sant eknath maharaj books and stories free download online pdf in Marathi

संत एकनाथ महाराज

💞संत एकनाथ महाराज..💞

🌹पांडुरंग पांडुरंग.. श्री विठ्ठल हरी..
रामकृष्ण हरी.. मुकुंद मुरारी..👣🌹


पूर्वार्ध...✍️✍️💞Archu💞


जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण असलेल्या गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले पैठण ला संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचा जन्म झाला.. पंधराशे 33 मध्ये पैठण या तीर्थक्षेत्री श्री संत भानुदास महाराजांच्या घरी झाला.. एकनाथ महाराज हे संत भानुदास यांचे पणतू होते.. म्हणजेच एकनाथ महाराज यांचे भानुदास महाराज पर पितामह होते.. त्यांची वंशावळ भानुदास.. चक्रपाणी... सूर्य नारायण..आणि त्यांचे पुत्र एकनाथ ..🤗

भानुदास महाराज पैठण होऊन पंढरपुरास आले ..पण तिथे त्यांना देव दिसला नाही ..बिदरच्या राजांनी भगवंताला नेलं होतं.. बिदरऊन भगवंताला पंढरपूर आणण्याचे काम भानुदास महाराजांनी केले..यासाठी चार महिने संत पंढरपुरात राहिले.. म्हणून तेव्हापासून पंढरपूर मध्ये आजही चातुर्मास पाळला जातो..आताही चातुर्मास चालू आहे... जुन्या जाणत्या लोकांना चातुर्मासाचे महत्त्व आहे... आजकालच्या मुलांना तर चातुरमास म्हणजे काय तेच माहिती नाही..🙏 तर संत चातुर्मासात तीर्थक्षेत्री जाऊन राहत असतात.... वारकऱ्यांचा चातुर्मास हा गुरू पौर्णिमेपासून कार्तिक एकादशी कार्तिक महिन्यापर्यंत चालू असतो...वारकरी एवढे भगवंताचे एकनिष्ठ असतात की ते कोणत्याही परिस्थितीत भगवंताच्या सेवेस तत्पर या चार मासामध्ये खंड पडू देत नाही..अशा या वारकरी संप्रदायांच्या कुळामध्ये भगवंताचे एकनिष्ठ भक्त आणि संत भानुदास यांचे पणतू म्हणून ज्या कुळात आराध्य दैवत श्री विठ्ठल ची उपासना व सूर्य उपासना करणारे ,तसेच एकविरा भगवती ची सेवा केली जात होती.. त्याच परंपरेत जगाच्या मालकांनी भानुदासच्या विनंतीवरून आपले स्वरूप असणारी एकनाथ महाराज यांचा अशा या पवित्र कुळात जन्म झाला..💞
ब्राह्मण कुळात जन्माला जन्मलेले भगवंताची भक्ती असलेले व दिव्यत्व प्राप्त असलेले एकनाथ महाराज बालपणापासूनच भक्तीचे वेड घेऊन जन्मास आली..नाथ हे मूळ नक्षत्रावर जन्म झाल्याने त्यांच्या भाग्यात माता-पित्याची सुख नव्हते ...त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा आणि आजी यांनी केला.... बालपणीच त्यांचे आई-वडील इहलोकी गेले होते..😔
एके दिवशी खेळता-खेळता एकनाथ महादेवाच्या मंदिरात गेले... तिथे अत्यंत पवित्र अशा वातावरणात महादेवाची सेवा करण्यात गुंग झाले.. त्या दिवशी रात्री नाथांना अंतःप्रेरणेने दृष्टांत पडला की "नाथा तू तिथूनच गृश्णेश्वर मंदिरा जवळ असलेल्या देवगिरी च्या डौलातदाबाद किल्ल्यावर जा.. तिथे जनार्दन स्वामी आहेत त्यांच्या आशयात राहून तयांची सेवा कर.".. नाथ आजूबाजूला पहात आपल्यास स्वप्न पडले की साक्षात भगवंतच आपल्याशी हितगूज करतोय हा भास होत असतानाच ते तसेच तडक उठून दौलताबाद कडे जाण्यास निघाले, पण देवगिरीचा रस्ता माहीत नसल्यामुळे कसे जायचे?? कुठे जायचे?? माहित नसतानाही ते वाट सापडेल तेथून ईश्वर चे नामस्मरण करीत जाण्यास निघाली ....सकाळी सकाळी चलत चालत घुश्मेश्वर मंदिर जवळ आले.. तेथील पुजार्‍यांनी विचारले की हे कुठले मंदिर आहे ??तेव्हा त्यांनी हे गृष्नेश्र्वराचे मंदिर आहे असेन सांगितल्याबरोबर नाथांना आपल्या दृष्टांतची खरी प्रचीती आली !!!!!!!तेथील ईश्‍वराचे दर्शन घेऊन ते निघाली...,देवगिरी ला जावून तेथे त्यांनी स्वामींची भेट घेतली..🤗

तिकडे आपला नातू अजून घरी कसा येत नाही?? बिना माय बापाचा लेकरू!!! करून कंटाळा कुठे निघून गेल्या ...आता त्यांचा शोध कसा घ्यावा!?! याचा विचार नाथांचे आजी-आजोबा करून रडत आक्रोश करत सगळीकडे शोधत फिरत होते..😟
इकडे मनात जनार्दन स्वामींच्या किल्ल्यावर जनार्दन स्वामींची सेवा करत होते.. जनारदन स्वामींकडे किल्ल्याच प्रशासकीय विभागाची जबाबदारीअसल्यामुळे व ती स्वतः किल्लेदार असल्यामुळे त्यांच्याकडे प्रशासकीय खात्याची सेवा होती.. तेथे काम करत असणारे मजुरांना पैसे वाटपाचे काम त्यांनी नाथांना दिले होते...💐

एक दिवस .. नाथांना म्हणाले दमद्याचा हिशोब किती होणार लेखी मला या महिन्यातील सर्व खर्च वजा जमा करून हिशोब सकाळी दे.. एकनाथ महाराजांनी आपली जमा खात्याची वही घेऊन त्यात असलेल्या मजुराच्या दमडीचा करायला घेतला.. एकूण महिन्यात दहा दमडी खर्च झाली होती.. नऊ दमडयांचा हिशोब लिहिलेला होता.. मात्र एक दमडी काही केल्या सापडेना ..म्हणून ते रात्रभर तळमळत तसेच त्या दमडीचा शोध घेत राहिले ...रात्र उतरून गेली आणि सकाळच्या तीन प्रहारमध्ये चार वाजेच्या सुमारास एकनाथांनी अजून एक दमडी च हिशोब सापडला.. सापडली.. हरवलेली एक दमडी सापडली ...असे म्हणून ते आनंदाने नाचू लागले.. एकनातहाचा आवाज एकून पंत जागी झाली आणि म्हणाली अरे नाथाहे काय आहे?? तू काय करतो आहेस!!! तेव्हा नाथ म्हणाले की "स्वामी मला एखा दमदीचा हिशोब लागत नव्हता.. तो आताशी मला सापडला..." नाथांची तन्मयतेने काम करण्याची जिवापार एकनिष्ठ स्वामी सेवा करण्याची एकनिष्ठता जनार्दन स्वामींनी ओळखली व आता भगवंताच्या सेवेत रुजू करण्यासाठी परिपूर्ण आहे असे वाटून त्यांनी त्याला आलिंगन दिले....🤗
जनार्दन स्वामींच्या सानिध्यात राहून एकनाथांनी वेद पुराण व उपनिषदांचे वाचन मनन व श्रवण केले त्यांना एक प्रकारचे देवत्व प्राप्त झाले होते.. जनारधन पंत हे नित्य नियमाने श्री दत्तात्रय दत्तात्रय प्रभूंची सेवा मनोभावे करीत होते.
संत सांगतात नाथांची गुरुपरंपरा अशी होती की
हंसा रूपाने परमात्म्याने ब्रम्हा ला उपदेश दिला. ..☺️
ब्रम्हाने अत्रि ऋषी ला उपदेश...☺️
अत्रीऋषींनी श्री दत्तात्रेय प्रभु ना उपदेश ..☺️
आणि श्री दत्तात्रय प्रभू यांनी जनार्धन स्वामी ना उपदेश..☺️
जनार्दन स्वामींनी एक नाथाला आपले शिष्य बनवुन त्यांना उपदेश दिला..,🤗
कलियुगामध्ये जनार्दन स्वामींनी दत्तात्रेय प्रभु साक्षात भेट देत होते.. दौलताबाद जवळच असलेल्या जंगलात सुलिभंजन या टेकडीवर औदुंबराच्या वृक्षाखाली दत्तात्रय प्रभू व जनार्दन स्वामींची भेट ठरलेली असे.. गुरूवारच्या दिवशी जनार्दन स्वामी ध्यानस्थ बसून दत्तात्रय प्रभूंची भजन करीत ,अनुष्ठान करीत असत ...दत्तप्रभू देखील आपला भक्त आपल्याला बोलावतो आहेत ..आपला शिष्याचा शब्दाला मान राखून त्यांची भेट घेण्यासाठी कुठूनही अवतरीत होत असत..🤗

असेच एकदा शत्रूंना याची भनक लागली व गुरूवारच्या दिवशी काही यवनांनी देवगिरीवर हल्ला केला .. एकनाथ त्यांनी विचार केला, आपल्या गुरूंना जाऊन याची वर्दी दिली तर त्यांची समाधी भंग होईल.. बाहेर शत्रू आला आहे?? त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी एकनाथ महाराजांनी त्यांच्यासारखाच वेश धारण करून जनार्धन पंथान सारखे पाघोटे डोईवर घेऊन शत्रूंशी लढा दिला ..दुसऱ्या दिवशी पंतांना वार्ता कळली व माझा नाथ आता परिपूर्ण झाला आहे ...सर्वगुणसंपन्न माझा एका आपल्या जीवावर उदार होऊन आपला हा शिष्य देवशीही एकनिष्ठ राहील या प्रेरणेने त्यांनी त्याची भेट दत्तप्रभू घडवून आणण्याचा निश्चय केला...🤗

. जो सद्गुरु ची खरी मनापासून सेवा करतो..
" जो करी खरी सेवा त्यासी भय काय जीवा.." याप्रमाणे सद्गुरूंच्या सान्निध्यात आज त्यांना साक्षात भगवंत भेटत होते☺️.. आज आपण देवाला भेटणार आहोत!! तू चल माझ्यासोबत अरण्यात असे म्हणून .. सुलिभांजन या ठिकाणी उंच औदुंबराच्या वृक्षाखाली जनार्दन स्वामी एकनाथा सोबत आले.. या टेकडीवर ते नेहमीच येत असतात..☺️
एकनाथ दूरवर झाडाच्या खाली बसले.. त्यांनी पाहिले की जनार्दन स्वामी ना एक मलंग वेशात असलेला फकीर, अंगावर फाटकी वस्त्रे गळ्यामध्ये अडकवलेली झोळी, जोडी हातामध्ये कटोरा, पाठीमागे तीन चार कुत्रे अशा या व्यक्तिमत्वाला आपले गुरुवर्य साक्षात दंडवत प्रणाम करतात असे नाथ पहातच राहिले.. त्यांनी एकमेकांना भावपूर्ण आलिंगन दिले 🤗..प्रसाद घेण्यासाठी त्यांनी कटिरायामध्ये असलेली शीळी भाकरी आणि त्यासोबत कुत्रीचे दूध म्हणून ते प्रसाद घेत आहेत.. नाथान पाहून पंतांना पण त्यांना वाटले की माझा नाथा इथ आला.. पण त्याला प्रसादयासात काही भेटला नाही ..म्हणून त्यांनी त्याला तो कटोरी या धूवून आणण्यासाठी नाथांना बाजूला पाठवले.. त्यांनी प्रसाद म्हणून थोडेसे उच्छिष्ट त्याकडे ठेवले होते ..एकनाथांनी प्रसाद म्हणून तो कठोरा धुऊन त्याचे पाणी पिली.. तर विस्मयकारक आणि आश्चर्यचकित करणारे ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा धक्का बसतो त्या त्याचप्रमाणे त्यांची शुद्ध हरपत होती आणि तत्क्षणी त्यांना दत्तात्रेयांचे दर्शन झाले ..🤗
तीन शिरे सहा हात ..
दत्त माझा अवधूत..👣असे गुरुदेव दत्तांची दर्शन नाथांना झाले..
" दत्त माझे गुरु
दत्त माझे तारु..
बहीण बंधू चुलता..
दत्त माझा..."👣
एकनाथांना साक्षात दत्तात्रय प्रभू चे दर्शन झाले ही केवढी विलक्षण गोष्ट होती...🤗🤗

असेच एकदा एकनाथ महाराज ध्यानस्थ बसलेले असताना एक नाग महा सर्प नाथांच्या दिशेने सरपटत आला.. तो महा सर्प नाथांच्या दिशेने त्यांना दंश लावण्याच्या हेतूने अंगावर धावून आला पण देवांच्या भक्तीने व त्यांच्या समाधीस्थ भावनेने त्यांच्या भोवती एक प्रकारचे तेजपुंज असे वलय निर्माण झाली होती.. ते शांत वातावरण पाहून देखील महसरप त्यांच्या जवळ जाऊन थांबला..महसर्पानी पहिली की नाथ महाराज सकाळपासून समाधी लावून बसलेले आहेत ..दुपार होऊन गेली आणि कडाक्याचे ऊन पडले होते.. म्हणून त्या महा सर्पानी आपल्या नागाचा फणा नाथांच्या डोक्यावरती छत्र म्हणून धरला आणि उरलेले आपले थंडगार असे शेपूट नाथांच्या भोवती गुंडाळले पण नाथांना मात्र याची पुसटशी कल्पना देखील नव्हती.. नाथ आपल्या समाधी तच मग्न होते.. या समाधिस्त महात्म्याला उन्हापासून संरक्षण मिळावे एवढाच त्याचा उदात्त हेतू होता.. कसलीही जाणीव नसलेले नाथ परमभक्तित त्तल्लीन होते..😌
आता त्या महसर्पाचा रोजचा दिनक्रम झाला होता..नाथ समदिष्त असताना त्यांच्या भोवती गुंडाळले जावून त्यांची इतर हिंस्र प्राण्यापासून सुरक्षा करणे..त्या जंगलात लाकूड फाटा जमा करण्यासाठी जवळच्या गावातील एक शेतकरी जोडपे आले होते..त्यांनी ध्यानस्थ एकनाथांना पाहीले.. त्यांची आपल्या हातून काही सेवा व्हावी म्हणून त्यांनी नाथांना त्यांचे प्रसदरुप म्हणून दररोज गायीचे दूध देण्याचे ठरवले..ते शेतकरी दररोज निटीनियमने एकनाथांना सकाळी सूर्य उदय होण्यापूर्वीच काही फळे व धुध आणत असे..🙏
एके दिवशी त्या शेतकरी दाम्पत्यांना अर्ध्यरात्री ची जग आली..त्या बाईने बाहेर अंगणात येवून पाहीले तर टिपूर चांदणे पडली होती..त्यांना वाटल सकाळची माझी ऐहिक नित्यकर्म आटपे पर्यंत सूर्योदय होईलच.. त्यांनी सद्गृहस्थ ल उठवून रात्रीचेच ते एकनाथ महाराजांकडे जायला निघाले..तिथे जावून पाहतात तेर रात्रीचे च नाथ समाधी अवस्थेत बसलेले आहेत. त्यांच्या भोवती महासर्पणे वेटोळे घातले आहे ... शेतकरी जोडपे ते पाहून घाबरले आणि एकनाथांना आवाज देवू लागले..पण नाथ मात्र ध्यानस्थ बसलेले.. सद्गृहस्थ च आवाज एकून एकनाथ महाराजांनी आपले डोळे उघडले.. तोपर्यंत महासरप निघून गेला होता..त्या जोडप्याने एकनाथांना घडलेला प्रसंग सांगितला.. एकनाथ महाराजांन आठवलं की जनार्दन पंतांनी तोपर्यंत आपल्या ल समाधी अवस्थेत बसायला सांगितलं होतं जोपर्यंत चेतन हिन अवस्था प्राप्त नाही. सर्व प्राणिमात्र वर एकरूप होते.. एकनाथांना आता शांतता प्राप्त झाली होती.. ध्यान धरणेने एकप्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते.. एकणथ आता शांतीचे सागर झाले होते.. परब्रम्ह शांतिसगर एकनाथ महाराज परिपूर्ण झाले होते..आपण बऱ्याच वेळा मंदिरात एकनाथ महाराजांचे सपासोबतचे चित्र पाहीले असतील..नाही क...ज्यात एकनाथ महाराजच डोक्यावर नागचत्र आहे..किती सुंदर दिसतात..🥰
एकनाथ महाराज आता तप करून जनार्दन स्वामी कडे आले होते..त्यांना दिव्यत्व प्राप्त झाले होते. आता जनार्दन स्वामी नीं एकनाथ महाराज यांना तीर्थयात्रा करण्यासाठी पाठवले.. एकनाथ चारधाम यात्रेसाठी निघून गेल्यानंतर पैठणहून एक सद्गृहस्थ देवगिरी वर आले.. व एकनाथ चे आजी आजोबा त्यांची वाट मोठ्या आतुरतेने पाहत आहे असे जनार्दन पंतांना सांगितले...जनार्दन स्वामी म्हणाले माझ्या एकाला आजी आजोबा आहेत,हेच मुळी माहीत नवत..म्हणून त्यांनी एकनाथांना पत्र पाठवून पैठ्णसी जावून राहण्याची आज्ञा केली.. आता एकनाथ महाराज हे आपल्या मूळ गावी परिपूर्ण होवून परतले..🙂

ज्या नाथाच्या दरवाज्यात श्री दत्तात्रय प्रभू साक्षात दंडक घेवून उभे आहेत.👣..ज्या नाथांच्या घरी परब्रह्म परमेश्वराने बारा वर्षे पाणी वाहिले..👣 अस्य या एकनाथांचे चरित्र अत्यंत प्रसन्न, अतुल्य, अप्रतिम आहे.. त्यांच्या घरी त्यांचे पूर्वज कसे येतात,,देव कसे नाथाच्या घरी राहतात..त्याचे लिखाण, व त्यअंची जलसमाधी आपण दुसऱ्या भागात लिहिणार आहे.. त्यांचे चरित्र जितके सखोल वाचत जावे,तितके ते आपले समोर असल्याचा भास होतो... त्यांच्या विषयी जितके लिहावे तितके कमीच आहे..तरीपण माझ्याकडून हा छोटासा मांडण्याचा प्रयत्न...✍️✍️💞archu..💞

नाथांच्या चरित्रात वर्णन केल्याप्रमाणे त्यांचे अनेक दृष्टांत आहेत ते आपण उत्तरार्ध या भागात पाहणार आहोतच.. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, दुसऱ्यांची पण... माझं काही चुकले असल्यास मी लहान समजून मला क्षमा करा आणि काही उणीव असल्यास हक्काने कळवा तुमच्या-आमच्या मधील ✍️✍️✍️ 💞Archu 💞


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED