आकर्षण Tulisa द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आकर्षण

आकर्षणाची गम्मतच वेगळी आहे .माझ्या मते तर या आकर्षणामुळे खरं तर माणसाला जगण्याची आस राहते.एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्याला आकर्षण असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण काहीही करू शकतो आणि जर त्या गोष्टीचं आकर्षण कालांतराने संपलं तर ती गोष्ट आपल्याला तितकीच नकोशी असते...

अशाच माझ्या एका आकर्षणाची गोष्ट जी आयुष्यभर माझ्या लक्षात राहील...मी एका छोट्याशा गावातली गावंढळ मुलगी पण मला माझं गाव अजिबात आवडत नव्हतं मी लहानपणी कधीतरी आमच्या दूरच्या नातेवाईकांकडे राहायला गेले होते तेव्हापासूनच शहराची ओढ लागलेली तिथली श्रीमंती, तिथे रस्त्यावर नटून सजून जाणाऱ्या लोकांची गर्दी त्यांची सगळी जीवनशैलीच मला फार पटायची .ज्या गोष्टी गावाकडे फार फार कष्ट करून मिळायच्या त्या शहरात फार सहज रीतीने मिळायच्या .माझं शहराविषयी फार आकर्षण आणि एकच स्वप्न शहरात येवून राहायचं...

तशी मी गवतातल्या गावंढळ पोरिंमधली एक नव्हते पण माझ्या बऱ्यापैकी मैत्रिणी होत्या .दिवसभर त्यांच्यासोबत दिवसभर शेतात,गावात फिरायच मजा करायची घराची काम आणि थोडासा अभ्यास .अभ्यासात मी फारशी हुशार नव्हते पण बऱ्यापैकी गुण मिळायचे यातच मी आणि आई फार खुश असायचो वडील तर लहानपणीच गेले होते पण त्यांची फारशी चांगली आठवण नाही माझ्याकडे कारण बऱ्याच वेळा ते आईला रागवायचे म्हणून मी त्यांच्यासोबत बोलत नसायचे...

मी तशी दिसायलाही फार देखणी होते आणि आता तर तारुण्यात माझं रूपही फार उठून दिसायचं गावात माझ्या दिसण्याचही फार कौतुक व्हायचं गावाची पोरं तर सारखी माग लागलेली पण मी त्या पोरांकडे लक्षही देत नसू .मी दिसायला जशी सुंदर तशी मला नटून सजून कायम राहायला आवडायचं .माझ्या आईला माझी खूप काळजी असायची पण मी तिला कधीही काळजीत राहू द्यायची नाही मी तिला सारखी हसवायला लावायचे कारण बाबा गेल्यापासून तिने मला कधीही त्यांची आठवण होवू दिली नाही मला जे पाहिजे ते सर्व द्यायची फार जीवही लावायची तशी मीसुध्दा तिला बऱ्यापैकी मदत करायचे कामात.माझी आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती तिच्याशिवाय माझं कुठेच मन नव्हतं लागत .अशी माझी खेड्यातली जीवनशैली पण मी समाधानी कधीच नव्हते कायम काहीतरी कमी पडतंय अस वाटत राहायचं...

पण आता मात्र सगळं बदलणार होते.आणि शेवटी तो दिवस आलाच - माझ्या चुलत आजोबांचं अचानक निधन झालं आणि मैतीला लांब लांबचे नातेवाईक येवू लागले मी सगळ्याला मैत झाल्यावर चहा देत होते आणि अचानक माझी नजर एका ठिकाणी खिळून राहिली पण मी परत चहा द्यायला सुरुवात केली .तो खूप सुंदर होता माझ अख्खं गाव पालथं घातलं तरी असा मुलगा सापडणे शक्य नव्हतं .मी काही विचारण्याच्या आतच आई म्हणाली तूझे दाजी आहेत खूप मोठे व्यावसायिक आहेत ते तू लहानपणी गेली होतीस ना त्यांच्या घरी आपल्या गावातही काहीतरी करायचे आहे असे म्हणत होते मग आजोबांचं अस झाल म्हणून गावाला आले आहेत उद्या परत येणार म्हणताहेत जमीन बघायला.सध्या तरी आईला फक्त ह म्हणून उत्तर देत होते पण मनातून मला उकळ्या फुटत होत्या आजोबा गेल्याच दुःख तर विसरूनच गेले पण माझ्या मनासारखा मुलगा पाहून खूप आनंदात होते.त्यादिवशी मी नीट झोपले सुद्धा नाही दुसऱ्या दिवशीची वाट बघत राहिले....

शेवटी उजाडला तो दिवस मी सकाळी आवरून मैत्रिणीकडे निघाले होते इतक्यात आवाज आला - गितली आणि मी समोर पाहिले बघते तर काय इतक्या भारी चारचाकितून तो पहिला मला तर हे स्वप्नच वाटायला लागलं मी म्हणाले तुम्ही मला ओळखता? तो म्हणाला कसा नाही ओळखणार लहानपणी खूप त्रास दिलाय तू मला .मी मनातून तर खूप खुश होते पण परत त्याला महणाले मी नाही ओळखलं तुम्हाला तो म्हणाला ओळखशील लवकरच .पण या छोट्याशा संभाषणातून मला एवढ तर कळत होते की आमची खूप वेळ नजरानजर होत होती आणि मी तर त्याच्यावरून नजरच हटवू शकत नव्हते.तो घरात आला आईने त्याला चहा दिला आणि आई मला म्हणाली येशील का आमच्यासोबत यानला रान दाखवायचं आहे या सगळ्यामध्ये मी मैत्रिणीला विसरूनच गेले . आईच्या बोलण्यावरून मला त्याचं नाव अविनाश आहे हे कळलं .रान दाखवून झाल्यावर अविनाश म्हणाले ही राईट जागा आहे बिझनेस साठी आणि मी परत येईल कधीतरी पक्क करायला मी निघतो आता मामी .पण आईने त्याला जेवण करायलाच लावलं जेवण झाल्यावर आई भांडे खासायला गेली आणि आम्ही दोघेच घरात होतो तेव्हा त्याने मला विचारलं काय करतेस सध्या मी म्हनाले बी एस सी च्य दुसऱ्या वर्षाला आहे .तुम्ही इथे बिझनेस करायचं म्हणताय का अविनाश तो म्हणाला तू मला अविच म्हण.आणि अशाच गप्पा सुरू झाल्या...

असेच अविनाश येत राहिले कामासाठी आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या आम्ही एकमेकांचे बऱ्यापैकी मित्र झालो .मैत्रीसोबत हळूहळू जवळीक वाढायला लागली .एकदा अविनाश म्हणाला पण होता लहानपणी नव्हती इतकी सुंदर दिसत यावरून मी समजून घेतलं की त्याला मी आवडते. शेवटी एकदा अविनाश म्हणाला माझ्यासाठी आईने एक स्थळ आणलाय फक्त माझीच मंजुरी बाकी आहे .मी म्हणाले काय सांगणार तू आईला तो म्हणाला - आईला सांगणार माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे .मी विचारलं कोणत्या ते म्हणाले गीतली आणि मला काहीच सुचेना मी काहीच न बोलता तिथून निघाले तरी जाता जाता तो मला म्हणाला उद्या मला उत्तर पाहिजे...

मी घरी जाऊन खूप विचार केला आणि मी ठरवल जर माझं शहराच स्वप्न पूर्ण होत असेल तर मी अविनाश सोबत लग्न करीन आणि दुसऱ्या दिवशी मी अविनाशला भेटायला निघणार तोच अविनाश समोर त्याच्या आई वडीलानला घेवून आणि मला काही कळायच्या आत ते आईकडे गेले आणि लग्नाची मागणी केली आई म्हणाली हे तर आमचं भाग्यच आहे पण माझ्या मुलीला विचारून आम्ही लवकरच निर्णय कळवू .आत्याला सुद्धा मी आवडले होते हे पण कळताच होत.आईने ते गेल्यावर मला विचारलं तुला हे लग्न करायचय का नाही माझं उत्तर नाही असावं हे आईला वाटत होत कारण आईला वाटायचं गावातल्या गावात माझं लग्न झालं तर मी आईपासून दुरवणार नाही .पण माझ्या मनात भलताच चालू होत ...

माझं खरं तर अविनाश वर प्रेम नव्हतं पण माझं शहाराच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविनाश ही फक्त पायरी होती त्याला माझ्या प्रेमात पडण्यासाठी मी कितीतरी प्रयत्न केले होते .पण आईच मन कसं मोडू पण घेतला शेवटी एकदाचा निर्णय आणि आईला सांगितलं माझं अविनाश वर खूप प्रेम आहे आता आईही काही बोलू शकत नव्हती .असच थाटामाटात आमचं लग्न झालं आणि मी आले एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून...

माझं आयुष्य अगदी मला पाहिजे तस चालू होत पण मला माईची खूप आठवण येत असत अधून मधून पण काहीच करू शकत नव्हते मी . अविनाश माझी खूप काळजी घ्यायचे म्हणून मला अविनाश आता खरंच खूप आवडायला लागले होते. माझं आयुष्य मला जस पाहिजे तसच चालू होत अगदी तोपर्यंत जोपर्यंत लीना अविनाश ची सेक्रेटरी येणार होती माझ्या आऊष्यात...

लीना दिसायला फार सुंदर होती आणि हुशार सुद्धा अविनाश आणि तिची मैत्री लवकरच झाली .आता अविनाश घरी उशिरा यायला लागले माझ्याशी तोडून वागायला लागले आमची भांडणं व्हायची सारखी सारखी.आता मात्र मी खचून गेले आईच्या गळ्यात पडून खूप रडव वाटायचं पण काय करणार हे सगळं माझ्यामुळेच झाल होत .आता धीर देणाऱ्या त्या सगळ्या मैत्रिणी आठवायला लागल्या ती गावाकडची साधिभोली माणसं सगळ डोळ्यासमोरून जात होत...

शेवटी अविनाश म्हणाले मला तुला दुखवायचं नाही पण माझं लीनावर खूप प्रेम आहे पण आता तू म्हणशील तसच होईल मी तिला सोडून देईल कारण मी तुला आयुष्यभर सुखात ठेवणार अस वचन घेतलंय.मलाही अविनाश ची परिस्थिती समजत होती त्याचं माझ्यावरच आकर्षण संपलं होत आता मला ठरवायचं होत काय करायचं . मी खूप विचार केला आणि...

मी माझ्या गावाकडे चालले आहे बाग भरून अविनाश मला सोडवायला आलेत अविनाश माझ्यावर खूप खुश आहेत आणि मला म्हणत आहेत तुझ्यावर मी प्रेम केलं ती माझी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी माझ्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतलाय मी आईकडे कायम राहणार आहे .मी अविनाश ला सगळं सांगितलंय पहिल्यापासून .अविनाशने मला समजून घेतल आहे आणि ते लीनासोबत लग्न करणार आहेत आता. माझी आई मला समजून घेईल का नाही हेही मला माहित नाही गावातले काय म्हणतील याचीही कल्पना नाही पण मी खुश आहे कारण मला कळले आहे की माझं खरं प्रेम काय आहे ते माझी आई ,माझं गाव आणि गावातली गावंढळ माणसं . माझं मनही आता पूर्ण समाधानी आहे कोणत्याच गोष्टीच काहीच वाटत नाही मला आणि त्या आकर्षण च कौतुक वाटतं त्याने दाखवून दिलं मला माझं खरं प्रेम....