कादंबरी- प्रेमाची जादू
भाग- १
------------------------------------------------------------------
..यश ..एक व्यक्ती -एक माणूस सगळ्यांना आवडेल असाच होता ,
त्याची family शहरातली सर्व परिचित अशी फामिली. प्रत्येकाने स्वकर्तुत्वाने कमावलेला नावलौकिक “ हे या परिवाराचे विशेष होते .
यशचे आई-बाबा दोघेही भाषा-विषयाचे निवृत्त -प्राध्यापक . साहित्य व कला क्षेत्रात एक मान्यवर आणि रसिक जोडपे म्हणून त्यांचा वावर होता
यशचा मोठा भाऊ .सुधीर आणि मोठी वाहिनी- अंजली , नव्या पिढीतले हे जोडपे एका मोठ्या सोफ्टवेअर कंपनीत जॉबला आहेत .
यशच्या घरात लक्ष्मी –सरस्वती अगदी एकमताने आणि आनंदाने हातात हातात घेऊन रहात आहेत असेच या घरातले वातावरण पाहून वाटते .
यशची एकच बहिण ..ती आणि तिची फमिली विदेशात सेटल झालेले आहेत
यश स्वत: ऑटोमोबाईल इंजिनियर झालेला , लहानपासून टू-व्हीलर आणि फोर –व्हीलरचा तो प्रचंड शौकीन ,
त्याचे हे वाहन-प्रेम सगळ्या दोस्त-आणि नातेवाईक याना माहिती होते.त्याला त्याच्या बर्थडेला अजून ही toys-कारचे गिफ्ट सगळ्यात आवडते गिफ्ट असते.
रस्त्यावरून धावणार्या एकूण एक सगळ्या गाड्यांची बारीक-सारीक माहिती आहे त्याला .
या आवडीपायी त्याने कंपनी जॉब करायच्या ऐवजी ..
चक्क ..टू-व्हीलर आणि फोर –व्हीलर गाड्यांचे स्पेअर-पार्टससचे ए-टू-झेड सेंटर सुरु केले आहे.
याच सेंटरच्या मागच्या बाजूला ..त्याने स्वतहाचे एक ग्यारेज सुरु केले .....याचे सर्वांना मोठे कुतुहूल वाटते .
एकीकडे गाडी दुरुस्तीचे काम करायचे आणि समोरच्या शॉपसमोर नवी चार चाकी येऊन उभी राहिली की
की तिला मस्त डेकोरेट करून द्यायचे .या स्वरूपाचे काम कधीही जा यशच्या कार-सेंटर मध्ये अगदी मन लावून केले जाते .
विशेष स्वतः यश या कामात स्वतःला झोकून देतो आहे ..हे पाहून कस्टमर खुश होऊन जातात .
या दोन्ही कामाच्या ठिकाणी काम करणारा माणूस कामगार नव्हता की कुणी लेबर नव्हता ..
तर इथला हर एक जण यशचा अगदी जवळचा मित्र आहे. हे मित्र ज्यांच्या घरची परिस्थिती बिकट आहे ,
कुठे नोकरी मिळणे शक्य नाही ..पण, मेहनत आणि कोणतेही काम करायची तयारी आहे ,
अशा मित्रांना यश आपल्या या दोन्ही कामात सामवून घेत असतो “ हे सगळ्यांना आता माहिती झालेली गोष्ट आहे.
असे हे मित्र ..काम करतात .तेव्हा त्यांच्या मनात भावना असते की –हे शॉप, हे ग्यारेज , हे सेंटर माझे आहे,
आणि ते ज्या पद्धतीने काम करतात त्यातून “हे आलेल्या सगळ्यांना जाणवत असे.
“ जे काम करू ते करण्यात लाज वाटणार नाही “, अशा मित्रांना माझ्याकडे नेहमी काम
मिळेल , ते सुद्धा कमी पगारावर ..असे मुळीच नाही ..मार्केट मध्ये जो ट्रेंड असेल, तोच पगार मी देईन.
अशा प्रकारे दोस्त-कंपनीतल्या गरजू मित्रांना यशने आपल्या कार-सर्विस सेंटर मध्ये जॉब दिला आहे .
..यशच्या या भक्कम आधाराने त्याच्या अनेक मित्रांची घरे सावरली गेली आहेत
स्वतः यशला आपण सुरु केलेल्या जॉब बद्दल खुप आस्था आहे आवड आहे., हातात काम ‘घेतले
म्हणजे ते विश्वासाने पूर्ण करणार “ हे सगळ्यांना माहिती आहे . याचा परिणाम इतका छान झालाय की -
इथे एकदा येऊन गेलेले ,मग पुन्हा –पुन्हा येणारे ..त्याचे कस्टमर स्वतःहून “,
यशच्या कार -सर्विस-सेंटरची कीर्ती सगळीकडे सांगत असतात
.अशा पब्लिसिटी मुळे यशकडे कायम गर्दी असते , काम इतके असते की ..इतर कामे कधी करायचे ? असा प्रश्न त्याला
आणि त्याच्या सोबत काम करणाऱ्या माणसाना पडत असतो.
वेळप्रसंगी स्वतहा यश ..टू-व्हीलर , कार रेपेरिंग ही दोन्ही कामं मित्रांच्या बरोबरीने करतांना पाहून सगळ्यांना खूप कौतुक वाटते . ,
आणि कामगारांना मनातून कायम भीती ..वाटत असते ..की आपण हे काम सोडून जाण्याचा
विचार करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे..
कारण असे आहे की –आपण काम सोडून जाऊ असे धमकीवजा बोलणे सुद्धा चूक होईल ,
कारण या मालकाचे आपल्यावाचून कधीच काही अडणार नाही . आपल्यापेक्षा तोच जास्त हुशार आहे या कामात ,
अगदी बारीक-सारीक गोष्टी करतो हा हुशार माणूस.
त्यामुळे एकदा जो इथे आला तो टिकला .तो परत दुसरीकडे काम करण्यासाठी जाणायचा विचार करीतनाही.
इथे भरपूर काम आहे..आणि पगार वेळेवर मिळतो ..मग दुसरीकडे जाणायची गरजच काय ?.
यशच्या अशा जॉबचे स्वरूप कमीपणाचे आहे “ असे ही त्याच्या परिवारात कुणाला वाटत नव्हते
एक तर यश या विषयातील इंजिनियर होता , तो शिकलेला असून कामात हुशार आहे .अजून काय पाहिजे असते ?
कोणत्या कंपनीत नोकरी केली म्हणजेच आयुष्याचे सार्थक झाले “
असे तो आणि त्याचा परिवार मानीत नाही.
आपल्या आवडीचे काम आहे ना , मग ते करणे म्हणजे त्यातून डबल आउटपूट मिळवण्यासारखे आहे.
आवडीची कामं करून यश थकलेला आहे असे कधी पाहायला मिळायचे नाही .
हातावर किती ही काम असो, किंवा अजिबात वेळ मिळणार नाही याची कल्पना असून सुद्धा
एखाद्या मित्राचा – एखाद्या मैत्रिणीच्या किंवा दोस्त-कंपनीतल्या कुणाच्या घरून जरी
मदतीसाठी फोन आला तर, लगेच यश त्या मित्राच्या घरी हजर होतो .
त्याची आवडती बाईक अगदी सुसाट पळतांना दिसली की ..त्याला ओळखणारे म्हणतात ..
भरदुपारी वेगाने बाईक वरून जाणारा यश दिसतोय म्हणजे त्याच्या मित्रापैकी कुणी तरी पोर्ब्लेम मध्ये आहे.
बातमी मिळण्याचा अवकाश हा निघाला मदतीला , राहवतच नाही याला
त्याचे मित्र तर मोठ्या कौतुकाने ,अभिमानाने सांगत असतात –
अहो आमचा यश म्हणजे .
आमच्यासाठी फायर –ब्रिगेड, अम्ब्युलांस सगळं काही आहे. बोलवण्याची तर तो कधी वाट पहात नाही ,
त्याला कुठून ,कोणाकडून समजो लगेच घरा समोर याची बाईक दिसणार म्हणजे दिसणार .
हा यश स्वतःच्या दुकानात कमी .आणि मित्रांच्या मदतीच्या कामात गुंतलेला असतो .
याच्या आधाराविना या मित्रांचे काही खरे नाही.
सगळ्यांना हवाहवासा असणारा हा लाडका मित्र ,जिंदादिल फ्रेंड ..वगेरे वगरे ..आहे.
त्यामुळे जिथे जाईल तिथे ..यशबद्दल लाडिक चौकश्या होतात ..कित्ती छान आहे
हा आपला फ्रेंड यश !
यशचे अशा सगळ्याजणीकडे अजिबात लक्ष नसते .
तर अशा या यशला -
पॉप्युलर फ्रेंड म्हणून सगळीकडे डिमांड असते . दोस्त कंपनीची पार्टी म्हटले की
त्याची ए टू झेड तयारी करायची जबाबदारी यशची असते .
गोडबोल्या यश हसत हसत बोलायला लागला की ,त्याच्या समोरचा फक्त, .
ओके यश, यस यश ,अगदी पक्का , होऊन जाईल आपले काम , तू काळजीच नको करू यार !
यश ,अरे तुला कुणी नाही म्हणेल का ?
थोडक्यात काय तर कोणतेही मिशन " यशाच्या हातात दिले की ,त्यात यशच मिळणार.
गोरापान, हँडसम यश हुशार आहे पण बेरकी नाहीये भोळा नाहीये आणि बदमाश तर बिलकुल नाहीये .
ज्याला त्याने आपला मानला, तो कायम त्याचा दोस्त ",होऊन जातो.
दोस्ती के लिये कुछ भी"..करण्यास यश 24x7 रेडी असतो ,हे सगळया दोस्तांना माहिती आहे.
इतकेच नव्हे तर या सगळ्या फ्रेंड्सच्या फॅमिलीमेंबर्स ना सुद्धा ,या यशबद्दल खुप कौतुक असते
यामुळे नेटवर्क खूप मोठे झाले आहे यशचे.
मित्रांसाठी काही न करण्याची एक ही संधी", यश सोडीत नाही ",
असा यश "संधीसाधू अजिबात नाही ", त्याचा हा गुण दोस्तकंपनीतल्या तमाम पोरींना फार आवडतो .
पण याच यशवर या सगळ्या सुंदरी कायम नाराज असतात
त्यांची तक्रार आहे की – आमचा फेवरेट फ्रेंड असून हा मात्र –
"हा आम्हा पोरींना भाव देत नाही, इतक्या छान छान स्वभावाच्या मैत्रिणीं आहोत ,
त्याच्या समोर आणि सोबत असतो आम्ही .
..पण बघा ना हो .. आपल्या मैत्रिणींची कदरच नाही याला,
"उल्लू का पठ्ठा " आहे एकदम ..!
ये शिकायत तो है हमारी !
यशाचा दोस्त- गॅंगमध्ये बॉईज अँड गर्ल्स " दोन्हींचा भरणा आहे यातल्या कित्येकजणींनी मनातल्या मनात
"यश को अपने दिल मे कब से बसा लिया था ",
पण, जगमित्र यशाच्या हे कधी लक्षात येत नसे,
त्याच्या भवती राहून - गोंडा घोळणार्या सुंदर सुंदर पऱ्या, कायम त्याला इम्प्रेस करायच्या, पण,
यातल्या कुणाच्याच खूबसुरतीची जादू यशवर चालत नाही,
एखादी तर वैतागून म्हणते -
हे कसलं सॅम्पल म्हणायचं ? येडबम्बुच आहे हा यश,
आम्ही पोरी कधी कुणाला भीक घालीत नाहीत,
अहो, काय सांगावे ,
आमच्या भवतीचे पंखे "भिरभिरणे सोडीत नाहीत..
या यशाच्या मागे आम्ही एक सोडून डझनभर पोरी, धावताहेत आपले दिल घेऊन.
आणि हा नमुना बघा ,कधी स्माईल पण करत नाही ..माझ्याकडे पाहून ..
एखादी म्हणते -
अरे माझ्या राजकुमारा, माझे मन कसे रे कळत नाही अजून तुला ?
असं "प्रेमविलाप "करीत त्याच्या समोर समोर प्रेमाश्रु गाळीत बसतो,
पण, एकीबद्दल ही याच्या मनात कधी काही वाटत नाही, दगड हृदयी आहे निव्वळ,
हे कळाल्यावर, या सुंदर पोरींच्या टीमला यशाचा एक निकटवर्ती मित्र समजावून सांगू लागला-
हे सुंदरींनो, तुमच्या नाजूक मनाची, प्रेमाने तुडुंब भरलेल्या चिमुकल्या हृदयाची
काही कदर या यश नावाच्या इसमास नाही,
हे कटू सत्य तुम्ही सर्वांनी पचवण्यात तुमचे हित आहे,
कारण, यश तुम्हाला आमच्यासारखा फक्त एक मित्र मानतो,
तो काय म्हणतो ते नीट ऐका -
आपल्या फ्रेंड्स टीममध्ये एक से एक सुंदर आणि, देखण्या तरुणी आहेत
" हे मला काय दिसत नाहीये ..असे वाटते का तुम्हाला ?
पण यातली कुणी माझी मैत्रिण नाही होऊ शकत", या सगळ्या माझे फ्रेंड आहेत.
त्यांच्याविषयी फक्त फ्रेंडशिप ही एकमेव फिल्लिंग ठेवून आहे मी,
या पेक्षा ईतर फिलिंगच्या अपेक्षा माझ्या मनात या पैकी कुणाबद्दल कधी येतील " ,
ही अपेक्षाच ठेवू नये कुणी ",
त्यामुळे कुणी किती ही फिल्डिंग लावली तरी नो युज !
------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात ..
भाग - २ रा लवकरच ..
--------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी - प्रेमाची जादू ..
ले- अरुण वि. देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------