नीला... भाग ५ Harshad Molishree द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नीला... भाग ५

अध्याय ५... अफवा

"सर शिरीष आता घोडबंदर रोड ला आहे आणि तिथून पुढे जात आहे"..... विजय

"Then lets catch him.... no idea to kutey चालला आहे... may be अजून एक हत्या करायला"..... वैभव

वैभव आणि विजय शिरीषला पकडण्यासाठी निघाले, वैभव शिरीषला GPS ने TRACK करत होता, शिरीष तेव्हाच मधीच थांबला....

"सर तो थांबला आहे मधीच, काय ठीक वाटत नाहीये"..... विजय

वैभव full speed मध्ये गाडी चालवत होता आणि शेवटी तो शिरीष जिथं थांबला होता तिथं पोचला..... वैभव ने शिरीष च्या गाडीच्या पुढे लावली आणि खाली उतरला....

"काय रे असं मधीच गाडी लावून का थांबला आहेस".... वैभव

"सर गाडी बिघडली आहे माझी, म्हणून थांबलोय मदत साठी बघत हो शोधत होतो कोणाला तरी, तुम्ही मदत करणार का".... ??? शिरीष

"अच्छा...मदत थांब मी करतो ना मदत तुझी अजून कोण आहे सोबत तुझ्या".... वैभव

"सर कोण नाही सोबत एकटाच आहे मी".... शिरीष

"कुठे जात होता, सर मी गावी जातोय २ दिवसासाठी".... शिरीष

"अच्छा मग आता गावी पळून जातोय, विजय ह्याला आता टाक".... वैभव

"सर आत टाक म्हणजे, थांबा अरे सर पण मी केलं काय आहे... सर ऐका तर सर".... शिरीष बोलत रहायला पण वैभव ने त्याच्या काही ऐकलं नाही विजय ने त्याला पकडून गाडीत बसवलं आणि स्टेशनला घेऊन आला....

शिरीष ला interrogation room मध्ये बसवलं... आणि वैभव आत आला

"बघ जितक्या लवकर तू प्रश्नाचे उत्तर देशील तेवढ तुझ्यासाठी बरं आहे मग फटाफट उत्तर दे, ती मुलगी कुठे आहे".... वैभव

"सर कुठली मुलगी"... शिरीष ( शिरीष मुद्दाम काहीच बोलत नव्हतं, अस वागत होता जणू त्याला काही माहीतच नाही )

"नीला... जिच्या सोबत मिळून तू लोकांना मारतोय, हत्या करतोय".... विजय

"बघ जास्त शहाणपण दाखवू नकोस नाहीतर माझी सटकली ना तर, बघ गप्प खर काय ते सांगून टाक".... वैभव अगदी रागात बोलला

"सर काय बोलतायेत तुम्ही... कोण नीला आणि मी का कोणाची हत्या करणार"....??? शिरीष

"आज तुझा तो बिल्डिंगचा watchman मेला, तूच मारलं ना त्याला'.... वैभव

"सर मी का कोणाला मारणार.... काय बोलतायेत तुम्ही, सर माझी गाडी बिघडली म्हणून मी थांबलो होतो इथं, मी तर गावी चाललोय २ दिवस ची सुट्टी भेटली आहे म्हणून".... शिरीष

"खोटं खोटं बोलतोय सर हा".... विजय शिरीष ला बोलताना मधेच अडवत बोलला

"सर मी खरं बोलतोय".... शिरीष

"बघ शिरीष मला आता राग येतोय प्रेमाने सांगून टाक.... अजून कोणाला मारणार होतास, कोना कोणाची हत्या केली तू, रूम नंबर १३०३ मध्ये काय झालं होतं".... वैभव

"रूम नंबर १३०३ ऐकताच शिरीष वैभव समोर बघायला लागला....
बघ शिरीष जर तुझासोबत काय चुकीचं झालं असेल तर मी तुझी मदत करेल पण काय खरं आहे ते सांग".... वैभव

स"र रूम नंबर १३०३ मध्ये मी रहातो महिनाभर झाला असेल जवळ पास... बाकी मला खरच माहीत नाही की तुम्ही काय बोलतायेत".... शिरीष

वैभव रागात ओरडला... "विजय याला आताच ठेव, जो पर्यंत हा खरं बोलत नाही याला पाणी सुद्धा देऊ नको.... मारू द्या सल्याला इथं".... वैभव

शिरीष ला एक रूम मध्ये टाकून दिलं, बघता बघता ४ तास झाले रात्रीचे ११ वाजले होते, शिरीषला खूप तहान लागली होती तो पाणी मांगत होता पण त्याला कोणी प्याला पाणी दिलं नाही.... कंटाळून शिरीष खाली बसला, त्याने डोळे बंद केले....

"शिरीष पण जे तू बोलतोय.... त्यात तुझ्या जीवाला धक्का आहे".... नीला

"तर काय झालं.... मला वाचवण्यासाठी तू आहेस ना"... शिरीष

"आणि जर काय चुकून झालं तर"... ???? नीला

"तर मग माझं नशीब, तू इतकं विचार करू नकोस नीला, त्यांना त्यांच्या गुनाहची सजा मिळाली पाहिजे आणि माझी इच्छा आहे की हे तू स्वतःहून करावं, मी आहे तुझासोबत".... शिरीष

"शिरीष ठीक आहे, पण तूला तुझा promise माहीत आहे ना.... विसरू नकोस ते".... नीला

"हो नीला नाही विसरणार"... शिरीष

"काय रे... मेल्या, इतकं वेळ झालं १२ वाजून गेले रात्रीचे तरी शांत बसला आहेस पाणी नकोय का तुला, असच मारायचं आहे का ??? बघ अजून पण वेळ आहे सांगून टाक".... वैभव

शिरीष काहीच बोलला नाही बस्स त्याच्या जागेवरून उठला आणि वैभवाच्या जवळ आला, interrogation room मध्ये फक्त शिरीष आणि वैभव दोघेच होते....

"बघ मला माहित आहे की त्या मुलीबरोबर काय तरी चुकीचं घडलं आहे, पण जर प्रत्येक जण असं प्रतिशोध च्या नावाने मर्डर करायला लागलं तर कस चालेल".... वैभव

शिरीष शांत उभा होता.... तो काहीच बोलत नव्हता, वैभव शेवटी कंटाळून बाहेर जायला लागला, तेव्हाच शिरीष बोलला...

"सर काय तरी चुकीचं नाही, खूप काय झालं आहे तिच्यासोबत... विश्वासाने तिने मित्र समजून त्यांना घरात येऊ दिलं, पण त्यांनी काय केलं तिचं फायदा उचलून बळजबरीने तिच्या वर बलात्कार केला एक एक करून त्या तिघाणे, तिला मारलं, इतकं मारलं की तिला चालता सुद्धा येत नव्हतं"....

(बोलता बोलता शिरीष च्या डोळ्यातून पाणी आलं.... त्याची हिम्मत तुटली)

शिरीषचं बोलणं ऐकून वैभव मागे फिरला आणि शांतपणे शिरीषच बोलणं ऐकायला लागला.....

"तो watchman.... त्याला सगळं माहीत होतं पण त्याने काय केलं नाही, बस एक whisky च्या बाटली साठी, watchman काय असतो आपल्या घराची रखवाली करणारा पण इथं तर, ते लोक बलात्कार करून निघून गेले, पण त्या watchman ने त्या गोष्टीचा फायदा उचलला.... ते लोक गेल्यानंतर तो रूम मध्ये गेला, ती अशीच जमिनीवर बेशुद्ध पडली होती, कपडे पण नव्हते तिच्या अंगावर.. आणि त्या हलकट ने तिची मदत केली पाहिजे पण नाही त्याने पण तिच्या वर बलात्कार केला"....

शिरीष अगदी रागात रडत रडत बोलत होता, तेच हे सगळं ऐकून वैभवला पण खूप राग येत होता....

"पण काय झालं साहेब, पैस्यांचा जोरा पूढे बिचारी हारली ती, ना कोणी तिच्या मदत साठी पूढे आलं".....

"बस्स हे सगळं फक्त अफ्फा म्हणून लोकांचा कानात रहायला, अफ्फा.... सगळ्याची life normal झाली, त्या watchman ने तर त्यांना blackmail करून पैसे पण घेतले आणि मग सगळे अशे जगायला लागले जणू काय झालच नाहीये, ह्यांच्या सोबत पण तेच होणार... लोक आत्महत्या समजून विसरून जाणार काय झालं का झालं, कोणाला कळणार नाही आणि जरी कळलं तर फक्त अफवा म्हणून".....

"तुम्हाला नाही समजणार सर, की तिला किती त्रास झाला, किती त्रास तिने भोगावलं आणि अजून पण भोगावतेय.... मी अगदी जवळून तिचा तो त्रास, तो दुःख बघितलं आहे, अजून पण कानात तो आवाज ऐकू येतो.... तिच्या चेहऱ्यावर तिच्या मनाच्या शांती साठी मी तिला बोललो की मारून टाकूया त्यांना, हो आम्ही मर्डर केलं आहे... मी मर्डर केलं आहे लटकवून टाका मला फाशी वर".....

हे ऐकताच वैभव शुद्धीवर आला..... तो अचानक बोलला

"शिरीष ती मुलगी कुठेय... शिरीष नीला कुठे आहे आता".... वैभव

शिरीष जोर जोरात हसायला लागला, वैभव ने बंदूक काढून शिरीष च्या डोक्यावर लावली...

"शिरीष शेवटचं विचारतोय नीला कुठे आहे"....??? वैभव

"नीलाला आता जिथं असायला पाहिजे ती तिथंच आहे, आजची रात्र ह्या खेळ ची शेवटची रात्र आहे आणि आमच्या लिस्ट मधला तो शेवटचा माणूस.... आणि मला खात्री आहे की नीला ने त्याला आता पर्यंत वर पण पोचवलं असेल".... शिरीष

शिरीष जोर जोरात हसायला लागला, वैभव ने रागात शिरीषला जोरात लाट मारली आणि शिरीष खाली पडला, पण शिरीष तरी हसत होता, तेव्हाच वैभवचा फोन वाजला, वैभव शांत झाला आणि त्याने फोन उचलला....

-------------------------------------------------------- To Be Continued ------------------------------------------------------------------