मला फक्त सावाकाशरित्या बाहेर पडायचं “ हे बोलताना सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं आज तीच मन मोकळ झालं आणि मनावरच ओझ पण कमी झाल हे पाहिल्यावर सुरेशला बर वाटल आज तिने स्वताहून ह्यातून सावरली हे पाहून त्याला तिच्या बद्दल आदर अजून वाढला. आज ते दोघ एकमेकांच्या कुशीत शांतपणे झोपले.
प्रेझेंट डे
आज खूप दिवसांनी त्याला हे आठवल कारण सुहासच्या जन्मानंतर तिने दुसरा चान्स नाही घेतला आज तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुरेशला खूप भारी वाटत होत, कारण तिला जे पाहिजे होत ते तिला मिळणार होते , आज तिला राधिकाच्या स्वरूपात तिला सून नाही तर तिला आपली मुलगी भेटणार होती. तिची खूप इच्छा होती कि आपल्याला मुलगी हवी आणि ती आता आपल्या सुनेला पण मुलीसारख वागवणार हे तिनेच आधीच ठरवलं होत , आज तिच्या सुनेला भेटल्यावर तिच्या डोळ्यात आपसूकच पाणी आलं तिला आपला भूतकाळ आठवला असेल पण तिने त्यावेळी स्वतला सावरल, राधिकाच बोलण, तीच सगळ्यासोबतच वागण बघून तिला बर वाटल, कारण राधिका पण सुश्मासारखी च होती स्वभावाने. आता काही महिन्यानंतर राधिका आपल्या घरत येणार म्हणून तिने आधीपासूनच तिची आवड-नावड विचारली होती. जेणेकरून ती तिच्या आवडीच सगळ करेन. राधिकाला पण हे सगळ नवीन होत पण सासुंचा मन राखावा म्हणून ती काय बोलायची नाही . राधिका अगदी नवीन नवरी तर होती पण एका राणीसारखी वागणूक सुषमा द्यायची.
लग्न करून आल्यावर सुषमाला राधिका कुठे ठेऊ आणि कुठे नको अस झालेल ज्या दिवशी राधिका लग्न करून आली त्याचदिवशी राधिकाने स्वताच्या रुममध्ये सुषमाला बोलावलं आणि दर बंद करून घेतलं, आईंना बेडवर बसवून राधिका तिच्या पायापाशी बसली, राधिका अशी का वागतेय ह्याचा अंदाज सुषमा लागत नव्हता , राधिकाने वरती पहिले आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते ते पाहिल्यावर सुषमाला वाईट वाटल आपण काही चुकलो काय, कोणी काय बोलेल काय ..?? ह्याविचाराने सुषमाने विचारलं,” राधिका बाळा काय झालाय.” कोणी काय बोललं काय ..? अशी रडू नकोस मला संग काय झालाय ते ..??
राधिका आईच्या गुडघ्यावर डोक ठेवते आणि रडत सांगते कि ,” आई तुम्ही मला खूप सांभाळतात जेव्हा पासून माझ लग्न ठरलंय तेव्हापासून मी पाहतेय कि तुम्ही मला काहिंच कमी पडू देत नाही आहेत ह्याब्द्द्दल मी तुमची आभारी आहे देव पण कसा खेळ खेळतो, माझा जन्म झाला आणि आई मला सोडून गेली , मग बाबांनी दुसर लग्न कारायचा विचार केला नाही मला त्यांनी आई-बाबांचं प्रेम एकत्र दिल आणि मला कशाची कमी पडून दिल नाही. आज आई नाही आहे माझ्या आयुष्यात पण जेव्हा सुहासने आपली ओळख करून दिली तेव्हा मला तुम्ही माझ्या आईच्या रुपात भेटलात , पहिल्या भेटीपासून ते आतापर्यंत तुम्ही माझ सगळे आवडी-निवडी पूर्ण करत आलात आणि करत्यात पण मला सगळे म्हणतात कि,” तू खूप नशीबवान मुलगी आहेस “ हो मी आहेच पण आई मी तुमच्याकडे एक विनंती करते ,” मला ह्या अश्या सगळ्यांची सवय नाही ओ म्हणजे मला तुमची मुलगी म्हणूनच राहायचं पण special treatment नकोय तुम्ही आहात जश्या सगळ्यांसोबत वागतात तसेच वागा , मला आवडेल, मला माहितीय तुम्ही एका मुलीला गमावलय आणि मी सुध्धा माझ्या आईला गमवलय दोघींना एकीमेकिंच दुख समजून आहे तर मग आपण एकीमेकींना special treatment देण्यापेक्षा आपण नॉर्मल वागूया आणि एक खर सांगायचं तर कोण आपल्यापासून दूर गेल तर भीती वाटते ना, तर आई विश्वास ठेवा असी गोष्ठ पुन्हा काही होणार नाही”
समाप्त
(मनापासून खूप धन्यवाद माझी कथा वाचल्या बद्दल
कथेमध्ये लिहलेले काही तुमच्या आयुष्यातिल मिळत जुळत असेल तर तो निवळ योगायोग समजावा
तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर नक्की share करा,like kara, comment करा
माझ्या अजून असे नवी नवीन कथा येत राहतील नवीन कल्पना मध्ये )
धन्यवाद