कादंबरी -प्रेमाची जादू - भाग -१२ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी -प्रेमाची जादू - भाग -१२ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग -१२ वा

-----------------------------------------------------------------------------

मधुरा अंजलीवहिनींना म्हणाली -

वहिनी -मला एक मोठी प्लेट द्याना प्लीज , आत येण्या अगोदर माळीकाकांशी बोलताना

मी त्यांच्याकडून ही अबोलीची फुले आणलीत पहा ,

आता या फुलांचे छानसे गजरे करते ..

संध्याकाळी माळूया केसावरती आपण सगळ्याजणी,

आजींना ,आईना आवडेल आणि वाहिनी खूप छान दिसेल तुमच्या

केसावरती गजरा .

मधुराने समोर बसलेल्या मोनिकाकडे पाहत विचारले ..

मोनिका मैडम- तुमच्यासाठी करू ना गजरा ?

त्यावर झुरळ झटकून टाकावे ..तसे मधुराचे शब्द झटकून टाकल्यासारखे करीत मोनिका म्हणाली ..

छे छे ..हे असले काही आवडत नाही आणि चालत पण नाही मला ..

यु नो मधुरा ..ऑफिस मध्ये बॉसच्या चेअरमध्ये बसणाऱ्या माझ्या सारख्या इम्प्रेस्सिव- चार्मिंग लेडीला

अशा गजर्याची गरज नसते कधी , आमचे दिसणेच प्रभाव टाकण्यासाठी पुरेसे असते .

जाऊ दे ..तुला त्याचे महत्व कळणार पण नाही.

मधुरा म्हणाली –ओके मोनिका -

राहिलं ,नको तर नको ..तुम्हाला सोडून .मी गजरा लावने बरे नाही ,म्हणून मला वाटले ,.

दोघींचे बोलणे ऐकून ..आजी म्हणाल्या ..

अंजली – तुझ्या गेस्ट ..मोनिका –एक मुलगी म्हणून आल्यात की , ऑफिसमधल्या बॉस मोनिका

मैदाम आलेल्या आहेत ?

मी जरा कन्फुज आहे .

आज्जींनी मारलेला सिक्सर ..मोनिकाला बरोब्बर लागला ..ते लगेच नॉर्मल आवाजात म्हणाली ..

सोरी यशच्या आज्जी ..

अहो ..मला इतकी सवय झालेली आहे ना ..या गोष्टींची ..की .बाहेरच्या वातवरणात साध्या

माणसांशी जुळवून घेणे , जमतच नाही मला .

मोनिकाचे बोलणे ऐकून ..यशचे आजोबा म्हणाले ..

बरोबर आहे मोनिका तुझे..तुझी अडचण समजू शकतो मी ,

तुझ्यासाठी हे वातवरण ,इथली माणसे

नेहमीपेक्षा जरा अशीच आहेत” असे तुला फील होणे ..अगदी करेक्ट आहे ..!

मोनिकाला ..आजोबांचे शब्द ऐकून आनंदच झाला ..ते तिच्या बाजूने बोलतील .हे तिला अनपेक्षित होते.

त्यामुळे ..ती म्हणाली –

ग्रेट ,आजोबा तुम्ही एकटेच आहात ,

ज्यांना माझ्या पोजिशन बद्दल ,माझ्या फीलीन्ग्स बद्दल अचूक

समजले आहे..रियली ..थांक्यू सो मच.

तुमच्या या बोलण्यामुळे ..आता यशच्या आज्जी ,यशच्या आईच्या मनात

माझी छान इमेज अजून छान होण्यास मदत होईल.

अंजलीवहिनींच्या मनात तर माझ्यासाठी खास जागा आहे हे मला माहिती आहे ..कारण आम्ही

एकाच फील्ड मधल्या आहोत ..आणि त्यांनीच तर आज मला इथे सन्मानाने बोलावले आहे.

आजोबा म्हणाले –

मोनिका ..तू माझे बोलणे पूर्ण झाल्यवर मग बोल ,

तू पार्ट- वन ऐकून खुश झाली आहेस ,

माझ्या बोलण्याचा दुसरा भाग असा आहे की—

सध्या सोप्या आणि सरळ भाषेत ..सांगायचे झाले तर ..

तुझे जग आणि आमचे जग खूपच वेगळे आहे ..

छोट्या जगातली – छोटी माणसं आहोत आम्ही ..

तू इतक्या मोठ्या जगातली असतांना ..या छोट्याश्या जगात येण्यास का उत्सुक आहे ?

मला याचे कोडे पडले आहे .

मोनिकासहित . ..चुपचाप बसून राहिले ..

बोलावे तरी ..पंचाईत ..ना बोलावे तरी पंचाईत ...

आज्जींनी घड्याळाकडे पहात ..अंजली वहिनींना जेवणाचे बघण्यास सांगितले ..

तेव्हा ..त्या लगेच किचनमध्ये जाण्यासाठी निघाल्या ..

मोनिका ..स्वतःच्या नादात खुर्चीत बसून पहात होती ..

उभ्या असलेल्या वहिनींच्या जवळ जात मधुरा त्यांना म्हणाली ..

मी तुमच्या मदतीला आले तर चालेल न वाहिनी ?

यावर वाहिनी आजोबांच्या कडे पाहत म्हणाल्या ..

काय हो आजोबा ..तुमच्या पाहुनीला काम करायला लावले तर चालेल ना ?

आजी म्हणाल्या ..अंजली ..अग तुला मदत केली तरच .या मधुराला बरे वाटेल ,

इथे आमच्या सोबत बोलण्यात तिचे अजिबात लक्ष लागणार नाहीये , माहिती आहे आम्हाला .

सगळ्यांच्या सोबत बसून असलेला ..यश काही न बोलता ..एका श्रोत्याच्या आणि प्रेक्षकाच्या रोल मध्ये

समोर घडणारे सीन पाहत होता .

मोनिका आणि मधुरा ,

दोन तरुणी ....पण..यातल्या एकीने ही यश बद्दल काही इंटरेस्ट आहे “असे दाखवले नव्हते .

मग,आपण तरी यांच्या उगीच पुढे पुढे काय करायचे .

*********

२.

किचन मधून खमंग वास येऊ लागले , मसाला भाज्या , गरमा गरम पुऱ्या, आणि काय काय असणार आहे कुणास ठाऊक ?

किचनमधल्या काकू ..म्हणाल्या ..

अंजलीवाहिनी ..तुमच्या गेस्ट तर बाहेरच बसून आहेत , मोठ्या माणसात काय बसायचे असे ?

तुमची फ्रेंड आहे म्हणजे ..तुमच्या बरोबर असायला हवे ..पण..हे काही त्यांना सुचत नाहीये असेच दिसते .

त्यावर वाहिनी हसत म्हणाल्या –

अहो काकू ..ती बाहेरच बसलेली बरी ..असे वाटते आहे मला ..मोनिकाची खूप वेगळी केस आहे आहे

त्या उलट ही मुलगी –मधुरा ,

मी निघाले की, आली माझ्या मागे मागे ..आणि बरोबरीने हात लावते आहे सगळ्या कामाला .

काकू म्हणाल्या –

खरे आहे वाहिनी ..बघा ना ..किती सहजतेने वावरते आहे किचन मध्ये ही मुलगी ,

घरी नेहमी करीत असणार , सवयीचा हात लगेच ओळखू येतो आम्हाला .

अंजलीवहिनीनी न रहावून विचारले –

काय ग मधुरा ..तू इतकी एक्स्पर्ट कशी ..किचन –ड्युटी मध्ये , ?

अजिबात टेन्शन नाहीये तुझ्या चेहेर्यावार .

मधुर सांगू लागली ..

वाहिनी .आमच्या घरात परिस्थिती अशी आहे की .

सततच्या आजाराने , होणार्या त्रासाने ..आईला निजून राहावे लागायचे ..तरी ती खूप करायची ,

मग आम्ही दोघी बहिणी ..ताई आणि मी ..शाळेत जाण्या अगोदर सर्व कामे करूनच जायचो .

आता बरे दिवस आलेत आईच्या नशिबात ..

ताईचे लग्न झाले , मी पण इकडे आले ..आता तिकडे आई-आणि बाबा दोघेच , दोघे मिळून करतात .

काकू म्हणाल्या ..बघा वाहिनी ..परिस्थिती किती शिकवते माणसाला

..ही मधुरा ..तशी तर लहानच आहे की

पण..किती समज आलीय तिला , मर्यादा आणि जाणीव ..दोन्ही गुण आहेत हो तिच्यात .

अंजली वाहिनी म्हणाल्या ..

काकू अगदी बरोबर बोलताय तुम्ही ..आज पहिल्यांदाच ही मधुरा ..आपल्याकडे आली ..तेव्हा पासून

तिचा हसरा आणि खेळकर स्वभाव दिसतो आहे सगळ्यांना .

काकू म्हणाल्या ..वाहिनी ..आपल्याला छान वाटतय खूप हे खरे ..

पण..त्या तुमच्या गेस्ट मोनिकाबाई , त्या तर पार रुसून फुगून बसल्या असतील .

मधुराचे येणे त्यांना नक्कीच आवडलेले नाहीये ..

अंजलीवाहिनी म्हणाल्या – काकू ..

एक सांगू का ..मोनिका सारखी मुलगी ..यशच्या मागे का लागली आहे ? याचेच मला खूप म्हणजे

खूप आश्चर्य वाटते आहे..

तिच्या मनातले काढून घेई पर्यंत ..तरी ..तिला सहन करणे मला भाग आहे.

मधुरा म्हणाली –

वाहिनी ..अहो, मागच्या वेळी यशच्या ऑफिस बाहेर या मैदाम बोलत असतांना ,

यशला पाहून मी थांबले तेव्हा

मी बोललेले सुद्धा मोनिकाला आवडले नव्हते . जमेल तितका अपमान केलाच त्यांनी माझा ..

पण, मी लक्ष दिले नाही ..

त्यात भरीस भर म्हणजे ..हे यश महाराज ..त्यांनी मला ओळखलेच नाही ,

मग मात्र मीच घाबरले ..

..मान ना मान ,मै तेरा मेहमान ..असे नको वाटायला .

आणि तिथून निघून गेले .

बरे आणखी एक गम्मत बघा ना कशी झालीय आज सुद्धा -

मला जर माहिती असते की.. मोनिका तुमची गेस्ट म्हणून ..आज इथे दिवसभर असणार आहे ,

तर , मी अजिबात आले नसते ..

पण.आजोबांनी ..फोन करून ..मला जेवायला नक्की ये ,आम्ही वाट पाहतो तुझी ,

असे बोलावल्यावर ..त्यांना नाही कसे म्हणणार ?

अंजली वाहिनी काकूकडे पहात म्हणाल्या –

मधुरा –तू का उगीच स्वतःला दोषी ठरवते आहेस ?

ही मोनिका तर कुणीच नाहीये !

..तू तर ..आजी-आजोबांच्या गावाची आहेस..त्यांच्या परिवारातील आहेस , तू परकी

आहेस , असे काही नको वाटू देऊस , एन्जोय कर ..!

काकू म्हणाल्या – अंजलीवाहिनी ..अगदी बरोबर बोललात तुम्ही ,

मधुरा – तुझ्या मनात काही येऊ देऊ नकोस .

आपण सगळे मिळून सुटीचा आनंद घेऊ या.

*********

३.

अंजलीवहिनी आणि मधुरा डायनिंग टेबलावर जेवणाची तयारी करू लागल्या ..

सेंटर –खुर्चीत बसलेली मोनिका ..निर्विकार नजरेने पाहत होती ,

यशचे आई आणि बाबा ...मधुराकडे पाहत होते , तिच्या सहज्तेचे त्यांना कौतुक

वाटत होते .

यशच्या हातात मोबाईल होता ..नजर स्क्रीन वर होती ..आणि डोक्यात मोनिकाचे विचार ..

मोनिका आज आपल्यासाठी आलेली नाहीये .

.तिला अंजली –वहिनींना भेटायचे ,आपल्या घरातील

माणसांच्या सोबत राहायचे ..यापलीकडे तिच्या मनात दुसरा हेतू आहे जाणवत नाहीये.

जाऊ द्या , आपणच विनाकारण काही तरी काल्पनिक विचार करतो आहोत तिच्याबद्दल.

आणि आपल्यासारख्या अगदी सामन्य व्यक्ती बद्दल ..तिला काही वाटते आहे ?

हे वाटणे म्हणजे ..दिवा स्वप्न पाहिल्या सारखे आहे.

आपण असा मूर्खपणाचा विचार करू नये ..हेच बरे ..!

टेबलवर सगळे मांडून झाल्यावर ..अंजलीवहिनीनी आवाज दिला ..

तसे ..

आजी-आजोबा , आई-बाबा , यश ,सुधीरभाऊ असे खुर्च्यावर बसले ..

किचन मधून गरमा गरम पुऱ्या आणून ठेवीत काकु म्हनाल्या ..

अंजलीवाहिनी ..तुम्ही, सुधीरभाऊ इथे बसा ..

मी आणि मधुरा ..दोघी मिळून वाढतो तुम्हाला ..

हे मी नाही..मधुराने ठरवले आहे..

आजोबा म्हणाले ..मग तसेच होऊ द्या ..

अंजली ..तू पण बस ..आज ,काही होत नाही .

मग,गप्पांच्या सोबत सगळ्यांची जेवणे झाली ..

यश म्हणाला – का हो काकू .तुमच्या हाताची चाव आज जरा जास्तच छान झालीय ,

आलेल्या पाहुणीला खुश केलेत तुम्ही . हो ना मोनिका ..

सकाळ पासून यश मोनिकाला उद्देशून बोललेलं हे पाहिलं वाक्य होतं ..

ती तिच्याच नादात होती ..यश काय म्हणाला ..नीट ऐकले पण नव्हते तिने ..

तरी ..म्हणाली ..

यस यस..मला खूप आवडले सगळे जेवण आणि पदार्थ .

अंजली वाहिनी म्हणाल्या ..

अरे यश ..तू अगदी अचूक ओळखलेस ..

काकूंच्या हाताची चव आज बदलली आहे ..

आजची जास्त छान चव आणणारी सुगरण ..मी आणि काकू दोघी पण नाहीत ..

आजची चीफ शेफ आहे..मिस ..मधुरा ....

वहिनींचे हे शब्द ऐकून ..मोनिकाचा मूड एकदम ऑफ झाला ..

आजचे जेवण हे आता पर्यंतचे सगळ्यात बेचव जेवण आहे “ असेच तिला वाटत होते ..

आलेल्या रागाला आवरण्याचा ती प्रयत्न करू लागली ..आणि काय करावे ?

म्हणजे ..आपल्याला बरे वाटेल ?

----------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग -१३ वा लवकरच येतो आहे ..

----------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------