पावसातली ती ... Journalist Kiran Doiphode द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पावसातली ती ...


रविवार चा दिवस होता... दुपारचे साधारण २-३ वाजले असतील पण सूर्याचा कुठेच ठाव-ठिकाणा नव्हता. आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी भरून आले होते .. मातीचा मस्त सुगंध येत होता .. सगळी धरती हिरवी-गार झाली होती, झाड मुक्त होऊन वाहणाऱ्या वाऱ्या बरोबर डोलत होती. घरात बसूनही कंटाळा आला होता, मी गाडी काढली आणि बाहेर चक्कर मारण्यासाठी निघालो ...कुठ जावा काही सुचत नव्हत मग मी नदी काठी जाण्याचा निर्णय घेतला .. नदी ही घरा पासून ५ ते ६ किलोमिटर अंतरावर होती .. वातावरण खूपचं भारी झालं होत . थंड गार हवा चालू होती त्यामुळं गाडी चालवायला मज्जा येत होती.. नदी जवळ येतात. .. पावसाची रिमझिम रिमझिम चालू झाली होती ... जवळच एक रस्त्याच्या कडे ला एक छोटस मंदिर होत ... गाडी उभा करून मंदिरा जवळ जाऊन थांबलो .. पाऊस थोडा जोराचा चालू झाला होता ... रस्त्यांनी कोणीच दिसत नव्हते .. मी मस्त पैकी पाऊस बघत बसलो होतो... तोच एक मुलगी फुल्ल स्पीड ने गाडी वर तिथे आली ...आणि मंदिराच्या दुसऱ्या बाजूने थांबली ... तिनी मला बघितलं नव्हत ...तिचं वय साधारणतः २२ ते २३ असावं .. दिसायला ही खूप सुंदर होती .. पाऊस जोराचा चालू झाला होता ... तिनी घाई गरबडी मध्ये गाडी पावसातच उभा केली आणि ... घाई मध्येच तिनी तिचे ते लांबलचक केस सोडले आणि ... पावसामध्ये पावसाचा आनंद घेत .पावसात एकदम दिलखुलास नाचू लागली ... त्या पावसात ती अगदी चिंब चिंब भिजली होती . पावसाच्या रिमझिम सरी अंगावर घेत होती ..पावसामुळे दरवळणारा मातीचा गंध, पावसाचे ते टपोरे थेंब, मधूनच वा-याची येणारी ती झुळुक, तिची ती मनसोक्त मज्जा घेत होती ....मी मात्र एकटक फक्त तिच्या कडे बघत होतो..तब्बल ती १५ ते २० मिनिट पावसात ती भिजत होती.. मी तिच्या कडे बघत असतानाच तिनी ही मला बघितलं होत ...मला बघताच ती लाजली आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिली..पाऊस मात्र जोरात चालूच होता .. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र आत्ता सगळा निघून गेला होता... ती एका बाजूने आणि मी दुसऱ्या बाजूने एकदम शांत बसलो होतो ... मला ही थोडंसं वाईट वाटल होत ..लपून लपून तिला बघायला नको होत ... पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता ... संध्याकाळचे ६ वाजायला आले होते ... आभाळ असल्या मूळ थोडासा अंधार ही पडला होता ... विजाचा कडकडाट मात्र आत्ता वाढला होता .. तीही थोडीशी घाबरली होती ... तिनी शेवटी पावसातच घरी जाण्याचा निर्णय घेतला होता . ती तिच्या गाडी जवळ गेली .. आणि गाडी चालू करू लागली पण पावसात भिजल्या मूळ गाडी चालू होत नव्हती .. तिच्या चेहऱ्यावर वर आत्ता टेन्शन दिसत होत .. मला राहवलं नाही मी तिची मदत करण्यासाठी गेलो.. मी गाडी चालू करतो म्हणून तिच्या कडून गाडी ची चाबी घेतली आणि गाडी मंदिरा जवळ घेऊन आलो .. पावसात भिजल्या मूळ गाडी चालूच होत नव्हती .. आम्ही दोघेही एकमेकां कडे बघून बोलत नव्हतो ..दोघं पण आम्ही लाजत होतो.. कुठ जायचं म्हणून तिला मी विचार तर माझ्या गावा जवळ एक वस्ती होती तिथली ती होती.. आत्ता मात्र अंधार पडत होता .. आणि गाडी ही चालू होत नव्हती.. काय करावं काय सुचत नव्हत .. शेवटी गावा पर्यंत माझ्या गाडी ला गाडी बांधून घेऊन जावा लागेल तिथं गॅरेज आहे तिथं दाखवू अस तिला बोललो.. पण गाडी बांधायची कशाने हा विचार आम्ही करत होतो .. तोच तिच्या गळ्यात ओढणी होती ... त्या ओढणी ने माझ्या गाडीला तिची गाडी बांधली आणि पावसातच भिजत कशी तरी गाडी गावा पर्यंत आणली ... गावा मध्ये गॅरेज ला गाडी दाखवली ... गाडी चालू होऊ पर्यंत मी तिथेच थांबलो ...आणि तिला हळूच सॉरी म्हणालो .. जर अगोदरच मी तुला दिसलो असतो तर तू त्या पावसाचा आनंद घेतला नसता ... तू दिलखुलास होऊन पावसाचे ते टपोरे थेंबाची मज्जा तू घेतली नसतीस...परत एकदा सॉरी तिनी फक्त मान हलवली ... तोच गाडी चालू झाली म्हणून गॅरेज वाल्याने आवाज दिला.. पाऊस ही आत्ता उघडला होता..तिनी मला थँक्यु .... म्हणून ती निघून गेली.. पण मी तिला तीच नाव विचारलं नाही ..ती निघून गेली .. कोण होती कुठून आली होती , काय माहिती... पण कुठ तरी माझ्या मनात ती जागा करून गेली होती... दुसऱ्या दिवशी परत त्याच वेळेत पाऊस सुरू झाला ..घरात बसूनच मी पाऊस बघत होतो... परत एकदा ती मला त्या पाऊसात दिसू लागली...आणि पाऊस बघता बघता मी परत एकदा तिच्या आठवणी मध्ये हरवून गेलो....