घर भूतांचे - 1 Ajay Shelke द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घर भूतांचे - 1

बहुदा १ वाजला असेल रात्रीचा मी अर्ध झोपेत होतो आणि दारावर टकटक झाली. उठून दरवाजा उघडला तर समोर पाहून मी तर.....
बी.ए करून वर्ष झाल होतं मला पण घरच्याापरिस्थितीमुळे कामाला लागण भाग होत आणि जॉबला लागून जवळ जवळ ८ महिने झाले होते मला. माझ्या मागे एकटी माझी बहिण होती आई वडील तर मला च आठवत नाही तर तिला तर काय आठवतील माझ्यात आणि कोमल (बहिण) मध्ये फक्त दीड वर्षाच अंतर आहे. मला अजून एम.बी.ए करायचं होत पण विचार केला आधी थोडा जॉब करतो मग कोमल तिच्या जॉबला लागल्यावर मी करेन. माझे मोजून २ च मित्र संकेत जो लहानपणी चा मित्र आणि एक इथे जॉब वर संकेतचीच मैत्रीण जी त्याने ओळख करून दिली होती ती म्हणजे केटी जी मूळची रोमानिया ची होती. ती तिच्या कोणा तिच्या नातेाइकांच्या ओळखी वरून आली होती मला एवढंच माहित होत.
मी जिथे जॉब करत होतो त्या कंपनीने मला कामानिमित्त बाहेरगावी पाठवत असे ८ महिन्यात मी २ देश करून आलो होतो. आत्ता सुद्धा मला रोमनियाला ४ महिन्यासाठी पाठवत होते. मी सुद्धा तयार होतो कारण बाहेर फिरायला भेट असे.
मी आज तगायत कधी मसनवाटा पहिला नव्हता. येताजाता कधी प्रेत वगेरे दिसल तरी मी २ २ दिवस झोपेत नसे तेच माझ्या डोळ्यासमोर येत. भुताचे चित्रपट कार्यक्रम आणि इतर बघन तर लांबची गोष्ट आहे. आजी ने मला आणि कोमलाला लहानाचे मोठे केले पण आमचं नशीब एवढं खराब की आजीच प्रेम आणि सावली सुद्धा आमच्या नशिबी पुरल नाही. मी १५ वर्षाचा असेन जेव्हा आजी वारली. आम्ही रात्री लवकर झोपाव म्हणून आजी आम्हला भुताच्या गोष्टी, चेटूक, राक्षस यांच्या गोष्टी सांगत असे आणि तेव्हा पासून माझ्या मनात जी भीती बसली ती बसली पण कोमल माझ्या विरुद्ध आहे ती अजिबात कशाला घाबरत नाही भल्या रात्री ३ वाजता जरी तिला उठून स्मशानात पाठवलं तरी ती खुशाल जाईल आणि येलं पण मी मात्र एवढा की रात्री लाईट चालू ठेऊन झोपणारा मनुष्य.
मी रोमानिया ला जाणार ही बातमी मी संकेतला, कोमला आणि केटीला कळवली केटीला मी घाबरट आहे हे माहीत होत आणि हे ऐकून ती ने मला आपण आज डिनर करू रात्री अस सांगीतल. रात्री ऑफिस मधून घरी आलो जरा टापटीप झालो आणि परत केटी सोबत डिनर साठी निघालो वाटेत जे नको तेच झालं आणि एक अंतयात्रा दिसली आणि माझा फ्युज उडाला कसा बसा हॉटेल मध्ये दाखल झालो. केटी आधीच येऊन बसली होती रेड ड्रेस घालून वाइन घेणं चालू केलं होत तिने. मी आलेला दिसताच ती ने ग्लास खाली ठेवला आणि आमच्या गप्पा चालू झाल्या. ती खूप महिन्यापासून इथेच राहत होती म्हणून आणि संकेत ने तिचे मराठी आणि हिंदीचे धदे गिरवले होते. त्यामुळे ती चांगल्या पैकी मराठी हिंदी बोलत असे पण मूळ इंग्रजी असल्यामुळे बोलण्यात भाषेत अनेक वेळा इंग्रजी येत असे.
"आलाश तू शेवटी बर झाल वाटच बघत हुते मी" मी बसताच केटी ने बोलायला सुरुवात केली. "हो ते झाला थोडा उशीर मध्येच जरा येताना उशीर झाला म्हणून तू लवकर आलीस वाटत?" "नाही रे मी ही जस्ट च आले आहे".
जेवण वगैर झाल्या नंतर मला केटी सांगू लागली
Katie:- "by the way congratulations for selecting in a Romania trip"
Me:- "Ohh thanks".
Katie:- "Come on give me treat for your selection man it's your 3rd outside visit"
Me:- "hey waiter! What do you want to eat Katie?" Katie:- "Just chocolate ice cream"
Me:- "Then 2 chocolate ice cream please and Bill thank you"
waiter:- "yes sir"
Katie:-"hey listen I know you're afraid of ghosts, but you know Romania is a top on the honted place I don't want to frighten you but I'm just telling you don't worry and my house is empty so you can stay there so relax. I'll just telling you as your friend And it's my country, I've lived there, so I'm telling you ok.
Waiter:- "sir madam your ice cream & bill thank you"
Me:- "ohh thanks"
Katie:- " hey relax chill don't panic"
Me:- "ohh no no I am good"
Katie:-"ok then end this here and tell me before you are going Romania okh take this keys this are of my home keys so enjoy have a safe and good flight".
Me:- "yeah sure"
दोघांनी जेवण करून बिल वगैरे देऊन मी घरी आलो.
कोमल अजून आली नव्हती मला ३ दिवसांनी रोमानिया गाठायचा होता पण केटी ने सांगितलेलं ऐकून मी घाबरलो होतो गूगल वर वाचलं तिने सांगितलं होत ते खर होत रोमानिया ला "home of drakula" सुद्धा बोलतात आणि केटी च घर होत ते पण होया जंगला जवळ घरापासून फक्त ७ किलोमिटर वर ते जंगल होत आजूबाजूला घर होती पण तिथे ना कोणी ओळखीचं ना कोणी स्वतःहून बोलणार ना कोणी अनोळखी सोबत बोलणार. आत्ता मी जाणं टाळू पण शकत नव्हतो ह्याच विचारत जाण्याचा दिवस आला filght पण दुपारी २ ची होती म्हणजे जायला रात्र होणार होती आणि झालीच मी रोमानिया मध्ये उतरलो तेव्हा रात्री चे १२ व्हायला आले होते कंपनी चा माणूस आज रात्री साठी होता जाताना च भकास रस्ते ती गर्द झाडी बघून तर मी अजून च घाबरलो जाताना मध्ये जेवलो वगैर सोबत ४ ५ दारू च्या बाटल्या घेतल्या म्हणजे रात्री शुद्धीत राहायला नको आणि नीट झोप यावी म्हणुन. घरी गेलो तेव्हा सर्व नीट होत बस जरा कचरा आणि धूळ होती झोपण्या पुरती जागा केली आणि कसा बसा थकाव्या मुळे झोपलो.
सकाळी डोळे उघडले आणि बस उघडेच राहिले कारण आराम खुर्ची आपोआप हलत होती नीट बघतो तर तो कंपनीचा माणूस नुकताच त्यावरून उठलेला. अवरावर केली आणि जेवायला बाहेर जात होतो की भल्या भकास रस्त्यावर गाडी ला मांजर आडव गेलं आणि अजून च मी घाबरलो आणि काय मग 3 महिने कसे घालव्याचे हे कळेना ह्याच विचारत होतो की कोणी तरी खांद्यावर हात ठेवला आणि मी जागेवर उडालो बघतो तर मागे केटी चा भाऊ होता मला येण्या अगोदरच तिने मला तिचा फॅमिली फोटो दाखवला होता म्हणून त्याला मी ओळखल. जरा गप्पा गोष्टी करत लंच झाला आत्ता जरा घर वगेरे नीटनेटक करायचं होत. कारण हा कंपनीचा माणूस आज जाणार होता आणि आज पासून त्या पूर्ण घरात मी एकटाच ३ महिने राहणार होतो. आधीच नवीन जागा आणि त्यात एकट राहणं आणि वरून असलेली भीती त्यामुळे हे ३ महिने मला ३ साला सारखे वाटतं होते.
सर्व घर नीटनेटक करायला रात्र झाली आणि इथे वेळ कसा चालतो हे समण्यासाठी मला आधी इथे कोणती वेळ कधी असते हे समजन गरजेचं होत. रात्री जेवायला गेल्या नंतर तो माणूस तिथूनच निघून गेला आणि मी त्या ने देलेली गाडी घेऊन घरी आलो. घरी येताना मला चापापणी झाली आणि मी उलट दिशेला आलो आणि ते ही जवळ जवळ १० मिल घरा पासून उलट दिशेला विचारानं मला पूर्त वेढ केलं होत घरी पोहोचलो तेव्हा १ वाजला होता.
कपडे बदलून आडवा झालो तोच जंगलातून ओरडणारी जनावरे ऐकू येऊ लागली आणि मी तर भीतीने थरथरत होतो नक्की काय ओरडत आहे हे सुद्धा समजेना लॅपटॉप काढून इथे तिथे मन रमवण्याचा प्रयत्न केला पण काही नाही शेवटी झोपलो. जेव्हा जाग आली तेव्हा रात्री चे ३.३० वाजलं होते जाग कशी आली काहीं कळेना पण कोणी तरी घरात चालत आहे याचा आवाज येत होता लाकडी फ्लोअर असल्यामुळे आवाज नीट ऐकू येत होता आणि माझी तर आवाज ऐकून गाळण उडाली कसा बसा उठून दरवाजा नीट बंद केला आणि राम राम म्हणत बसलो आणि केटी ला सुध्दा ४ शिव्या घातल्या आत्ता झोप येणं तर मुश्किल काम होत आणि त्यात मला हलक होयच होत पण बाथरूम खाली होत आणि मी वरती आणि येणारा आवाज मला खाली जाण्याची हिम्मत करून देत नव्हता तसाच मी सकाळी ६ वाजे पर्यंत बसून राहिलो नको नको ते विचार करत देवाचं नाव घेत पहिली रात्र भित भित कशी तरी धकली आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात केली.


क्रमशः