांच्या राहण्याची शिवाय खाण्याची सोय केली पण मजुरांना
घराची वाट लागलेली . मग काय ? जायला साधन नाही ... बस , रेल्वेची सोय नाही . जायचं तरी कशाने अशात मजूर पायाची पायपीट करत पायदळ निघाले . कोसो कोसो मैल अंतर पार करून ते परराज्यात जाऊ लागले .

कोरोनाने माणसाचं जीवन होत्याचं नव्हतं केलं ... पक्षी आकाशात भरारी घेतांना बघून , काळोखातल्या चांदण्यांना टिमटिमताना बघून वाटायचं हे नैसर्गिक सौन्दर्य अनुभवायला माणूस राहिलं का धर्तीवर ?


माणूस चुकतो म्हणून निसर्ग कोपतो असं ऐकलंय पण हे कोणतं नैसर्गिक संकट माणसावर ओढवून आलं ? ज्या संकटाने माणूस जीवन होरपळून निघालं .

माणसांवर उपचार होतोय पण एखाद्या प्राण्याला झाला तर काय होणार ?

अमेरिकेत वाघाला कोरोना झाल्याची बातमी वाचण्यात आली . माणूस बोलेल हो पण त्या मुक्या जनावराने कुणाला सांगावं .

जिल्ह्याची सीमा बंदी केल्याने माल वाहतूक ठप्प झाली . अश्यात उद्योग धंदे कसे चालणार ? शेतकऱ्यांना भाजीपाला पाण्याच्या भावात विकावा लागला

तर कुठे तो भाजीपाला शेतकऱ्यांनी असाच फेकून दिला . परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत गेली . महागाई वाढू लागली . सरकारचं पॅकेज लक्षात घेता
सामान्यांनी बँकांच्या बाहेर उन्हात उभे राहून रांगा लावल्या . काहीना तो आर्थिक लाभ मिळालाही पण काहीना निराश होऊन माघारी जावं लागलं .

देश लॉकडाऊन करता आला पण गरिबांच्या भुकेला येईल का हो लॉकडाऊन करता ??

आईची मुलासाठी धावाधाव


एक आई आपला मुलगा शिक्षणासाठी बाहेर गावी राहत असल्याने हजार मैल ओलांडून त्याला आणायला आपल्या गाडीने जाते .... वाटेत तिला किती तरी अडथळे येतात त्या वाटेत तिला काही मदतीचे हात हि मिळतात . एका आईची अश्या परिस्थितीत मुलांसाठीची धडपड ह्या प्रसंगातून दिसून येते .

अपघाती मजुराची दयनीय अवस्था

मध्यप्रदेशात राहणारे मजूर महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात जायला निघाले रेल्वे बंद आहे असं समजून ते पायी प्रवास करत रेल्वेच्या रुळावरून चालत जात होते वाटेत त्यांना झोप येत असल्याने ते

औरंगाबादच्या जवळ रेल्वेच्या रुळावर झोपी गेलेत . पहाटे सहाच्या दरम्यान एक माल गाडी आली एकूण सोळा मजूर त्या माल गाडीने जागीच चिरडल्या गेले . किती हृदयद्रावक घटना होती ही .....

ऐकूनच अंगावर काटा उभा राहावा ....

काय दोष असावा त्या निष्पाप मजुरांचा पोटाची खळगी भुकविणारे ते घराचा बाहेर पडले ते घरी कधीच न परतण्यासाठी ..... त्यांचं कुटुंब , त्यांची मुलं आजही आपले वडील येतील म्हणून रस्त्याने वाट लावून बसली असावीत . त्या चिमुरडयांना कोण सांगायचं कि तुझे बाबा आता कधीच परतणार नाहीये म्हणून..... ह्यातही विविध पक्षाचा राजकारणी हेतू सफल व्हावा असच झालं , त्या मजुरांचा मुद्दा घेऊन वाद उफाळला गेला . राजकारण्यांना भांडायला विषय मिळाला आणि राजकीय नेत्याना पुन्हा महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यास मुभा मिळाली ती गोष्ट वेगळीच . विरोधी पक्षनेते तर असं वाटत ह्या संधीची वाटच बघत असतात कि काय ? एकट्या सरकारला आपण कुठे जबाबदार ठरवणार ह्या सर्वांसाठी......

गोष्ट माणुसकीची

एक आजी आजोबा मुबंईत राहणारे कोरोना नसताना मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर पाणी पाऊच विकायचे आता रेल्वे बंद असल्याने तिथे गर्दी तरी कुठली असणार म्हणावं ? त्या आजी आजोबाना कोण हितचिंतक ?

त्याच्या पोट पाण्याचा प्रश्न एरणीवर टांगलेला ? एबीपी माझाच संवाददाताने त्यांच्या सोबत सम्पर्क साधून .....त्यांना मदत केली ती वाखण्याजोगीच आहे ..... ते आजोबा कोरोना आल्याने आता डोळ्यात दिसत नसताना ही मास्क शिवून त्याची विक्री करतात . त्याच्या कामाला आजीही हातभार लावतातच . दोघे मिळून आयुष्याची अशी गुजराण भागवत आपल्या राहिलेल्या दिवसाचा असा गाढा

ओढत आहेत ......

कोरोनाने जग थांबलंय पण पोटाच्या भुकेसाठी माणूस मिळेल ती वाट स्वीकारायला जणू सज्ज झालाय...... कोरोनासोबत आता आपल्याला जगावं लागेल ह्या पेक्षा अधिक भीती सर्वसामान्याच्या मनातली उद्या कुठून आणि कसा पैसा येईल .

पहिला टास्क थाळी आणि टाळी

घरात बसून राहणाऱ्यांच्या मनात एक उत्सुकता कधी आपल्या देशाचे पंतप्रधान टीव्हीवर येतील आणि लॉकडाऊन खोलण्याबाबत घोषणा देतील .

एक दिया देश के नाम

मोदीजींनी कोरोना योद्धा जे आपले डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत त्यांच्यासाठी टाळी आणि थाळी वाजवायला सांगून स्वागत करायला सांगितले होते त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पण झालं काय ? जनतेने जमाव करून बॅण्ड वाजवायला लागले . घराचा बाहेर जमाव निर्माण करून एकत्रित येऊन थाळी वाजवायला लागलेत . ह्यात दोष कुणाचा ? समजून न घेण्याचा.... आपण शोधल्यास प्रत्येक गोष्टीत चांगली गोष्ट आढळून येईल ..... मोदींनी सांगितलं टाळी आणि थाळी वाजवायला म्हणून वाजवली.... असच झालं !

दुसऱ्या भाषणात सांगितलं , दिवे जाळायला... हा उत्साह एकात्मतेसाठी होता पण जनतेचा तीव्र रोष इथेही बघायला मिळाला , कोणी म्हणायला लागले दिवे जाळून कोरोना पळणार आहे का ? ह्यात कसली आली एकात्मता . दिवे जाळून कोरोना जाणार आहे असाही हास्यपद गैरसमज निर्माण झाला . काहींनी तर एक दिवा लावायला सांगितलं असता पूर्ण घर दिव्यांनी मढवून टाकलं .....

शुभम करोति कल्यानम.... आरोग्यम धनसंपदा..... हे सुभाषित रोष पत्करणार्यांनी स्वीकारलीच नसावी . त्या ओळी फक्त अंगणवाडीत असताना हात जोडून म्हण्यासाठी होत्या .....

इथे एकात्मता कसली न काय .... इथे ही मोदीजींच्या वक्तव्यावरून राजकारण उफाळून आलं ..... डिबेट मध्येही ह्यावरून चर्चा सत्र भरवण्यात आलं ..... कोरोनाने जग आणि लोकांचं वागणंही बदलवून टाकलं....

रस्ते ओसाड पडलीत

माणसं रस्त्यावरून दिसेनाशी झाली....

पक्षी आकाशात मनोसक्त उडताना दिसतात

पण त्या उडणाऱ्या पक्षांना , उडताना बघण्यासाठी

आता ती माणसं कुठे हरवलीत ?

दहशतीतच बंधिस्त झालीत...

विस्कळताना घडी आयुष्याची

पुन्हा नव्याने नवी उमेद घेऊन

सज्ज आहोत आम्ही लढाई जिंकण्यासाठी.....