Father books and stories free download online pdf in Marathi

खरंच बाप महान असतो ना......

खरंच बाप महान असतो ना........

एक मध्यमवर्गीय आणि लहानसं कुटुंब....
या कुटुंबात फक्त वडील आणि मुलगा...
मुलाच्या लहानपणीच आईच छत्र हरवलेलं.....
पण वडील मात्र हारलेले नव्हते....
कारण वडीलास आपल्या मुलाला आधार द्यायचा होता.....त्यामुळे ते खचले नाहीत....परिस्थितीशी एकरूप होऊन या प्रसंगावर मात केली....इतकं प्रेम त्यांनी आपल्या मुलाला दिलं....की आपल्या मुलाला आईची आठवण मात्र कधी होऊ दिली नाही....वडीलांना त्यांंच्या पत्नीची आठवण आली की मात्र आपसुकपणे डोळ्यात अश्रू यायचे.....वडीलांनी त्या अश्रूंंना घराच्या एका कोपऱ्यात ठेवायचे.....
वडिलांनी मुलाला वडिलांचे प्रेम तर दिलेच पण सोबत आईचं प्रेमही दिलं.....
मुलाला लहानाचं मोठं केलं....तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले....
मुलाला त्याच्या इच्छेप्रमाणे शिक्षण दिलं.....
वडीलांनी ठरवलं की मुलाला Class One Officer बनवायचं....तसं मुलाला बनविले....
त्याच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा वडीलांनी पूर्ण केले.
आई आणि वडील या दोघांचे भूमिका साकार करणारे ते वडिल खरोखरच खूपच GREAT ना....
आई झुळझुळ वाहणारी नदी असते
तर बाप खोल शांत वाहणारा झरा आहे

शेवटी मुलाच्या पसंदीप्रमाणे मुलगी निवडली आणि लग्नही करून दिलं.......
काही काळानंतर मात्र एक विलक्षण चित्र त्या घरात पाहवयास मिळालं......
मुलगा नेहमीप्रमाणे ऑफिस मधून घरी आला
आणि वडीलांना म्हणाला...
बाबा हे रंगबिरंगी कपडे घालणं सोडून टाका.....
हे सहा मीटरचा पांंढरा कपडा घ्या....
अंगावरती परिधान करा....
आणि घरातून चालते व्हा......
हे ऐकताच कोणतेही बापाची पायाखालची जमीन सरकल्या शिवाय राहणार नाही.....
काय चुकलं होतं त्या बापाचं....?
त्याच बाबाने आपल्या मुलाला त्याची आई नसताना देखील आईचं प्रेम दिलं...हे चुकलं का?
मुलाचं भविष्य घडविण्यासाठी स्वतःला गहाण ठेवलं.....हे चुकलं का?
स्वत: फाटकी बनियान घातली पण मुलाच्या अंगावर कधी फाटका कपडा येऊ दिला नाही.......हे चुकलं का?
स्वतः खिळे मारलेली फाटकी चप्पल घातली पण मुलाच्या चपलीला कधी खिळा मारू दिला नाही...कधी त्या चपलीची चकाकी कमी होऊ दिली नाही......हे चुकलं का?

स्वत: उपाशी राहीला पण पोरावरती कधी उपास मारिची वेळ येऊ दिला नाही... हे चुकलं का?
असंख्य प्रश्न मनामध्ये तयार होऊ लागतात की त्या बापाचं खरंच काय चुकलं?????
जेंव्हा मुलगा आपल्या बापाला ६ मीटरचा कपडा देतो ना....तेंव्हाही तो बाप सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने स्मितहास्य करतो आणि म्हणतो.......
अरे...मी खुप पुण्याचं काम केलं होतं.....
म्हणून तुझ्यासारखा मुलगा मला जन्माला आला....
नाहीतर घरातून बापाला बाहेर काढताना कोणता मुलगा ६ मीटरचा कपडा देईल?
हीच माझी आयुष्यभराची आणि पुण्याईची कमाई आहे रे बाळा....
एक काम कर बाळा....यातला अर्धा कपडा तू स्वत:साठी ठेवून घे....कारण तुझा मुलगा तुला इतकं पण देईल की नाही माहिती नाही.....हे ऐकताचं बाप काय सांगतो हे मुलाला कळलं आणि मुलाच्या डोळ्यात अश्रूंंचा सागर दाटून आलेेला होता....मुलाने आपल्या बापाच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं आणि माफी मागितली.....बाबा माझं चुकलं....मला माफ करा...मलाा माफ करा बाबा....
काय वाक्य होते त्या बापाचे?.....
अशा कठीण परिस्थितीमध्ये सुध्दा बापाने हसत-हसत अशा प्रसंगाशी सामना करावा...
किती धैर्य त्या बापाचं...
किती मनोबल त्या बापाच....
काय त्या बापाची सकारात्मकता....
सांगायचं एवढंच की आजही बाप, मुलगा, सुन आणि नातवंड असा परिवार एकाच छताखाली राहतो......
खरंच तो बाप महान आहे ना.....

बाप एक वटवृक्षासारखा आधार आहे
सताड उघडं राहिलेलं दार आहे
बाप भीतीच्या अंधारातील दिवा आहे
बाप तळपत्या उन्हातली झाडाची सावली आहे

ज्याचा बाप जिवंत आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.......बापाची किमंत बाप गेल्यावरच कळते हे जरी खरं असेल ना बाप आहे तोपर्यंत बापाची सेवा करा.....आयुष्यात कधीच...काहीही कमी पडणार नाही.....

आई-बापाची सेवा....आपल्या भविष्याचा मेवा

याच सुरेख आणि सुंदर भावविश्वासह

लेखक
©® प्रा.डॉ. गोविंद पांडुरंग चौधरी

@देव

इतर रसदार पर्याय