Mi ti aani shimla - 5 books and stories free download online pdf in Marathi

मी ती आणि शिमला - 5

मी तिच्याकडे पाहिलं तर ती मला हातवारे करून काही तरी सांगत होती पण मला काही समजत नव्हत तर तिने मला खुणेने मागे बघायला सांगितलं तसा मी मागे बघेतल तर हे माऊ चिऊ दोघे झोपलेले एकमेकांना बिलगून. मी ही बस एक हास्य देऊन गाडी चालवण्यात लक्ष्य देऊ लागलो कारण सकाळ पर्यंत शिमला गाठायचा होता.
मी गाडीचा वेग वाढवला शिमला अजून ९६ किमी होताा. रात्रीचे २.१५ झाले होते स्वरा सुद्धा झोपली होती डोकं टेकून आत्ता गाडीत मी एकटाच जागा होतो आणि पर्याय सुद्धा नव्हता. बराच वेळ गाडी चालवल्या नंतर मला अचानक झोप यायला लागली आणि ती ही भयानक. शेवटी एका हायवे वरच्या दुकानाजवळ गाडी उभी केली आणि जरा थांबावं असा विचार करत गाडीतून उतरलो आणि जरा मागे येऊन हलका झालो. गाडीजवळ येताच मला समोर बोनेटवर बसल आहे कोणी तरी समजल आणि बघतो तर स्वरा उभी होती. "काय रे कंटाळा आला का तुला?" स्वराली मला विचारत होती. "हो थोडा आला आहे म्हणूनच थांबलो जरा अंग जड झाल आहे म्हणुन थोड रिलॅक्स करण्यासाठी थांबलो तू कशी उठलीस मला वाटल आत्ता तुम्ही उठाल तेव्हा सरळ शिमला बघाल अस वाटल मला". "अरे नाही रे मी झोपली कुठे फक्त डोळे बंद करून पडले आहे बरं चल चहा किंवा कॉफी पिऊ तिथे समोर टपरीवर थंडी वाजत आहे मला". "बर चल माझा पण आळस जाईल पण हे दोघे?" "झोपुदे त्यांना झोपलेत सुखाने झोपूदे".
"अंकल 2 चाय देना" मी टपरी मधल्या एका वयस्कर माणसाला सांगितलं तसा तो मानेने होकार देऊन चहा बनवायला लागला. मी ही सिगारेट काढून ती तोंडाला लावणार की स्वराली बोलली "काय रे आत्ता कशाला हवी तुला? ठेव आत सकाळी सकाळी कशाला हवी तुला ठेव चहा पी गप्प त्याने आळस जातो जास्त". मी आधी चापापलो की हे चक्क स्वराली बोलते आहे म्हणुन "अरे बघतो काय आत ठेव" ."अ.. हो ठेवतो" बोलत मी आत ठेवली ती सिगारेट आणि तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो." किती दूर आहे रे अजून शिमला? आत्ताच हवेत किती गारवा आहे मला तर थोडी थंडी वाजत आहे". "अजून जवळ जवळ ६० किमी आहे तसा जाऊ आपण ६ पर्यन्त आत्ता वाजले आहेत ३.२० जाऊ ६ पर्यंत आरामात". "सरजी आपकी चाय" माझे बोलणे मध्येच थांबवत टपरीवाला बोलला. मी जाऊन चहा आणला आणि स्वराला दिला."घे ग तुझ प्रेम घे" "हो दे इथे माझ प्रेम आहे चहा" चहा पित पित बऱ्याच इथल्या तिथल्या गप्पा झाल्या मी चहा चे पैसे दिले आणि परत माझा हात सिगारेट काढे गेला पण स्वरा आत्ताच बोलल्या मुळे मी हात मागे घेत तिला बोललो "स्वरा तू हो पुढे मी जरा आलोच". "काही गरज नाही पेटव इथेच गप्प आणि चल मला नको वेढ्यात काढू मला माहित आहे ओळखते तुला मी". तिने हे बोलतच मी परत एकदा स्तब्ध झालो आणि शेवटी एक सिगरेट काढली आणि पेटवली पण माझा लायटर संपला होता आणि माझा संपलेला लायटर बघून स्वराने डोक्यावर हात मारत बोलली "बघा सिगरेट पितात पण लायटर नाही चालू हे घे" बोलत तिने तिझ्या खिशातून लायटर काढला आणि माझ्या सिगरेट जवळ धरला आणि बोलली "मला पण पास कर". मी मारून तिला पास केली तर ती गाडीकडे पाहत होती मी तिला पास करतो आहे हे तिने बघीतल नाही मी तिच्या खांद्यावर अलगद धक्का देत हुंकार दिला तशी ती बोलली "प्रेमात लोग वेडे होतात खरचं". "का अस बोलते ग?" मी तिच्या बोलण्याला फाटे फोडत विचारलं. "नाही आत्ता केतन आणि मानसीच बघ एवढ्या वर्ष आपण सोबत आहोत सर्व पण कानोकान खबर नाही होऊन दिली" . "हो ना मला सुद्धा नव्हत माहित मला सुद्धा आत्ताच समजत आहे बरं आपण इथे आलो म्हणुन समजल नाही तर ते सुद्धा नसत समजल". "हो तसे बरेच लोग असतात मनात लपाऊन ठेवणारे स्वतःच्या भावना लापाऊन ठेवतात जीव गेला तरी चालेल पण बोलणार नाही असो चल जाऊ नाही तर हे राघू मैना उठतील". अस बोलून ती गाडी काढे चालू लागली आणि मी राहिलेली सिगरेट पित तिच्याकडे पाहत होतो आणि ती काय बोलली त्याचा विचार करत होतो आणि मला एकएक समजल की ही आपल्याबद्दल तर नव्हती बोलत? असा विचार करत होतो की कधी सिगरेट संपली आणि तिचा चटका मला लागला समजलच नाही पण त्यामुळे भानावर आलो आणि गाडीत जाऊन बसलो स्वराली येऊन बसली होती आणि तिने डोकं टेकून डोळे बंद केले होते.
मी गाडी चालू करून चालू लागलो पण मनात स्वरा काय बोलली तेच फिरत होत अधून मधून तिरक्या नजरेने मी तिला पाहत होतो. आत्ता थंडी चागली च वाढली होती सकाळचे ४.४५ होत होते आणि मी तिला तिरक्या नजरेने बघत होतो. शांत डोक ठेऊन ती झोपली होती आत्ता मोकळे केस, बंद केलेल्या त्या बोलक्या डोळ्याच्या पापण्या थोडे उडणारे केस आणि कोमल गालांवर येणारी ती लट हलकेच तिच्या गालांवर स्पर्श करत होती आणि ते पाहून मी माझी नजर पूर्ण पणे तिच्या काढे वळवली आणि मागून हळूच आवाज आला "पुढे रस्ता आहे बाजूला नव्हे". ह्या वाक्याने मी भानावर आलो आणि पुढे बघून चालू लागलो रस्ता मोकळा होता एकात गाडी जात होती आणि मी आरशात मधून मागे बघीतल तर हे दोघे हसत होते हळू हळू मी ही काही न बोलता गाडी पळवली.
आत्ता आम्ही शिमल्यातील आमच्या होटेल जवळ आलो होतो गाडी पार्क केली आणि बघीतल तर स्वरा गाढ झोपेत होती तिला उठवण मला बरोबर वाटल नाही मी केतनकडे आणि मानसीकडे बघीतल तर ते thumb's up देत होते. मला त्याच्या ईशार्याचा अर्थ समजला पण समान कोण घेणार तर केतन ने राहूदे म्हणुन खूनावल. सकाळी एवढ्या पहाटे लोक पण नव्हते शेवटी मी तिला उचलून घेऊन जाण्याचं ठरवल आणि मी अलगद तिला उचल तशी ती थोडी जागी झाली आणि थोडे डोळे उघडले आणि पुटपुटली "झोपुदेना रे". मी केतनकडे पाहिलं तर तो जा बोलत होता गप्प मी ही तसाच तिला घेऊन लेफ्टकडे आलो तर हॉटेल चे २ ३ वेटर बघत होते त्यातला एक धावत आला आणि लिफ्टच बटन दाबून निघून गेला आणि मी लिफ्ट मध्ये शिरलो केतन ने पुढे जाऊन आधीच दरवाजा उघडला होता रूमचा तसा मी तिला घेऊन रूम मध्ये शिरलो आणि अलगद तिला बेड वरती झोपवलं तशी ती परत थोडी जागी होऊन बोलली "यार प्लिज ना" केतन तसा मला हळूच पाठीवर हात देऊन बोलला चल जरा बाहेर म्हणुन तिला पांघरून टाकून मी बाहेर आलो तर 2 वेटर केतन आणि मानसी हसत होते आणि मी केतन ल बोललो "हसतो काय बे झोपलेली ती म्हणूनच तिला तसं आणल ना". "ठीक आहे सर चिडू नका आम्ही समजतो" अस एक वेटर बोलला आणि मी त्याच्या वर रागाने एक कटाक्ष टाकला तसा तो मान खाली घालून उभा राहिला. "ए ए बस बस आत्ता बर आम्ही इथे ३ दिवस आहोत तर आत्ता आम्ही जरा आराम करतो तर एक सांगा ब्रेकफास्ट कधी पर्यंत असतो?" केतन त्या वेटर का विचारत होता. मी मानसीकडे पाहिलं तर ती अजून पण हसत होती. "हो ना बस ना आत्ता" मी थोड्या मोठ्या आवाजात मानसीला बोललो तशी तीच हसू अवरत हो बोलली आणि परत हसू लागली तसं मी तिला वैतागून बाजूच्या रूममध्ये जायला निघालो की मागून केतन बोलला "अबे तिथे कुठे इथेच जा ती माझी आणि मानसी ची रूम आहे चल तिथे" तसा मी केतन का बोलायला जाणार की मानसी बोलली "हो यार राहू देना आम्हाला जवळ जवळ अस करणार तू आत्ता". "ए चल ए मी नाही हा अस काही करणार मी आणि केतन तू आणि स्वरा". "का तुला भीती वाटते का *डफाट्या" केतन बोलला तसा मी परत रूम मध्ये आलो आणि दार लावून घेतलं तसा मला बाहेर केतन आणि मानसी चा टाळी देत हसण्याचा आवाज आला. नंतर बघून घेणं ह्याना असा विचार करत मी आत आलो तर स्वरा बेडवर झोपलेली. तिचे ते मोकळे केस आणि शांत झोप पाहून मी तिला तिथेच पाहत उभा राहिलो जवळ जवळ १०-१५ मिनिट मी तिला तसाच उभा राहून पाहत होतो की ती हलली आणि दुसऱ्या अंगावर झोपली. मी ही तसाच सोफ्यावर झोपून गेलो आणि परत एकदा तिच्याकडे पाहिलं तर तिच्या पायात मला चप्पल दिसली उठून ती काढली आणि परत सोफ्यावर येऊन झोपलो पण सोफा छोटा होता उठून सोफा परत एक्स्टेंड केला आणि घड्याळ बघतल तर ६.३० वाजून गेले होते सकाळचे पण आत्ता झोपने डोळे जड झाले होते आणि मी झोपून गेलो.
जाग आली ती दरवाजा वरच्या आवाजाने पण मी झोपेत असल्यामुळे मला भास होत आहे अस वाटल आणि येणारा आवाज सुद्धा बंद झाला. लगेच मला कोणी तरी उठवत आहे असं जाणवलं झोपेने डोळे उघडतं सुद्धा नव्हते पण कानानवर कोमल आणि प्रेमळ आवाज येत होता "अरे उठतोस का फिरण्यासाठी आलो आहे आपण झोपण्यासाठी नाही ओय उठ रे किती झोपशील?" कसे बसे डोळे उघडले तर समोर बघून मी स्वप्नातच आहे अस वाटल स्वराली उठवत होती तिचे ते मोकळे नुकतेच धुतलेले अर्धवट सुकलेले केस माझ्या चेहेऱ्यावर येत होते प्रेमाने अगदी लहान बाळाला उठवाव तसं स्वराली मला उठवत होती. तिच्या अश्या प्रेमळ उठवण्याने मी ताडकन उठून मागे सरकलो आणि बोललो "काय ग काय झालं?". "तशी ती मागे सरकुन बोलली "काय रे काय झालं एवढा चटकन का उठला घाबरला का मला बघून? आणि उठ आत्ता वाजले बाग किती ११.३० होत आहेत आवर लवकर केतन आले का बोलवायला तूच रेडी नाहीस आवर चल". "तसा मी गुपचूप उठून आवरायला सुरुवात केली मला सर्व अवरे पर्यंत १२.३० झाले होते.
"ऐक ना मी काय म्हणते तू ते तुझ ब्लॅक कलरच जॅकेट घालना" स्वराली बोलत होती. "ठीक आहे" बोलून मी जॅकेट हातात घेऊन दरवाजा जवळ बूट घालत स्वरालीला बोललो "तुझ झालं की बाजूला ये केतनकडे आहे मी" तसा दरवाजा लाऊन मी मानसीच्या रूम मध्ये गेलो आणि केतनला बोललो "केत्या मी संध्यााळपासून इथे येणार आहे बाकी मला काही माहित नाही". "अहा कंट्रोल नाही होत का?" कुत्सित हास्य देत केतन बोलला "हे बघ अस काही नाही तुला सांगतोय ते ऐक मी इथे येतो मानसी तू बाजूच्या रूम मध्ये शिफ्ट होत बाकी मला काही माहित नाही". "अरे काय *डू माणूस आहेस बे इथे आम्ही तुझी सेटिंग लावतोय आणि तू आहेस की लांब पळतोय काय बे". " हे बघ ते काही नाही मी इथे येतोय". "का रे काय झालं माझ काही चुकल का? हवतर मी सोफ्यावर झोपेन तू बेड वरती झोप" अस बोलत स्वराली आत आली आणि मी तिचा आवाज ऐकताच गप्प झालो.
"अरे बोलना बोलत होतास ना काही तरी गप्प का झालास?" स्वराली मला बोलत होती मात्र मी साप दिसल्या सारखा गप्प उभा होतो. "अग काही नाही ग त्याला अस राहणं बरोबर वाटत नव्हतं म्हणजे कस बॉईज बॉईज आणि गर्ल्स गर्ल्स कस फ्रीली राहतात ना तस आत्ता तू आणि तो आहे ना एकत्र तर तो जरा लाजतो आहे तुला". केतन ने माझा बचाव करत बोलला. "काय काय रे तुला अस्वस्थ वाटत का कंफर्टेबल नाही वाटत का माझ्या सोबत तस असेल तर सांग बाबा आत्ताच काय ते नंतर रूम बदल आणि बाकी ची डोकेदुखी नको". मला स्वराली परत विचारत होती. "नाही अस काही नाही पण अस राहणं जरा विचित्र वाटत म्हणून बस अजून काही नाही". "ए चल हा सिगरेट ला चालत तुला दारू प्यायला चालत तुला आणि राहायला नाही जमत काही तरीच तुझ". "अग ते वेगळं हे वेगळं आहे". "काही तरीच तुझ काय करायचं बोल हे लैला मजनू वेगळे होतील ते पण शिमल्यात मला नाही वाटत तर मग मी घेऊ का दुसरा रूम? बोल पटपट". "नाही नको राहू दे चालेल अस कशाला परत हे ते करत बसायचं आणि पैसे पण वाया". "नक्की ना बघ परत मी रूम बदलाबदली करणार नाही आत्ताच सांगते नंतर बोलू नको अस नी तस काही"." हो नाही काही बोलणार असू दे". सर्व बोलणं आपलं मी इथे तिथे बघत खाली मान घालून बोललो आणि हळूच केतन काढे बघीतल तर तो भोवया वरती करून खुशी दाखवत होता आणि मी परत मान खाली घालून रूम मध्ये जाऊ लागलो की स्वरा मागून आवाज देत बोलली "अरे माझी पर्स आन ना तेवढी आणि मोबाईल" मी आपला काही न बोलता तसाच पुढे गेलो आणि खोलीत येऊन गाडीची चावी तिची पर्स आणि मोबाईल घेऊन बाहेर आलो.
हातात समान असल्यामुळे मला लॉक करता येते नव्हत तेच मागून स्वराली ने पाहिलं आणि हातातून चावी घेत बोलली "बघू दे मी लावते" अस बोलत तिने लॉक लावल आणि माझा हात धरून बाजूला घेऊन जाऊ लागली "इथे ये जरा तू बाजूला ते दोघे येण्या अगोदर". "का पण झालं काय आत्ता". "काय रे तुला नाही जमत का माझ्यामुळे". "कसल पण नाही जमत? काय नाही जमात मला?"."हेच रूम शेअरिंग"."नाही अस काही नाही ग स्वरा पण मी कधी असा राहिलो नाही म्हणून बाकी काही प्रोब्लेम नाहीए"."नक्की ना रे आणि नाही राहिला तर आत्ता रहा माझ्या सोबत म्हणजे बायको आली की तेव्हा असा वागणार नाहीस"."हो ना आत्ता चल हसू नको माझ्यावरती". अस बोलून मी विषय टाळला आणि चालू लागलो तसे केतन मानसी बाहेर आले आणि केतन ने खांद्यावर हात टाकत माझ्या जवळ हळूच पुटपुटला "आत्ता पासूनच पर्स घेऊन फिरायला लागला तू तर". "ए अस काही नाही विसरलो मी द्यायला". "दिसतंय मला उम्ममम". "गप *डू". अस बोलून मी बाजूला झालो आणि स्वराली ची पर्स परत दिली आत्ता लिफ्ट मधून आम्ही खाली आलो तर सकाळचे वेटर आणि रिसे्शनचे लोग हसत होते ते स्वराने पाहिलं आणि आम्हाला बाजूला घेऊन विचारू लागली "हे सगळे असे का हसत आहेत रे?"."विचार ह्याला ह्याने सकाळी काय केलं ते" मानसी ने माझ्याकडे पाहून बोलली. "काय रे काय केलं सकाळी?". "काही नाही हे मूर्ख आहेत तू लक्ष्य नको देऊ" ." नाही सांग मला का हसत आहे?". "अग ह्यानेच तर तुला गाडीतून उचलून तुला रूम पर्यंत आणि बेडवर्ती झोपवलं". केतन हसत हसत बोलत होता आणि मी मान खाली घालून पुन्हा गप्प उभा होतो आणि विचार करत होतो आत्ता ही काय बोलेल त्याचा "शीट तरीच मी म्हटल की मी बेड वर कशी उठले तू". "सॉरी माझ अस काही इंटेंस्शन नव्हत फक्त मला तुझी झोप मोडायची नव्हती" मी एवढं बोलतच ती काही न बोलता पुढे चालू लागली आणि मी केतन आणि मानसी तिच्या मागे केतन आणि मानसी मला चिडवत हसत होते पण तिला ऐकू जाणार नाही अस.......


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED