मी ती आणि शिमला - 6 Ajay Shelke द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी ती आणि शिमला - 6

"बर तुमचा काय प्लॅन आहे पुढे?" केतन मला विचारत होता. "आमचा काही नाही असं का विचारतोय?" मी त्याला उलट प्रश्न विचारताच मला स्वरा पासून थोड लांब नेतं केतन बोलू लागला. "अरे मानसी आणि माझ आधी पासून ठरलेले की शिमल्यातला पहिला दिवस फक्त ती आणि मी सोबत घालवणार म्हणून". "मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?". "अरे तू आणि स्वरा दोघे फिरा आणि मी आणि माऊ फिरू फक्त आजचा डे प्लिज". "वा वा वा ! इथे आलो ग्रुप बरोबर फिरायला, एन्जॉय करायला आणि तू तर सपरेट ग्रुप बनवला काय बेहेन**" ह्याच्या ह्या बोलण्यामुळे माझा आवाज वाढला आणि रागात मी मोठयाने बोललो तोच मागून आवाज आला "असू दे रे जाऊ दे ह्यांना" स्वराली बोलली आणि माझा राग कधी विरघळला माहीत नाही. "चल गाडी काढ" स्वरा हे बोलतच केतन बोलला "ए गाडी मी नेतो आहे तुम्ही रेंट वर घ्या ना" आणि हे ऐकताच आत्ता स्वराली अशी भडकली जशी ती हॉस्पिटल मध्ये रुग्णाला आण्यासाठी उशीर केल्यावर त्या रुग्णाच्या नातेवाइकांवर भडकते तशी "ए बहेन** म्हणजे आम्ही काय ठेका घेतला आहे का सेपरेट तुम्हाला फिरायच आहे आम्हाला नाही सो गाडी तुम्ही घ्या रेंट वर" तिचे हे रागातले बोल ऐकून केतन आधी एक पाऊल मागे गेला आणि दब्या आवाजात बोलू लागला. "अग स्वरा मला काही प्रोब्लेम नाही पण प्रायव्हसी नाही मिळणार आम्हाला म्हणुन ग". "काही नाही चल आम्हाला पण हवी आहे प्रायव्हसी सो गाडी आमची तुम्ही बघून घ्या काय ते ओय तू काय उभा आहेस चल गाडी काढ तू बघते मी कोण गाडी घेऊन जातो ते ग्रुप ने यायचं असेल तर चला नाही तर मग भो****त जा तू चल ए" तसा मी गाडी कडे चालू लागलो आणि केतन मानसी उलटे फिरले पण तरी सुद्धा स्वरा काही न बोलता गाडीच्या दिशेने चालू लागली आणि मी तिच्या मागे मला हवे तर सर्व सोबत हवे होते नाही तर कोणीच नको पण ह्या परिस्थिती मुळे मी थोडा टेंस झालो आणि थोड मन भरून आल की एवढ्या लांब मित्रांनसोबत फिरण्यासाठी आलो आणि गाडी सारख्या गोष्टी वरून भांडण झाली ते पण माझ्या जिगरी दोस्तांनमध्ये आणि अस मन भरून अल की माझी जीभ जड होते आणि मी थोडा थांबत बोलू लागतो अर्थात अकलतो.
गाडी जवळ जाताच स्वरा बोलली "सॉरी यार रू मी थोड जास्तच बोलले पण माझ काही चुकल का सांग बरं तू आपण इथे आलोय का आणि ह्याचं काही वेगळंच". मी फक्त नकारार्थी मान हलवून गाडीत बसलो आणि ती सुध्दा. तशी मी गढी बाहेर काढली आणि थेट घेतली ती थेट स्कँडल पॉइंटकडे जाताना ना ती काही बोलत होती नाही मी ती माझ्या बाजूच्या सीट वर न बसता मागे बसलेली आणि समोरच्या आरस्यातून माझ्याकडे पाहत होती तर कधी बाहेर. दीड तास नंतर आम्ही पॉइंट वरती पोहोचलो आणि की बाहेर येऊन सिगरेट काढली आणि सुरू झालो ती ही बाहेर आली आणि फोटो वगैरे घेऊ लागली. थंडी बरीच पडली होती दुपारचे तीन वाजले होते पण थंडी होती. समोर सूर्यास्त बघण्यासाठी थोडे फार लोग होते आणि लहान मुले सुद्धा. "अरे लहान मुल आहेत बंद कर". तसा मी बाजूला गेलो आणि काम संपाऊन आलो आणि एका कोपऱ्यात जिथे लोकांचा कमी वावर आहे तिथे जाऊन उभा राहिलो. समोरच्या त्या बनवलेल्या लोखंडी रेलिंग वर हात पसरून समोरच्या नजाऱ्याला डोळ्यात कैद करू लागलो पण मन अजून मैत्रीत झालेल्या, आयुष्यात घडलेल्या गोष्टीच्या वावटळात येऊ लागल आणि डाव्या हातावर एक उष्ण, कोमल आणि मायेचा हात आला आणि सोबत ओळखीचा आवाज "विचार नको करुस होईल सर्व काही नीट एवढी वर्ष काढली तू एकट्याने पण आत्ता नाही आम्ही आहोत अजून. सेटल झालो आहोत आपण रिलॅक्स हो. मन शांत कर आणि एन्जॉय कर जरा माणसानंमध्ये मिसळत जा, बोलत, चालत जा, एकट राहण सोड आत्ता". हे सर्व ऐकून माझा माझ्या डोळ्यावरचा ताबा सुटला आणि हळू हळू त्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले आणि एक एक करून टपकू लागले. "अरे वेड्या लहान आहेस का तू ? इथे बघ माझ्याकडे इथे बघ चल आत्ता पुरे बसू चल इथे मागे ये कोणी नाही इथे" तशी ती माझा हात धरून मला मागे बेंच वर बसवल आणि स्वरा बाजूला बसली. "सांग काय झालं बघू मला नाही सांगणार का तू रूद्र अरे तुझ नाव अस रुद्र आणि असा रडतोय तू रुद्राक्ष बघ कसं कडक असत तस असायला हवं तू बोल ना तू बोलत का नाहीस माहित आहे मला तु गहिवरला की अडकतोस ते चालेल मला बोल तरी अडकत अडकत". माझे डोळे पुसत ती बोलत होती आणि मी आपला शून्यात गेलेलो तोंडातून शब्द बाहेर येत नव्हता की काय बोलावं सुचत नव्हत. तरी थोड सावरत बोललो "स स स सॉरी ते जरा थो थोड मन भरून आ आ आ आल". "ठीक आहे रे बोल माझ्या सोबत मी आहे ऐकायला खूप आहे आत बोलायला तुझ्यात पण कोणाला कधी तू ब्र सुध्दा बोलला नाहीस. ऐकतेय मी बोल तू". "नाही अ अ असं काही नाही"."बोलतोस का आत्ता तू लपाऊ नको चल तुला काय वाटतं आहे मूर्ख आहे का मी ? की मला समजत नाही डॉक्टर आहे मी समजलास आणि तू सुद्धा आणि त्या आधी आपण मित्र आहोत समजलास बोल चल गप्प". स्वरा प्रेमाने पण जरा थोड रागात येत होती तिला समजावता येत नाही हे मला माहीत होत पण जर तीच जास्त वेळ कोणी ऐकल नाही की मग ती रागात येते पण मला राग आवरून समजावत होती. माझ्या मनाला मोकळ करायला बघत होती. "अरे बोलतोस का आज की इथेच थांबायच महिनाभर".ती बोलली आणि माझी तंद्री भंग झाली."सो सोड तू का काही नाही". "काही नाही कसं किती अडकतो आहेस त्यावरून समजत मला बर थांब मी तुला लाईट देते म्हणजे शांत होशील". अस बोलून तिने सिगरेट चा बॉक्स काढला आणि त्यातून एक सिगरेट बाहेर काढून पेटून मला दिली आणि माझ्याकडे पाहू लागली.
"असं अस बघू नको म म मला कसं तरी हो हो होत कोणी मला पा पा पाहत असेल तर". "नाही मी असच बघणार तुला काय आहे तू गप्प फुकायच काम कर आणि पहिला शांत हो". टेंस झाल्यामुळे मी पटापट सिगरेट पिली आणि थोडा शांत झालो. "झालं मन शांत बोल आत्ता काय झालं तुला एवढं मन दाटून, भरून आलं तुझ आई बाबा आठवले का ? की काही अजून दुसर ?". "ना नाही अस काही बसं थोड जु जु जुन्या आठवणी जाग्या झाल्या ब ब बस अजून काही नाही". "अरे वेडपट झालं गेलं विसरून जा माहीत आहे मला नाही जमत पण ठीक आहे रे माहीत आहे मला तु बरच काही कमी वयात सहन केलं काका काकी लहानपणीच तुला सोडून गेले तुझी काकी अशी छत्रपती त्यात वरचढ काका ना कोणी बोलायला ना एकटेपणा कमी करायला जे होतो ते आम्ही तिघेच त्यात आत्ता आम्ही भांडलो त्यात महेश नाही आणि हे दोघे असे वागले बर मी सॉरी बोलते तुला बस आत्ता मन शांत करे मला तू असा नाही बघवत". "हो आत्ता आहे शांत चल निघू खूप वेळ झाला इथे नेटवर्क पण नाही तस". अस बोलून मी टाळण्याचा प्रयत्न केला. "अरे बस ना काय घाई आहे बसू चल इथेच आपण अजून बर वाटत तुझ्या सोबत शांत बसायला काही न बोलता कोणी आपल असल्याचा दिलासा भेटतो तसा तू आधी पासूनच शांत आहेस पण कधी तू आजूबाजूला असल्यावर एकटेपणाचा भास नाही होत बर वाटत". ती अस बोलतच मनाला अजून थोड बर वाटल आणि मला स्वतःलाच कोणी आपल असल्याचा भास झाला की आनंद झाला मलाच समजल नाही.
"थँक्यू". मी तिला फक्त एवढं बोलतच ती बोलली "चल गप्पं बस आत्ता आणि सनसेट एन्जॉय कर आणि गूड वाय्ईब्ज आण जरा". जवळ जवळ वीस मिनिटे सनसेट पाहत आम्ही बसलो आणि मी कोणत्या विचारात होतो तेच स्वराचा आवाज कानी आला आणि मी भानावर आलो "लग्न कधी करतोय तू तस ?". तिच्या ह्या प्रश्नाने मी थोडा चापापलो "अजून अस काही ठरवलं नाही". "बर मग कोणी पसंत आहे? की अरेंज मॅरेजच करतोय". ती ने लगेच माझ्या उत्तराला फाटे फोडले पण हाच मोका आहे अस मला सुचलं पण बोलू की नको ते समजत नव्हत पण शेवटी हिम्मत केली बोलायची आणि मी बोललो. "आहे तशी एक न नजरेत पण कधी बोलणं नाही झालं मा माझ बघू पण". "अरे कोण आहे ती सांग तरी मला कधी समजू नाही दिलास तू सुध्दा बराच चुपरुस्तम आहेस तू पण त्या केतन मानसीला बोलून काय तू पण तेच केलंस". ती थोडी खुश होत बोलली. "अरे बोललो ना मी कधी तिच्याशी बोललोच नाही मी अस काही हिम्मत नाही होत माझी". हे बोलताना माझी नजर आणि मान खाली झाली आणि तिला ते समजल आणि ती सुद्धा थोडी खाली बघत बोलली. "त्यात हिम्मतच काय बोलून टाक ना तुला काय माहित तिचं काय उत्तर असेल ते बहुदा तिला सुद्धा तू आवडत अशील घाबरु नको बोल ऐकतेय मी". तिचं ते शेवट च ऐकतेय मी ऐकून मी स्वतः स्तंभ झालो आणि......



क्रमशः