जग गोल आहे Supriya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जग गोल आहे

एक छोटे गाव असते, त्या गावात राजू नावाचा गरीब मुलगा राहत असतो. राजूच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते.
राजू शाळा सुटल्या नंंतर घरोघरी जाऊन मातीच्या वस्तू विकत असे, आणि येणाऱ्या पैशातून राजू शाळेचा खर्च भागवत असे.
एक दिवस दुपारची वेळ होती, राजू घरोघरी जाऊन दार वाजवून मातीच्या वस्तू विकत होता, दुपारची वेळ असल्याने राजूला खूप भूूूक लागली होती, म्हणून राजूने ठरविले की,पुढील दार वाजवल्या नंतर वस्तू बद्दल पैशांंऐवजी जेवणाची मागणी करायची.
राजूने ठरविल्याप्रमाणे पुढील दार वाजविले, दार उघडले तर समोर एक सुंदर मुलगी उभी असते, तीचे नाव गीता होते, राजूने घाबरतच पिण्यासाठी पाणी मागितले.
गीता किचन मध्ये पाणी आणण्यासाठी गेल्यावर तीने विचार केला की, हा मुलगा खूपच घामाघूम झालेला दिसतोय, दुपारची वेळ असल्याने तो भुकेलेला असेल
म्हणून गीताने राजूला एक पेला भरून दूध दिले.
राजूने दूध पित असताना देवाचे मनोमन आभार मानले, त्याने विचार केला की, अजूनही जगात माणूसकी जिवंत आहे.
राजूने दूध पिऊन झाल्यावर गीताला पेला परत दिला आणि म्हणाला की, दूधाचे किती पैसे देऊ?
गीता म्हणाली की, पैसे का देणार
माझी आई नेहमी सांगते की जर आपण कोणाची मदत केली तर त्याबदल्यात पैसे घ्यायचे नाही.
यावर राजू म्हणाला, तुम्ही काही वस्तू विकत घ्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर.
गीताने सांगितले की मला वस्तू नकोय.
राजू म्हणाला की, मी तुमचा मनापासून आभारी आहे मला मदत केल्याबद्दल, मला खरच खूप भूक लागली होती.
राजू गीताचे आभार मानून निघून जातो पण जाताना तो वाटेत विचार करत जातो की आपण पण सर्वांची मदत करायला हवी.
असेच काही काळ लोटला.
राजूने शालेय शिक्षण पूर्ण केले तसेच काॅलेजचे शिक्षण ही पूर्ण केले.
त्यानंतर राजू एका मोठ्या शहरात डॉक्टर म्हणून कार्यरत झाला.
तर इकडे गीताही मोठी होत होती, पण तीच्या घरची परिस्थिती बदलली होती.
एक दिवस गीता खूप आजारी झाली, तीची तब्येत खूपच बिघडली. गावातील डॉक्टरने सांगितले की गीताला शहरातील हाॅस्पिटल मध्ये दाखल करा.
डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे गीताला शहरातील हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
हे तेच हाॅस्पिटल होते जिथे राजू डॉक्टर म्हणून कार्यरत होता.
गीताची तब्येत खूपच बिघडली असल्याने तीला ICU मध्ये दाखल करण्यात आले.
राजूने गीताची फाईल बघितल्यावर त्याच्या अस लक्षात आले की ही तर तीच मुलगी आहे जिने काही वर्षांपूर्वी आपल्याला मदत केली होती.
राजूने प्रत्यक्ष जाऊन गीताला बघून खात्री करून घेतली, आणि त्याने गीताची मदत करण्याचे ठरवले.
राजूने गीताला बरे करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांना बोलावले,
राजूने गीताला बरे करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.
राजूच्या प्रयत्नांना यश मिळाले.
गीताच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. काही दिवसांनी गीता पूर्ण पणे बरी झाली, तेव्हा डॉक्टरांनी गीताला एका पाकीटात हाॅस्पिटल च्या बिलासोबत एक चिठ्ठी लिहून दिली.
जेव्हा ते पाकीट गीता जवळ पोहोचते तेव्हा गीता घाबरून जाते, ती विचार करते की आता तर आपण पूर्ण बरे झालो आहोत पण हाॅस्पिटलचे बिल कुठून भरायचे कारण गीताच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते.
गीता ते पाकीट उघडते तर तीला बिलासोबत अजून एक चिठ्ठी दिसते, गीता ती चिठ्ठी वाचते.
चिठ्ठीत खालील प्रमाणे मजकूर लिहिलेला असतो,
"तुम्ही तुमचे बिल काही वर्षांपूर्वीच एक पेला दूधाच्या स्वरूपात दिलेले आहे"
डाॅक्टर आल्यावर गीताने डॉक्टरांना ओळखले आणि मनापासून आभार मानले व म्हणाली की, त्या दिवशी तुम्ही माझे मनापासून आभार मानले होते तर आज मी तुमचे मनापासून आभार मानते.
ही एक छोटीशी कथा आपल्याला एक चांगली गोष्ट शिकवते, जर आपण काही चांगले केले तर फिरून आपल्या पर्यंत चांगलेच येते आणि जर आपण काही वाईट केले तर फिरून आपल्या पर्यंत वाईटच येते.