ती कोजागृती पौर्णिमा (भाग-एक) Dhanshri Kaje द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती कोजागृती पौर्णिमा (भाग-एक)

ते एकमेकांना जवळ-जवळ पाच वर्षांनी भेटले होते. पाच वर्ष. खुप काही बदललं होत त्यांच्या आयुष्यात पण एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे. 'ती.... कोजागृती पौर्णिमा' आणि आजही तीच रात्र होती.
प्रत्येकजण त्या एकाच विचारात होते. आता पुढे काय होणार?आज कुणाचा नंबर असेल? सगळीकडे एकच भीतीच सावट पसरलेलं होत.
सगळेजण शांत निशब्द फक्त एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात मध्येच रेवती वैतागुन बोलते. "अरे यार!!... पाच वर्ष गाईज पाच वर्षांनी भेटतोय आपण. अस किती दिवस कुढत जगणार आहात? हे बघा प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे मग त्याचा विचार करून तुम्ही आताच आनंद का गमवत आहात. त्यावेळी ती एक चुक आपल्या कडुन घडली होती त्याची आपण शिक्षाही भोगलीये मग परत तेच कशाला." लगेच चिडुन सौरभ म्हणतो. "कारण... आम्हाला जगायचंय रेवती. तुला बोलायला काय ग? आम्ही आमचे मित्र गमावले आहेत. तुझ्या मागे पुढे कुणीच नाहीये. तु पाहिले ही अशीच होतीस आजही अशीच आहेस स्वार्थी. पण आमच्या आयुष्यात आमचा सोन्या सारखा संसार आहे. कोण घेणार आहे त्याची जबाबदारी."
रेवतीचा चेहरा रडवेला होतो. ती रडवेल्या स्वरात बोलते. "मला. मला काय ग सौरभ मित्र मीही गमावले आहेत. आणि एक विसरतोएस तु आज जी भीती आपण अनुभवतोय न त्याच कारणीभुत तु आहेस ते सगळं जर तु केलं नासतंस न तर आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती. आम्ही सगळे तुला किती समजावत होतो पण तु कुणाचंही ऐकलं नाहीस आणि आता मला बोलतोएस."
परत सौरभ चिडुन बोलतो. "मी... कारणीभुत होतो? रेवती निर्णय आपल्या सगळ्यांचा होता. जितके आम्ही कारणीभुत होतो तितकीच तुही कारणीभुत होतीस."
मीनल दोघांना शांत करत बोलते. "प्लिज वेळ कुठली आहे. आणि तुम्ही कसली उणी दुणी काढत बसले आहात रे. शांत आपापल्या जागी बसा बर."
रेवती थोडस चिडक्या स्वरात बोलते. "तु मला का बोलत आहेस पण. सुरवात याने केली होती. मी तर सगळ्यांना धिरच देत होते न. मी एकटीच आहे माझ्या मागे पुढे कुणी नाही हे माझं प्रारब्ध आहे. ते मी बदलु शकत नाही पण हे इथे बोलण्याची गरज नव्हती." रागाच्या भरात रेवती तिथुन निघुन
जाते.
मीनल तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. "यार! रेवती." आणि लगेच सौरभवर चिडते. "काय केलंस सौरभ हे तु? तिला हे सगळं बोलण्याची गरज होती का? तुमचं हे नेहमीच झालाय. जा आता घेऊन ये तिला बाहेर."
मीनल बोलतच असते तेवढ्यात फार्महाऊस मधुन सगळ्यांना एका मुलीची किंचाळी ऐकु येते. तस सगळे एकदम स्तब्ध होतात मिनलला रेवतीचा आठवण होते सगळे एकमेकांनकडे बघु लागतात आणि लगेच फार्महाऊस कडे पळतात. फार्महाऊस मध्ये आल्यावर सगळे रेवतीला शोधु लागतात. रेवती आपल्या खोलीत फ्रेश होत असते. मीनल रेवतीला आवाज देते. "रेवु...(काही वेळा नंतर...).. ए रेवती कुठे आहेस तु?" रेवती खोलीतुन बाहेर येते तिला मीनल आणि सुहासिनी दिसतात. ती दोघींना आवाज देते. "मिनु... सुहासि.. अग मी इकडे आहे झालं काय पण." दोघी वळतात काळजीने सुहासिनी विचारते. "तु ठीक आहेस न? रेवती. आम्ही तुझा आवाज ऐकुन घरात आलो. किती जोरात किंचाळलीस तु?"
आश्चर्याने रेवती म्हणते. "मी... मी कशाला किंचाळु? मी तर फ्रेश होत होते हे बघा."
सगळे एकमेकांकडे बघतात. मिनु म्हणते. "तु खरच ओरडली नाहीस? आम्हाला ओरडण्याचा आवाज आला म्हणून तर आम्ही धावत पळत घरात आलो."
रेवती आपला चेहरा पुसत पुसत बोलते. "अग मिनु पण मी ओरडु कशाला मी तुमच्या समोरच बाहेर आलीये न."
सगळेच विचारात पडतात. लगेच विराज विचारतो. "रेवु... तुला किंचालण्याचा आवाज आला होता?" रेवती सांगते. "नाही मला कुणाचाच आवाज आला नाही."
हे ऐकताच सगळे आपापसात चर्चा करू लागतात. कौस्तुभ सगळ्यांना शांत करत बोलतो. "अरे! ... छोट्या छोट्या गोष्टींचा किती किस काढता रे सगळ्यांना भास झाला असेल म्हणून वाटलं तस आता सोडा ते टॉपिक. आता पुढचा प्रोग्रॅम काय आहे ते ठरवा."