khar prem ekdach hote books and stories free download online pdf in Marathi

खरं प्रेम एकदाच होतं?

ही कथा आहे रितू आणि संजूची..

असे कोणीतरी म्हटलेलंच आहे की,'हम एक बार जितें है । एक बार मरते है और प्यार...प्यार भी एक ही बार होता है।'

रितू अशी मुलगी होती जी नेहमी स्वप्नाच्या जगात रमलेली असायची.

तिला प्रेमावर इतका विश्वास होता की, तिला वाटायचे तिच्या स्वप्नातला राजकुमार एक ना एक दिवस तिला नक्की भेटणार..

तिला खूप मुलांवर क्रश व्हायचे, पण त्या पैकी कोणालाही विचारायची तिची कधी हिम्मतच व्हायची नाही😄 पण तरीही अजून ती खऱ्या प्रेमापासून वंचित होती..

अशातच ती वृंदावन सोसायटीत राहायला आली. नवीन जागा, नवीन शेजारी, सगळच नवीन..

संजू..अतिहुशार, देखणा, वृंदावनची शान!!

कोणतीही मुलगी पाहताक्षणी प्रेमात पडेल असा होता तो..पण त्याला कोणत्याच मुलींमध्ये इंटरेस्ट नव्हता...

फक्त एक सोडली तर..तिचे नाव होते मिनू(मिनाक्षी), ती इतकी सोज्वळ, सुंदर आणि खूप श्रीमंत, अगदी एखाद्या अभिनेत्री सारखी होती..

तिचा रुमाल पडला तरी तो उचलायला मारामारी होईल..इतकी मुले तिच्या पाठी होती..पण तिला त्याचा काहीच फरक पडायचा नाही..

कारण ती संजूच्या प्रेमात अखंड बुडालेली असायची. सगळ्या सोसायटीतील मुलामुलींना त्यांच्या जोडीचा हेवा वाटायचा.

संजू तासन्तास बाल्कनीत मिनूला बघत उभा असायचा आणि ती सुद्धा त्याला!!

पण तरीही..आनंद जास्त काळ टिकत नसतो असे म्हणतात आणि जे नशिबात लिहून ठेवलाय तसचं घडते, तुम्ही आम्ही काहीही करून नशीब नाही बदलू शकत..

ह्या दोघांच्या बाबतीत सुद्धा असचं झाल, मिनूची आई अचानक वारली आणि मिनूच्या वडिलांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला..

ते कायमचे बेंगलोरला शिफ्ट झाले..बिचारी मिनू काहीच करू शकत नव्हती..त्या वेळेला मोबाईल ही नव्हते ..तरीही शक्य तितक्या वेळेला ती न चुकता संजू ला फोन करायची..

दोघेही खूप रडायचे बोलताना..दोघेही शिकत असल्यामुळे भेटी गाठी चा प्रश्नच नव्हता..पुढे तिचे फोन ही येणे बंद झाले..संजू सेटल नसल्यामुळे तिला लग्नाचे आश्वासन ही देऊ शकत नव्हता..

असेच दिवस जात राहिले..आणि एके दिवशी मिनूच्या मैत्रिणी कडून संजूला हे समजले की मिनूच्या वडिलांनी तीचे लग्न जमवलय..

संजू च्या पायाखालची जमीनच सरकली..पण तो काही ही करू शकत नव्हता आणि ह्या लव्हस्टोरीचा दुःखद एन्ड झाला😢

अशीच काही वर्ष उलटली. मोबाईल ही आले.. पण संजूला ह्याचा काहीही फरक पडत नव्हता..कारण मिनू जी नव्हती त्याच्या आयुष्यात....

ऑफिस, घर आणि बाल्कनी..त्या बाल्कनीत मिनूच्या आठवणी, हेच त्याचे रूटीन झाले होते....

संजू अजूनही मिनूच्याच आठवणीत गुंग असायचा आणि दररोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकटक बाल्कनीत उभे राहून मिनूच्या बंद घराकडे बघत राहायचा..

पण आज त्याला त्या घरात कुजबुज जाणवायला लागलेली.. अशातच शेजारच्या पिंट्या (सोसायटी चा छोटा खबरी) कडून त्याला कळले तिथे कोणीतरी नवीन फॅमिली राहायला आलीये..

कोण आहेत?किती जण आहेत? सगळे पिंट्या सांगत होता....पण संजू ला त्याच्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता..कारण आता तो बाल्कनीत जास्त वेळ घालवू शकत नव्हता..

रितू आणि फॅमिलीला येऊन एक आठवडा झाला होता..त्यात त्यांच्या बऱ्याचश्या सोसायटीत ओळखी ही झाल्या होत्या..

आणि पिंट्या....तो तर रितूचा बेस्ट friend झाला होता..तो रितू ताई..रितू ताई करत तिच्या अवतीभोवतीच असायचा आणि सोसायटी ची इत्यंभूत माहिती तिला द्यायचा..

पण अजून ही तिची आणि संजू ची भेट झालीच नव्हती..संजूने ही बाल्कनीत येणे बंद केले होते..

पण एके दिवशी रितू आणि संजू ची गाठ पडलीच..ती पण बाल्कनीतच....संजू फोन वर बोलायला बाल्कनी त आलेला आणि रितू पण..त्यांची नजरानजर झाली..

पण संजू ने न बघितल्या सारखे केले.. पण रितू तो वही दिल हार बैठी..ती एक झलक..रितूला कधी पिंट्याला भेटतेय आणि विचारतेय की हा कोण आहे असे झाले होते..

पण शाळेला ख्रिसमस सुट्टी असल्यामुळे पिंट्या चार दिवस त्याच्या मावशीकडे गेलेला होता.. रितूला वाट बघण्या शिवाय काहीच पर्याय नव्हता..ती रोज वेळ मिळेल तेव्हा तासन्तास बाल्कनी त बसून संजू ची वाट बघत असायची..पण काही केल्या संजू तिला दिसायचाच नाही..तिला तर त्याचे नाव पण माहीत नव्हते..तिने त्याचे नाव प्रिन्स चारमिंग ठेवले होते..

फायनली पिंट्या घरी आला.. आणि तिने त्याच्यावर प्रश्नाची सरबत्ती करायला सुरुवात केली..

तेव्हा तिला संजू आणि त्याच्या हार्टब्रेकिंग लव्हस्टोरी बद्द्ल कळलें.. ते ऐकून ती इतकी इमोशनल झाली..की तिला नकळत संजू आवडायला लागला..

ती रोज संजूची वाट बघत असे..संजू एका ठराविक वेळेलाच बाल्कनीत येत असे..आणि रितू त्याला लपुनछपुन बघत असे..

असे खूप महिने गेले..पण रितू ची त्याच्याशी बोलण्याची हिम्मतच नाही व्हायची.. पिंट्याने तशी एकदा त्या दोघांची एकमेकांशी तोंड ओळख सुद्धा करून दिली होती..आणि त्यानंतर रितू सुद्धा काही ना काही कारण काढुन संजूशी बोलण्याचा प्रयत्न करत असे..पण हाय हॅलो शिवाय संजू काहीही बोलत नसे..त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त मिनू च होती..तो सगळयाच सोसायटीतल्या मुलींशी हटकून वागत असे..रितू ने संजू ला या वेदनेतुन बाहेर काढन्याचा निश्चयच केला होता..

तिने हयात पिंट्या ची मदत घ्यायचे ठरवले..रितू बीकॉम च्या शेवटच्या वर्षाला होती..आणि तिला अकाऊंट हा विषय खूप कठीण जात असे..आणि संजू तर खूप हुशार होता..

सो तिने त्याची मदत घ्यायचे ठरवले..की जेणेकरून त्याचा सहवास पण मिळेल आणि त्याच्या जवळ जाण्याचा चान्स मिळेल..पिंट्याच्या मदतीने फुल्ल सेटिंग पण तिने लावून ठेवली होती..की तिला नाही म्हणणे संजू ला शक्यच झाले नाही..कारण तो मुळातच हुशार असल्यामुळे अडल्या नडलेल्याना तो नेहमीच मदत करत असे..पण त्याला कुठे माहीत होते..की त्याच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलय ते..

हळूहळू दोघांची चांगली मैत्री झाली..अगदी घट्ट..रितू ला काहीही प्रॉब्लेम झाला तरी ती संजूची मदत घेत असे..ते दोघे एकमेकांशी खूप गप्पा मारत..

पण फ़ोन वर..उगाच सोसायटीत चर्चा नको म्हणून एकमेकांच्या समोर अगदी तोंडओळख असल्यासारखे दोघेपण वागत असत..संजू रितूला एका ठराविक वेळेलाच फोन करत असे..आणि ते दोघे तासन्तास गप्पा मारत असत..त्यावेळी रितू कितीही व्यस्त असली तरी तो वेळ फक्त आणि फक्त संजूसाठीच असे..

त्यावेळी ते दोघे एकमेकांशी दिवसभरच्या सगळ्या गोष्टी शेअर करत असत.. पण अजून ही संजू च्या मनात फक्त आणि फक्त मिनूच होती..तो जास्त वेळ रितुपाशी फक्त मिनू बद्द्ल च बोलत असे..पण रितू पण त्याला समजून घेत असे..तिला खूपदा वाटे की ह्याला प्रोपोज करावे..पण नंतर तिला ही पण भीती असे..की संजू ला जर हे आवडले नाही तर..म्हणून ती गप्पच बसत असे..

मिनू हळूहळू संजू च्या आयुष्यात विरळ होत चाललेली..आणि तिची जागा त्याच्या आयुष्यात रितू घेत होती..

पण तरीही तो रितू ला एक चांगली फ्रेंडच मानत होता..संजूला लग्नासाठी स्थळे ही यायला लागली होती..पण तो नेहमी टाळाटाळ करत असे..

एक दिवशी संजूची आई अचानक सिरीयस झाली..तिला कॅन्सरच निदान झाले..आणि ती पण लास्ट स्टेज..संजूला काय करावे ते सुचत नव्हते..अशातच तिच्या कडे काही महिन्यांचा अवधी आहे असे डॉक्टरांनी सांगितले..संजू पूर्णपणे हताश झाला..त्याच्या आईने ही गोष्ट सगळ्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांपासून लपवायला सांगितली..आणि संजूकडे वचन मागितले की मरायच्या आधी तिला सूनमुख पहायचे आहे..

संजू या वेळेला काही कारण देऊ शकत नव्हता..त्याने ही आईच्या आनंदासाठी लग्नाला होकार दिला..इथे ह्या सगळ्या व्यापात त्याचे रीतूशी बोलणं ही झाले नव्हते. त्याला मेसेज वाचण्यास फुरसतंच नव्हती..रितूला इतकच माहीत होते की संजूची आई आजारी आहे..या पलीकडे तिला काहीच माहीत नव्हते..

इथे संजूला मुलगी बघण्याचा कार्यक्रम जोरदार पार पडला आणि त्याचे लग्नही जमले..बोलणी झाली. लग्नाची तारीख पण 2 महिन्यांनी ठरली..आता तर संजू ला उसंतच नव्हती..कारण लग्नाची सगळी जवाबदारी त्याच्या एकट्या वर होती..आई च्या आजारपणामुळे बाबा जास्त मदत करू शकत नव्हते..आई जवळ कोणतरी असणे भाग होते..अशा परिस्थितीत तो रितू ला फोन करने ही विसरून गेला होता.. बरेच दिवस त्याने तिच्या मेसेजला ही प्रत्युत्तर दिले नव्हते..

इथे रितू तासन्तास बाल्कनी त उभी राहून संजू ची वाट बघत असायची..पण कित्येक दिवस तिला त्याचे दर्शनही झाले नव्हते..

एक दिवस अचानक रितूला संजूचा फोन आला आणि त्याने इतक्या दिवसात घडलेली सर्व हकीकत रितू ला सांगितली..रितूने त्याला खूप धीर दिला..

पण संजूच्या एका वाक्याने रितूच्या पायाखालची जमीनच सरकली.. संजूने त्याचे लग्न जमलंय आणि ते पण 2 महिन्यात आहे,असे सांगितले.. आणि ती त्याची जवळची एकच मैत्रीण असल्यामुळे तिने त्याला मदत करावी अशी आशा व्यक्त केली..रितूने ही आपले दुःख लपवून लागेल ती मदत करायचे वचन त्याला दिले..

लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली..रितू शक्य तितक्या वेळा चेहरा आनंदी ठेवून जमेल ती मदत संजूला करत होती..

पण म्हणतात ना 'प्यार पे किसिका जोर नही रहता', तिच्या बाबतीत अगदी तसच झाले..

सगळे दुःख आत लपवल्यामुळे तिला त्रास होऊ लागला..ती ठीक जेवत ही नव्हती..एक टक काहीतरी विचारात असे..घरातले सगळे काळजी करायला लागलेले..

कोणाला काहीच कळत नव्हते की नक्की हिला काय होतंय ते..तिलाच माहिती ती कोणत्या वेदनेतून जात होती ते....ही तिच्या सहनशीलतेची परीक्षा होती..ती फक्त दिवस मोजत होती..

लग्नाला 2 च दिवस शिल्लक होते आणि तिच्या सहनशिलतेचा अंत झाला..तिने स्वतः संजूला फोन केला.. कारण नेहमी संजूच तिला फोन करत असे ..त्याने फोन उचलला..त्याचा आवाज ऐकून रितू खूप रडायला लागली आणि मग तिने रडत रडत आपल्या मनातले प्रेम व्यक्त केले..

संजूला काय करावे सुचतच नव्हते..कारण त्याने कधीच रितुबद्दल असा विचारच केला नव्हता..त्याला काय बोलावे रीतूला कसे समजवावे हेच काही कळत नव्हते, त्यात लग्न 2 दिवसांनी होते..

संजूने रितूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला..पण ती फक्त रडत होती..तिला एकदाच संजूला भेटायचे होते..पण संजूला ते शक्य नव्हते..आणि तेवढ्यातच कोणतीतरी त्याला हाक मारली..घरात इतका गोंधळ होता..की संजूने फोनच ठेवून दिला..

लग्नाचा दिवस उजाडला..सगळी सोसायटी संजू च्या लग्नाला गेली होती..रितूचे आई बाबा सुद्धा..रितू मुद्दामच उशिरा गेली..लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला..लागणचे रीसेप्शन सुरू झाले..तेवढ्यातच रितूची एन्ट्री झाली..सगळी लोके नवदाम्पत्याला शुभेच्या देत होते..फोटो काढत होते..

रीतूने ही स्टेज वर जाऊन संजू आणि श्वेता ला शुभेच्या दिल्या..संजू बघत च राहिला..पण नेहमीप्रमाणे तो काहीच नाही करू शकला..अचानक त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि ही प्रेम कहाणी सुरू होण्या आधीच संपली..😢😢

त्यानंतर रितू काही महिन्यांनी शिक्षणासाठी परगावी निघून गेली..आणि तिथेच कायमची स्थिरावली..

कारण आता वृंदावन सोसायटीत तिच्यासाठी काहीच उरले नव्हते..

~समाप्त~

(ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा..धन्यवाद)

इतर रसदार पर्याय