संत एकनाथ महाराज - 3 Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संत एकनाथ महाराज - 3

संत एकनाथ महाराज-3

अंतिम भाग...✍️✍️💞Archu💞

श्री दत्तात्रय प्रभू दंडक घेवून, चोपदार म्हणून नाथांच्या द्वारी उभे आहेत, श्री खंड्या च्या रूपात साक्षात परब्रम्ह परमेश्वर भगवान कथा श्रवण करताहेत..असे एकनाथ महाराज यांचे चरित्र आपण सगळे पहात आहोत...
एक भक्त 12 वर्षापासून पंढरपूर मध्ये भगवंताच्या दर्शनासाठी तप करीत आहे.. भक्तिभावाने पूजा अर्चा आखंडीत चालू आहे. .. बारा वर्षा पासून भगवंताचा भेटीसाठी एकनिष्ठ तेणे आराधना करत होता...पण भगवान काही त्याला प्रसन्न होत नवते.. रुक्मिणी ने पाहिलं...त्या भक्ताची तळमळ पाहून रखुमाई ल काही राहवेना.. त्याच्या स्वप्नात जावून दृष्टांत दिला,"अरे वेड्या,तू बारा वर्षापासून इथे थांबला आहेस, त्यांच्या दर्शनासाठी, भगवंत तुला दर्शन देत नाही, कारण ते इथे नाही च आहे..ते तर पैठणच्या एक भक्त आहेत एकनाथ महाराज यांच्या वाड्यात आहेत. त्यांच्या घरी श्री खंड्या च्या रूपात सेवा करताहेत...तुला तिथे जावं लागेल देवाला भेटायला...."
स्वतः रुक्मिणी मातेने असे सांगितल्यावर तो भक्त धावत पळत, घाईघाईने पैठ्णकडे जाण्यास निघाला.. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो एकनाथ महाराज यांच्या वाड्यात येऊन पोहचला..
नाथांच्या वाड्यात त्या ठिकाणीं श्री खंड्या तेवव झाडून घेत होता..या भक्ताने त्यालाच विचारलं, एकनाथ महाराज इथेच असतात का?? म्हणे "हो"...
यांच्याघरी कुणी श्री खंड्या नावाचा माणूस इथेच राहतो का???
"हो हो... आतमध्ये जावून विचारा"... भगवंताने अाेलखल की हा मलाच शोधायला आलाय..त्याचे सगळं मनोगत भगवंताने हेरल..तो भक्त आतमध्ये नाथां कडे गेला ..आणि भगवंताने घाईघाईने पाण्याची कावड उचलली,आणि गांगेकडे जायला निघाले..
आतमध्ये गेल्यावर म्हणे, नाथ महाराज श्री खंड्या कुठेय???
"श्री खंड्या तर इथेच असेल कुठेतरी.."आता झाडून घेत होता... नाथ महाराज म्हणाले..
म्हणे::; तो आहे श्री खंड्या..
नाथ म्हणे.. हो तोच आहे... का बरं तुम्ही अस विचारताय??

हात जोडले त्याने,न म्हणाला" नाथ बाबा,तुम्ही मोठे भाग्यवान आहात,मी बारा वर्षे तपस्या करूनही देवाने मला अजुन दर्शन दिले नाही... भगवती रखुमाई ने मला स्वप्नात येऊन सांगितला की तुमच्या घरी श्री खंड्या म्हणून साक्षात परमेश्वर तुमची सेवा करतोय..तो कुणी साधारण मनुष्य नाही..तो तर अनंतकोटी ब्रम्हांडनायक माझा परमेश्वर आहे.."

असे ऐकताच नाथ महाराज धाडकन जमिनीवर कोसळले.."पांडुरंगा, माझ्यासाठी एवढी सेवा करतोस??
काय काय नाही केलेस तू,तू झाडून घेतोस काय!!!तू पाणी भरतो काय?!!!मी तुला काय काय काम करायला लावली...देवा!!!! कुठे आहेस??आत तू माझ्यासमोर का येत नाहीत???
घाईघाईने गोदावरीच्या दिशेने पळत सुटले.. जावून पाहतात तर काय!!! श्री खंड्या ना ही सापडला.. सापडली ती मोकळी कावड.. पाण्याने भरलेले मोकळी कावड वाळवंटात पडलेली. .. आणि भगवान अंतर्धान झाले होते..
श्री खंड्या!! श्री खंड्या!!! श्री खंड्या !!म्हणून नाथ महाराज आवाज देत होते... आलाप करू लागले, विलाप करू लागले. . रडू लागले.., श्री खंड्या कुठे सोडून गेलास?? माझ्यासमोर प्रगट हो...
गिरिजा माईला कळाल, श्री खंड्या देव. आहेत..त्या स्वतः ल कोसू लागल्या..मी मेलीन काय काय काम करून घेतली .काय काय सांगितलं..झाडून घ्यायचं,भाजी निवड्याची, भांडी घासायची, अगदी पाणी भरेपर्यंत . देवा आता का रे,असा अंत पाहतो!!! देवा प्रगट हो....असे म्हणून दोघे पती पत्नी काकुळती येवू लागले ..

तो भक्त गहिवरला..., भक्त आणि भगवंताच्या मधील प्रेम पाहू लागला.. भगवंत आहे बारा वर्ष आपल्या भक्तासाठी राबटोय..देवा प्रगट व्हा!!!!देवा दर्शन द्या..

आणि देव प्रगट झाले ते श्री खंड्या च्या रूपात .. कापलाळा लावलेले मोठा गंध, डोक्यावर पागोटं.. गुडघ्यापर्यंत ने धोतर.. अंगावरती उपरण..असा हा श्री खंड्या सगळ्यांसमोर उभा राहिला.. आणि असे पाहता पाहता चतुर्भुज भगवंत प्रगट होऊन सगळ्यांना दर्शन दिले ..
सर्वांनी साष्टांग प्रणिपात केला...देवा!!! आमच्या बरोबर राहिलास,तेरी आम्हाला कळू दिले नाही .तुझी संगत दिलीस . आम्ही धन्यधण्य झालो.. अनेक आशिष देवून भगवान अंतर्धान पावले..
नाथांचे चरि त्र आता सर्वदूर पसरले होते..
नाथ महाराज दररोज संध्याकाळी ज्ञानेश्वरीचे पारायण करून मग झोपी जात होते. असेच एक रात्री ते झोपले असता त्यांना स्वप्नात ज्ञानोबा रायानी सांगितले की, नाथा माझ्या गळ्याला अजनवृक्षाची मुळी लागली रे!! तू ये आणि येऊन एवढी मुळी काढ मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे.!!!..

त्या काळात ज्ञानेश्वरी अशुद्ध झाली होती त्या काळातल्या लोकांनी मनानेच त्यात ओव्या टाकल्या होत्या... मूळ प्रत ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर होती.. मूळ प्रत देण्यासाठी, व ती लोका समोर नाथा करवी आणण्यासाठी..ज्ञानेश्वर महाराजांना एकनाथ महाराजांना बोलावणे गरजेचे होते.. त्यासाठी त्यांनी अजणवृक्षाचे मुळीचे निम्मित केले होते..
त्याकाळात आळंदी येथील सिद्धेश्वरमंदिर कुणालाच माहीत नव्हतं.. सगळीकडे घनदाट जंगल होत.. ज्ञानोबा रयांची समाधी जंगलात घोर अरण्यात कुठेतरी लुप्त होवून गेली होती.. आजूबाजूला गवत वाढले होते..
नाथ महाराज तिथे गेले, इंद्रायणीत स्नान केलं.. सिद्धेस्वराच मंदिर च जवळ समाधी शोधू लागले..पण काही केल्या सापडेना..मग ते हताश होऊन मंदिरासमोरच नंदी ला पाठ टेकून बसले..पण तेवढ्यात त्यांना तो नांदी हाललयासरखा वाटला..हा नंदी कसा हल्टोय, म्हणून त्यांनी बारकाईने पाहीले तर त्या नंदी खालून समधिपर्यंत चालण्याचा रस्ता होता.. नाथ महाराज स्वतः च्य जिवाची पर्वा न करता त्या ठिकाणी खाली गेले..
कोटी सुर्यास्म तेज ज्ञानोबा रायांच देदीप्यमान असलेली माऊली अजूनही तेथेच बसलेली आहे . लोक म्हणतात, चंद्र सूर्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत ज्ञानोबराय तेथे आहे,पण असे नाही ...तर जोपर्यंत ज्ञानोबा माऊली आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार.....
केिवल्याचा पुतळा, प्रगटला भु तळा..
ती मुळी बाजूला केली.. माऊली उठले नी नाथांना आलिंगन देऊन भेट दिली..आणि हातात मूळ शुद्ध ज्ञानेश्वरी प्रत दिली... जनसामान्य पर्यंत ही पोहचण्याची जबाबदारी आता नाथाकडे आली.."ज्ञानेश्वरी पाठी,जो ओवि करील मराठी..
तेणे अमृताची ताटी, नारोटी जाण ठेविले.."सगळ्या जगाला नाथ महाराज यांनी पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी प्रगट करून दिली...
आता नाथ महाराज यांचे कार्य वाढले होते...आता नाथ महाराज भागवातावर टीका लिहिण्याचे काम सुरू केले... संतांचा वियोग होणे हे जीवनातील सगळ्यात वाईट गोष्ट आहे. संतांचा वियोग नाथ महाराज कळवळून मांडतात.. जनार्दन स्वामी एहलोकी गेले.. त्यावेळचे नाथांचे शब्द आहेत.. पुढे..

धन्य आज दिन संत दर्शनाचा..
अनंत जन्मीच शिण गेला..

मज ते त्यासी आलिंगन द्यावे...
कदा न सोडावे चरण त्यांचे...

त्रिविध तापाची झाली बोळवण..
झाले दर्शन वैष्णवांचे...

एका जनार्दनी घडो त्यांचा संग..
न व्हावा वियोग जन्मोजन्मी...🌹
भागवताची रचना चालू आहे..बरच ओव्या लिहून झाल्या..काही लोकांनी ते लिखाण कागदावर उतरवत आपल्याजवळ ठेवलं होतं.. एक सात्विक असलेला ब्राह्मण ते अर्धवट लिखाण घेवून कासीला गेला होता.. काशीमध्ये काही सण्याष्याच्ण्या आश्रमात तो ब्रहामन राहत होता.. दररोज सकाळी उठून तो नाथांचे लिखाण वाचत होत..एक दिवस तू ब्राम्हण नाथांचे लिखाण वाचत असताना तेथे एका संन्याशाने विचारले की हे तू काय वाचत आहेस ते म्हणाले भागवता वरचे टीका लिहिली आहे एकनाथ महाराजांनी भागवता वर मराठीत भाष्य केलेले आहे ते हेच.....
भाश्य तेही मराठीतून ते शक्य नाही त्यांना म्हणावं हे ताबडतोब बंद करा तुमचे हे लिखाण चालणार नाही!!!!

हा निरोप काशीहून पैठण आला तोपर्यंत भागवताची लिखाण पूर्ण झाली होती नाथ महाराजांना त्यांनी लिहिलेले भागवत घेऊन काशी वर येण्याची आज्ञा केली होती.. एकनाथ महाराज आज काशी पर्यंत येऊन पोहोचले त्या धर्म परिषदेमध्ये त्यांना विचारण्यात आलेकी; तुम्हाला कुणी अधिकार दिला, संस्कृत भाषेतील भागवत प्राकृतिक आणण्याकरिता?????
माझे गुरू मला म्हणाले,मला ज्ञानोबरायचे संकेत मिळाला,म्हणून मी हे लिखाण काम करत आहे..
सगळेजण रागावले..ही पोथी गंगेमध्ये बुडवून टाका म्हणे..
सगळेजण गांगेकदे निघाले..भागवता ल पाण्यात ब्बुडवून टाकल..आणि चमत्कार काय झाला, प्रत्यक्ष गंगा मैया भागवताला हातावर धरून पाण्यावर आली.. सर्व काशी क्षेत्रातील लोकांनी ते पाहिलं..नाथांच्या भा गवता ची चरचा एवढी प्रगटली की न नाथ महाराज यांची भा हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली..💞

महाराष्ट्रीयन संतांनी केलेला हा उत्तरविजय होता...!!!🌹 आधी चंगदेवची, नंतर ज्ञानोबा रायांची,आणि आज ना थांची मिरवणूक काढण्यात आली होती... सर्वांनी जयघोष केला.. एकनाथ महाराज अवतारी पुरुष आहेत,ही गोष्ट सगळ्यांना कळाली.. एकनाथी भागवत ची प्रसिद्धी झाली..
एकनाथ महाराज यांना वाटलं, का आलोच आहोत तर गंगेचं पाणी घेवून जावं..आणि रामेश्वराच्या पिंडीवर सोडावं.. अशी जुनी पद्धत आहे.. नाथांनी कावडीत पाणी घेतल नी निघाले रामेश्वर मंदिराकडे.. प्रवास करत असताना एके ठिकाणी वाळवंटात एक गाढव पाण्यावाचून तरफड करत होते.. तहानेने व्याकुळ झालेल्या त्या प्रण्याकडे नाथाला पहावल नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या जवळ असलेले कवडीमधल गंगेचं पाणी त्या गाढवाला पाजल..
लोक नावे ठेवू लागली.. काशीहून पाणी आणल, रामेश्वर साठी आणि एक डे त्या गाढवाला पाणी पाजले.
.माझा रामेश्र्वर दुसरीकडे कुठे नसून तो या प्राणिमात्र मध्ये आहे,असे नाथ म्हणाले..
त्या गाढवाला पाणी पाजणे, हीच रामेश्र्वराची खरी सेवा... माझा परमेश्वर या प्राणिमात्रांमध्ये बसलेला आहे...👣

आता नाथांचे चतुश्लोकी भागवत ही पूर्ण लिहून झाले होते शुकाष्टक लिहून झाले होतं आनंद लहरी लिहून झाली होती..गवळणी अभंग भारुड ही अनेक लिहिले होते आता नाथांना रामायण लिहिण्याचा संकेत जणू मिळाला होता जसेच्या तसे रामायण लिहिण्यासाठी एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिण्यास सुरुवात केली होती.. हे लिहित असताना स्वतः हनुमंत राय तिथे येत होते..👣
नाथ महाराज शेतीचा शोध या प्रसंगावर बोलत होती सीतामाता शोध घेण्यासाठी हनुमंत राय अशोक वनात गेली तेव्हा त्या अशोक कोणाचे वर्णन करीत असताना नाथ म्हणाले की तेथे सर्व पांढरी फुले होती तेवढ्यात शोधा वर्गामध्ये बसलेले हनुमंत म्हणाले की जे सांगायचे ते खरे सांगा, नाही ती फुले लाल होती ना ती म्हणाली नव्हे ती फुले पांढरी होती या रामायणामध्ये असाच उल्लेख आहे तेव्हा हनुमंत म्हणाले मी स्वतः जाऊन आले आहे तेव्हा मला माहिती की तुम्हाला माहिती ती फुले लालच होती हे प्रकरण एवढे वाढले की निवाडा करण्यासाठी प्रभू रामचंद्र आणि सीता माता पर्यंत गेले तेव्हा नाथ महाराजांनी सीता मातेला विचारले की फुले कोणत्या रंगाची होती सीतामाई म्हणाल्या फुले पांढरी होती हनुमंत म्हणाले मला तर लाल दिसणे तेव्हा नाथ महाराज म्हणाले की जेव्हा हनुमंत तुम्ही अशोक वनात गेले तेव्हा तिची अवस्था पाहून तुम्हाला भयंकर राग आला व त्या यामुळेच तुमचे डोळे लाल झाले आणि तुम्हाला आजूबाजूचे पांढरी फुले देखील लाल दिसत होती..
एवढा बारकाईनं रामायण नाथ महाराजांनी लिहिलेले आहे जसेच्या तसे जर रामायण तुम्हाला पाहिजे असेल तर भावार्थरामायण पहा.🌹

लहानपणापासूनच एकनाथ महाराजांच्या संगतीत असलेला गावबा नावाचा माणूस नाथांचे मन लावून ऐकत होता.. यांचे रामायण लिहिण्याचे काम चालू होते नाथ महाराजांचे वय 80 वर्ष होऊन अधिक झाले होते तेव्हा नाथ महाराजांना संकेत होऊ लागली की आता आपण थांबायला हवं...नाथ महाराज लोकांना म्हणू लागले की मला देवाने बोलाना धरला आहे बोलावं धाडलं आहे आता मला जायला हवं लोक म्हणू लागले की महाराज थांबा थोडे दिवस एवढं रामायण तरी पूर्ण करून जा तेव्हा नाथ महाराज म्हणाले ,की हिण्याचेहवं.. अपूर्ण राहिलेलं रामायण माझा हा गाभा पूर्ण करीन गावाचे नाव ऐकताच सर्वच लोक आश्चर्यचकित झाले हरिपंडित आला न सांगता या गावाला रामायण पूर्ण करण्याचे सांगितले म्हणून लोक तिरस्काराने नातं कडे पाहत होती पण नाथांच्या संगतीत राहून व नाथांचे घरचे अन्न खाऊन वाढलेला हा गाभा भक्तीने परिपूर्ण आहे म्हणूनच ना त्यांनी त्याला ही जबाबदारी दिली ली.. गावाने ही ती आनंदाने स्वीकारली आणि आजही आपण पहात असलेले भावार्थरामायण हे उरलेल्या काही ओव्या गावाने लिहिलेल्या आहेत..✍️✍️💞Archu💞

आता नाथ महाराज आपल्या समाधीची तयारी करू लागली..फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस ना त्यांनी निवडला यात षष्ठीला जनार्दन स्वामी यांचा जन्म गुरुंचा अनुग्रह व परमात्म्याशी एकरूपता झाली आणि या तिन्ही दिवसांचा संगम म्हणून एकनाथ महाराजांनीही आपल्या जाण्याचा दिवस फाल्गुन वद्य षष्ठी हा ठरवला.. नाथ महाराजांनी या दिवशी दिंडी काडली.. गळ्यात वीणा घेवून नाथ महाराज गंगेच्या दिशेने निघाले.. सगळी भक्तमंडळी भजनात तल्लीन होती... नाथांनी आता गंगेमध्ये प्रवेश केला.. हातात वीणा घेवून, अखंड देवाचे नामस्मरण करीत करीत घोट्या इतके पाण्यात, नंतर गुढ्याघ्या पर्यंत... हळूहळू पाणी कमरेपर्यंत, छातीपर्यंत पाण्यात चालत चालत नाथ महाराज गळ्यापर्यंत पाणी आले होते ..इतर भक्तांनी नाथांना पाहिल्यावर ते नाथांना आवाज देत होते ..पण नाथमहाराज मात्र भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जलमय झाले होते..🤗

सर्वजण नाथ नाथ म्हणून आता अनाथ झाले होते... त्यांचा नाथ आता एकरूप झाला होता जनार्धन यांचा एका एक म य झाला होता..
सगळ्यांनाच दुःख झालं.. तळागाळातल्या लोकांनाही आपण पोरके झाल्याचे वाटून गेले... सर्वजणच नाथांच्या जाण्याने हळहळले होते.. भानुदास यांच्या कुळातील हा कुलदीपक आता हरवला होता सर्वजण त्यांना भानुदास एकनाथ असे म्हणू लागले..💞
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असे म्हण आजही सांगता केली जाते..🤗

नाथ महाराजांनी आपल्या प्रत्येक गवळणी किंवा आपल्या लिखाणाच्या शेवटी आपण जनार्दनाचे एका आहोत एका जनार्दनी पूर्ण कृपेने असा त्यांनी असा उल्लेख केला आहे..💞

मला आवडलेले पुढे काही गवळणीचे ध्रुवपद..

काळा सावळा ग पोर कुणाचा बाई..ही एक गवळण..

अधरी धरुनी वेणू वेणू वाजविला कोणी...ही 2 री..

मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी..ही 3री..

हरी तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे..4 थी

एकनाथ महाराज यांनी हरिपाठ ही लिहिलेला आहे.. त्यांचा हरिपाठ अतिशय सुरेख आहे आणि तो आपण जीवनात नक्कीच अवलंबिला पाहिजे.. कितीही लिहिले तरी कमीच आहे यांच्याविषयी..

असेही नाथ महाराजांचे चरित्र आपण पाहिले आहे... त्यांच्या चरित्र विषयी खूप काही लिहिण्यासारखं होतं, पण मी अतिशय मोजके दृष्टांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे... तरीपण माझ्याकडून काही चुकले असल्यास मी बाळ बोध म्हणून मला क्षमा असावी आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला हे चरित्र कसे वाटले मी तुमच्या प्रतिउत्तर ची आवर्जून वाट पाहिलं..

तुमच्या आमच्या मधील...✍️✍️💞Archu💞