kadambari premaachi jaadu Part 15 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाची जादू -भाग -१५ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग-१५ वा

-------------------------------------------------

१.

------------------

मधुरा यशच्या केबिन मध्ये आली ..यश ने तिला खुर्चीत बसण्याची खुण करीत म्हटले ..

आज कसे काय येणे केले ? सकाळी सकाळी ?

ठीक आहे ना सगळं ?

खुर्चीत बसत ती म्हणाली ..

सॉरी -मी, तुला अरे यश , असेच म्हणून सुरुवात करू का ?

अहो यश ..हे खूप बोजड वाटते आहे मला , तरी पण विचारून घेते ..आणि मगच एकेरी नावाने

बोलेन .

खुर्चीत आरामशीर बसत यश म्हणाला –

आपण समवयस्क फ्रेंड्स आहोत ..आणि हेच मैत्रीचे नाते आपल्यात असायला हवे आहे..

तुला सुद्धा या भावनेतून आपले हे मैत्रीचे नाते आवडेल अशी अपेक्षा करू ना मी ?

यशचे शब्द ऐकून ..मधुरा खूपच रिलैक्स झाली ..

ती म्हणाली ..यश ..

आजी आणि आजोबां आणि आमची फ्यामिली एकाच गावात राहून एकमेकाशी खूप घरगुती नाते

बंध सांभाळून आहेत ..याचा मला खूप अभिमान आहे ,आनंद आहे .

तुम्ही लोक फक्त स्वताच्या गावाला दुरावलेले आहात ..पण..पोटापाण्यासाठी बाहेर पडलेल्याना

गावापासून ,आपल्या मातीपासून दुरावल्याचे दुखः सहन करावे लागते .

तुझ्या आई-बाबांच्या बद्दल ..गावातील सर्व थरात खूप आदराची भावना आहे.

इथे येऊन .या मोठ्या शहरात तुम्ही स्वतःच्या कार्याने मोठीच ओळख निर्माण केली ..

याचे खूप कौतुक गावाकडे नेहमीच केले जाते .

या अशा जुन्या नात्या मुळे..इथे आल्यावर मला वाटले ..आपली छान मैत्री जुळेल ,

तुझ्या सोशल सर्कल मध्ये मला ही माझ्या आवडीचे काम करता येईल ..

पण, गेल्या दोन-तीन महिन्यात काही झाले नाही ..ते एक वेळ ठीक ..

पण..ज्या वेळी ..मी तुझ्या समोर स्कूटीवर येऊन उभी राहिले ..त्यावेळी तू मोनिकाशी बोलत होता ,

आणि ..मी विचारले ..

ओळखले का मला ? यावर तू मला अजिबात ओळखले नाही ..हे पाहून ..

फार वाईट वाटले नाही ..पण ती मोनिका ..ज्या नजरेने माझ्याकडे पाहुन हसली ..

ते खूप अपमानदायक वाटले मला .

यश तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता ..तिचे बोलून झाल्यावर म्हणाला ..

मधुरा – ते आता सगळं विसरून जा ..!

अंजलीवहिनीनी माझे नाव विवाह मंडळात काय नोंदवले ..त्यात माझे प्रोफाईल पाहून

ही मोनिका मागेच लागली होती ..माझ्या आणि आमच्या फैमिलीच्या ..

तिची ही बळजबरी ..आणि एकतर्फी इंटरेस्ट ..कशासाठी होता , कळलेच नव्हते .

म्हणजे – ही मोनिका तुझी मैत्रीण –बित्रीन नव्हती ?

मधुराने आश्चर्याने विचारले ..

यश म्हणाला –

बिलकुल नाही मधुरा , ती इथे येऊन मला भेटेपर्यंत मी तिला पहिले सुद्धा नव्हते ,ओळख आणि मैत्री

हे तर अजिबातच नाही .

आणि ही मोनिका .तिने सगळ्या गोष्टीचे जणू सेटींग केले असावे ..अशा रीतीने वागत होती .

मला वाटते ..आमच्या घरातले वातावरण पाहून ..तिच्या मनात तिने जे काही ठरवले होते ,

तिच्या प्लैनचे पार बारा वाजले असावेत . आणि अंजली वाहिनी तिच्याबद्दल क्लियर आहेत असे

दिसत नव्हते ,आणि वाटत नव्हते .

यशचे बोलणे ऐकल्यावर मधुरा बोलू लागली -

बापरे ,मी तुमच्याकडे आले तेव्हा ..

मला पाहून ती इतकी अपसेट झाली की ..

जणू ..तिच्या सगळ्या गोष्टीवर माझ्यामुळे पाणी पडले आहे.

फारच अग्रेसिव्ह आहे बाबा ही मोनिका ..

आणि सगळ्यांच्या मनाने ती फारच अडव्हांस नेचरचे आहे असे जाणवत होते .

तुला तर ती गृहीत धरून ..अधिकार गाजवत होती ..फारच विचित्र वाटले हे सगळं .

आता तरी तुझा आणि तुझ्या फ्यामिलीचा पिच्छा सोडणार आहे की नाही ही मुलगी ?

मधुराने यशला विचारले ..

यश सांगू लागला –

मधुरा ..दुसरे दिवशी सकाळी चमत्कार झाला ..स्वतः अंजली वहिनींनी माझे प्रोफाईल पाहिले ..

तर ..मोनिकाने तिचा जो इंटरेस्ट दाखवला होता ..आता तिने स्वतहा डिलीट करून टाकला होता .

बाप रे – घरातील सगळ्यांना ..खूप मोकळे वाटले ..

मोनिकाचा आगाऊपणा आमच्या घरात कुणाला आवडला नव्हता .

हे ऐकून मधुरा म्हणाली ..अरे वा ..छानच झाले कि ..हे

पण, एक सांगू का ..रागावू नकोस .

तू खूप इम्प्रेस झाला होतास ..

मोनिका खूप सुंदर ,आकर्षक आहे, तिला तिच्या या गोष्टीची जाणीवअसल्यामुळे .

.ती खूप चलाख आहे ,चतुर आहे ..

आपल्या जाळ्यात कुणाला कसे फासायचे , हे सगळे फंडे तिला येतात .

तिच्या हाय-सोसायटीत या सगळ्या गोष्टी खूप कॉमन आहेत.

तिच्या हेतूबद्दल मला तर काही कल्पना नाहीये ..पण काही तरी नक्की हेतू होता तिचा.

यश म्हणाला ..

मधुरा , फारच स्टडी आहे तुझी ..अगदी अचूक ओळखलेस तू..

हो, मी नक्कीच तिच्यात जाळ्यात फसलो असतो .कारण तिच्यात काहीतरी विलाक्ष्ण अशी जादू आहे.

काय म्हणतात ते..संमोहन विद्या “ येत असणार तिला .

आता हे सगळ इतिहास जमा झालय .

तू आज कशासाठी आलीस ते तर सांग..

यश .. मी पुढच्या महिन्यापासून ..माझ्या कॉलेजमधील मैत्रिणीच्या सोबत राहायला जाणार आहे .

कारण ..दीदीच्या छोट्याश्या घरात नाही म्हटले तरी माझ्या मुळे खूप अडजेस्ट करावे लागते सगळ्यांना .

माझी अशी इच्छा आहे की ..छोटासा जोब मिळाला तर ..earn and learn ‘या प्रमाणे माझी मला मदत होईल.

याबाबतीत तू मला मदत करावीस . तुझ्या ओळखीने एखाद्या ऑफिसमध्ये एडमीन मध्ये जोब मिळवून दिलास

तर बरे होईल .

मधुराची ही अपेक्षा ऐकून ..यशला हसू आले ..

मधुरा म्हणाली – हे काय यश , तू तर हसतो आहेस मला ,

मी सिरीयसली सांगते आहे की – आय नीड जॉब.

यश म्हणाला –

अहो मधुरा मैडम- गुड न्यूज फोर यु ..

माझ्याकडेच ट्रेनी स्टाफ करशील का जोब ? थोडा कमी देईन पगार ,

पण तुला कमी नाही पडणार इतका नक्कीच देईन .

आम्ही सध्या नव्या उमेदवाराच्या शोधात आहोत...तू अगदी योग्य वेळी आलीस, आणि विचारलेस.

मधुराने क्षणभराचा ही विचार न करता म्हटले ..

यस सर , मी अगदी आत्ता ,या क्षणापासून जॉईन होते . .

इथे जोब मिळेल ,हे तर स्वप्नात कधी वाटले नसते . थान्क्स यश.

यशने ..ऑफिस मधील अनुभवी सिनियरला आत बोलावले -

काका – ही मधुरा , आजपासून तुमच्या सोबत ,तुमच्या गाइडन्सखाली ट्रेनी ऑफिस एडमीन

स्टाफ म्हणून काम करेल ..

आजी-आजोबांची खास मर्जीतली आहे ..तिला नाही कसे म्हणणार ..

मेनेजर म्हणाले – ठीक आहे , परिचित आहे हे जास्त महत्वाचे , अनोळखी माणसा बरोबर काम

करणे सोपे नसते .

तुम्ही काळजी नका करू ..मधुराला मी वर्क नॉलेज देईन.

ते बाहेर गेल्यावर

मधुरा म्हणाली – एक गोष्ट अजून ..

आता ऑफिसमध्ये तू बॉस, आणि मी स्टाफ ,

इथे सगळ्यांच्या समोर मी तुला एकेरी नावाने बोलणार नाही,

अहो सर ,अहो यश असेच म्हणीन.

मधुरचे बोलणे ऐकून यश म्हणाला –

मधुरा – तुला जे जे कम्फर्टेबल वाटेल तशी तू राहा .

या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या लक्षात पण येत नाहीत.

मधुरा म्हणाली --

यश – खूप खूप थांक्यू ...!

*******

--२...

मोनिकाने तिचा इंटरेस्ट स्वतःहून डिलीट केला , इज ओके ..पण, इतक्यावरच अंजलीवहिनींचे

समाधान झाले नव्हते .डोक्यात शिरलेली मोनिका आणि तिचे विचित्र वागणे ,याचा त्रास होत होता.

त्यामुळे ..ऑफिस संपल्यावर ..अंजलीवाहिनी मोनिकाच्या मावशीच्या घरी जाऊन धडकल्या .

घरात आलेल्या अंजलीला बसायला सांगत ..मोनिकाच्या मावशीने विचारले ..

काय ग अंजली ..आज इकडे कसे काय येणे केले ?

अंजलीवहिनीनि मावशींना सरळ विचारले ..

मी मैत्रीण म्हणून विश्वासाने .माझ्या दिराचे ..यशचे स्थळ तुला सुचवले होते ..

पण मोनिका आणि तुम्ही ..दोघींनी मिळून नक्की काय ठरवले ? ते जाणून घेण्यासाठी मी

आले आहे .

मोनिकाने ..तिचा इंटरेस्ट डिलीट केलाय , हे तुम्हाला सांगितले नसेलच ..कारण ..

तिचा बाप ..तुम्हाला कवडीची किंमत देत नाहीये ..हे माहिती आहे मला ..

त्यामुळे तुम्ही मोनिकाच्या डोक्यात काय भरवले होते ते मला कळले पाहिजे ..

मोनिकाने परस्पर आपल्याला कटवले आहे “ याचे मावशीला वाईट वाटले आणि मूर्ख मोनिकाचा

राग आला ..त्या भरात त्या अंजली वहिनींना सांगू लागल्या ..

हे बघ अंजली ..मोनिकाचे भले व्हावे हाच हेतू होता माझा ..

म्हणून .. तुमच्या यशचे स्थळ ,स्वतःसाठीच ट्राय कर , त्यासाठी त्याला तुझ्या जाळ्यात ओढ ,

त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरात एन्ट्री घे..आणि मग हळू हळू ..तुझ्या घरात घेऊन जा ..

पापांचा घर जावाई म्हणून .

मावशींची ही कबुली ऐकून अंजली वहिनींच्या रागाचा पारा अधिकच चढला ..

आता ..उद्या आमच्या सगळ्या कंपनीच्या मिटिंग मध्ये आणि फंक्शन मध्ये तुमच्या मोनिकाला कशी एक्स्पोज

करते ते बघाच , या नंतर पुन्हा कधी कुणाला मूर्ख बनवण्याचा ती प्रयत्न सुद्धा करू शकणार

नाही.

मोनिकाच्या मावशीने ..अंजली वहिनींचे पायच धरले ..

असे नको करूस अंजली ..आधीच मोनिकाचे बाबा आमच्यवर खार खाऊन असतात , तू असे काही

केले तर ,आम्ही तर पार उध्वस्त होऊन जाऊ .

प्लीज असे नको करू अंजली ..आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला .

अंजली वाहिनी म्हणाली –

हे बघ ..तुझे नाव न घेता ..मोनिकाला धडा शिकवल्या शिवाय मी स्वस्थ बसू शकत नाही.

पुन्हा असे उद्योग नका करू मोनिकाच्या मावशी बाई.

************

बाकी पुढच्या भागात ..

भाग- १६ वा लवकरच येतो आहे .

------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED