प्रित - भाग 3 Sanali Pawar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रित - भाग 3

शाॅपिंग झाल्यावर प्राची आणि अमृता काॅफी शाॅप मध्ये येतात तेव्हा श्री आधीच तिथे आलेला असतो व त्याच्या सोबत अदित्य असतो. अदित्यला श्री सोबत बघुन प्राचीला आश्चर्य वाटतं. ती स्वतः ला एक चिमटा काढते.

अदित्य आणि श्री काहीतरी बोलत असतात. प्राची आणि अमृताला आलेलं बघून ते गप्प बसतात. श्री प्राची व अमृताला बसायला सांगतो. प्राची श्रीला म्हणते,

"तूम्ही दोघं एकत्र कसे?"

"का? आम्ही सोबत नाही बसू शकत का?" श्री तिची गम्मत करत असतो.

"नाही तसं नाही पण.." प्राची

"पण काय हं? आम्ही मित्र आहोत. आमच्यात रुसवे फुगवे चालूच राहणार. " अमृता

"म्हणजे वहीनी तू पण" प्राची

"हो, मी पण." अमृता

"प्राची तू जर आपल्या मोठ्या भावावर इतकं प्रेम करू शकते तर मी एवढ तर करू शकतो. आणि असंही अदित्य आणि मी तर मित्र आहोत. आणि मैत्रीत एवढ तेवढं चालतच." श्री

" पण खूप बर वाटल, ईतक्या दिवसांनंतर भेटून. आणि याच क्रेडीट फक्त तूलाच जातं प्राची." इतका वेळ त्यांच बोलणं ऐकत बसलेला अदित्य बोलतो.

"मी काहीच केलेलं नाहीय." प्राची

"पण तूझ्या निमित्तानेच तर आम्ही परत एकत्र आलो." अदित्य

नंतर त्यांच्यात बर्याच गप्पा रंगतात. अदित्य आणि प्राचीत फोन नंबर एक्सचेंज होतात. थोड्यावेळाने अदित्य ला काही काम असल्यामुळे तो निघून जातो. अमृता व प्राची ही घरी येतात. प्राची आज खूपच खूश असते. कारण तिला अदित्य आवडलेला असतो आणि त्याच्या बद्दल काही माहिती नसतानाही ती नकळत त्याच्या प्रेमात पडते. पहील्या नजरेतल प्रेम जे असतं ना तसच काही. आणि आज तर श्रीने स्वतःहून प्राची आणि अदित्यची भेट घडवून आणली होती. तिच्यासाठी ते एक सरप्राईजच होतं. त्यामुळे प्राची आज खूपच खूश असते.

प्राचीला श्री, अमृता व अदित्यला एकत्र आणायचं होतं आणि ते ईतक्या लवकर व आपण काही प्रयत्न न करता झालं याचं तिला नवल वाटत होतं. पण हे तिघे एकत्र आले होते पण अजून पाच ग्रुप मेंबर्स एकत्र यायचे बाकी होते व ते एकत्र यावे म्हणून काहीतरी खटाटोप करावा लागणार होता.अमृता व श्री तिला जास्त काही सांगणार नाही. याची तिला खात्री होती. 'काय करावं?' या विचारात ती होती.

तिला फक्त त्या पाच जणांची फक्त नावच माहिती होती. ते काय करतात? कुठे असतात? हे काहीच ठाऊक नव्हतं. पण ते शोधाव लागणार होतं. पण कसं? आणि अचानक तिला अदित्यची आठवण झाली. अदित्य कडूनच माहिती काढावी लागेल तीही त्याच्या नकळत. प्राची मनाशी खूणगाठ बांधते.

रात्री तिला झोपच येत नसते. टाईमपास म्हणून ती मोबाईल चाळत असते. आज ती अदित्य ला भेटली होती. तिला अचानक आठवलं की आदित्य च मोबाईल नंबर आहे आपल्याकडे मग त्याला एक मेसेज तर करावा. तिने व्हाट्सअप ला पाहिलं आदित्य ऑनलाईन दिसत होता. प्राची ने त्याला 'हाय' असा मेसेज केला. व त्याचा रिप्लाय येण्याची वाट बघू लागली. खूप वेळ झाला तरी अदित्यने रिप्लाय केला नाही म्हणून प्राची थोडी नाराज होते व तिच्या मनात धाकधूक सुरू होते. आपल्याला जसा आदित्य आवडला तसं आपण ही आदित्य ला आवडलेलं असू का असा विचार तिच्या मनात आला व असेल काही कामात असं म्हणून दुसऱ्यात क्षणी तिने हा विचार आपल्या मनातून काढून टाकला.शेवटी प्रेमात पडली होती ना! रात्री उशिरा केव्हा तरी तिला झोप लागते.

ईकडे अमृता श्रीला विचारते,

"श्री अदित्य तयार कसा झाला भेटायला?"

"तूला वाटतं तो तयार होईल असं. तो तर बोलायला ही तयार नव्हता." श्री

"मग तो आला कसा काय?" अमृता

"बिझनेस अमृता, बिझनेस!" श्री

"मी समजले नाही!" अमृता

"बाबा प्राचीच लग्न अदित्य बरोबर का करत होते, कारण या लग्नामुळे बिझनेस मध्ये फायदा होणार होता. तो फायदा फक्त आपल्यालाच नाही तर अदित्यलाही होणार होता." श्री

"श्री, तूला समजतय तू काय बोलतोयस ते. प्राची प्रेम करते अदित्य वर आणि अदित्य तूला माहीती आहे ना?" अमृता

" हो, माहिती आहे. प्राची माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. आणि मला तिला कोणत्याही परिस्थितीत आनंदी पाहायचं आहे." श्री बोलत असतो तोच त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनर अदित्यचा मेसेज झळकतो.

"अदित्यचा मेसेज आहे." श्री

"काय म्हणतोय" अमृता

"ऊद्या माॅर्निंग वाॅकच्या वेळी भेटायचं म्हणतोय. अर्जंट." श्री

नंतर त्यांच्यात बर्याच वेळ या विषयावर चर्चा होते.

ईकडे मुंबईत मिरा उशिरा घरी येते. घरी आल्यावर ती सरळ रूममध्ये जाते व अंशला झोपलेलं बघून तिला थोड बर वाटत.

अंश मिराचा चार वर्षाचा मूलगा. मिरा त्याच्या जवळ जाऊन बसते व त्याच्या चेहर्यावरून हात फिरवते. तेवढ्यात मागून राधाताई तिला बोलतात,

"आत्ताच झोपलाय. खूप नादी लावावं लागतं आजकाल साहेबांना." यावर मिरा हसते. व ती ऊठून बाहेर येते. राधाताई ही तिच्या मागे बाहेर येतात.

राधाताई ही एक मध्यमवयीन स्त्री. लग्नानंतर मूलबाळ होत नाही म्हणून माहेरी परत आलेल्या. पण माहेरच्यानाही त्या आपली ईज्जत नको जायला म्हणून नकोश्या झालेल्या. मागच्या पाच वर्षांपासून त्या मुंबईत मिरा सोबतच राहतात. मिरा त्यांना आपली मोठी बहीण मानते. त्याही आपल्या लहान बहिणी प्रमाणे तिला जीव लावतात.

"मिरा चल जेवण करून घे." राधाताई

"नाही. मला भूक नाहीये ताई" मिरा

"बाहेरून जेवून आलीस का?" राधाताई

"नाही." मिरा

"अस काय करतेय मिरा. जेवण न केल्याने पुण्याला जाण कॅन्सल होणार आहे का?" राधाताई

"नाही ताई . पण मला खरच भूक नाही. असंही कंपनीने मला एक महीन्याचा वेळ दिलाय. त्यानंतर पुण्याला शिफ्ट व्हावं च लागेल. पण भिती वाटते ताई, परत पुण्याला जाण्याची." मिरा

"तूला तो समोर येण्याची भिती वाटते का?" राधाताई

"हो, माहिती नाही. तो समोर आल्यावर मी स्वतःला सावरू शकेल की नाही. पण तो परत कधीच समोर येऊ नये हिच ईच्छा आहे." आणि मिरा रडायला लागते.

राधाताई तिला समजावत असतात. ती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून आपलं मन मोकळं करत असते.

"पुण्यात मी आयुष्यातले चांगले व वाईट दोन्ही दिवस पाहिलेत ताई. आणि ते सर्व माझ्यामूळेच झालं.मी जाणूनबूजून केल ते सर्व. आज माझ्यामूळंच ते कोणी एकमेकांच तोंडही पाहत नाही. आणि सर्व माहिती असतानाही मी परत कशी जाऊ पुण्याला." मिरा

"तू का या सर्वाला स्वतःला जबाबदार ठरवते. तूझ्या कडून ज्यांनी ते करून घेतलं ते दोषी आहेत." राधाताई मिराला समजावत असतात.

क्रमशः