porka books and stories free download online pdf in Marathi

पोरका


वयाच्या तिशीत तिनं घर सोडलं. वैतागली होती ती त्या घरच्या जाचाला.... लग्नाला तीन वर्ष झाली, पण अजुनही मुलबाळ नाही म्हणुन ती नकोशीच होती त्यांना , इतरांशी हसुन खेळुन राहणं .. खुप सार्‍या गप्पा गोष्टी करणं, मन भरुन हसणं, त्यांना मुळीच नाही पटायचं.
म्हणत की सभ्य ,संस्कारी लोकांचं चारचौघांत असं वागणं शोभत नाही, आता यात कुठले सभ्य संस्कारी लक्षणं आले त्यांनाच माहित...आता तर तिच्या शरीरावर वळही उठत होते....
ती वाट मिळेल तिथे चालु लागली
आता अंधार पडला होता...
सकाळपासुन चालुन तिचे पाय बोलु लागले होते. अजुन वीस - पंचवीस पावलांवर रेल्वे रुळ होता. तिथेच जावुन आपलं आयुष्य संपवावं असा विचार डोकावला तोच तिला तान्ह्या बाळाचा रडायचा आवाज आला , ती पळतच त्याच्याकडे गेली...
त्याच्या थोड्या अंतरावर तिसर्‍या रुळावर रक्ताचे थारोळे होते. तिथुन काही अंतरापर्यंत छिन्नविछिन्न शरिराचे तुकडे अन् कपडे ,साडीचे तुकडे सगळं विखुरलेलं होतं . हे बघून तिला सगळं काही समजलं... त्या पोरक्या तान्ह्याला उचलून हृदयाशी कवटाळले.. आणि तसेच तिथेच पदराने बांधले. जणु त्याच्याशी तिने नाळ जोडली आयुष्यभराची...
त्या आई बापासोबत काय झाले माहिती नाही पण या सगळ्याची शिक्षा या तान्ह्याला का?
तिने मिळेल तेवढे सरपण जमा केले आणि त्यावर जमेल तेवढे ते विखुरलेले शरिराचे तुकडे जमा केले आणि त्यांना अग्नी दिला..
पण या रुळावर दोघांचही नशीब इतकं भयावह असु शकतं याचा विचारही कोणी केला नव्हता...
रुळाच्या दुसर्‍या बाजुला तिने नारळाच्या फांद्या , दोरे , सुतळ्या चिंध्या जे मिळेल त्याने आसरा तयार केला आणि त्यात तान्हुल्याला घेऊन पहुडली.
त्याच्या स्पर्शाने तिला आईपण आले होते, जीवन संपण्याच्या मार्गावर असणार्‍या दोन जिवांना जीवनदान मिळाले होते .
आई - लेकराचं नातं दिवसेंदिवस फुलत होतं रेल्वेरुळावर तिनं एकटीनं थाटलेला संसार लेकराच्या गमतीजमतीनं बहरत होता. कोवळ्या वयात झळ बसलेलं ते लेकरु दिवसेंदिवस समजदार होत होतं.आईला कामात मदत करी,तिच्या पावलांवर पाऊल ठेवत रुळावरील कामगारांना मदत करी, आणि काही न काही कारणांनी रुळावर जीव देण्यासाठी आलेल्यांना वाचवत असत...
आईने एकदा पाहिले की रुळाच्या खालच्या बाजुला काहीतरी अडकलेले आहे, प्रवाशांचा जीव धोक्यात येणार ,,,, या विचारांनी थरकाप उडाला . दोन पट्ट्यांमध्ये अडकलेला दगड काढण्याच्या नादात गाडी येण्याची वेळ झाली ,त्या दोन पट्ट्या आता जवळ येवु लागल्या , तिने अंगातील सगळे बळ एकवटून तो दगड ओढुन काढला पण त्या नादात दोन पट्ट्यामध्ये तिचा पाय कधी अडकला समजलचं नाही .
स्टेशनवरुन गाडी निघण्याचा हाँर्न वाजला ,तसा तिचा पाय काढण्याचा प्रयत्न सुरु झाला त्या नादात तो अधिकच रक्तभंबाळ होऊ लागला . आईची ही अवस्था पाहुन त्या लहानग्याचा जीव कासावीस होऊ लागला . आईला वाचवण्यासाठी खटाटोप सुरू झाला ...जीवाच्या आकांताने आई ओरडु लागली , तो ञास तिला सहन होत नव्हता. त्या लहानग्या जीवालाही समजेना काय करावे .सगळीकडे आरडाओरडा करून झाला , सगळ्या प्रकारचे प्रयत्न करुन झाले पण त्यांचा आवाज ऐकणारे तिथे कोणीच नव्हते. आता ती ही त्याला ओरडु लागली, रागवु लागली की तु जा इथून गाडी येईलच आता... पण तो माञ त्याच्या प्रयत्नांत व्यस्त होता. अचानक त्याला आठवले की एकेदिवशी आई लाल कपडा घेऊन रेल्वेकडे पळत गेली तेव्हा रेल्वे थांबली होती ,आता लाल कपडा आणायचा कुठून , क्षणभर विचार करुन तो आईकडे पळत गेला.तिच्या अंगावरील फाटक्या साडीची अजुन एक चिंधी फाडली त्यावर आईच्या पायाचं भळाभळा वाहतं रक्त पुसलं. ते घेऊन तो रेल्वेच्या दिशेने पळणार तोच आईने अंगात होतं नव्हतं तेवढं बळ लावुन त्याला बाजुला ढकलले ,, तो जवळपास फेकलाच गेला आणि...
क्षणभर सारे सुन्न.....
त्या क्षणभरात आईचा देह छिन्नविछिन्न विखुरला गेला .....
भोवळ येऊन पडलेले ते लेकरु आज पुन्हा एकदा पोरकं झालं....
कायमचं.....

इतर रसदार पर्याय