prit - 1 books and stories free download online pdf in Marathi

प्रित - भाग 1

"प्राची उठ किती उशीर झालाय बघ उठ बघू आता लवकर." आई प्राचीला झोपेतून उठण्यासाठी आवाज देत असते पण प्राचीवर मात्र त्या आवाजाचा काहीच परिणाम नसतो. प्राचीला आवाज देऊन वैतागलेली आई प्राचीच्या रूमच्या बाहेर निघून जातात. जातानी त्या रूमच्या खिडकीचा पडदा उघडतात. खिडकीतून येणारी सूर्याची किरणे प्राचीच्या चेहऱ्यावर रेंगळतात. त्यामुळे मुळातच सुंदर असलेल्या प्राचीचं सौंदर्य अजून खुलून दिसतं.

आई प्राचीच्या रूम मधून निघून खाली किचन मध्ये येतात. तिथे अमृता नाश्त्याची तयारी करत असते. अमृता प्राचीच्या मोठ्या भावाची म्हणजे श्री ची बायको. अमृता व श्री कॉलेज पासून सोबत असतात व एक वर्षापूर्वी त्यांनी घरच्यांच्या मर्जीने लव मॅरेज केलेले असते. आईंना किचन मध्ये आलेले बघून अमृता त्यांना विचारते,

"आई प्राची उठली का?"

"नाही गं, ती कसली उठते एवढ्या लवकर. आपण आपली तयारी करून ठेऊ. ती लोक दूपारी जेवणाच्या आधी येतील. तोपर्यंत प्राची उठून तयार होईल." आई

"तस तिला उठवण्याचा एक मंत्र आहे माझ्याकडे." अमृता

"अगं मग जा उठव ना तिला लवकर." आई

"त्याची काहीच गरज नाही. मी काय लहान आहे का? जे तूम्ही मला तंत्र-मंत्र वापरून उठवण्याचा प्रयत्न करत असतात." प्राची उठून आईला शोधत किचनमधे येते व आई व अमृताच बोलणं ऐकून तनतनतच बोलली.

प्राचीला आज तीच तीचंच उठलेले बघुन आई व अमृता दोघींनाही आश्चर्य वाटतं. पण लगेचच आईला प्राचीच्या लवकर उठण्याचं कारण लक्षात येत.

"प्राची काय ग रूममध्ये ए सी चालू होता ना?" आई

"हो." प्राची

"मग तूला एवढा घाम कसा आला." आई

"कुठे घाम आलाय मला, ते मी रूममधून चालत आली ना म्हणून घाम आलाय." प्राचीने आपली बाजू सावरत आईला ऊत्तर दिलं व अमृताकडे बघत तिला खुणावलं आपल्या रूममध्ये येण्यासाठी व ती रूममध्ये जाण्यासाठी वळाली. तोच आई तिला बोलली,

"प्राची, परत स्वप्न पडलं का?"

आईच्या तोंडच वाक्य ऐकून प्राचीने आवंढा गिळला व डोळ्यांतील पाणी लपवत ती बोलली,

"नाही ग आई, काही स्वप्न नाही पडलं मला. तू आपली उगाचच काही विचार करतेस." अस बोलुन प्राची आपल्या रूमकडे पळाली.

प्राचीच ऊत्तर ऐकून आईला कळून गेल की तिला काहीतरी भितीदायक स्वप्न पडलयं आणि त्यामुळेच ती लवकर उठली व आपल्याला शोधत किचनमधे आली. त्यामुळे त्या चिंतेत पडतात. हे बघुन अमृता आईला म्हणते,

"आई तूम्ही काळजी करू नका. मी बघते काय झालय ते."

"हो तू बघ तिला. तुलाच सांगेल ती." आई

आईने सांगितल्यावर अमृता प्राचीच्या रूममध्ये येते. प्राची खिडकीत ऊभी राहून बाहेर बागेतली ऊमललेली फूल बघत अमृताची वाट पहात असते. अमृता तिला आवाज देते. तिचा आवाज ऐकून प्राची अमृताला मिठी मारून रडू लागते. प्राचीला असं रडताना बघुन ती तिची समजूत घालते. व तिला काय स्वप्न पडलं ते विचारते,

"वहीनी खूप वाईट स्वप्न पडलं ग मला, स्वप्नात ना मी माझ्या जवळच्या आवडत्या व्यक्तीला माझ्यापासून दूर जातानां बघितलं. त्याचा खूप त्रास होत होता ग मला. अजूनही आठवलं तरी शहारे येतात अंगावर." प्राची

"ये वेडा बाई स्वप्न होत ते. स्वप्न काही खरे होतात का कधी. त्याचा विचार करणं सोड बघू आता. आज जो राजकुमार तूला बघायला येणार आहे त्याचा विचार कर." अमृता

हे ऐकून प्राचीची कळी खुलते व ती लाजते. अमृता ही तिला चिडवत लवकर आवरायला सांगते.

बाहेर हाॅल मध्ये श्री व बाबा बोलत असतात. आज जे पाहूणे प्राचीला बघायला येणार असतात ते कोण आहेत, काय? हे कोणाला ही माहीत नसतं. पण बाबांसाठी येणारे पाहुणे हे फार महत्वाचे असतात. त्यांनी प्राचीला पसंत केल्यावर त्याचा फक्त कौटुंबिक स्तरावरच नाही तर बिझनेसच्या दुनियेतही फार मोठा परिणाम होणार असतो. थोडक्यात प्राचीच लग्न ही एक बिझनेस डील ठरणार असते. त्या संदर्भातच बाबा श्री सोबत बोलत असतात. बाबांच्या या निर्णयाने श्री काहीसा नाराज असतो. बाबा त्याला समजावत असतात.

"बाबा तूम्ही अस कस करू शकता? आपली प्राची काय एखादी वस्तू आहे का जीची तूम्ही किंमत ठरवताय?" श्री

"मला कळतय तूला काय म्हणायचं श्री. पण हे बघ प्राचीवर किंवा तिच्या भावी आयुष्यावर याचा काही परीणाम होणार नाही." बाबा

"होणार कसा नाही बाबा, दोन माणसांना लग्न करण्यासाठी त्यांच्यात प्रेम असावं लागतं, प्रेम नाही निदान त्यांनी एकमेकांना पसंत तरी कराव लागत." श्री

"हे तू मला शिकवतोय आहेस. हे बघ जरी यामुळे आपल्या बिझनेसला फायदा होणार असला तरी प्राचीला हे लग्न मान्य नसेल तर हे लग्न नाही होणार. हे माझं प्राॅमिस आहे तूला." बाबा

बाबा बोलतच असतात तेव्हाच श्री ला एक काॅल येतो व त्याला काही अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागतं. बाबा त्याला लवकर घरी यायला सांगतात. श्रीची गाडी बंगल्याच्या गेटच्या बाहेर पडते व प्राचीला बघायला येणार्या पाहूण्यांची गाडी आत येते. त्यांना आलेलं बघून बाबा आईंना आवाज देतात व प्राचीलाही पटकन आवरायला सांगतात. बाबा बाहेर पोर्च मध्ये पाहुण्यांच्या स्वागताला थांबतात.

गाडी पोर्चमध्ये येऊन थांबते व गाडीतून बाबांचे बिझनेस पार्टनर मि. अग्निहोत्री व सौ. अग्निहोत्री उतरतात. बाबा त्यांच स्वागत करतात. त्यांच्या सोबत गाडीतून श्रीच्याच वयाचाच एक मूलगा गाडीतून बाहेर येतो. सगळे त्याला बघतच राहतात. मि. अग्निहोत्री त्याची ओळख करून देतात.

"मि. साने हा माझा मूलगा, अदित्य!"

"याला कोण नाही ओळखणार खूपच कमी कालावधीत बिझनेसच्या दुनियेतला बेताज बादशाह झाला आहे." बाबा

आणि ते सर्व जण अदित्यच कौतुक करत हसतात. सर्व जण हाॅलमध्ये येऊन बसतात. थोडावेळ गप्पा झाल्यावर अमृता प्राची ला घेऊन हाॅलमधे येते. हाॅलमध्ये आल्यावर अमृता अदित्यला पाहूण आश्चर्यचकित होते व नकळत ती बोलते,

"अदित्य! तू ईथे!"

अदित्य तर अमृताला पाहूण सरळ ऊठून उभा राहतो. तेवढ्यात प्राचीची आई त्यांना म्हणते,

"तूम्ही ओळखता एकमेकांना?"

"हो आई, ते म्हणजे श्री, अदित्य व मी काॅलेजला सोबतच होतो." अमृता

पुढे अमृता काही बोलणार तोच बाबा अमृताला बोलतात,

"अमृता बाकी गप्पा आपण नंतर करू आधी अदित्य आणि त्याचे आई वडील ज्या कामासाठी आलेत ते तर करू."

"बाबा हो, पण... " अमृता

"पण काही नाही अमृता, जा श्री ला फोन लावून बघ तो कुठपर्यंत आलाय." बाबा

"हो." अमृता नाईलाजाने बोलते व अदित्य कडे बघत आत जाते. अदित्य ला ही त्याचे वडील हात धरून खाली बसवतात. अदित्य त्याच्या वडीलांना म्हणतो,

"मी चाललोय, मला ईथे एक मिनिट पण थांबायच नाहीये."

मि. अग्निहोत्री त्याला दरडावणीच्या स्वरात पण प्राचीच्या बाबांना ऐकायला जाणार नाही याची काळजी घेत बोलतात,

"अदित्य तू मला वचन दिलंय. मी ज्या मुलीशी सांगेल तिच्याशी लग्न करण्याचं."
आता मात्र अदित्यचा नाईलाज होतो व तो परत आपल्या जागेवर बसतो.
प्राचीला तर अदित्य पहिल्या नजरेतच पसंत पडतो. अदित्य तिला एकदाच पहातो. नंतर घरच्यांच्या परवानगीने प्राची व अदित्य एकांतात बोलण्यासाठी जातात.

प्राची तिच्या स्वभावाप्रमाणे अदित्यशी अखंडपणे बोलत असते. अदित्यच्या कानात मात्र आपल्या वडीलांचे शब्द कानात गरम तेल टाकल्या प्रमाणे घुमत असतात.

"तिला विसरून जा. ती तिच्या आयुष्यात खूप पूढे निघून गेली असेल. म्हणूनच ती एवढ्या वर्षात एकदाही तूला भेटायला आली नाही." पण अदित्य मात्र ते खर मानायला तयार नसतो.

थोड्यावेळाने ते परत हाॅलमधे येतात, तेवढ्यात श्री घरी येतो. अदित्यला घरात पाहूण त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. तो अदित्य ला बघून जोरात ओरडून बोलतो,

"बाबा तूम्ही याच्यासोबत प्राचीच लग्न ठरवताय, मी हे लग्न होऊ देणार नाही."

त्याच्या अशा बोलण्यानं सर्वच जण ऊठून उभे राहतात. प्राचीला तर समजतच नाही की तिचा दादा अस का बोलतोय. कारण मनोमन तिला अदित्य आवडलेला असतो. तिला सकाळ च स्वप्न आठवत व ती रडायला लागते. प्राचीचे बाबा श्री चा हात धरतात व त्याला ओढत आत घेऊन जातात व त्याला समज देतात. व थोड्यावेळाने बाहेर येतात. नंतर अग्निहोत्री कुटुंब ही घरी निघून जाते. रस्त्याने अदित्यला आपल्या भूतकाळातील काॅलेजचे दिवस आठवतात. त्या आठवणींत त्याच्या डोळ्यासमोर परत तिचाच चेहरा दिसतो व नकळत त्याच्या तोंडून एक नाव बाहेर पडते,

"मिरा"

ईकडे मुंबईत एका मल्टिनॅशनल कंपनीत एका मीटिंगमध्ये एक अनाउन्समेंट होते की कंपनीची एक ब्रॅन्च पुण्याला ट्रान्स्फर होतेय. हे ऐकून तिथे जमलेल्या सर्वांनाच आनंद होतो. पण हे ऐकून एक मुलगी व्यथित होते व ती असते,

' मिरा'

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED