aayushyatli phili trip: jute zale gayb books and stories free download online pdf in Marathi

आयुष्याची पहिली ट्रिप : जुते झाले गायब

आयुष्याची पहिली ट्रिप : जुते झाले गायब

गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी पहिल्या वर्गात होती . आमच्या शाळेची ट्रिप फन अँड फूडला जाणार होती .ते ट्रिप माझ्या आयुष्याची पहिली ट्रिप . मैत्रिणींसोबतची आयुष्यातली पहिली ट्रिप तर सगळ्यांच्याच आठवणीत राहते .
ट्रिप जेव्हा जाणार होती तेव्हा आम्ही ऐवढे लहान होतो कि आम्हाला ट्रिप म्हणजे काय असते , हे हि कळत नव्हतं . तो म्हणजे एक नवीन वेगळाच शब्द होता आमच्यासाठी तेव्हा .
आमच्या पहिलीच्या वर्ग शिक्षिका होत्या हजारे मॅडम त्यांनी सगळ्यांच्या पालकांना कळवून ट्रिपची जे काही फी होती ते जमा केली.
आता ट्रीपच्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे युनिफॉर्म घालुन शाळेत आलो .सकाळी आठ वाजता एक पिवळ्या रंगांची बस आली होती. त्यात आम्ही सगळे म्हणजेच A बॅचच्या 35 मुली बसल्या होत्या. एकदा शेवटची वेळ निघायची म्हणुन मॅडमने विचारले "आल्या का सगळ्या मुली बस मध्ये" ? सगळ्या मुली हो म्हणाल्या होत्या .
आम्ही मेंत्रिणींचा ग्रुप त्यामध्ये पवार ,नान्हे आस्कर, मानवटकर आणि मी बसच्या मागच्या सीटवर बसुन एकमेकांना बॉटल ने मारत होतो. बसमध्ये अंताक्षरी सुरु होती आणि आमच्या ग्रुप ची वेगळीच मस्ती चालायची म्हणून हजारे मॅडम आमच्या वर रागावल्या होत्या.
फन अँड फूडला पोहोचल्यावर मॅडम ने आम्हाला एका रांगेत उभे केले . नंतर आम्ही सगळे एका रांगेत गेटच्या अंदर गेलो .मॅडमने आम्हाला स्ट्रिक्टली सांगितले होते कि," जास्त दूर जाऊ नये, ग्रुप मध्येच खेळायचे ,वगैरे वगैरे
आम्ही सर्वात पहिले तर झुले झुलायला लागलो. रेलगाडी सारखा झुला होता. त्याच मिकी माऊस सारखं तोंड होत .त्यात आम्ही बसून एक वेळा पारी केली . दुसऱ्या राऊंड साठी दुसरे विदयार्थी बसणार होते म्हणून आम्हाला उतरायला लावलं .पण आम्ही कोणाच काही ऐकत नाही .आम्ही त्या रेलगाडी लपून खाली बसलो आणि दुसऱ्या राऊंड ची पण मजा घेतली. मॅडम आमच्याकडे पाहून हसायला लागल्या आणि म्हणाल्या "ह्या पोरीं मोठ्या बदमाश " .सगळे झुले एक-एक वेळा झुलल्या नंतर आम्ही वॉटर पार्क कडे आलो .मॅडमने आम्हाला युनिफॉर्म काढायला लावला. ओला झाला नाही पाहिजे म्हणून. आम्ही युनिफॉर्म काढला. जुते काढले आणि पाण्यात खेळायला लागलो. आम्ही तेव्हा खुप लहान होतो म्हणून मॅडम आम्हाला स्विमिन्ग पुल मध्ये उतरु देत नव्हतीं. आम्ही बाजूला ऑक्टोपसचे डिजाईन असलेला रेन डान्सच्या पेंडॉल मध्ये नाचत होतो. सुरुवातीला तर डान्स चालु होता आणि मग आम्ही एकमेकांना गुदगुदल्या लावायला लागलो. पाण्यात खेळायला लागलो .आजु बाजु रेन डान्स चालु होता आणि आमचा ग्रुप पकडम-पकडाई खेळत होता .आम्ही मस्त मजा करत होतो.
पाण्यात खेळुन झाल्यावर आम्ही इकडे- तिकडे फिरत होतो .मजा करत होतो .शेवटी निघायच्या वेळेस सगळ्या मुलींनी युनिफॉर्म घातला .मला माझे जुते -मोजे मिळतच नव्हते .मी खुप शोधले आता फन अँड फूड काही मंदिर तर आहे नाही ,कि तेथून माझे जुते चोरी जातील. खुप शोधल्यावरही मला माझे जुते मिळाले नाही. ते चोरी झाले कि हरवले ते मला आजही कळत नाही .पण त्या ट्रीपची आठवन केली तर सोबतच मला माझे जुतेही आठवतात.

ती माझ्या आयुष्याची पहिली ट्रिप होती .तेव्हा मला ट्रिप म्हणजे नेमकं काय होते? हेही कळत नव्हतं.मला तेथून निघत पर्यंत माझे जुते मिळाले नाही शेवटी मी उघड्या पायांनी बस मध्ये

बसून वापस आली. घरी आईला सगळी हकीकत सांगितली. ती माझी गोष्ट ऐकून फार हसायला लागली . मला नवीन जुते मिळाले आईकडून .अश्या इतक्या लहानपणी मी अनुभवलेली गोष्ट आहे .
गोष्ट आवडली असेल तर रेटिंग दया आणि मला फॉलो करा .
.

इतर रसदार पर्याय