तिला सावरताना भाग -४ Rushikesh Mathapati द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तिला सावरताना भाग -४

तेवढ्यात तिचा कॉल आला. वेळ न घालवता अर्णव लगेचच रिसिव्ह केला .

अर्णव -" हॅलो ...... अग कुठ पूजा आहेस तू???....हॅलो ..... तुझा आवाज येत नाहीये.... हॅलो ...."

पूजा -" ह ह ह ..... हॅलो ..... मी येऊ नाही शकत रे...... "

अर्णव -" अग कुठ आहेस तू ?... काही झालं आहे का ??..."

पूजा -" ह ह अह.... मी नाही येऊ शकत रे...."

तिचा मोबाईल हातातुन खाली पडल्याचा आवाज अर्णवला आला.

अर्णव -" हॅलो .... पूजा काय झाल सांग की....शेट कट झाला कॉल..."

त्याच हृदय धडधडत होत , जसा की बुलेट ट्रेन धावत असावी. काही झाल तर नसेल ना तिला??... असे प्रश्न त्याच्या मनात येत होती . तो विचारच करत होता की रचना त्याच्यासाठी ड्रिंक्स घेऊन आली .

रचना - " हे... काय झाल ?.... हे घे .."

अर्णव -" अग पूजाचा कॉल आला होता ..."

रचना -" अाे हो ... मग कुठ जाणार आहे डेटिंगला ???...😋😋😋😜"

अर्णव -" अग ती येणार नाहीये... तिचा आवाज पण खूप विक येत होता ग... मला खूप भिती वाटत आहे रचना ... तिला काही झाल तर नाही ना ..."

रचना -" डोन्ट वरी... काहीही झाल नसेल.... आपण तिच्या घरी जायचं का?"

अर्णव -" हो चल .... आणि रवीला पण घेऊन जाऊ ."

रवी तर आपल्याच रंगात होता . एक मुलीसोबत फ्लर्ट
करत होता . तिचा हात त्याच्या हातात घेऊन एकदम रोमँटिक मूड मध्ये तिला पटवत होता.

रवी -" यू हेव् ब्युटिफुल आईस्, यू नॉ ??."

ती -" ओह् ... रिअली???...😊😊"

रवी -" येअह... तुझे केस तर घायलच करून टाकणारी आहेत .... तुझे ते हसणे , तुझी अदा , हाये हये मार ही डालोगे .... तुझे हाथ तर खूपच सॉफ्ट आहेत ग अस वाटत की तुझा हाथ नेहमी माझ्याच हातात असावा .... तुझे डोळे तर मोरनी सारखेच आहेत .... "

ती -" चल झूठा....😊😊😊😊"

ती लाजत हसत होती .

रवी -" सची..... यू हॅव वेरी ब्युटिफुल लेगस अल्सो...."
मागून रचना येत म्हणाली .

रचना -" आणि त्याच पायात असलेलं हिल्स पण खूप छान वाजतात.... बघायचं का?"

रवी -" नो नो .... मी फक्त तिच स्तुती करत होतो.."

रचना -" स्तुती तर माझं पण करत होतास ना.... "

ती -" यू नॉ हर.... "

रवी -" नो नो.... आय डोन्ट नॉ हर... हु इज शी??"

रचना -" असा का करतोस रवी ..... सांग की आपल लग्न ठरलय म्हणून आणि हे पण सांग ना की मे तरी बच्चो का मा बननेवाली हुं..."

रवी -" काय ????.... काहीतरीच काय .... हे लूक आय डोन्ट नॉ हर..."

ती तडक्यात उठून म्हणाली.

ती -" तुला गर्लफ्रेंड असून माझ्यावर ट्राय करत होतास.... यू यू....."

असं म्हणत ती रवीच्या तोंडावर पाणी फेकली आणि उठून गेली.

रचना -" 😂😂😂😂😂.... तुला असच पाहिजेल."

रवी -" तू बोलू नकोस माझ्याशी चांगला मूड खराब केलीस ."

रचना -" इथ अर्णव टेन्शन मध्ये आहे आणि तुला मूडच पडलाय.😤😤"

रवी -" का ... काय झालं?"

रचना -" पूजा अजून आली नाही. तिचा कॉल वर काही तरी गडबड असल्यासारखं वाटत आहे. आपल्याला जाव लागेल तीच्याघरी चल गाडी काढ."

रवी -" अग पण तुला तिच घर माहिती का ?"

अर्णव -" मला माहिती आहे ."

रवी -" पण तीच काय पडलाय तुम्हाला "

रचना -" अरे असा काय बोलतो... अर्णव लव हर... तो आज तिला प्रपोज करणार होता."

रवी -" वाहा रे वहा... अरे तुझ्यासाठी जीव देणारा मी आणि मला नाही सांगितलस.... एका मुलीच्या प्रेमात मला विसरलास...😥😥😥"

अर्णव -" तस नाही रे.... "

रचना -" अर्णव तुझी खेचतोय तो... रवी चल पटकन ... "

रवी -" ओके गाडी काढतो तुम्ही बाहेर भेटा."

रचना आणि अर्णव दोघे बाहेर आलो. रवी लवकरच गाडी घेऊन आला . थोड्यावेळात सगळे तिच्या अपार्टमेंट खाली आले . अर्णव लगेच गाडीबाहेर आला . रवी गाडी पार्क करायला गेला. त्याच्या मागोमाग रचना सुद्धा बाहेर आली आणि दोघे अपार्टमेंट मध्ये गेले. थोड्यावेळाने रवी सुद्धा आला. वॉचमन पूजाचा फ्लॅट दाखवला.सगळे तिच्या फ्लॅट बाहेर येऊन उभे झाले. दरवाजा उघडाच होता . तिघे आत गेले . रचना किचन मध्ये गेली . हे दोघ तिच्या बेडरूम च्या बाहेर आले . बेडरूम उघडला तर सगळा धूर धूर बाहेर येऊ लागला . हा धूर आगीचा नव्हता तर सिगरेटचा होता . त्या धूरमुळे त्यांना स्पष्ट दिसत नव्हतं . ते जसे आत गेले अर्णवच्या पायाला बिअरची बाटली लागली . अजुन आत गेल्यावर खाली एक नव्हे तर कमीतकमी १० तर बाटल्या पडले होते. फक्त बिअरच तर व्हिस्की , रम अजून खूप सारे दारूच्या बाटल्या खाली पडल्या होत्या . दोघेही बघितले तर काय पूजा बेडवर नशेत पडली होती. तिच्या हातात कसलीतरी डायरी होती.

अर्णव -" रचना .... पूजा इथे आहे.... लवकर ये..."

रचना लगेचच आली . ती आत येताना खोकत होती.

रचना -" अरे ... एवढे सिगरेट पिली ही....आणि एवढे बाटली ....आईशपथ..😨😨"

रवी -" मानायला पाहिजे लगा.... स्टमिना खूप आहे हीच्यात ...."

रवी चेष्टेच्या मूड मध्ये होता.

रचना -" अरे काही काय बडबडतोस..... "

अर्णव तिच्या बेडवर जाऊन तिच्या नाकाजवळ हाथ नेला. तिचे श्वास चालूच होते . तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला.

अर्णव -" तुमच्या दोघांचं काय चालाय.... सीरियस नेस नाही का .... हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल.... "

रवी -" हो हो चल.... तुम्ही दोघं उचला ... मी गाडी काढतो...."

पूजाचा मोबाईल आणि डायरी अर्णव रचनाला दिला आणि तिला उचलून खाली जाऊ लागला . रचना फ्लॅट लॉक करून येऊ लागली. खाली जाऊन अर्णव मागच्या सीट वर पूजाला घेऊन बसला . रचना पुढच्या सीट वर बसली. वेळ न घालवता लवकरच हॉस्पिटलला पोहचले .

रवी पळतच डॉक्टरला बोलवायला गेला. अर्णव पूजाला स्त्रचेर वर झोपवला. डॉक्टर लवकरच आले .

डॉक्टर -" हिला घेऊन चेक अप रूम मध्ये घेऊन चला . तुमच्यापैकी कोणीतरी सोबत चला ."

रचना तिच्या कडे असलेल मोबाईल आणि डायरी अर्णवकडे देऊन गेली. अर्णव आणि रवी बाहेरच थांबले

रवी -" डोन्ट वरी यार ... काही नाही होणार ."

त्याला खूपच भीती वाटत होती . भीती म्हणण्यापेक्षा मनात कसतरीच भीती निर्माण झाली होती. अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर आले . रचना बाहेर बसलेले दोघांना डॉक्टरच्या केबिन मध्ये बोलवली.

डॉक्टर-" मॅटर इस सो सीरियस.... खूपच नशा केल्या मुळे ती कोमात गेली आहे. माहिती नाही कधी बाहेर येईल . तुम्ही त्याचे कोण?"

रचना -" आम्ही सगळे तिचे कलिग आहोत."

डॉक्टर -" तिच्या घरचे कोणी नाही का ?"

रचना -" ती एकटीच राहते ."

डॉक्टर -" ओके ... मी काही इंजेक्शन लिहून देतो तुम्ही आणून द्या ."

अर्णव -" सर... ती बरी तर होईल ना?"

डॉक्टर -" होईल.... डोन्ट वरी .पटकन ते इंजेक्शन आणा."

सगळे बाहेर आले. रचना आणि रवी इंजेक्शन आणायला बाहेर गेले.

अर्णव तिथेच बाहेर बसून होता . त्याला स्वतःलाच कळत नव्हतं की काय चाललंय. तो जिच्यावर प्रेम करत होता .तिची अवस्था खूपच सीरियस झालेलं होती . त्याला माहिती नव्हतं की तो काय करत होता. पण त्याला फक्त एकच पाहिजे होत की ती बरी झाली पाहिजे..
त्याच्या हातात मोबाईल आणि कसलीतरी डायरी होती. तो मोबाईल चेक केला की कोणी नातेवाईक चा मोबाईल नंबर तर मिळेल का तर तो लॉक होता. मग डायरी चा पहिला पेज उघडला. तर...................

**********************************************

क्रमशः

तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर शेअर करा . रिवियू द्या . समीक्षा करा ... धन्यवाद ..🙏🙏..

पुढचा भाग लवकरच .....

ऋषिकेश मठपती