कोरोना वॉरिअर
प्रिय मित्रा ,
तुझी धावपळ लक्षात येते आहे...तुझी धडपड कळते आहे....साथीच्या आजाराने होरपळलेली माणुसकी , त्यांच्या रक्षणासाठी तुझी चालेली कसोशी....आता तरी खाकीतल्या तुझ्या मागच्या
विहीन वृत्तीच प्रत्येकाला झालेलं दर्शन पटणारं असेल , असावंच ते !
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" चांगल्याची रक्षा करणे आणि वाईटाचा नायनाट करणे हे तुझं ब्रीद वाक्य....ह्या वाक्य प्रमाणे तू तुझं कर्तव्य कायमस्वरूपी बजावत आलाय.
एक चिमुरडी आपल्या आईला सांगते , आई बाहेर नको ना ग जाऊस.... बाहेर कोरोना आलाय.... आई नको जाऊ म्हणारी ती चिमुरडी आई पासून आपल्या दुरावतेय....तिची आई घरात एक माता असली तरी घर सांभाळून आपलं मातृत्व निभावताना सरकारी दायित्व पण पुरे करतेय . त्या दायित्वाची पोचपावती म्हणून हा समाज तिला काय देऊ शकणार ? सरकार पगार देतोय त्यांच्या कामाचा पण त्याचा जीव ? आपला जीव धोक्यात घालून सील बंद एरियात उन्हातान्हात राबणाऱ्या ह्या खाकीने किती महाराष्ट्रातील कर्तबगार जीवाची आहुती घेतली ..... ती भरपाई कोण करून देईल हो ?
दगडाचा वर्षाव झेलून पुन्हा त्याच वस्तीतील रोग्यावर उपचार करताना जणू त्याने शवाला दृढालिंग दिले असावे.... आपल्या कर्तव्याला अधीन ठेऊन कीर्तीचे जीव तू वाचवले असावेत . आणि त्यात झालीच असावी तुला बाधा तर चौदा दिवसाचा तो वनवास तुझ्याही माथी आलाच....
रात्रीच्या काळोखात जेव्हा गिनती न करणारे असंख्य तारे चमकत असतात तेव्हा वाटतं हे ब्रम्हांड अजूनही आहे तसेच सुखद प्रकाशित आहे .... अवकाशाच्या छत्रछायेखाली उभे राहून चांदण्या बघणारे ते जीव मात्र दहशतीत जगताहेत....
आकाशात उंच उंच भरारी घेणारे पक्षी.... त्यांच्या मार्गी आरूढ होताना वाटतं मनुष्य थांबलाय.... एका अदृश्य भीतीने कोसळला.... त्याला सावरला तुझा हात तो कायम आहे....
तुला कोरोना योद्धा म्हणावं कि-
जीवाला जीवाचं दान देणारा
दानव.... एकच आहे.... तुझं सम्बोधन
पण तुझं माहात्म्य थोर आहे.....
टीव्हीवर येणाऱ्या बातम्याने कित्येकांची मन हेलावून जातात. आम्ही प्रत्यक्षात तुझ्या कामाचं अनुभव घेऊ शकत नसलो तरी.... जे बघतो त्यातून तुला समजत जातो....तुझंही वेगळंच स्थान आहे... आम्ही सर्वानी तुझ्या त्या खाकीचा आदर करायला हवा....
पण काही महाभाग आहेत जे तुला अजूनही समजू शकले नाहीत.... तुला लहानसहान किरकोळ गोष्टींसाठी त्यांच्यावर काठी उचलावी लागते... ते बघताना अनेकांचे हसू अनावर होतात....आणि अनेक वारंवार त्या चुका करतात....
तोंडाला मास्क बांधायचा दंड आकारूनही काही असेच न मास्क बांधता फिरतात . तर काहींना आपल्या जीवाची पर्वा नसतेच पण इतरांच्या जीवालाही धोक्यात टाकतात...काहीही काम नसताना बाहेरच वातावरण कसंय हे बघायला पडणारेही आहेतच.... तुझ्या डोक्याचा ताण कमी व्हावा हे देखील काहींना वाटतच म्हणून... नियमाचं पालन करीत घरात बसणारीही आहेत .
तुझी नोकरी आणि रक्षक म्हणून पेलवून घेणारी तुझी भूमिका..... ह्यात कोंडमारा होणाऱ्या तुला असह्य होत असावं सामाजाचं वर्तन.... नियमाचं पालन केलं नाही म्हणून बेडकू बनवत तर काहींना गांधीगिरीचा मार्ग अवलंबुन तुला सरळ आणावं लागतं... तरी देखील आम्ही चुकतोच..... चुकणाऱ्या आम्हाला तूच दिशा दाखवतोस म्हणून ही व्यवस्था टिकून आहे .
तू देशाला सर्वस्व मानून कायम देशाच्या हितासाठी लढतो.... पण आम्ही सामान्य नागरिकांनी तुझं ते बलिदान कधीच जाणलं नाही.... तू म्हणजे समाजाचा मित्रच म्हणून तुला प्रिय मित्रा हे सम्बोधन मी दिलं.... काहीही वाईट झालं म्हणजेच तुझ्याकडे यायचं , असं म्हणतात सामान्यांनी तुझ्या दालनाची पायरी कधी ओलांडू नये..... पण हे अर्ध सत्य चुकीचं आहे....ह्या महामारीतच नाही पण काहीही झालं तरी आधी तात्काळ आमच्यासाठी तुला सज्ज असावं लागतं . नोकरी नोकरी म्हणजे काय तर तुझ्यासाठी चोवीसही तास सतर्कता .
तुला स्वतःला तरी स्वतःसाठी किती वेळ देत येत असावा ?
सकाळी आठच्या डय़ुटीसाठी घरापासून दूर असलेल्या पोलीस ठाण्यात वेळेत पोहोचायचे. पण १२ तास डय़ुटी करूनही सुटका होईल याची शाश्वती नाही.
दिवसभराच्या डय़ुटीतच केलेल्या चांगल्या कामाचे क्वचितच कौतुक मिळेल.... त्याची अपेक्षाही माफक . थोडासा हलगर्जीपणा झाला तरी वरिष्ठांचे खडे बोल हमखास ऐकावे लागत. कुणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाच तर वरिष्ठांचे ऐकत नाही, असा कांगावा.
बंदोबस्ताच्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही. क्वचितच लोकांकडून मदत.
हक्काची रजा अगोदर मागूनही ती शेवटपर्यंत मंजूर न करणे. आग्रह धरलाच तर कारवाईची धमकी.
वरिष्ठांकडून खासगी कामे सांगितली जाणे. अगदी मुलीला शाळेतून आण वगैर.....
एक माणूस म्हणून तुझ्याकडे पाहिले पाहिजे. लंडनचा बॉबी जसा अगदी पोलीस आयुक्तापर्यंत जाऊन पोहोचतो, तसा तुला मान दिला पाहिजे. पोलीस दलात दाखल होणाऱ्या शिपायाला त्याच्या हयातीत किमान पाच बढत्या मिळायला हव्यात. त्याला अगदी अतिरिक्त आयुक्तापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. पूर्वी १०-१२ वी पर्यंत शिक्षण घेतलेले पोलीस दलात शिपाई म्हणून भरती होत असत. आता ही जागा पदवीधरांनी घेतली आहे. अशा वेळी त्यांना बढतीच्या संधी असल्या आणि आपण अगदी अतिरिक्त आयुक्तपदापर्यंत पोहोचू शकतो, असे वाटू लागल्यास त्याच्यामध्येही उत्साह निर्माण होऊन तो कार्यक्षमतेने काम करू लागेल. थेट उपनिरीक्षक भरती बंद करा. शिपायांतूनच बढतीच्या संधी मिळाल्याचा निश्चितच फरक दिसू लागेल.
शासनात कुणीही १२ तासांची डय़ुटी करीत नाही. मग तूच का ? तुलाही आठ तासच डय़ुटी हवी. पण असं नाहीये .
तू आणि नागरिक यांच्यातील संघर्ष कमी करायचे असल्यास तुझ्या कामात समाजाला सामावून घेतले गेले पाहिजे. आपल्याकडे असे काही प्रयोग झाले आहेत ते केवळ तत्कालीन अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे. त्याला कायदेशीर कोणताही आधार नव्हता. तुझ्या यंत्रणेची कार्यपद्धती ठरवताना सर्वसामान्यांच्या मतांना प्राधान्य देण्यात आलेले नाही, हे तितकेच खरे आहे. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी असलेले तुझे खाते इतर कोणकोणती कामे करते आणि त्यातून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल रोष वाढतो आहे, याकडे कोणी गांभीर्याने पाहणार आहे की नाही? तुझ्या हल्ल्यांची कारणमीमांसा करताना ‘पोलिस सुधारणे’बद्दल चर्चा झाली पाहिजे. शहीद झाल्यावरच तुझे गोडवे गायचे आणि हयात असताना तुझ्या नावाने बोटे मोडण्याच्या घटना काही कमी नाहीत.
सर्वसामान्याच्या रक्षेसाठी म्हणून तुला त्यांच्या वस्तीत शिरताना दगडाचा मारा सहन करावा लागतोय . आणि त्याच वस्तीत महामारीचा उद्रेक होताना दिसतोय .
सरकारचे प्रतिनिधित्व करणारा आणि नागरिकांसमोर सरकार म्हणून सर्वप्रथम दिसणारा घटक म्हणजे तू आहे. तू सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक वेळा रस्त्यांवरही भेटतो. नागरिकांकडून अनेकदा सरकारवर असणारा रोष तुझ्या हल्ल्यांतून व्यक्त होतो. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांत तुलाच का मरतात, आंदोलनांमध्ये तूच का मार खातो अशी अनेक उदाहरणे देता येतील. तुझ्यावर कायदा-सुव्यस्थेची जबाबदारी आहे, हे जरी असले तर केवळ सरकारच्या विविध विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे कायदा-सुव्यस्थेचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याला तुलाच बळी पडतात. याला जबाबदार कोण म्हणायचे.... दुसऱ्या लॉकडाऊन नंतर मजूर वर्गाचा सर्वाधिक रोष पत्करताना तुला सामोरे जावे लागले होते.... बांद्रा मुंबई येथे गावी जाणाऱ्या मजुरांनी रस्त्यावर येऊन आक्रोश केला असता त्या जमावाला तुलाच शांत करावे लागले.... दिल्लीला रेल्वे सुरु न झाल्याने काही जमाव आनंद विहार जवळ येऊन गावी जाण्यासाठी पायदळी निघाला तेव्हा त्यांना तुलाच समजवत तिथे थांबण्याची विनंती करावी लागली.... तुझे कृतार्थ आमच्यावर कायम राहील.... मला माहित्येय.... पण तुझ्या हितासाठी आम्ही देखील तुला साह्य करणे तेवढेच गरजेचे आहे..... कोरोना वॉरियर्स म्हणून लढताना.... आम्ही तुझ्यापाठीशी असू.... ही लढाई तुझ्या एकट्याची नाहीये.... आपण ती सर्वानी सोबत मिळून लढायला हवी.... आम्ही कायम तुझ्या सोबत असू.....
बे वजह घर से निकलने की ज़रूरत क्या है"
"मौत से आँखे मिलाने की ज़रूरत क्या है"
"सब को मालूम है बाहर की हवा है क़ातिल"
"यूँही क़ातिल से उलझने की ज़रूरत क्या है"
"ज़िन्दगी एक नेमत है उसे सम्भाल के रखो"
"क़ब्रगाहों को सजाने की ज़रूरत क्या है"
"दिल बहलाने के लिये घर में वजह हैं काफ़ी"
"यूँही गलियों में भटकने की ज़रूरत क्या है"