Neela - 1 books and stories free download online pdf in Marathi

नीला... भाग १

विचार, भावना, कल्पनाशक्ती, Imagination.... बोलण्याला फक्त शब्द आहेत पण हे शब्द त्यातच एक जग आहे, माणूस आपल्याच कल्पनाशक्ती मध्ये एक नवीन जग तयार करू शकतो, तेवढाच नव्हे पण त्यात त्याला हवं तसं जगतो, पण जेव्हा एक माणूस आभासी जग ला सोडून त्याच्या कल्पनाशक्ती मध्ये जगायला लागतो तेव्हा तो आभासी जगासाठी घातक खूप घातक होऊन जातो....

अशीच ही एक कथा आहे शिरीष ची ज्यात त्याच्या कल्पशक्ती ने आभासी जग च्या कपाळावर एक प्रश्न चीन उभा करून ठेवला.. " नीला"

अध्याय एक.... शुरवात

रात्री चे १:३० वाजले असतील, इतक्या काळोखात कुटून तरी एक गाडी येऊन थांबली.... शिरीष ने गाडीचा दार उघडला आणि हळूच बाहेर आला, मागे जाऊन त्याने गाडीची डिकी उघडली त्यात एक माणूस होता, तो माणूस बेशुद्ध होता.... शिरीष ने जसं तसं करून त्या माणसाला बाहेर काढलं आणि पुढे घेऊन जाऊन त्याला रेल्वेच्या पट्टरीवर टाकून दिलं.....

शिरीष परत त्याच्या गाडी जवळ आला आणि वाट पाहायला लागला गाडीची, थोडयाच वेळात वेगाने एक गाडी आली आणि पट्टरीवर पडलेल्या त्या माणसाच्या वरून निघून गेली.... त्या माणसाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, पण शिरीष च्या चेहऱ्यावर जरा पण लाज किंवा भित्ती नव्हती, उलट त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची एक वेगळीच भावना उठून आली होती....

शिरीष गाडीत बसला, त्याने गाडी ला उ-टर्न घेतला आणि तिथून निघाला....

३ महिन्या आधी....

शिरीष ऐका खोलीत निवांत बसला होता, तेव्हाच तिथं श्रावणी आली....

"शिरीष.... हे बघ तुझासाठी मुंबई वरून पत्र आला आहे, माहीत नाही कसलं आहे, बघ तूच"..... श्रावणी

शिरीष ने श्रावणी ला बघितलं, एका क्षणा साठी शिरीष श्रावणीला बघताच रहायला पण काय बोलला नाही...

"शिरीष काय झालं, शिरीष".... ????

"आई बाबा ला जाऊन आज एक वर्ष झालं... आजच्या दिवशीच त्यांचा अकॅसिडेंट झाला होतं, मला शेवट च्या क्षणी त्यांच्या चेहरा सुद्धा बघायला भेटला नाही"..... शिरीष बोलता बोलता रडायला लागला

"शिरीष... रड रडून घे, आई बाबा गेल्यानंतर आज एक वर्ष झालं, तेव्हा जाऊन आज कुठे तरी मी तुला रडताना पाहिलं आहे, एक वर्ष झाला... कूट पर्यंत मनात अस दुःख लपवून ठेवणार आहेस तू....??? आज मन मोकडं करून रडून घे, मनात जे आहे ते बाहेर काढून टाक".... श्रावणी

"काय करू श्रावणी.... काहीच कळत नाही यार, कुठे जाऊ कोणाला सांगू".... ??? शिरीष

श्रावणी ने शिरीषला जवळ घेतलं.... शिरीष खूप रडत होता, शेवटी एक वर्षा नंतर त्याच्या मनातला दुःख आज बाहेर पडत होतं.....

श्रावणी शिरीष च्या बाजूच्या घरात राहते, लहानपणापासून श्रावणीला शिरीष आवडतो.... शिरीष च्या मनात श्रावणी ला घेऊन कधीच प्रेमाची भावना नाही आली हे श्रावणीला पण माहीत होतं पण तरी श्रावणी ला कधीच त्याचा फरक पडला नाही, तिचा शिरीष वर खूप प्रेम होतं....

एक वर्ष आधी एका अकॅसिडेंट मध्ये शिरीष चे आई बाबा मेले... शिरीष तेव्हा अमेरिका गेला होता, पण वस्तुस्थिती काय अशी होती की शेवटच्या क्षणी शिरीषला त्याच्या आई बाबांचा चेहरा सुद्धा बघणं नशीब नाही झालं.....

श्रावणी गेल्या एक वर्षा पासून शिरीष च्या मागे सावली सारखी त्याच्या पाठीशी होती, त्याच्या दुःखाची फक्त ती एकटीच भागीदार होती.....

श्रावणी ने शिरीषला शांत केलं आणि त्याला तो पत्र दिला.... शिरीष ने पत्र उघडून पाहिलं, तो पत्र एका कंपनी चा appointment letter होता, शिरीष ला मुंबई मध्ये एका मोठ्या I.T कंपनी मध्ये मॅनेजर ची पोस्ट मिळाली होती, श्रावणी ने तो पत्र त्याच्या हातातून घेतला आणि वाचलं....

"शिरीष हे"....??? श्रावणी

"हो श्रावणी मीच Job साठी Apply केलं होतं.... माझं मन लागत नाही इथं, मला इथून दूर जायचं आहे कुठे तरी".... शिरीष

श्रावणी ची ईच्छा तर नव्हती पण तरी, शिरीष च्या खुशी साठी ती काहीही बोलली नाही....

पहाटे ७ च्या सुमारे शिरीष मुंबई साठी निघाला...

"शिरीष... काहीही मदत लागली तर मला कळव आणि संभाडून रहा.... वेळेवर जेव आणि झोप मी नाहीये तिथं तुझी काळजी घ्यायला, काळजी घेत जा जरा, वेळ भेटलास कधी फोन कर".... श्रावणी

"हो श्रावणी.... तू पण काळजी घे, जाता जाता एकच सांगतो, माझ्यासाठी तू खूप केलस त्या साठी धन्यवाद आणि श्रावणी.... बस्स माझी वाट पाहू नको".... शिरीष

शिरीष एवढं बोलून पटकन गाडीत बसला आणि तिथून निघाला....

शिरीष चे शेवटचे शब्द ऐकून श्रावणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.... तिला खात्री होती की आता शिरीष येणार नाही, पण तरी तिच्या मनात कुठे तरी एक आस होती की एक दिवस तो येईल फक्त तिच्यासाठी.....

शिरीष ने मुंबई मध्ये त्याच्या राहण्यासाठी आधीच एक फ्लॅट भाड्याने घेऊन ठेवला होता, दुपारी तो तिथं पोचला.... घरात येताच त्याला वेगळच वाटायला लागलं, त्याने खिडकी उघडली आणि थंड वारा त्यांच्या शरीराला असं स्पर्श करून गेला की जणू कोणी तरी त्याला येऊन मिठीत घेतलं.....

शिरीष चा फोन वाजला, श्रावणी चा कॉल होता... शिरीष ने फोन कट केला आणि तिथं श्रावणी रडायला लागली, पण तिने स्वतःला सावरलं आणि मनात ही आस घेऊन शांत झाली की एक दिवस शिरीष परत येणार....

शिरीष ने सामान वगैरे घरात नीट लावलं आणि फ्रेश होऊन तो शांत पणे बेडरूम मध्ये जाऊन झोपला, खूप थकला होता तो....

शिरीष बिल्डिंग जवळ पोचला.... त्याने गाडी पार्किंग मध्ये लावली आणि वरती आला, हळूच त्याने फ्लॅटचा दार उघडला आणि बेडरूममध्ये गेला.... शिरीष बेडरूमच्या बाल्कनी मध्ये येऊन थांबला, तेव्हाच मागून एक मुलगी हळू हळू चालत त्याच्या जवळ आली.... शिरीषचं लक्ष नव्हतं, तो त्याच्याच धुंदीत होता त्याने खिशातून एक cigrate काढली.... तेव्हाच

"परत cigrate प्रॉमिस केलं होतंस ना नाही पिणार करून".....

"हो नीला, नाही पिट.... तुझीच वाट पाहत होतो, कुठे गेली होती"..... म्हणत शिरीष ने cigrate फेकून दिली....

"मी कुठे जाणार इतच तर होती तुझ्याजवळ"..... नीला

"काय झालं शिरीष.... ज्या कामासाठी गेला होतास ते झालंना"....??? नीला

"हो नीला झालं.... सुरज आता कधीच सुरज नाही बघू शकणार"..... शिरीष

" हां "..... शिरीष

"नीला हे तर अजून शुरवात आहे.... लिस्ट मधून हा पहिला नाव होता, अजून पण आहेत ज्यांना वरती पोचवायचं आहे"..... शिरीष

"हो शिरीष.... जातील सगळे जातील, एक एक करून".... नीला

"बरं मला खूप झोप आली आहे, खूप दमलोय मी".... शिरीष

"हो.... चल ये तू झोप मी झोपवते तुला"..... नीला

नीला येऊन बेडवर बसली.... आणि तेच शिरीष ने निलाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तो झोपी गेला.... नीला हळूच शिरीष च्या केसांमध्ये हाथ फिरवत होती आणि शिरीष निवांत होऊन झोपला.....

--------------------------------------------------------- To Be Continued -----------------------------------------------------------------


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED