Her struggle # 05 books and stories free download online pdf in Marathi

संघर्षमय ती ची धडपड #०५

 

दुसऱ्या दिवशी यशवंत आणि अवंतीचा दाहसंस्कार करण्यात येतो...... त्या वेळी तिथे यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याच्यासोबत वकील उभे असतात...... सगळा विधी पूर्ण पार पाडून, जो - तो आपापल्या घरी निघून जातो...... शिवाजी, सविता, यशवंतचा सावत्र भाऊ आणि त्याचा वकील सगळे हॉलमध्ये बसले असतात.....

 

रघुनाथ : "पटकन काय ते बोल लॉयर माझ्याकडे वेळ नाही..... अनोळखी लोकांसोबत बसायला.....�"

 

ठोंबरे : "हो सर ह्या काही प्रोसेस आहे त्या पूर्ण केल्या म्हणजे, आपल्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी झालीच म्हणून समजा......"

 

शिवाजी : "...������"

 

रघुनाथ : "असा काय बघतोस...... ही प्रॉपर्टी माझीच आहे ना..... मग?? आणि आता तर तो ही मेला मग ही माझी प्रॉपर्टी झाली ना.... तुला अस बघायला काय होतंय....��"

 

शिवाजी : "हेच बघतोय की, माणसं प्रॉपर्टीसाठी इतक्या खालच्या पातळीची भाषा कशी वापरतात.....!��"

 

रघुनाथ शिवाजीवर धावून जातो.....

 

रघुनाथ : "जरा तोंड सांभाळ.... नाहीतर, इथच जिता गाढतो....��"

 

वकीलासोबत दोन कॉन्स्टेबल आलेले असतात ते रघुनाथला धरून बाजूला करतात.....

 

शिवाजी : "तुझ्याकडून अपेक्षाच कुठली ठेवायची नाही का....!! अरे स्वतःच्या बापाच्या जीवावर उठणारा तू.... छी!! लाज वाटतेय मला.....���"

 

रघुनाथ : "अरे निघ आयत्या बिळात नागोबा...... फुकट रहायला आणि गिळायला काय जातं..... म्हणे, बापाला गिळणारा......��� माझा बाप होता तो समजल.... आणि आता ही प्रॉपर्टी माझी आहे.... निघ इथुन.... �"

 

तो त्यांचे सामान बाहेर फेकून देतो..... आणि नाईलाजास्तव त्यांना ते घर सोडून जुन्या घरी यावं लागतं.....

 

तर, मित्रांनो कधीच कुठल्याही परिस्थिती मध्ये स्वतःला कंफर्टेबल फील करवू नये..... कधीही कुठलीही परिस्थिती आली तर, तिचा सामना आपल्याला करता यायला हवा..... आता इथून पुढे सुरू होईल आपल्या परी म्हणजेच, आपल्या कथेतील नाईका, शितलची खरी संघर्षाची कहाणी.......�

 

शिवाजी आणि सविता दोघे घरी परतलेले बघून शेजार - पाजारी नको ते बोलू लागले.....

 

कांताबाई : "बघा तरीही आम्ही बोललोच होतो..... कोणी खपवून घेत नसतं..... पण, काय जातं यांना.... फुकट रहायला, खायला मिळालं गेले...... दोन दिवस श्रीमंत होऊन, परत फाटकं जीवन..!� काय त्याला अर्थ..... त्यापेक्षा इथच असते तर, काय होत होतं........ आम्ही राहतच नाही का.... आम्हाला तर किती आमचे नातेवाईक म्हणतात.... पण, आम्ही अःह.... आणि हे बघा घेतली धोपटी आणि निघालं बिराड घेऊन...���"

 

ह्या होत्या कांताबाई...... शिवाजीच्या शेजारीण... नेहमीच कुणाही विषयी हाच गलिच्छपणा त्यांच्या तोंडी असायचा..... पण, मला अस वाटतं..... कुणी काहीही करो हे त्यांचं आयुष्य असतं..... नाही का?...... आपण कोण त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगणारे.....� मी तर म्हणेल, माणसाने अंक रेषेच्या अतिडाविकडे वा अतिउजविकडे कधीच असू नये...... त्याने नेहमीच शून्यावर स्थिरावे.... कारण, शून्य वास्तववादी व्यक्तिमत्त दर्शवते.... त्याऐवजी, अतिडावी आणि अतिउजवी बाजू अनुक्रमे, नकारात्मक आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व दर्शविते.... अर्थात डावी बाजू ही नेहमीच अतिनिरुत्साही तर, उजवी बाजू नेहमीच अतिउत्साही असल्याचे जाणवते...

अर्थात "अती तिथं माती" ही म्हण आपल्यासाठी नवीन नाहीच....☝️

 

कांताबाई चे ते शब्द ऐकून शिवाजीने स्वतःचा दार बंद करून घेतला......��

 

सविता : "कधी पर्यंत असाच दार लोटायचा.....?? कधीतरी आपल्याला बाहेर पडून, चार पैसे कमवावे लागतीलच ना......��"

 

शिवाजी : "मी काय म्हणतो सविता...... आपण एक छोटं कॅफे टाकलं तर कस राहील..... दोघेही मिळवून सुरू करू...... परी तशीही मामाकडे असेल..... तर, आपल्या दोघांना ते सोपं पडेल नाही का....��"

 

सविता : "मला काहीच प्रॉब्लेम नाही.... उलट काही न करण्यापेक्षा आपण दोन पैसे काही विकून, मेहनतीने कमावलेले बरे.... नाही का!!��"

 

शिवाजी : "ठरलं मग..... उद्यापासून सुरु करुया.... कारण, जितकं लवकर केलं, आपल्याला बर पडेल.... काय म्हणतेस.....��"

 

सविता : "हो ना....☺️☺️"

 

शिवाजी, सविताला प्रेमाने मिठीत घेऊन परीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो....... आणि थोडा वेळ दोघेही परीकडे बघून सुखावतात....... कारण, त्यांची परी देवाच्या कृपेने सुखरूप असते..... ��

 

शिवाजीचा फोन वाजतो......�

 

शिवाजी बघतो......� तर, तो लँड लाईन वरून असतो....... शिवाजी फोन उचलतो......

 

शिवाजी : "हॅलो....... शिवाजी बोलतोय.... आपण कोण बोलताय....??��"

 

@@@ : "हॅलो साहेब पोलीस स्टेशन मधून बोलतोय..... यशवंत मर्डर मिस्ट्री विषयी बोलायला आपल्याला याव लागेल...... लगेच या कारण, साहेबांनी तसं सांगायला सांगितलंय....."

 

शिवाजी : "धन्यवाद साहेब...���� खूप उपकार झालेत..... लगेच निघतोय....��"

 

फोन ठेऊन तो सविताला ही बातमी देतो....

 

सविता : "..��कुणीही असला ना.... तरी, सोडू नका म्हणावं.... चांगली शिक्षा द्या..... आमच्या देव माणसाला जीवाने मारलंय ना..... तशीच कठोर शिक्षा त्याला होऊ देत......�"

 

शिवाजी तिला मिठीत घेऊन शांत करतो .....

 

शिवाजी : "तू काळजी घे चल..... येतो मी.....� काही खाऊन घे मी बाहेर खाऊन घेईल....�"

 

शिवाजी स्टेशनला निघून जातो...... स्टेशनमध्ये तपास ज्यांच्या अखत्यारीत सुरू असतो..... ते पोलीस उप - अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक साहेब केबिनमध्ये बसले असतात..... केस विषयी त्यांच्यात बातचीत सुरू असते.......

 

शिवाजी : "सर, परवानगी असेल तर येऊ का....?�"

 

शेख : "या शिवाजी..... बसा...."

 

शिवाजी : "सर ते....... यशविषयी काय माहिती.....��"

 

शेख : "सर्व सांगतो शिवाजी..... आधी पाणी घ्या...."

 

शिवाजी खूप घाबरला असल्याने, पाणी पिऊन शांत होऊन बसतो..... पोलिस सांगायला सुरुवात करतात.......��

 

शेख : "शिवाजी आपण गोपीनाथ नखाते याला ओळखता का...??"

 

शिवाजी : "हो साहेब, तो आधी यशचा ड्रायव्हर होता आणि काहीच दिवसांनी तो बेपत्ता झाला तो कायमचा.... पण, साहेब आपण हे सर्व.....�"

 

शेख : "सांगतो.....� त्यानेच कट रचला ह्या सगळ्या खूनाचा..... त्याच झालं अस की, तो बेपत्ता नव्हता..... तो याच शहरात राहून यशवंतरावांच्या मागावर होता...... त्यांना फोनवरून धमक्या द्यायचा...... खंडणी मागायचा..... पण, त्यांनी तसं करण्यास वेळोवेळी नकार दिल्याने तो आणखीच चिडला..... आणि तो अस फक्त पैशांसाठी करायचा अस प्राथमिक तपासात समोर आलेलं........ पण, जेव्हा खोलात जाऊन तपास केला तेव्हा मात्र वेगळीच माहिती हातास पडली..... ती म्हणजे, त्याने त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला अस तो म्हणाला....."

 

शिवाजी : "....�� वडिलांच्या मृत्यूचा बदला...��"

 

शेख : "त्याच्या आधी त्याचे वडील यशवंरावांच्या वडिलांकडे कामाला होते..... यशवंतरावाच्या सावत्र भावाने आपल्याच वडिलांना संपवण्याच्या उद्देशाने, जो काही प्लॅन केला त्यात गोपीनाथचे वडील संपले...... त्याचाच बदला म्हणून त्याने, यशवंतला संपवण्याचा कट रचला...... कारण, यशवंतचे वडील नैसर्गिकरित्या वारले..... त्यामुळे, गोपीनाथचा तो प्लॅन हुकला व म्हणून, त्याने यशवंतला कुठल्याही परिस्थितीत संपवण्याचा प्रण घेऊन, हे कृत्य केले........ तो हे सर्व करताना स्वतःची ओळख लपवून होता...... पण, काल जेव्हा त्याने या दोघांचा जीव घेतला आणि शेवटी स्वतःचा चेहरा त्यांना दाखवून, तिथून निघत होता....... तेव्हा तोच चेहरा, शेजारील व्यक्तीने लपून बघितला....... ज्याचा स्केच आम्ही, काल बनवून घेतला होता...... स्केच नुसार, त्याला आज ताब्यात घेतले..... त्याने स्वतःच्या कृत्याची सगळी कबुली दिलीय..... त्याला यावर कसलाच पश्चाताप नाही..... त्याने जे केलं ते योग्यच होते अस तो ओरडून आत्मविश्वासाने सांगतोय..�....."

 

शिवाजी : "कसला काळ आलाय साहेब...... गुन्हा करून लोकांना त्याच काहीच वाटत नाही.... मग यात कायदाही हतबल होतो आणि कायद्याचे रक्षण करणारे सुद्धा...... गोपीनाथ सारखे विकृत कमी नाहीत साहेब...... माझ्या देव माणसाला गिळलय त्याने......�� चांगली शिक्षा करा..... पुन्हा अस काही करण्याचा विचारही तो करणार नाही.....��"

 

शेख : "शिवाजी तुम्ही नका काळजी करू.... आता तुम्ही शांत राहून स्वतःच कुटुंब सांभाळा.... आम्ही गोपीनाथ ची मेहमान नवाजी करतो....��� या तुम्ही....���"

 

शिवाजी घरी जायला निघतो..... मात्र, त्याच्या डोक्यात हेच विचार सुरू असतात...... तो एका जागी शांत बसतो..... एक पाण्याची बॉटल विकत घेतो..... पाणी पितो आणि विचार करतो......

 

शिवाजी : "का ही मानसिकता इतकी विकृत बनते.....��� काय केलं होतं यशने...... बिचारा नेहमी सगळ्याची मदत करायला पुढं असायचा.....�� हाच दोष असतो खूप लोकांचा की, ते नेहमीच दुसऱ्यांचा चांगला विचार करतात...... आणि नेहमीच मदत करण्यास तत्पर असतात...... आणि मग लोकांची शत्रूता विकत घेतात......�� यशच्या आत्म्याला शांती मिळो......��"

 

तो काही वेळ तसाच बसून रहातो...... नंतर घरी जायला निघतो....... घरी येऊन सविताला सगळी घटना सांगून टाकतो...... सविताला धक्का बसतो....�� तिचे अश्रू अनावर होतात......�� तिला शिवाजी सावरतो आणि उद्यापासून नवीन आयुष्याच्या येणाऱ्या आव्हानांना, हसत सामोरे जाण्याचे वचन मागतो.....

 

आता होणार खऱ्या संघर्षाला सुरुवात.....���

 

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED