Well done .. books and stories free download online pdf in Marathi

वेल बहरली..गोष्ट सुंदर अश्या नात्यांची गुंफत गेलेल्या वेलीची ..💕

वेल बहरली🎐..

आई टॉवेल कुठे आहे.. आई चाहा .. आई ऑफिसची बैग कुठे आहे .. आई डबा ...😣आई इकडची पुस्तक बघितलिस का ?

काय ग मति कीती तो गोंधळ घालतेस सकाळ सकाळ आणि आता 27 वर्षाची घोड़ी झालीस तरी स्वतःच काही आवरता येत नाही आई मतिच्या पाठीत हलकस मारत म्हणाली

आई तूच बोलतेस ना मुंल आईसाठी लहानच असतात म 😋

आईला मागून मीठी मारत ते जाउदे ,आई आई तू...

हो हो कबर्डच्या खालचा ड्रॉवर दिसतोयस तिथे ठेवली आहेत तुझ्या आवडत्या लेखकाची पुस्तक

व्हा आई तूच ग तूच , ग्रेट आहेस तू 😋😘मति आईला पापी देत म्हणाली

हो हो आमचे लाड पूरे झाले लग्नानंतर कोण असणार आहे हे सर्व करायला, स्वतः पुरत शीकुन घेतल म्हणजे होत नाही मती, तुझ्या एका पाउला बरोबर अजुन एकाच पाऊल उचल जाणार आहे काय !

ये आई परत नको चालू करुस उगाचच सकाळ सकाळ मूड ऑफ आणि तुम्हाला मला पाठवायची घाई झली आहे का ? नाही तस सांगा गेले दोन वर्ष हेच लावल आहे तुम्ही आणि अश्या कीती ग दिवस असतो आम्ही इथे ?😤 मति रागत बैग पैक करत म्हणाली.

अस काय ग बोलतेस परत बोलशील तर याद राख ,
तुम्ही नवीन पिढी ना म्हणूनच गेले दोन वर्ष तुझ्या मताचा आदर राखला की आम्ही एकतरी स्थळ आणल का तुझ्यासाठी आणि घाई वैगरे काही झालेली नाही आहे अट्ठाविसाव लगेल आता तुला वेळेत होउदे की सर्व , आई मतिला सॉफयावर बसवत म्हणाली

तस ही वेळ बदल की सगळच बदलत लग्न त्यानंतरच आयुष्या नाती-गोति जबाबदारी संसार सगळच स्वतची अशी प्रिवेट स्पेस पण शोधण कठिण होत म .. आईने मतीचा हात हातात घेतलेला मति त्यावर बोट फिरवत ,

आई काहीही बदलत नाही ग आणि जनरेशन कुठलीही असली ना तरी त्या मधे अंडरस्टैंडिंग आणि मैत्री असण महत्त्वाच, हा आता काही प्रमाणात चेंजेस होतात करायच की दोघांनी मिळून adjust मग

आणी कोणत ही नात विणण्या आधी मैत्रीची दोर घट्ट तयार करायला हवी आणि दोन्ही बाजूने हा म कस सगळ सोप्प होऊन जात 😄

वा मति आता आईला शिकव ,
अग तस नाही आई आता आपणच बघ की आहोत ना फ्रेंड्स 😉

बर चल मी जाते मला घाई होतेय..

ही मुलगी ना म्हणजे खरच , पण लग्नानंतर बोलू नकोस आई तू बोलत होतीस ते बरोबर होत मला हे सर्व झेपते नाही आणि..

आणि बिनि काही नाही मी निघतेय जर तू असच बोलत रहिलिस ना तर तो मुलगा भेटणार आहे मला आज त्याच्या तोंडावर नाही बोलून येईन हा मी आणि खापर तुझ्यावर फोड़ेंन की आईने सांगितल आहे मेलोड्रामा आणि त्या रडक्या सीरियल बघणारा असेल तर नाही बोलून ये डायरेक्ट . 😜

आई लाटन घेऊन मरायच्या आत मतीने सैंडल घालुन आईला दांत दखवत😁 तिथुन पळ काढला

तू ना मति थांब...

संध्याकाळी******

आई योय आईसाहेब शिटी मारत हेंगरला लटकवलेले दोन ड्रेस दखवत
वन पीस की कुर्ती दोन्ही हाताने खाली वर करत सांग ना ग लवकर 😪

मती 🤦आईने डोक्याला हात लावला काय हे तू अजुन तयार नाही झालीस आणि क.. काय हा पसरा हा मति मी आधीच सांगते मी उचलनार नाही आहे ..
जरा चिडून मति कितिवेळा बजावल आहे ग मी तुला,
तू हे रेडियो ते आधी बंद कर बघू झालेल्या जुन्या मैचची हाईलाइट येकत असते नुसता कानाला त्रास

ये आई तो चालू होऊन बंद तरी होतो ,तू चालू नको ना होउस परत तू सांगना वन पीस की कुर्ती😄 मतिने अगदी उत्साहने विचारल

तुला काय आवडत ? आईने विचारल ,

आई दोन्ही म्हणजे बघ कुर्ती कम्फ़र्टेबल आहे तस वन पीसही नो इशू आणि प्लीज आता अस नको बोलूस की मुलगा बघायला जातेयस हे काय घातलस वैगरे..

नाही तस काहीच म्हणणार नाही आहे मी उलट तू जशी आहेस तशी प्रेजेंट हो त्याच्यासमोर😚, म काय ठरल
वन पीस की कुर्ती ?

जम्ब सूट 😉😁

देवा खरच🤦 आता बोलू शकते हा मी काहीही काय घालुन जातेस ग तिथे काय तू फिरयला जातेयस 🤷.

आई तू आत्ताच म्हणालेलीस 😑

घाल ग बाई जे घलायच आहे ते आणि जा लवकर आणि अजुन एक ,

एक आई नाही तर मैत्रीण म्हणून सांगतेय मतीच्या खांद्यावर हात ठेवत
सगळच परफेक्ट नसत समोरच्या मधे थोड़ इम्पेरफेक्ट आसण ही चांगल असत☺️...

एक दिड वर्षा नंतर ***

आई ...आई आईसाहेब कशा आहात मतीने जाऊन आईला मीठी मारली आई आई आई , आईला गोल फिरवत कशी आहेस ग तू आईचे गाल खेचत😘

ये गप की ग मी काय तुझ्यावायची आहे का सोड आणि काय हे आज एकदम वेळेत आलिस आई मतीला पाणी देत म्हणाली.

हो म सुमितमुळे punctual झालेय डोळा मारत तुझ्या जावयला जरा घड्याळ जास्तच प्रीय आहे आणि हो म्हणूनच आम्ही जेव्हा सेकेंड टाइम भेटलो तेव्हा माहीत आहे ना त्याला वॉच गिफ्ट केलेल मी , असला ऑकवर्ड फील झालेल ना त्याला 😆पण त्या नंतर मलाच सवय लागली वेळेत काम करायची😣

बरच झाल की म त्यामनाने सुधरलीस तरी

आई काय ग तुला काय मी आळशी वाटते का एकतर मी सहा महिन्यांनी आले आहे तुझ्याकड़े आमची फर्स्ट anniversery झाली आणि मग टाइमच नाही मिळाला आणि तू अशी बोलते आहेस मति रुसुन म्हणाली

बर बाबा चला आपल्या आवडत जेवण केल आहे मस्त जेउ गप्पा मारु रात्री बाबा येतीलच आणि घ्यायला येणार आहे का सुमित नाही तस लवकर निघायला

येईल तो पण जरा लेट चल मला जेवणाच्या सुगंधानेच भूक लागली आहे..😍

*******

आई खुप भारी जेवण होत हा, तुझ ते वेगवेगळ्या पदार्थोंवर प्रयोग करण संपल नाही वाटत अजुन आणि मी होते तेव्हा ठीक होत मला खायला द्यायचीस आता काय बाबांना पकडलस कि काय😂

नाही ग आता तू आलिस ना म्हणून तुझ्यासाठी खास सेप्शल आणि घोड़े प्रयोग काय ,करायची तेव्हा बोट चुपुन खयचीस की

बर मती ही पुस्तक परत का आणलिस वचायच सोडून दिलस की काय आणि हा रेडियो... 😶

मतीss काही आवडी जपायच्या सगळच सोडून नाही द्यायच.
तू..😑 हे बघ मला personly नाही आवड़नार तू वाचण सोडून दिलस तर आईच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखण मतीला जमत न्हवत

आई आई चील iam shock हिच का ती आई जी मला संगत होती लग्नानंतर सगळच बदलत n all जरा हसत..

अग काही वाचन वैगरे सोडून दिल नाही आहे ग उलट सुमित तोच मला रोज नवीन नवीन पुस्तकं आणून देतो अग ढिगारा साचला आहे नुसता म्हणून जरा इथे आणली आहेत
आणि रेडियोच म्हणशील तर...

तर काय सासुला पण त्रास देतेस का मोठ्या मोठ्या लाऊन

आई गपा हा आता आईंच आणि माझ चांगलच पटत ते बाबांनी मला न्यू रेडियो आणून दिला होता म म्हटल की इथे येतच आहे तर हा घेऊन येते इथे आली की येकायला बर

हुशः झाल समाधान😁 आयूडी ग आईचे गाल खेचत काहीही बदलेल नाही आहे आणि जे बदल आहे ते चांगलच आहे . मती समाधानाने हसत म्हणाली😊

जस ?🤔 तू परत घोळ घातलास का मति? , मी काय विचारल कितिवेळा सांगितल होत आता मी नसणार आहे चुका सुधारायला आई जरा चिडुन म्हणाली

आई तुला काय झाल आहे मी आल्यापासुन बघतेय तुला काय वाटत ग मी काय वेंधळी आहे का घरची काम ऑफिस सोबत वाचन एडिटिंग ट्रैवलिंग सगळच एकटीने आणी आवडिने करते आहे समजल ना तुझी मुलगी आहे मी कशात कसर सोडेंन का जरा मती नाराजिने म्हणाली

तस नाही बाळा आमच जग वेगळ होत आणि ते वेगळ असून सुद्धा वेळात वेळ काढून आपल्याला जे आवडत ते करायला वेळच मिळायचा नाही ती खंत प्रत्येकीच्या मनात कायम असते मग त्या प्रत्येक ' ती ' ला असच वाटत आपल्या मुलीने किंवा आपल्या मुलाने अश्या एखाद्या गोष्टीमधे किंवा काममधे गुंतू नये जो जगणच विसरेल😌

अग आई असते ना त्या प्रत्येक आईला असच वाटत आपण जे करु शकलो नाही किंवा आपल्याला जे मिळाल नाही ते आपल्या मुलांना मिळाव आणि म्हणून ती सतत धडपडत असते आणि एकदा का ती गोष्ट मिळाली ना कि त्याची किंमत कळावी म्हणून पण प्रयत्न करत असते..

असो तू तुझ बोल ( आई विषयाच्या खोल न जाता )
नेक्स्ट ट्रिप कोणती आहे ? तुझे तेच शाळेतल्या मित्रांसोबत की ट्रिपवाली वेगळी गैंग आहे त्यांच्यासोबत जातेयस आणि सुमित , घरच्यांनी परमिशन दिली का 🙄

आई तू आज मला एवढे प्रश्न का विचरते आहेस तू काही विचारायला घबराते आहेस का काही क्षणात काहीतरी लक्षात आल्यासारख आई तू खुप फॉर्मल वागते आहेस माझ्याशी अस नाही वाटत🤔

तस नाही ग , म कस आई हम्म ! आल लक्षात मी तुझीच मुलगी आहे कोणी परकी नाही मी माझ्या आईच्या घरी हव तेव्हा येऊ शकते हव तस राहु शकते

आणि..आणि विषय बदलत मी झुंम्बा क्लासेस चालू केले आहेत 😁 सुमित मुळे (जरा हसुन) त्या दिवशी बोलताना गंमत केली ग सिक्स पैक्स चा जरा .. हा जरा 😝 फैमिली पैक झाला आहे तर सहेबांनी मनावर घेतल आणि झुंबाचे क्लासेस चालू केले

देवा म्हणजे तिथेहि आहेच की काय गरज ग बोलायची म तू कशाला जॉइन झालीस

अग त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडेंसच लौ झालेला पूर्ण म म्हटल मी पण जॉइन होते 😅 म्हणजे बरच झाल तेवढा वेळ सोबत

नाहीतर , त्याला त्याचे ते रड़के सीरिअल्स आणि कार्टून बघण्यापासुन फुरसत मिळेल तर खर एकतर ऑफिसवरुन लेट येतो आला की लगेच tv समोर आई आणि तो बसलेले असतात , अग आई लिट्रली रडतात ते दोघे आणि आई तुला सांगू मी आणि बाबा त्यांची मजा घेत असतो 😂

वा ती कंपनी काय तुला लग्ना आधीच मिळलेली जम्ब सूट नाही का घालुन गेलेलीस तेव्हा त्यांचीच तुला तोंडावर पड़ता पड़ता वाचलेल आठवतय का

हो म चांगलच अस कस विसरेन आणि कोणतेही कपड़े घलायला त्यानी परमिशन दिलेली उलट तेच म्हणालेले तुझ्या आयुष्याची तू नवी सुरवात करते आहेस माझ्या मुलाला सुद्धा तूच निवडलस म आता कपड़े निवडायचा हक्कही तुझाच आहे

एंड आई माझे सासरे ग्रेटच आहेत तुला माहीत आहे जेव्हा जेव्हा मैच असते तेव्हा तेव्हा you wont belive ते सुमितला सांगतात माझ्या बिडुला सातच्या आत आणायच काम तुझ 😂 आणी संडेला तर जुन्या मैच लाऊन बसलेले असतो आम्ही , भिंतिला पाठ टेकत बाबांची कमी जाणवूनच देत नाही ते 🙂

अच्छा ! म सुमित आणि तुझ कस चालू आहे

चाल्लय की बर , इवन बर म्हंणण्या पेक्षा खुप चांगल चालू आहे😍 हा कधी कधी उन्नीस बिस होत आता तो राहिला शांत स्वभावाचा आणि मी चंचल तापट ,

तस घोळ तो घालतच नाही मीच घलते म दोघ मिळून निस्तरतो नंतर समजाऊन सांगतो अगदी क्लियर आणि सोप्या शब्दात , आणि त्याला काही प्रिब्लेम आला ना तर माझ्या एका एका फंडयाने चुटकीसरशी सॉल्व होतात मति चुटकी वाजवत म्हणाली😂

आणि म्हणजे बघ सकाळी मी त्याला ड्राप करते रात्रि तो मला पिक करतो एवढ़या मागे येऊन डोक्याला हात लावत 🤦
Then , रात्रि झोपताना मला पुस्तक वचल्याशिवाय आणि त्याला एखाद रैप सॉंग येकल्याशिवाय झोपच येत नाही , झोपायच्या आधी मात्र दिवसभरातल्या गप्पा आणि रोज त्याचे सर् कसे झापतात याची एक्टिंग करून दखवतो😂

आई आठवडयाला एक दिवस तरी गास फुस खायला लावतो मला , मग मी पण वीकेंडला योगाचे क्लासेस घेते 😜 मती हसत म्हणाली

मग सैटरडेला त्याच्या एखाद्या आवडत्या झू मधे किंवा गेम झोन मधे जातो नाहीतर लांगड्राइव किंवा मला आवडत म्हणून एखाद्या ट्रेकला जातो

मग अ.. अजुन बरच काही ग कस सांगू म्हणजे 😄
माझ अस की दिवसाला कॉल नाही केला तर नो टेंशन म्हणजे पडलेलीच नसते कसली, पण तो.. दिवसाला चार चार कॉल करतो डबा खल्ला का वैगरे ते काही नाही विचारणार नीट आहेस ना कोणाशी भांडली नाहीस ना डोक किंवा हाता पाय तोडून नको घेऊस स्वतःचही आणि दुसऱ्याच ही 😫जरा राडलेल्या स्वरांत आई आता तो पण माझी उड़वायला लागला आहे माहीत आहे

आई मात्र हसत होती हस तू हस ग तुला काय हसायला ह्याच गोष्टीवरुन रागवलेली मी त्याच्यावर तर मला म्हणतो
आपण पिलो फाइट किंवा लूडो खेळतो ना कधी तर त्यात पण मी जिंकायला देतो तुला तर का मी भोकाड पसरेन म्हणून , आता तो स्वतःच रड़तो tv बघताना तो मला रड़का बोलतो 😑

लगेच चेहऱ्यावर स्माइल अणत पण मज्जा येते आमच्या दोघांमधल understanding maturity leval imperfection जस तू संगीतलेलस अगदी तसच आहे त्याचमुळे आयुष्याचा बैलेंस साधता येतो , एक पडला तर दूसरा असतोच पकडायला 😄

चला म्हणजे मुलगी जबाबदार झाली आई म्हणाली

आई मुलगिच नाही ग मुलगाही जबाबदार झाला अस म्हंण

लग्न माझ एकटीच नाही त्याचही झाल आहे आणि कोण म्हणत लग्नानंतर फक्त मुलीच्या लाइफ मधे चेंजेस होतात
मुलांच्याही होतात की फक्त आपण दुर्लक्ष करतो एवढंच

जी धाकधुक मला होती तीच त्याला ही होती म्हणजे, सांगितल नाही त्याने आधी पण मला समजत होत

आपला बेड कबर्ड इथ पासुन ते चप्पलाचा स्टैंड tvचा रिमोट आणि घरातला राउटर कोणाला तरी शेयर करण जे आपण इतकी वर्ष एकटयाने वपरत आलो होतो, ते काही महिन्यात किंवा वर्षात शेयर करण म्हणजे मोठी गोष्ट आणि त्याही पेक्षा जिच्या सोबत हे सर्व शेयर करणार आहोत तीला समजून घेण स्वताच्या काही सवयी बदलण तीला त्रास न होता स्वतच काम करण मैन म्हणजे रागवर मुळ स्वभावाचि तीव्रता कमी करण ज्याने तीला त्रास होउ नये तीला ऑकवर्ड वाटू नए याची सतत धडपड तो करत होता ..

त्याची ती हालत बघवली नाही ग मला आणि परत एका शैक हैंडने सर्व सोप्प करून टाकल we become a again Friends 😘😄 आणि त्याच्याशिच नाही आई बाबाशी सुद्धा ,
मैत्री आणि नात या बद्दलचि व्याख्या मी त्यांच्या समोर मांडली म्हणूनच आतापर्यन्त आम्ही कूल आहोत😉😉

बघ ना माझ आधी जम्ब सूट आणि आता ही जम्ब सूट त्याची आधिची थ्री फोर्थ आणी आताही थ्री फोर्थ , माझे हिल्स मैक- उप स्कूटी टेंटच समान आतही तेच 😄
त्याचे मित्र त्याचा कट्टा कपडयाच दुकान आणि ग्याजेट जस आहे तसच अजूनही😊

बदल ते फक्त सुमित बरोबर मीही घड्याळाच्या काट्यासोबत चालायला लागले . त्याचा तो थोड़ा सीरियस शांत स्वभाव कमी होऊन त्याच्यातल लहानपण उभरुन आल

सुमित एडिटिंग ग्राफिक्सच नॉलेज माझ्याकडून घ्यायला लागला.आता तोच मला एक एक आइडियाज देत असतो

माझ ब्रेथ इन ब्रेथ आउट थोडक्यात शांततेचे धड़े घ्यायला शिकले आणि तो चक्क मराठी लिटरेचर पुराणिक कथा येतिहासिक मूवी बघायला लागला मी सातवे आसमान पर 😆 मला पार्टनर मिळाला

मतिच्या प्रत्येक वाक्यावर आनंद झळकत होता ती अगदी मन लाऊंन संगत होती आणि आईही तितक्याच मन लाऊंन समाधनाने येकत होती 😌😊

तस सिंगिंगचा शॉक नाही मला पण त्याच्याकड़ून गिटार शकतेय😣 आहे मति डोळे बंद करत जरा घबरत म्हणाली

अच्छा मी सांगत होते मति विणा शिक मति रियाज कर जरा तर नाही आता नवरा संगतोय तस शकतेयस काय😏 , आसुदे आसुदे चांगल आहे 😄

चला म्हणजे माझी चिंता सुटली पोरगी मार्गी लागली आई मनात म्हणाली एक श्वास सोडत चला म्हणजे मी निच्छिन्त 😄

झाल म ओझ उतरल का मति हताची घड़ी घालत डोळे वर करत म्हणाली

आई मी जेव्हा जेव्हा इथे येते ना तेव्हा तेव्हा तुझ्या मनाची अशीच चलबिचल होत असते आणि तू तुझे प्रश्न आणि मझि तीच उत्तर 😊 ती मिळाली ना कि म तुझा आसा समाधनाने भरलेला चेहरा असतो आईला मीठी मारत

आईची माया ग ती तूला अस सुखी आनंदी बघुन छान वाटत आणि म काय ग एकुलती एक तू लहानपणापासुन तुला स्वताच्या पायावर उभ केल आम्ही खुप आधीपासुन वाटायच मला मला माझ्या आवडीनिवाड़ी नाही ना जपता आल्या म तुझ्या तरी जपता आल्या पाहिजेत

म्हणूनच खुप मुंल बघितलि त्यांना खांद्याला खंदा देऊन काम करणारी मुलगी हवी होती पण स्वताच्या विश्वात रमणारी नको होती

मतिच्या डोक्यावरुन हात फिरवत लग्नानंतर सगळच बदलत मीच म्हणालेली पण ते आपल्या हातात असत आपण कीती बदलायच आणि कीती नाही

दुसर्याची काळजी करता करता त्यांना जपताना त्यांच्या मतांचा आदर राखतना त्यांची आवड़ जोपसतान स्वतकडे दुर्लक्ष करण म्हणजे स्वतःला नकळत दुखावने .
एक लक्षात ठेव मति आपला पहिला पार्टनर सोबती म्हणजे आपण स्वतः ☺️

समोर आभाळ भरून आलेल गार वारा झूळ झूळ करत खिड़कीतुन आत शिरत होता आणि माय लेकीच्या गप्पा रंगत चाललेल्या🐾

आई नात गुंफत जात ना actually आपण नात्यात गुंफतो आणि वेल बहरत जाते 😍..

आपण एखाद्या नात्याला जस वळवू तस ते वळत😊 एखादी वेल कशी आधार घेऊन वर पर्यन्त जाते तसाच त्या वेलीला म्हणजे नात्याला प्रेमाची मैत्रीची जोड़ दिली ना कि ते अजुन घट्ट आणि बहरत जात ☺️

जस अ.. जस तू गायला लागलिस की माझ तन मन विसरून
त्या त्या.. डोंगराच्या वर , खिड़कीवरुन ओघळणारया थेंबातुन बोटाने वाट सारत..तिथे आभाळाला गवसणी घटल्या सारख वाटत😍🎐

आई 😁😍ये गाना ग प्लीज प्लीज आज कीती तरी दिवसांनी आली आहे मी प्लीज 😚🤗

आई हसू आवरत हो ग मति तू अशी बोलायला लागलिस ना कि मला ती लहान मति आठवते शाळेत जाणारी आणि मला शाळेत सोड़णारी आई 😋😍...

मतिने आईला गैलरीपाशी बसवल.

जणु पावसाचे सुर आईच्या सूरत मिलिन होऊन मैफिल रंगल्याच भासत होत.. आणि त्या भर पावसातही ती वेल ताठा उभी होती💕..

अक्षता माने.


नमस्कार मातृभार्ती ! लिखाणाची ही पहिलिच वेळ आहे माझ्या लिखाणाबद्दल मला नक्की सांगा .आशा आहे ही तूम्हाला कथा आवडेल .

इतर रसदार पर्याय