संघर्षमय ती ची धडपड #०२ Khushi Dhoke..️️️ द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्षमय ती ची धडपड #०२

 

ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहचतात...... शिवाजी काउंटरवर फिस जमा करतो...... नंतर दोघेही ऑपरेशन थिएटरकडे वळतात.... जिथे सवितावर उपचार सुरू असतात...... शिवाजी खूप काळजीत असतो..... राम त्याला धीर देतो.....

 

राम : "काळजी नको करुस रे..... सगळं ठीक होईल बघ....�... हे देवा वाचव वहिनी आणि बाळाला.....��"

 

काही वेळ असाच जातो..... नर्स आत - बाहेर, येत - जात असतात..... शिवाजी विचारायचा प्रयत्न करतो... पण, सगळे त्यांच्या कामात असल्याने, कुणी काहीच सांगत नाहीत..... वेळ जाता - जाता तब्बल चार तास होत आलेले असतात.... हे चार तास शिवाजीला चार वर्षासारखे भासतात..... होणारच ना राव.... आपली बायको ऑपरेशन थिएटरमध्ये असल्यावर कुठला नवरा शांत बसतो....! आणि सविता आता इतक्या वर्षांनी आई बनणार म्हटल्यावर, काळजी तर असणारच ना.....�

 

चार तासांनी बाळाच्या रडण्याची किंकाळी ऐकु येते आणि शिवाजीची तंद्रि तुटते......������

 

नर्स छोटू बाळाला घेऊन बाहेर येते.....�

 

नर्स : "सर..... आपल्याला मुलगी झालीय.....☺️☺️ अभिनंदन......☺️��"

 

शिवाजी आणि राम खूप खुश होतात..... दोघेही जाऊन नर्स जवळ थांबतात...... आणि त्या छोटुशा मुलीकडे बघतच बसतात......� नर्स, परीला त्याच्या कडे देते..... शिवाजी तिला डोळे भरून बघतो......� आणि काळजीत नर्स कडे बघतो.......���

 

नर्स : "काळजी नका करुत, मॅडम अगदीच ठीक आहेत......☺️☺️"

 

हे ऐकुन शिवाजीच्या जीवात - जीव येतो...... आणि तो परत आपल्या छोटू मुलीकडे प्रेमाने बघतो......☺️�☺️�☺️�

 

थोड्या वेळानंतर नर्स बाळाला घेऊन आईकडे जाते.... दोघे बाहेर देवाजवळ प्रार्थना करून त्याचे आभार मानतात.....☺️�

 

राम यशवंतला कॉल करून बोलावून घेतो..... थोड्याच वेळात यशवंत आणि त्याची बायको अवंती तिथे येतात..... यशवंत बातमी ऐकुन खूप खुश होतो......☺️☺️

 

यशवंत : "अरे वाह...... लेक झाली..... आता तर शिवा तुझी चिंताच मिटली रे..... कारण, मुलगी नशीब असणाऱ्यांच्याच पदरात टाकतो देव....... कमावलस तू......☺️☺️"

 

अवंती : "हो ना भाऊजी...... आम्हाला बघा अजूनही आम्ही ओंजळ घेऊन आहोत......... पण, आमच्या पदरी देवाने मुल दिलं नाही......����"

 

यशवंत : "रडू नकोस....��"

 

शिवाजी : "अहो वहिनी अस रडून कस होणार.... नाही ना यशला बर वाटणार ते..... आधी शांत व्हा तुम्ही..... आणि माझी लेक तुमचीही लेकच ना...कशाला काळजी करता हवं तर घेऊन जात जा की तिला.....हो पण, फक्त दीड वर्षे ती इथे असेल.... नाही म्हणजे, त्याच काय ना दीड वर्षानंतर ती तिच्या आजोडी जाईल...... कारण, तिच्या मामांनी आधीच बुकिंग केलीय आपल्या भाचीची...... तोपर्यंत खेळवू आपण सगळे मिळून.... नाही का.... तुम्ही अशा निराश नका होऊ, म्हणजे झालं.....☺️☺️☺️"

 

यशवंत : "अरे का नाही..... बेबी आमचीही असेल की.....☺️☺️ मग शिवा काय ठरवलं नाव बेबीच.....☺️☺️"

 

शिवाजी : "तिला बघताक्षणी, ती मला थंड स्वभावाची वाटली..... म्हणून, ठरवलं तिचं नाव मी शितलच ठेवणार...... माझी गुणाची लेक....☺️☺️"

 

राम : "काय भावा काय मस्त जमवलं तू... आपली बच्ची आहेच शांत अगदी माझ्यावर गेलीय.....����"

 

यशवंत : "हो फक्त एक गुण नसेल तिच्यात....����"

 

राम : "...������"

 

सगळे : "...�������"

 

अवंती : "अहो भाऊजी ते मजा घेतात ना..... काय हो प्यायच कधी सोडणार तुम्ही.....��"

 

शिवाजी : "हे बघ आता वहिनी ही बोलतात म्हटल्यावर सोडावच लागतंय भावा.....�"

 

राम : "बस का वहिनी तुम्ही काही ऑर्डर दिलेली मी ऐकली नाही..... अस झालंय का कधी...??��"

 

यशवंत : "ही ऑर्डर ऐकायला काही जास्तच उशीर नाही का लावला तू.....??"

 

राम : "ये भावा.... आता तू लगेच कुठं आलाय आपली टोचणी घेऊन.... थांब ना जरा.... प्रयत्न करतोय अरे.... पण, होतच नाही बंद... विचार करतोय नशा मुक्ती केंद्र जाऊन प्रयत्न करू..... काय वाटतं तुला.....�"

 

यशवंत : "हे बघ भावा आपल्या व्यसनामुळे जर कुणाला त्रास होत असेल..... तर, ते असतं आपलं कुटुंब...... त्यांच्यासाठीच आपण इतकी मेहनत घेतो ना.... मग त्यांना जर आपल्या पिण्यामुळे त्रास असेल तर का नाही सोडत आपण हे व्यसन.....?? आणि नशा मुक्ती केंद्र हे काही वाईट पर्याय आहे..... अस मला तरी वाटत नाही.....��"

 

शिवाजी : "हो ना..... त्यात काय.... जा तू राम होईल सर्व नीट........ सुटेल तुझीही.....�"

 

राम : "हो जाईल नक्की...."

 

सगळे चेहऱ्यावर एक सुखद....... समाधानी हास्य घेऊन असतात..... तिकडून नर्स येते.....

 

नर्स : "सर मॅडम आणि बाळाला जनरल वार्डमध्ये शिफ्ट केलंय आपण त्यांना बघू शकता..... हो पण, गोंधळ नको तुमची छोटी परी झोपलिये.....��☺️"

 

नर्स निघून जाते...... सगळे सविताकडे जायला निघतात...... आत परी पाळण्यात शांत झोपलेली असते......आणि सविता तिला खूप प्रेमाने न्याहाळत असते......��

 

शिवाजी सविता शेजारी जाऊन बसतो......

 

शिवाजी : "कशी आहेस..... कस वाटतंय आता तुला.....��"

 

सविता : "अहो मला काय झालं..... तुम्ही असताना, मला काही होऊ देणार का.☺️.....?"

 

अवंती आणि यशवंत एकमेकांकडे बघून सुखावतात.... कारण, त्यांचही एकमेकांवर असच प्रेम असतं....

 

शिवाजी : "ऐक ना ह्या आपल्या वहिनी आणि हा यश, राम आणि माझा मित्र...☺️☺️"

 

सविता : "ह्यांना कधीच बघितलं नाही हो आजवर.....�"

 

शिवाजी, सविताला घडलेला सगळा प्रकार जशास - तसा सांगतो...... तिला खूप काळजी वाटते.... पण, तो तिला समजावतो...... तेव्हा ती शांत होते.....�"

 

अवंती सविताजवळ येऊन बसते आणि शिवाजी यशवंत जवळ जाऊन उभा रहातो.....

 

अवंती : "सविता तू नको ग काळजी करू..... भाऊजिना काहीही होणार नाहीये......☺️"

 

सविता : "तुम्ही सगळे असलात की, मी कशाला काळजी करणार ताई.... नाही का.....☺️"

 

सगळे सुखावतात......☺️☺️�

 

तोपर्यंत आपली परी उठलेली असते...... तिला भूक लागली हे ती तिच्या किंकाळीतून पूर्ण हॉस्पिटलला सांगत असते....�� किती निरागस असतात हे छोटू पिल्ले...... त्यांचा रागच येत नाही कुणाला...... न कुठलं स्वार्थ न कुणा विषयी मनात वाईट भावना.....���

 

सविता, परीला Breast feeding करणार..... म्हणून, तिघेही रूम बाहेर थांबतात......

 

शिवाजी : यश ती गुंड कोण होती...��"

 

यशवंत : "शिवा मला वाटलच तू हे विचारणार..... ये बस मी सांगतो सगळं......�"

 

तिघेही बसतात......यशवंत सांगायला सुरुवात करतो....

 

यशवंत : "खूप जुनी शत्रुता आहे ही��...... माझ्या बाबांना दोन बायका होत्या.... मी त्यातील, पहीलीचा..... दुसऱ्या बायकोला, एक मुलगा...... बाबांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी मलाच दिली... कारण, त्या माझ्या सावत्र भावाने, पप्पांना जिवे मारण्याचा कट रचला होता..... आणि त्यांनी तो हाणून पाडला...... तेव्हापासून, त्याला घराबाहेर काढलं होतं... त्या इंसिदेंट नंतर त्याची आई आणि माझी सावत्र आई आम्हा सगळ्यांना सोडून गेली..... तिला तिच्या मुलाला या प्रवृत्तीमध्ये कधीच बघायचे नव्हते...... पण, हा असा कसा झाला हे एक कोडच आहे, अजून तरी..!!... आता इतक्या वर्षांनी तो माझ्या मागावर आहे... त्याने आज केलेला पहिलाच हल्ला नव्हता..... याआधीही केलेत.... पोलिसांना तक्रार करूनही सुटतो तो.....� मीच माझी काळजी म्हणून, सेफ्टी जॅकेट घालून असतो..... कारण, बुलेट आत घुसू नये..... आता पुढे बघू, देवाला काय मान्य आहे....��"

 

शिवाजी : "यश तुझ्या मागे इतके सगळे टेन्शन आणि तू इतका फ्री माईंड...... मानलं भावा तुला..... आणि बघ ना, पैशांसाठी आपलेच - आपल्या जीवावर उठतात...... काय ते नातं पैशाच्या हावापोटी स्वतःच्या बापाला न सोडणारे ते मुलं..... काय हे युग आलंय देवच जाणो......��"

 

यशवंत : "कोण असा विचार करतो रे..... आपली मुलं ह्या वळणावर जावीत....... पण, माझा सावत्र भाऊ खूपच वाईट प्रवृत्तीचा निघाला.... बालपणी त्याला काय राग होता माझ्याविषयी माहित नाही....... तो सतत मला रागातच बघत असायचा...... आणि एकदा तर...... मला डोक्यात दगड घातला त्याने.....का तर म्हणे, मी त्याच्या हिस्स्यावर डल्ला टाकतोय..... अरे हे त्याला त्याचा मामाच शिकवायचा..... त्याच्या मामाचा डोळा बाबांच्या प्रॉपर्टी वर आधी पासूनच होता....... म्हणून, आपल्या बहिणीचे स्थळ घेऊन आला....आणि लाऊन दिलं लग्न... त्यानंतर मात्र आमच्या घराची शांतीच भंग झाली....��"

 

शिवाजी : "काय ही लोकांची मानसिकता....... दुसऱ्यांच्या संपत्तीवर कसल्या नजरा टिकवून बसतात..... आळशी कुठले..... स्वतः कमवायला काय होतं......�� जाऊदे आता आम्ही आहोत....... तुझ्यासोबत नेहमी.....���"

 

यशवंत : "हो रे भावांनो......��"

 

तिघेही एकमेकांना मिठी मारतात......आणि सुखावतात.....��

 

क्रमशः