Mriganayani books and stories free download online pdf in Marathi

मृगनयनी

#मृगनयनी.....♥


दिवाळी जवळ आली होती म्हणून माधव सामान खरेदी करायला बाजारात गेला..... माधव तसा एकटाच राहायचा पुण्यात...तो अनाथ मुलगा... पण तरीही चांगल शिक्षण घेऊन.... मोठ्या कंपनीमध्ये कामाला तो होता....त्याने मोठ्या कष्टाने स्वतःच 4BHK घर घेतलं.... माधव अगदी शांत..सरळ स्वभावाचा....मेहनती... मुलींकडे त्यांनी कधी लक्ष नाही दिल... तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता....

तर आज माधव बाजारात आला होता.....सगळी खरेदी तो करत होता... तेवढ्यात त्याला भांडणाचा आवाज येऊ लागला....

"ऐ मिस्टर तुम्ही मला धक्का दिलात... वरून मला कुठेही हात लावत होतात.... मी मग बघत राहू का🤨..... ती"

"ए चमकछलो.. क्यो मचमच कर रही हें.... हात लगाया तो क्या....अच्छा लगा क्या.......मवाली"

"अच्छा...... मुझे तो भूत अच्छा लगा..... (कानाखाली मारून)..... अब ये केसा लगा... अच्छा था ना.....🤨Useless....ती"

घडलेला प्रकार माधवने पहिला..आणि त्या मुलीला ही पाहिलं.... ब्लु कुर्ता...व्हाईट लेगीज... आणि तोंडाला स्कार्फ बांधला होता...स्कार्फ मधून फक्त तिचे डोळे दिसत होते.... तिचे डोळे अगदी हरणा सारखे होते...कोणीही त्या डोळ्यांमध्ये बुडेल असे...मृगनयनी♥️ इतक्या मुली पहिल्या माधवने पण ही मुलगी वेगळीच जाणवली... तो तीच्या डोळ्यात हरवला...तेवढ्यात ती त्याच्या समोर येऊन बोलली.....

"ओ जरा बाजूला होता का.... मला जाऊद्या..... ती"

"अअअ हो हो माफ करा...... (बाजूला होत..)....माधव"

वाऱ्यासारखी आली आणि गेली ती....माधव तिच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत राहिला.... काहीवेळाने तो घरी परतला..... पण माधवच्या डोळ्यासमोर तीच येत होती....

"कोण असेल ती????.... काय नाव असेल तीच????... पण मला का असे प्रश्न पडावेत....मी तिचा विचार का करतोय...जाऊदे... कशाला मी विचार करतोय तिचा....."

असं म्हणत माधव...तिचा विचार जरा बाजूला सारून कामाला लागतो.....बघता बघता दिवाळी होऊन जाते...माधव पुन्हा त्याच्या कामाला जाऊ लागतो.... एकदा बस मधून जाताना... त्याच लक्ष बाजूच्या सीटवर जात...तर तीच मुलगी असते....आज सुद्धा ती तिचा चेहरा स्कार्फने झाकून होती...पण तिच्या डोळ्यातील ती नशा तीच होती....माधव तिच्या डोळ्यात पुरता हरवला...काहीवेळाने तिचा स्टॉप आला आणि ती उठून निघून गेली....

माधव आता हळू हळू तिच्यात गुंतत होता.... त्याला तिच्या डोळ्यात पाहिलं की कुणास ठाऊक काय होत... तो हरवून जातो.... तिच्या डोळ्यात आपलेपणा.. माया.. आणि एक ओढ वेगळीच नशा त्याला दिसायची... आणि तो तिच्या जवळ ओढला जायचा.... आता रोज तो तिला बसमध्ये पाहत असायचा.... खूप दिवस असच चालू होत... शेवटी एकदा माधव तिच्याशी बोलाच....

"आ... हाय!!!!🙂....... माधव..."

"आ.... हॅलो!!!!!!🙂....... ती..."

"मी माधव गोखले...... (हात पुढे करत)..... माधव"

"मी.... मृगाक्षी सहस्त्रबुद्धे...... (हात मिळवत)... ती"

"नाव सुंदर आहे तुमचं.......माधव"

"Thank uuu.... मृगाक्षी"

अशी झाली त्यांची ओळख.... हळू हळू त्यांच्यात चांगली मैत्री झाली....मग मृगाक्षी सुद्धा स्कार्फ न बांधता येऊ लागली..जसे तिचे डोळे होते तसेच... तीच रूप होत... गव्हाळ रंग.. लांब सडक केस... ओठांखाली तीळ..अशी होती ती...मृगाक्षी सुद्धा सगळं शेअर करू लागली माधवला... फक्त कधी तरी तिच्या हसण्यामागे दडलेल दुःख माधवला दिसायचं..... माधवला आता मृगाक्षीला आपल्या मनातलं सांगावं का... हा प्रश्न पडला...त्याने एकदा धाडस करून तिला विचारले सुद्धा.....

"मृगाक्षी....जरा बोलायचं होत....माधव"

"हो बोल माधव...... मृगाक्षी"

"आ... मृगाक्षी.... I Love Youuuu... माझं खरं तुझ्यावर खूप प्रेम आहे..... माझी...."

"गप बस माधव..... (त्याच बोलण मधेच तोडत).... मृगाक्षी"

"मृगाक्षी पण प्रॉब्लेम काय आहे...... माधव"

"मला नाही माहित मी निघते.... तु सुद्धा इतर मुलांसारखा फालतू अशील वाटलं नव्हतं.....मृगाक्षी"

"मृग.........."माधव

मृगाक्षी तिकडून निघून जाते.... खूप दिवस माधव तिच्या समोर येत नाही... तिला सुद्धा अस्वस्थ वाटू लागत... कारण त्यांच्या मैत्री च्या नात्यात ओढ निर्माण झाली होती.... नातं कोणतेही असो त्यात ओढ निर्माण झाली की.. प्रेमाची वेळ आपोआप फुलत जाते..... मृगाक्षीला असं वाटलं की आपण त्याला नकार देण्याचं कारण तरी सांगायला हवं होत.....

खूप दिवसांनी माधव तिला बस स्टोपवर दिसतो.... ती जाऊन त्याला भेटते.... आणि माधवला बोलायचं आहे सांगून.... सोबत घेते.... तिकडून ते एका स्कुलमध्ये जातात....शाळा सुटल्यावर एक गोड.. गुबगुबीत... गोलू मोलू... गोरीपान अशी 5 वर्षाची मुलगी मृगाक्षी जवळ आली.... माधवला काही कळेना.... मग मृगाक्षी माधवला घेऊन घरी आली....तिच्या मुलीला तिने आत झोपवून ती माधवशी बोलू लागली....

"माधव तुला आता असं वाटतं असेल...की ती मुलगी कोण....... मृगाक्षी"

"हो...... Madhv"

"ती माही आहे माझी... मुलगी...... मृगाक्षी"

"कायय😮..... माधव"

"हो.... मी हें तुला कधी सांगितलं नाही....म्हणजे तशी कधीच वेळ आली नाही...... पण तरीही त्यासाठी खरच सॉरी....... मृगाक्षी"

"म्हणजे तु Married...... माधव"

"हो पण आता नाही.... तुला तेच सांगायला मी इकडे आणलाय......"

"हम्म सांग..."

"आमची परिस्थिती गरीब होती....म्हणून वयाच्या 18 व्य वर्षी माझं लग्न माझ्या घरच्यांनी एका दारुड्या आणि वयस्कर माणसाशी लावल.... मला ही ते करावं लागलं... खूप मारझोड करायचा माझा नवरा मला....खूप त्रास होत होता.... पण काय करणार.... मग लग्नाच्या 4 वर्षानी मला माही झाली.... मी खूप खुश होते.... पण यांच्या घरचे कोणी खुश नव्हते... मुलगा हवा होता ना त्यांना..... आणि माही पोटात असताना तर माझ Checkup करण्यात आलं होत.... मुलगी आहे हें समजलं तेव्हा त्यांनी खूप छळ केला... पण मी मात्र अडून राहिले... कारण माझं बाळ होत ते....थोडाफार अंश एका दारुड्याचा का असेना पण माझी मुलगी होती ती... म्हणून मी सगळा त्रास सहन केला..... माही झाली आणि.... एकदा हें घरी येत असताना ट्रकने यांना धडक दिली.... आणि त्यात हे गेले.... वयाच्या 22 व्या वर्षी मी विधवा झाले 😔सगळ्यांनी मला आणि माहूला दोष दिला..... आम्हला घरा बाहेर काढलं..... आई बाबांनी पाठ फिरवली....मी ठरवले माझ्या शिवणकामाच्या कले वरून काय तरी करून दाखवू.... आणि जस की तुला माहित आहे.... माझे कपडे आज किती डिमांड मध्ये आहेत... माझे स्वतः चे दोन बुटीक आहेत.... हे स्वतः च घर आहे.....बस माझं मन उतरले आता माधव लग्न... प्रेम यावरून.... माझं विश्व् आता माहू आहे.... मला माहित आहे... माझ्या सारख्या विधवा आणि एक मुलगी असलेल्या स्त्रीला कोणी नाही स्वीकारणार....मला वाटलं तु ही......म्हणून मी तुला नकार दिला......😟🥺......... (रडत )..... मृगाक्षी"

"ठीके.....मृगाक्षी मी निघतो......... माधव..."

"माधव............"

माधव तसाच तडक निघून गेला.....मृगाक्षीला काही कळत नव्हते....माधवच्या मनात विचारांनी काहूर माजला होता.....मृगाक्षीला वाटतं होत.... की माधवच आपल्यावर प्रेम नव्हतं.... म्हणून तिने ही त्याचा विचार न करायचा ठरवले...काही दिवसांनी माधव मृगाक्षीच्या घरी आला.....

"माधव..... तु......???... मृगाक्षी"

"हो..... बोलायच होत.... माधव.."

"बोल न......"

"मृगाक्षी..... काल असं तडक मी निघून गेलो सॉरी त्यासाठी..... आणि ऐक आता मी जेव्हा पहिल्यांदा तुला बाजारात पाहिलं.... म्हणजे तुला असं नाही.. तुझ्या डोळ्यांना.... तुझ्या मृगनयनी डोळ्यात बघून का कुणास ठाऊक मला वाटतं तुला माझीच आहेस.... कोणीतरी ओळखीची..... तुझ्या डोळ्यातील जादू मला तुझ्याकडे खेचते....आता हे नcक्की काय मला नाही माहित.... हो पण त्यादिवसापासून मी तुझ्यावर खरं प्रेम करतोय.... तुझा धाडसीपणा...हिम्मतीने जगण्याची पद्धत... स्पष्ट बोलण..तुझा स्वभाव... शुद्ध मन... मला खूप आवडत...तुझ्या चांगल दिसण्यावर नाही.. तुझ्यावर प्रेम करतो मी....हम्म आता तुझा भूतकाळ मला समजलय...पण मला तुझ्या भूतकाळाशी आता घेणं देण नाही.... मला फक्त तुझी आयुष्यभर साथ हवी आहे...आता पुढचं असं की मी तर अनाथ आह माझं असं कोणी नाही..... आणि बाकीचं तुला माहित आहे...आता प्रश्न माहूचा तर माहीला मी जीवापाड जपेन...माझ्या स्वतः च्या मुलीसारखी.... आणि हे बग मृगाक्षी आपण माही नंतर बाळासाठी चान्स घ्यायचा नाही... माहीच आता आपल सर्वस्व... आपण प्रोटेक्शन वापरू हवं तर..😂....ट्रस्ट मी... माहीला आणि तुला कधी अंतर नाही देणार मी... माहीला शाळेत सोडणं.... शाळेतून घेऊन येन.. तिला भरवणं.. सगळं करेन... मला मुलगीच हवी होती बर...आणि आता आपल्या दोघांचं वय सुद्धा बरोबर आहे...म्हणजे माझं 28.. तुझं 27... आता तु हो बोलीस की लगेच साध्या पद्धतीने लग्न करू....बग सगळं तुला सांगियलय..... हुश्शह्ह्ह..... झाले माझं बोलून आता तु बोल.....😃🥰"

"मला कळत नाही आहे मी काय बोलू....मला वाटलं पण नव्हतं...की तुझ्यासारखी चांगली माणसं ही असतात... .🥰🥺thank uuuuu so much..... and I love You Madhav♥️😍🥰♥......"

"बर माझी मुलगी कुठे आहे....माहू..."

"बाबा.... आई....... माही"

"ये माहू... तुला आवडलो ना ग मी..... माधव"

"हो मला माझे बाबा खूप आडवले...... Mahi"

मग माधव मृगाक्षीला त्याच्या मिठीत घेतो.....दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवतात.... आज पहिल्यांदा त्यांना एकमेकांचा स्पर्श झाला होता...तो स्पर्श खूप हवाहवासा होता... त्या स्पर्शात माया होती... प्रेम होत... हवंस नव्हती... म्हणतात ना...स्पर्शाची सुद्धा भाषा असते......
त्यांच्या मिठीत ते पुरते हरवतात....त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवू लागतात....आणि आजूबाजूच वातावरण बदलून जात.....

"मृगनयनी या हाक दे मला...
मृगनयनी या हाक दे मला....
रोज मी उभा त्या वाटला...
ह्म्म्म हम्म...."
🎵🎶🎵🎶🎵
.
.
.
.
{प्रेम खूप सुंदर गोष्ट आहे.... प्रेम नेहमी होत...केल जात नाही...आपल मन आपल्याला कितीही अडवत असलं तरी... आपण प्रेमात तर पडतोच....आपला लाईफ पार्टनर जर चांगला आहे आपल्याला समजून घेत असेल तर हरकत काय आहे...प्रेम समोरचा किती चांगला दिसतो यावरून नाही तर.... समोरचा मनाने स्वभावाने कसा आहे यावरून करावं....आपण प्रेमात पडलो की कळत नाही... आपल्याला काय होतंय..काय करतोय...प्रेमाची नशाच वेगळी असते...तसेच प्रेमाची खूप रूपे असतात... ती हळूहळू आपल्या समोर येतात....यातील एका रूपावर होती माझी छोटीशी कथा.... मृगनयनी... मी आशा करते की तुम्हाला माझी कथा आवडली असेल.... मला कमेंट करून नक्की सांगा....लवकरच भेटू नवीन कथेसह.....🙂 🙏 }

©प्रतीक्षा....♥

इतर रसदार पर्याय