मी ती आणि शिमला - 2 Ajay Shelke द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी ती आणि शिमला - 2

प्रवास खूप लांबचा होता केतन आणि मानसी मागे बसलेले तर स्वराली माझ्या बाजूच्या सीटवर. गाणी वाजत होती गप्पा आणि मस्ती चालू होती आणि मध्ये मध्ये महेश ला शिव्या घालन सुद्धा. आम्ही पहिला ब्रेक घेतला तो वलसाड ला सकाळचे ११ वाजत होते आणि बसून बसून सर्वच जण आत्ता वैतागले होते. नाश्ता वगैर केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.आत्ता गाडी केतन ने घेतली आणि मी केतनच्या जागी बसलो. परत गप्पा गाणी मध्येच थांबून फोटो शूट वगैर चालू होत केतन आणि मानसी एन्जॉय करत होते पण मी आणि स्वरा असे गप्प होतो जसे म्युट असल्या सारखे.
आत्ता बरच वेळ झाला होता दुपार चे ३ वाजून गेले होते आणि सर्व आत्ता रेंगाळले होते. स्वराली ला झोप येऊ लागल्यामुळे ती ही मागे येऊन बसली पण एकदम मागे बॅगा आणि समान असल्यामुळे ती माझ्या आणि मानसीच्या मध्ये बसली. केतन आणि मी दोघे च जागे होतो तो गाडी चालवण्यात लक्ष्य देत होता आणि माझं लक्ष्य स्वराली खेचत होती. ती मागे डोकं टेकून झोपली होती. तिचे केस मोकळे होते आणि तिचा अर्धा चेहेरा त्यात लपलेले होता जसा अर्धा चंद्र काळया ढागंच्या मागे लपतो तसा. तिचे ते रूप पाहून मी सतब्ध च झालो होतो पण केतन ने हॉर्न वाजवला आणि मी भानावर आलो. केतन ने गाडी साईड ला घेतली आणि आम्ही दोघे खाली उतरलो. ह्या दोघी मागे साखर झोपेत होत्या त्यामुळे गाडी थांबल्याच त्यांना समजल नाही. केतन हलका होऊन आला आणि सिगारेट पेटवत बोलला "तू बोलून टाकायला हवं" मी चापापत आणि अडखळत उत्तरलो "काय बोलू रे?" "हे बग तुला मी आपण चड्डीत होतो तेव्हा पासून ओळखतो आहे आणि तुझ्या मनातल पण तर आत्ता मला तू चु*या बनऊ नको आणि मनात आहे ते तिला बोलून टाक ती मागे बसल्या पासून तुला बघतो आहे मी आणि निघाल्या पासूनच तर जाऊ दे so आत्ता तू बोलायला हवं" केतन च बोलण ऐकून मी जरा अडकलोच "अरे बाबा तू गप आणि तुला माहित आहे ती नाहीच बोलणार आहे मला तर कशाला मी मैत्रीच हे नात खराब करू आहे ते बर आहे आणि चालू दे सुखाने आणि तू गप्प बस नेहमी सारखं उगीच बोंबलू नको चल आत्ता". "आत्ता बसतोय गप्प पण ह्या ट्रिप मध्ये तू नाही तिला बोललास तर बघ मी काय करतो ते बास्स झाल आत्ता तुझ" माझ ऐकून केतन बोलला आणि आम्ही गाडीत बसलो. मानसी उठली होती आणि आतून बघत होती पण तिने काही ऐकल नव्हत पण स्वरा अजून झोपलेली होती म्हणून आम्ही तिघे गप्पच होतो.
शेवटी स्वराली उठली आणि जवळ जवळ ६.३० वाजत आले होते. स्वरा उठली तेव्हा आम्ही वडोदरा जवळ जवळ होतो पण वडोदरा पोहोचायला एक दीड तास लागणार होता अंधरपण पडायला लागला होता आणि फ्रेश होण्यासाठी गाडी साईडला घेतली १० मिनटे जरा अंग वगेरे मोकळं केलं आणि पुढची प्लॅनिंग केली. आज वडोदर्यात थांबायचं ठरल. गाणी गात आणि गप्पा मारत मारत वडोदरा पोहोचायला रात्री चे ८ वाजले. हॉटेल शोधून सेट होईपर्यत ९.३० वाजले आणि आत्ता पोटात कावळे ओरडत होते सकाळी केलेला नाश्ता नंतर पोटभर अस काही खाल्ल नव्हत. जेवण आणि पिन झाल तेव्हा ११ वाजून गेले होते आणि सकाळी लवकर निघायचं होतं. सर्वांनी सिंगल रूम घेतलेली. रूम पण लाइन मध्ये होत्या. मी ही रूम मध्ये आलो आणि सिगारेट पिऊन झोपणार च होतो. सिगरेट चे दोन कश होतात की दरवाजा वाजला. "तू झोपला आहेस काय?" असा प्रश्न विचारत स्वराली बेधडक रूम मध्ये दाखल झाली. "नाही आत्ता झोपणार च आहे का ग?". "अरे ती जोशीची केस आठवते का तुला ते तिसऱ्या माळ्यावरून पडलेले आणि spinal surgery ला आलेले ते आले आहेत हॉस्पिटल मध्ये आत्ता कॉल आलेला मला की खूप पेन होते आहे त्यांना. जरा तुझा lapi यूज करू का मी? माझ्या lapi ची बॅटरी डाऊन आहे रे" स्वरा सांगत होती "हो कर ना विचारते काय तू पण" मी माझा laptop काढून देत बोललो. "काहीं नाही रे व्हिडिओ कॉल वर त्रिपाठी ना सांगते केस काय आहे ती ते हँडेल करतील. तुला त्रास होते असेल तर मी lapi घेऊन जाते आणि उद्या देते तुला की करू इथे १० मिनटे लागतील बघ?". "अग त्रास काय तू कर इथे किंवा तुझ्या रूम मध्ये मला काही नाही". "थांब मग इथे च करते तू झोप हवं तर काही प्रो्लेम नाही मी दार लावून घेईल". "अग नाही तू बस इथे बेड वर टेबल ची लाईट खराब आहे इथे बेड वर बस मी जरा बाहेरून येतो चेक आउट च विचारून केतन काही उद्या उठणार नाही गडबड नको उगीच सकाळी तू घे आवरून". "बरं ok तू ये जाऊन". अस बोलून ती कॉल वर बिझी झाली आणि मी खाली जाऊन विचारपूस केली पण वरती येताना आठवल की सिगारेट संपली आहे मी तसाच सिगारेट च्या शोधात गेलो टपरी पण हॉटेल पासून लांब होती. परत यायला मला रात्री चा पाऊने एक झाला आणि झोप पण उडाली होती म्हणून विचार केला की एक दोन पेग घेतले तर झोप येल लगेच आणि स्वराली पण गेली असेल. हॉटेलच्या बार वर जाऊन 2 पेग घेतले आणि रूम मध्ये गेलो. दार उघडताच दिसल की स्वराली तिथेच झोपी गेलेली आणि laptop मध्ये माझे आणि तिचेे फोटो असणारा फोल्डर ओपन होता आणि तिने सर्व फोटो बघीतले होते ती बेड वर झोपली होती. मी जाऊन लॅपटॉप हळूच बंद केला आणि फोन चार्जिंग ला लावला पण बटणं टाकताना आवाज आला आणि स्वराली उठली पण ती झोपेत होती.तिने मला हातनेच सांगीतल की तू माझ्या रूम मध्ये झोप मी इथून आत्ता उठणार नाही आणि ती परत झोपली. मी बाजूच्या सोफ्यावर बसलो आणि तिच्याकडे बघत बसलो. मी धुंदीत होतो पण डोक्यात त्या सर्व आठवणी, तिची सुंदरता फिरत होती. शांत आणि गाढ झोपलेली तिला मी बघत होतो. तिची ती सुंदरता मी माझ्या मनात आणि डोळ्यात साठवत होतो आणि....



क्रमशः