कादंबरी - प्रेमाची जादू भाग - १३ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाची जादू भाग - १३ वा

कादंबरी -प्रेमाची जादू

भाग-१३ वा

--------------------------------------------------------------------

रात्रीचे जवळपास २ वाजत आलेले होते. यश अगदी टक्क जागा होता .. त्याच्या डोक्यात आणि मनात

एकाच वेळी इतका गोंधळ सुरु झालेला होता की ..आता पहाटेपर्यंत झोप येईल असे त्याला वाटत नव्हते .

कालचा रविवार मोनिका आल्यामुळे खूप छान होता असे म्हणावे की , आजोबांनी नेमके कालच त्या मधुराला बोलवून

गोंधळात भर घातली आणि सगळी मजा घालवून टाकली असे म्हणावे वाटते आहे.

आपल्या बाबतीत खरे सांगायचे झाले तर, इतर मुलांच्यासारखं आपल्याला पोरा –पोरींच्या उचापती मध्ये

पहिल्यापासून गोडी वाटत नाही , म्हणून इतर पोरं –पोरी थोडेच आपल्यासारखे असणार ,

ते तर त्यांच्या मनाप्रमाणे वागणार , मुलांना मुली आवडणे, त्यांचे आकर्षण वाटणे यात गैर काहीच नाही .

आणि किती वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात ..बाप रे ..हे प्रेम जुळणे , कुणाचे एकतर्फी प्रेम करणे ,

अनेकदा प्रेमभंग होऊन पुन्हा तेच तेच करणारे दिलजले आशिक ..असे आपले हिरो मित्र पाहतचआहोत ,

पण, या गोष्टीपासून दूर रहाणेच आपल्या मनाला बरे वाटत असते .

यशच्या मनातले विचार थांबण्याचे चक्र चालूच होते ..

आपल्या अशा वागण्यामुळे आपली टिंगल होते .यात मुलीं पुढे आहेत ,हे त्यला दिसायचे, कळायचे .

एक मात्र खरे की –इतरांच्या गोष्टी मनावर न घेण्याची कला साधली म्हणजे “

खूप गोष्टी पासून होणारा मन:स्ताप होणे “या पासून आपण वाचतो “ हाआपला अनुभव .

त्यामुळे ही मैत्री , प्रेम ,ते निभावणे ... वगरे ..भानगडी आपल्या समजण्याच्या पलीकडचे आहे हेच खरे.

या गोष्टी आपण सरळ कबुल करतो., नाही जमत बाबा आपल्याला ! यात काही कमीपणा नाही !

आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये मोनिका इतक्याच सुंदर पोरी आहेत , त्यातल्या कुणा बरोबर ही

आपली लव्ह स्टोरी सुरु करणे सहज जमणारे होते , त्याही पेक्षा या पोरी वाटच पहायच्या की,

हा यश कधी तरी थोडा फार रीस्पोंस देईल . या साठी सतत आपल्या मागे लागत होत्या ..

पण आपणच एक नियम आपल्या सर्कल मध्ये करून ठेवला होता ..

या दोस्त कंपनीतल्या कुणा मैत्रिणी बरोबर कधी जोडी जमवायचा प्रयत्न करायचा नाही आणि कुणाला करू पण द्यायचा नाही.

कारण..मित्रांच्या पाठबळावर आपण आपले सोशल कार्य करतो ..त्यांची सोबत आणि मदत आहे म्हणून ..

हा यश चोवीस तास मदतीसाठी धावून जाण्यास तयार असतो. ‘

अशा मैत्रीत ..हे प्रेमाचे खेळ “आणि प्रेमाचे चाळे “ आपण करू लागलो तर आपण करीत असलेल्या सेवा कार्याची कुणी किंमत करणार नाही.

लोकांच्या नजरेतून उतरलो तर ..ते खूप मोठे नुकसानकारक आहे आपल्यासाठी आणि आपल्या व्यवसायासाठी सुद्धा हे वाईट आहे.

आणि असे वागलो असतो तर “ पब्लिक ने आपली किंमत ठेवली नसती .

त्यामुळे आपल्या एकूणच कामात आपण पोरा - पोरींच्या प्रेम-प्रकाराला अजिबात स्कोप देत नाही

आपल्या अशा वागण्यामुळे आणि रुल्स मुळे किती तरी मैत्रिणी नाराज झाल्या , अजून ही मनातून शिव्या देतात ..दगडी मनाचा यश..!

अशा वातवरणात अचानकच ही मोनिका नावाची मुलगी ..एका वादळासारखी घोंगावत आलेली आहे .आपल्या आयुष्यात .

.अशी डायरेक्ट एन्ट्री या आधी कुणाही पोरीने केली नव्हती . आश्चर्य म्हणजे

मोनिकासारख्या हाय- प्रोफाईल मुलीला आपल्यात इंटरेस्ट का वाटला आहे ? हा प्रश्न एक कोडे आहे. अंजलीवहिनीना सुद्धा याचे आश्चर्य वाटते आहे.

आर्थिक परिस्थिती ,नौकरी ,आणि सोशल स्टेट्स या मध्ये ..मोनिका आपल्या पेक्षा खूपच वरच्या क्लास मधली आहे .

आपण आणि आपला परिवार फार फार तर ..उच्च मध्यमवर्गीय म्हणवला जाईल ,

सुधीरभाऊ आणि अंजली वाहिनी दोघे ही सोफ्टवेअर जोब मध्ये आहेत ...आपण इंजिनियर आहोत ...

एक स्थळ म्हणून .. नौकरी न करणारा इंजिनियर आजकालच्या मुलींना चालत नाही ,

त्यात आपण तर ग्यारेजवाला ..म्हणजे म्याक्यानिक “ या पेक्षा आपला जास्त भाव नाही .

मग भले ही आपल्या ग्यारेज मध्ये पाच-पंचीवीस लोक काम करीत असतील ..

पण याने स्टेट्स मध्ये काही फरक पडत नाही ,त्याचे काही इम्प्रेशन पडत नाही .

कारण आपल्याकडे अपेक्षांचे ठोकताळे ठरलेले आहे.

या फ्रेमच्या बाहेर जाऊन काही करणार्याला मग तो मुलगा आसो वा मुलगी

त्याला “लग्नाच्या मार्केट मध्ये “ अजिबात किमंत नाही “

अशी रियालिटी असतांना .. अंजलीवहिनीनी आपले नाव म्यारेज ब्युरोमध्ये नोंदवले ..आणि लगेच या

मोनिकाने तिचा इंटरेस्ट पाठवला ,

आपण तर अजून मोनिकाचे प्रोफाईल पाहिलेले नाही की ..तिचे फोटो ..मग इंटरेस्ट दाखवणे आणि तो पाठवणे हे दूरच .

त्या अगोदरच ही मोनिका ..स्वतहून भेटते काय , घरी येते काय ,दिवसभर सगळ्यांच्या सोबत राहते ..

सगळ अजब आणि चमत्कारिक वाटणारे आहे.

आज दिवसभर आपल्याला लाभलेला तिचा असा हा सहवास ,ते क्षण म्हणजे एक सुगंधी वावटळ “ येऊन गेली आहे असे वाटणारे आहे.

मोनिका ज्या कल्चरमध्ये राहते तिथल्या बिनधास्त असण्याच्या , बिनधास्त जगण्याच्या ..कल्पना

आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत ..म्हणून वाटते आहे की ..

तिच्यात आणि आपल्यात काहीच साम्य नाहीये .. तिचे आणि आपले रस्ते ..वेगळे म्हणजे अगदी वेगळे असे “दो –रास्ते “ आहेत .

तरी ही ..मोनिका आपल्यात इंटरेस्ट दाखवते आहे ? काय कारण असेल ?

एक मात्र खरे की ..

ती बुद्धिमान आणि चतुर –सुंदरी आहे, तिला आपल्यातील सामर्थ्याची पुरेपूर जाणीव आहे ,

म्हणूनच सौंदर्याच्या जाळ्यात या यशला सहज अडकवता येईल “ हा तिचा कॉन्फिडन्स

आपल्याला तर जाणवलाच ,पण काल घरातील सगळ्यांना ? तो ओव्हर कॉन्फिडन्स आवडण्यापेक्षा

खटकला असणार हे नक्की ..

-----२------------

आजी-आजोबा ,आई-बाबा ..काही न बोलता फक्त पहात आहेत हे दिसत होते .आणि सुधीरभाऊ तर

नेहमीच एक मूक प्रेक्षक असतो .

..मोनिका येईपर्यंत अंजलीवहिनींना तिच्याबद्दल विशेष असे काही वाटले नसणार ..

पण.. ती आपल्या घरात आली..आणि मग तिचे बोलणे ..वागणे ..दिसणे ..वावरणे

हे सर्व अंजली वहिनींना अनपेक्षित असावे ..

कदाचित मोनिकाला प्रत्यक्ष पाहून, बोलून आणि थोड्याफार सहवासा नंतर

आता मोनिका बद्दलचे त्यांचे मत नक्कीच बदलले असणार .

यशला कालची संध्याकाळ आणि चहाची वेळ जशीच्या तशी आठवली ...

बिनधास्त मोनिकाने – हॉलमध्ये समोर बसलेल्या लोकांना आपल्या बोलण्याने काय वाटेल ?

याचा अजिबात विचार न करता सगळ्यांच्या समोर किती धीटपणे म्हणाली ..

“ काय हे अंजली वाहिनी .सकाळपासून आलीय मी इथे ..पण

यशबरोबर मला एक शब्द बोलायला दिले नाही तुम्ही अजून ,

मला तर आल्यापासून असे वाटते आहे की मी, जनरल पब्लिक मध्ये , कॉमन हॉलमध्ये बसून आहे.

किती बोअरिंग आहे हे सगळं. आणि मग, सरळ आपल्यालाच म्हणाली ..

ए यश ,..इथे सगळ्यात बसून काय बोलायचे ?

चल ,तुझे घर दाखव ,आतून, बाहेरून ..

..तुझी रूम, तुझी बाग ..तुझ्याबद्दल बोलू या ,तू माझ्याबद्दल विचार ..असे काही तरी करू या ना .

मी तुझ्यात इंटरेस्ट दाखवून इथे आले आहे , हे खरे आहे ,

तू थोडा तरी इंटरेस्ट दाखवण ना , जरा तरी वेळ देशील की नाही मला ?

मीच आपली पुन्हा पुन्हा गरज असल्या सारखे दाखवते आहे की ..आय एम इंटरेस्टेड इन यु ...!

आणि तू मात्र कॉल्ड्ली बसून पाहतो आहेस ,

अंजली वहिनींची गेस्ट म्हणून आले ही चूकच केली मी ,

त्या ऐवजी ..तुझीगेस्ट म्हणून आले असते, तुला भेटायचे आहे म्हणून आले असते तर बरे झाले असते .

मोनिकाचे हे डेअरिंग पाहून ..क्षणभर आपल्याला काहीच सुधरले नाही ..

समोर बसलेल्या सगळ्यांच्या चेहेर्याकडे पाहण्याचे सुद्धा धैर्य नव्हते आपल्यात ...

अंजलीवहिनींच्या मौनाला ..संमती समजून मोनिका म्हणाली ..

वाहिनी ..येतो आम्ही घरतल्या घरात फिरून .बाहेर जाणे नाही तर नाही

घरातल्या घरात ही सही .!...चल रे यश...!

मोनिकाच्या विचारण्यावर अंजलीवाहिनी ..म्हणाल्या ..चालेल , लवकर या परत हॉल मध्ये ..!

यश आणि मोनिका वरच्या फ्लोअरवर जाणर्या जिन्याच्या पायऱ्या चढू लागले , त्यावेळी मोनिकाने

मधुरा कडे हसून पाहिले व हात हालवला ..जणू तिच्या नजरेने मधुराला सुनवले असावे ..

तुझ्या हात नाही लागायचा हा यश कधीच ..तो माझा आहे ..!

दुसर्या मजल्याच्या टेरेसवर दोघे उभे होते ..संध्याकाळची गार हवा ..स्वच्ह निरभ्र आकाश ..

मन प्रसन्न होते . मोनिका यशच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली .

स्पोर्ट्स पर्सनची बॉडी असलेल्या यशच्या भक्कम बाहूंचा आधार मोनिका घेत म्हणाली ..

किती क्युट आहेस रे यश तू, मी तर तुला पाहूनच प्रेमात पडले आहे.. त्यादिवशी तुला तुझ्या

ऑफिसमध्ये पाहिले , भेटले , तुझा स्पर्श झाला ..आणि माझे मन वेडे झाले , मी वेडी झाले .

मनापसून मला आवडलेला तू पहिला आहेस . रियली ..आय लव्ह यु ..!

आणि मिठीत येण्यास ती अधीर झाली आहे ..हे यशला जाणवले ..

क्षणभर त्याला ही मोह झाला ..सुंदर मोनिकाच्या मोहक देहाचा स्पर्श तिला घट्ट मिठीत घेऊन

अनुभववा .

यशच्या चेहेर्यावार आणि नजरेत त्याच्या मनातले विचार जाणवले ..तशी मोनिका मनातून खुश

झाली होती . त्याच्या मिठीत शिरून ..त्याला स्पर्श सुख घेऊ देणे “ तिच्यासाठी किरकोळ गोष्ट होती .

पण.तिने तसे केले नाही ..यशच्या अगदी जवळ जाऊन ..ती तितकीच दूर उभी राहिली ..हे पाहून

तो बोलला काहीच नाही ..पण.त्याचा चेहेरा उतरला आहे, किती छान चान्स आला होता ..पण,

गेला निसटून ...!

यशच्या मनात तिच्या स्पर्शाची झालेली इच्छा तसीच अर्धवट राहू द्यायची ..म्हणजे त्याला झुलवत

ठेवले तरच आपल्याला हवे तसे त्याला डोलावता येईल.

यशच्या जवळ जात .ती म्हणाली ..डियर , पहिल्याच भेटीत मला तुझ्याशी इतके फ्री वागतांना

पाहिले तर तुझी माणसे .माझ्यावर विनाकरण नाराज होतील ..आज नकोच ..पुढच्या भेटी मध्ये

नक्की ..!

यश एक प्रोमीस कर ..ती कोण मधुरा ..खाली आलेली , ती मला पुन्हा इथे दिसता कामा नये .

माझे डोकेच खराब करून टाकलाय या फालतू पोरी ने.

एक सांग रे यश ..त्या मधुरात तुला माझ्या सारखे अपील दिसले का ? ..

यश म्हणाला – मोनिका , या अशा गोष्टीत मला इंटरेस्ट नाहीये , तू काय आणि ती मोनिका

दोघी पूर्ण वेगळ्या आहात .

तू समोर असतांना ..मधुराच काय ..दुसरी कुणी आठवावे असे कुणी नाही .

मोनिकाला हवे तसे उत्तर यश कडून मिळाले .

दोघे खाली आले .. त्यांना पाहून अंजलीवाहिनाना सुटल्या सारखे वाटले .

आजोबांनी यशला म्हटले ..- सकाळी येतांना मधुरा पायी पायी चालत आली आहे ..

आता बराच उशीर झाला आहे.. जा, तिला तुझ्या बाईकवर सोडून ये .

मोनिकाला असल्या गोष्टींची सवय आहे .ती जाईल तिच्या तिच्या कार मध्ये .

थोड्या वेळापूर्वी छान मूड मध्ये असलेली मोनिका ..आजोबांचा आदेश ऐकून पार ऑफ होऊन गेली.

तिच्या कल्पनेच्या उलट घडत होते.

सगळ्यांना बाय करीत ती बाहेर पडली ..त्या वेळी यशने बाईक गेट बाहेर सुरु केली .आणि

आतून मधुरा आली ..यशच्या मागे बसतांना ..तिने दोघात अंतर ठेवले आहे , हे गोष्ट सगळ्यांनी

पाहिले .. मोनिकाला मात्र दिसत होते ..मधुरा तिच्या यशला मिठी मारून बिलगून बसली आहे ..

या मधुराचे काय करावे ? कबाब मे हड्डी..!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग .. १४ वा लवकरच येतो आहे .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------