स्त्री gauri द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्त्री

स्त्री ......
आज घरात खूप आनंदी वातावरण होत .कारण ही तसंच होत मधुसूदन आणि राधा च्या आयुष्यात नवीन पाहुण्याचं आगमन होणार होत ..मधुसूदन तर अगदी कानात जीव आणून डॉक्टर येण्याच्या प्रतीक्षेत होता ..कधी एकदा आपल्या प्रिय राधेला आणि नवीन जीवाला भेटतो असं त्याला झालं होत...थोड्यावेळातच नर्स ताई आल्या आणि मधुसुदनच्या हातात कपड्यात गुंडाळलेला इवाला जीव ठेवत त्याच अभिनंदन करत म्हणाल्या लक्ष्मी आली तुमच्या घरी......मधुसूदन अगदी भान हरपून आपल्या लेकीला न्याहाळू लागला ....त्याचा आनंद आपोआप डोळ्यातून गालावर ओघळला ....त्याच्या घराचे सर्व मंडळी एव्हाना हॉस्पिटल मध्ये पोहचले होते....सर्वजण आनंदी होते पण मधुसूदन ची आजी आणि आई थोड्या हिरमुसल्या होत्या ..त्यांना आपल्या नाती पेक्षा नातवाची आस लागली होती ...बाळाला घेऊन मधुसूदन राधेला भेटायला तिच्या रूम मध्ये गेला ..राधाही आई झाल्यामुळे खूप सुखावली होती ...बाळाला जवळ घेत शांत डोळे मिटून तृप्त झाल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती...मधुसूदन तिला म्हणाला राधा आपल्या आयुष्यात ऊर्जा आली आपण हिचे नाव ऊर्जा ठेऊया .....आणि झालं ही तसंच चिमुकल्या ऊर्जाच प्रवास सुरु झाला ....ऊर्जा हळूहळू मोठी होऊ लागली तशी ती सर्वांचीच ऊर्जा बनून सर्वांना आनंदीत करू लागली ... ऊर्जा आज कोणाचीतरी मुलगी होती ,कोणाचीतरी नातं होती, कोणाचीतरी बहीण होती आणि प्रत्येकाला ती त्या नात्यातून आनंद देत होती ....बघता बघता दिवस वाऱ्यासारखे उडून गेले ....ऊर्जा आता तारुण्यात आली होती तीच रूप तिच्या आंतरिक ऊर्जेने अजूनच खुलू आले होते ....घरात तिच्या लग्नाची बोलणी होऊ लागली ....सगळं कसं विधिलिखित असल्या प्रमाणे घडत गेले ....आणि ऊर्जाचा नवीन प्रवास पुन्हा एकदा नव्याने चालू झाला ...आता ती बायको ,सून ,भावजय म्हणून नवीन नात्यात ऊर्जा बनून मिसळू लागली ....थोड्याच दिवसात ती आई म्हणून आपल्या तान्हुल्याला ऊर्जा देत वाढवू लागली....

ही सगळी प्रत्येक स्त्रीची कमी जास्त फरकाने असलेली गोष्ट आहे ..जन्म झाल्यापासूनच तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजाने ठरवून ठेवला आहे ....तिने कोणाशी कसं वागायचं हे सुद्धा समाजानेच ठरवलं आहे ....तिला स्वतःला काय वाटत तिला कोणाशी कसं वागायचं ह्या बद्दल तिला विचार करायला पण आपण वेळ देत नाही .....मुलगी म्हणून आई वडिलांशी कसं वागायचं ,बहीण म्हणून भावंडांशी कसं वागायचं ,बायको म्हुणुन नवऱ्याशी कसं वागायचं ,आई झाल्यावर मुलांशी कसं वागायचं याचे सगळे अलिखित नियम समाजाने स्त्रियांसाठी करून ठेवले आहेत .स्त्री कितीही शिकली ,सावरली ,मोठ्या पदावर कायर्यरत असली तरी सगळी नाती जपायची जबाबदारी तिचीच ...त्यात ती कुठे कमी पडली कि संपलं सगळं मी ती कशी चुकली ह्यबाबतच सगळी बोलणार त्यावेळी ती एक व्यक्ती म्हणून किती चंगली आहे हे कोणीच बघत नाही ...आणि हीच एक मेख आहे कि आपण स्त्रीला कधीच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून स्थान देत नाही ....आपण फक्त प्रत्येक नात्याची गरज म्हणून तिच्याकडे बघतो ....आज ही मुलींचं प्रमाण इतकं कमी होऊन पण ज्यावेळी आपण विचारतो कि मुली कशासाठी हव्या आहेत ? तर उत्तर काय तर आमच्या मुलाला बहीण पाहिजे ,बायको पाहिजे ,आमचा वंश वाढला पाहिजे ....म्हणजे काय तर आमच्या मुलग्याला तिची गरज आहे म्हणून ती आम्हाला पाहिजे आहे .....ह्या शिवाय तिची आम्हाला गरजच नाही...ही आपल्या समाजाची मानसिकता .... ही मानसिकता बदलायला खूप उशीर लागेल इतके वर्ष सुरु असलेलं आणि आपल्या अंगवळणी पडलेले असं अचानक नाही बदलता येणार ...पण त्याची सुरवात तरी झाली पाहिजे ..आणि ती सुरवात आधी स्वतः पासून केली पाहिजे ...उपदेश देणं सोप्प असत पण ते वागण्यात उतरून अंमलात आणायला खूप कमी लोकांना जमतं ..