प्रित - भाग 4 Sanali Pawar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रित - भाग 4

दुसर्या दिवशी सकाळी श्री माॅर्निंग वाॅकच्या वेळस अदित्यला भेटायला जातो. तेव्हा अदित्य वाॅक करून श्रीची वाट बघत एका बेंचवर बसलेला असतो. त्याच्या हातात एक फोटो असतो. तो फोटो पाहत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं.

श्री येऊन अदित्य जवळ उभा राहतो व त्याला हाक मारतो. श्रीला बघून अदित्य घाईघाईत हातातील फोटो आपल्या खिशात टाकतो व डोळ्यात आलेलं पाणी पुसतो व श्री कडे बघतो.

"गूड माॅर्निंग श्री" अदित्य

"गूड माॅर्निंग! बोल काय काम काढलं? म्हणून तू मला सकाळी सकाळी ईथे बोलवून घेतलं.?" श्री

"काम तूझ्याच फायद्याच आहे. तू बोलला म्हणून मी प्राचीला भेटलो. त्यबदल्यात आपल्यात बिझनेस डील झाली." अदित्य

"हो मग, त्याच काय?" श्री

"त्याच अस आहे मित्रा, साॅरी मि. साने प्राची मला मेसेज करतेय म्हणून मी तूला हे विचारायला ईथे बोलावलं आहे की आता पूढे काय?" अदित्य

"काय म्हणतेय ती?" श्री

"अजून तर फक्त हाय केलंय. कारण मी अजून त्याला ऊत्तर नाही दिलंय." अदित्य

"हं. तू लग्न करणार आहे प्राचीशी?"श्री

या अनपेक्षित प्रश्नाने अदित्य चमकून श्री कडे बघतो व त्याला म्हणतो,

"माझा कोणताच निर्णय पर्सनल नाहीये...." अदित्यच बोलणं मध्येच तोडत श्री त्याला म्हणतो,

"अदित्य प्राची माझी बहीण आहे. आणि तिच्या बाबतीत ला निर्णय पर्सनल असायलाच पाहीजे." श्री च्या या वाक्यावर अदित्य बेसूर हसतो व त्याला म्हणतो,

"मिराला पण तू बहीणच मानायचा ना मग..... हं ते जाऊ दे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं कि प्राची बरोबर लग्न करण्याचा निर्णय पप्पांनी माझ्यावर थोपवला आहे त्यामुळे मला लग्न करावंच लागेल. हीच तर बिझनेस डील आहे ना. चल बाय" असं म्हणून अदित्य निघून जातो.

पण श्री मात्र तिथेच बसून राहतो. त्याच्या डोक्यात अदित्यच 'मिराला पण तू बहीणच मानायचा ना' हे वाक्य फिरत असतं. आणि त्याला जूने दिवस आठवतात.

काॅलेजच शेवटचं वर्ष असतं, त्यामुळे सर्वांनी मिळून एकदा तरी सर्वांच्या घरी जायचं ठरवलेलं असतं. रक्षाबंधन च्या निमित्ताने सर्व जण मिराच्या गावी जायचं ठरवतात. मिरा ला याबाबत काहीच माहिती नसते. ती आधीच घरी गेलेली असते. अदित्य तर हे ऐकून जवळ जवळ ओरडतोच,

" नाही. आपण नंतर कधीतरी जाऊ."

"ये तूला काय झालं ओरडायला. आणि का नाही जायचं आपण मिराच्या घरी." नेहा

"अगं नेहा आपण नंतर कधीतरी जाऊ पण आता रक्षाबंधन ला नाही." अदित्य

"तूला काय प्रोब्लेम आहे रे, रक्षाबंधन तर आहे आणि हे बघ मिरासाठी आपलं रक्षाबंधनच गिफ्ट. ह्या वर्षी आपलं आणि मीराचं रक्षाबंधन जोरात होणार." संजय

"एकदा ठरलंय ना आपलं जायचं म्हणून मग उगाचच गोंधळ नका घालू." जय

"ये श्री अदित्य बरोबर म्हणतोय, आपण जर गेलो तर मलाही श्रीला राखी बांधावी लागेल." अमृताच्या या बोलण्यावर सर्व जोरात हसतात. तशी अमृता चिडते आणि म्हणते,

"मीरा सांगत असते तिचे बाबा खूप कडक आहेत. त्यांना सर्व सण समारंभ विधीवत झालेले आवडतात व ते करतात."

"हो मग, म्हणूनच तर मी म्हणतोय ना?" अदित्य

"तूला मीराकडून राखी बांधून घ्यायला काय हरकत आहे रे, अमृता आणि श्री च आम्ही समजू शकतो." संजय

यावर सगळे एका सूरात चोर पकडला असे ओरडतात.

"आपला प्लॅन सक्सेस झाला तर. काय अदित्य." श्री

"आम्हाला खूप दिवसापासून तुमच्या दोघांवर डाऊट होता. आज तो खरा ठरला." जय

अदित्य तर पुरता गोंधळलेला असतो. आणि आपली चोरी पकडली गेली या अवस्थेत होता.

"चील यार, नाही बांधणार मीरा तूला राखी, आणि अमृता ही नाही बांधणार श्रीला. आपण करू काहीतरी.मग तर झालं." संजय

"मग ठिक आहे. चला मग कधी निघायचं?" अदित्य

"आता आला वठणीवर. आज दुपारी निघू. डन!" जय

सगळे याला दुजोरा देतात आणि दुपारी निघण्याचं नक्की करतात.

दुपारी सर्व जण मिराच्या गावी जायला निघतात. त्यांच्यात फक्त अनघा व विकी आलेले नसतात. संध्याकाळी ते नाशिकला म्हणजे मीराच्या घरी पोहचतात.

मीराचे वडील नाशिकमधील एक मोठे प्रस्थ असतात. त्यांच्या कुटुंबाचा तिथे मोठा दरारा असतो. मीराचे वडील घरात मोठे असतात. त्यांना मीरा व युवराज अशी दोन मुलं. मीराची आई ती लहान असतानाच देवाघरी गेलेली असते. घरात अजून मीराचे काका काकू व त्यांची दोन मुलं मयूर व सागर. हे ही राहत असतात.

संध्याकाळी ही सर्व मंडळी नाशिकला मीराला न सांगता तिच्या बंगल्याच्या बाहेर येऊन थांबतात. तिथे पोचल्यावर संजयला एक कल्पना सुचते. त्याप्रमाणे बंगल्यात आधी अदित्य जाईल व मीराला सरप्राईज देईल अस ठरत.

अदित्य ला ते सर्व जण मिळून बंगल्याच्या कंपाऊंडच्या भिंतीवरून अंदाज घेऊन आत उतरायला मदत करतात. अदित्य आत उतरतो व मीराला शोधू लागतो. पण त्याला मीराला जास्त शोधावं नाही लागत.

घराच्या बाहेर एक मोठा झोपाळा असतो. त्यावर मीरा टेकून बसलेली असते. ती कोणत तरी पुस्तक वाचत आपल्याच स्वप्नात हरवलेली असते. अदित्य बाहेर सर्वांना आत येण्याचा इशारा देतो व हळूच मीराच्या शेजारी झोपाळ्यावर येऊन बसतो व मिराच्या गालावर अलगद ओठ टेकवतो. मीरा त्याच्याकडे बघते व म्हणते,

"हं मला आज तूझी खूपच आठवण येतेय म्हणूनच तर मला समोर फक्त तू दिसतोय.मिस यू अदित्य." आणि ते दोघं एकमेकांच्या डोळ्यांत हरवून जातात. पावसाळ्याचे दिवस असल्याने बाहेर पाऊस सुरू होतो. अदित्य बाहेरच्या मंडळीला विसरून जातो. ते सर्व अदित्यला शिव्या घालत घरात जातात.

घरात त्यांना मीरा चे वडील हाॅलमधेच भेटतात. ते त्यांच स्वागत करतात व मीराला आवाज देतात. त्यांच्या आवाजाने मीरा भानावर येते. अदित्यला समोर बघून ती म्हणते,

"हे स्वप्न नाहीये. तू खरच आलाय."

"हो. मी खरंच आलोय." अस म्हणत अदित्य तिच्या जवळ सरकतो. बाबा परत मीराला आवाज देतात. आवाज ऐकून मीरा अदित्यला म्हणते,

"अदित्य तू जा इथून. बाबा बोलवताय. जा प्लीज."

"मी नाही जाणार." अदित्य

"आदि जा ना प्लीज. बाबा तूला इथे बघून चिडतील. जा." मीरा

अदित्य तिच्याकडे बघून हसतो व जातो अस म्हणतो. मीराही आत पळत जाते. आत आल्यावर,

"सरप्राईज!!!!"

अस एका तालासूरात सर्व ओरडतात. अदित्य ही हळूच येऊन त्यांच्यात सामील होतो.

मीराचे सर्व मित्र मैत्रिणी घरी आल्यामुळे घरात जणू दिवाळीच साजरी होत असते. यात मीरा व अदित्यही वेळ मिळेल तस एकांतात भेटत असतात व त्यांची ही गम्मत घरातील माणसं सोडून सर्व फ्रेंडस् बघत असतात. मीराला माहीती नसतं कि सर्वांना तिच्या व अदित्य बद्दल माहिती आहे.

दुसर्या दिवशी सकाळी रक्षाबंधनचा सण मीरा सर्व भावांना राखी बांधून साजरा करते. त्या वेळेस अदित्य मला थोड काम आहे असं सांगून बाहेर जातो. अमृता ही पोट दुखतंय म्हणून झोपून घेते. नेहा व मीरा मात्र संजय, जय व श्रीला राखी बांधतात. व त्यांच्यातलं मैत्रीच नातं अजून घट्ट करतात.

श्रीचा फोन वाजतो व श्री त्या आठवणींतून बाहेर येतो. अमृता त्याला फोन करत असते. तो फोन घेतो व अमृताला आलोच अस सांगतो.

अदित्य घरी येऊन प्राचीच्या मेसेजला रिप्लाय करतो त्यांच्यात गप्पा सूरू होतात. अदित्य व प्राची अधूनमधून भेटूही लागतात. प्राची अदित्यच्या अजूनच जवळ जात असते. त्याच्या बरोबर आपल्या भावी जीवनाची स्वप्न पाहत असते. पण तीने जे ठरवलेलं असतं की ह्या सर्व फ्रेंडस् ला एकत्र आणायचं हे ती विसरलेली नसते. पण अदित्य ही तिला काहीच सांगत नसतो. त्याच्याजवळ विषय काढल्यावर तो विषय बदलून टाकायचा. त्यामुळे प्राचीचा मूड ऑफ व्हायचा व ती परत नवीन उत्साहाने बाकीच्यांची माहीती काढायला लागायची.

एक दिवस काही कामासाठी ती बाहेर आलेली असताना एका शाॅपमध्ये तिला नेहा दिसते.

क्रमशः