Shevat Gunhegaricha - 2 books and stories free download online pdf in Marathi

शेवट गुन्हेगारीचा.. - (भाग-२)

आज व्यंकटला पाहिल्यावर राघूभाईला त्याच्यात आपल्या बलपणाची छबी दिसते, एवढा मोठा मॅटर करूनसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे लवलेशही दिसत नव्हते, तो जसा निडर होता त्याप्रमाणेच त्याला व्यंकट वाटला म्हणून त्याला हसायला आले, आपल्या गँगमध्ये एकदम परफेक्ट माणूस त्याला सापडला होता आणि आशा निडर मुलांच्या शोधत तो नेहमीच असतो. व्यंकटची तिथे नीट सोय करण्यात आली त्याला एक रूम, खायला चिकन बिर्याणी आणि तंदुरी देण्यात आली, तो देखील काहीच न घडल्याप्रमाणे बिनधास्त वावरत होता तिथे असलेल्या पंटर लोकांशी ओळख करून घेत होता.
इकडे त्याच्या घरात मात्र खूप गोंधळ उडाला होता कृष्णाला पोलीस घेऊन गेले होते त्यांच्यामागे रमय्या आणि ओळखीतले नातेवाईक पोलीस स्टेशनला पोचले होते, रमय्या रडून रडून हैराण झाली होती तिथून ते नगरसेवकाच्या कार्यालयात पोहचले पण काहीच उपयोग झाला नाही. ज्याच्यावर हल्ला झाला होता तो थोडक्यात वाचला होता जखम मेंदूपर्येंत पोहचली नव्हती, काही वेळापूर्वी शुद्धीवर आला होता, रात्री दहा वाजले होते रमय्या शेजारच्या नातेवाईकांसोबत नगरसेवकाकडून थेट घरी गेली आणि विरुभाईला भेटली, व्यंकटबद्दल विचारले आणि झाला प्रकार त्याच्या कानावर घातला त्यानेही आश्वासन देत तिला म्हणाला "तेरा बच्चा मस्त है, भाई के छत्र छाया मे है, तू टेन्शन मत ले, अभी घर पे जा कल तेरे मरद को भी छुडाने का झुगाड करेंगे" त्याने दिलेल्या आश्वासनाने तिला थोडा धीर आला पण तरीही खूप टेंशन मध्ये होती तिचे नातेवाईक जबरदस्तीने तिला जेवण देत होते पण अन्नाचा एक कणही तिच्या घशाखाली उतरला नाही, ती रात्रभर झोपू शकली नाही, एकीकडे मुलगा कुठे आहे माहीत नव्हते आणि दुसरीकडे नवरा पोलीस स्टेशनला, आता सारी मदार विरुभाईवर होती, सकाळ होण्याची ती वाट पाहत राहिली, तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता पहाटेच लवकरच तिने सर्व विधी उरकल्या देवापुढे पदर पसरून मुलगा आणि नवऱ्याच्या सुरक्षेचे मागणे मागितले घोटभर चहा घेतला आणि बाजूलाच नातेवाईक होते त्यांच्याकडे गेली, त्यांचीही सकाळची आवरा आवर सुरू होती त्यांची तयारी झाल्यावर साधारण नऊ वाजता ते विरुभाईकडे गेले तो घरी नव्हता म्हणून ते पोलीस स्टेशनला गेले कृष्णाला कोठडीच्या बाहेर काढले होते तिथे तो हॉटेल मालक पोलिसांसमोर टेबलवर बसून काहीतरी कागदपत्रांवर सही करत होता, ती कृष्णाजवळ गेली त्याचा चेहरा सुजला होता पोलिसांनी त्याला मारहाण केली होती, आता एक हवालदार आला आणि त्या दोघांनाही घेऊन जिथे तो हॉटेल मालक बसला होता तिथे घेऊन गेला तिथे असणाऱ्या सब इन्स्पेक्टर बोलायला लागला "देखो फिलहाल तुमको ये शेठ के कहने पे छोड रहे है पर तुम्हारा छोकरा आया तो उसको सिधा इधर लाने का"
कृष्णा "साहब उसका कुछ गलती नही जो भी सजा देने का मुझे दो" त्यावर साहेब भडकला, "चूप नहीं तो अभी दोनो को अंदर कर दुगा जितना बोला है उतना कर ज्यादा चपड चपड मत कर, साले कुठून कुठून पोट भरायला येतात आणि आमच्या डोक्याला ताप करतात" साहेबांचा रौद्र अवतार पाहून रमय्या म्हणते "ठीक है साब जैसा आप बोलोगे वैसाही करेंगे" आणि तिथून निघतात ते थेट विरुभाईकडे जातात. विरुभाई, "बोला था सुबह तेरा मरद छुटेगा,अरे तुम लोग विरुभाई के एरिया के हो,राघूभैया का हाथ है अपने उपर, अभी बच्चे का भी टेन्शन लेने का नहीं थोडा पुलीस का झंझट खतम होने दो तुम लोग से मिलवाता हु, अभी घर पे जाके आराम करो और कलसे धंदा शूरु करना वॊ हॉटेलवाला अब तकलीब नही देगा उसकी भाईने फाड के रखी है'
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे त्याने आपली इडली सांभारची गाडी सुरू केली, चौकशीसाठी पोलीस आले त्यांनी त्यांच्या घरी आणि आजूबाजूच्या लोकांकडेही व्यंकटची चौकशी केली, पोलिसांना कुणाकडूनच काही माहिती मिळू शकली नाही. विरुभाईच्या विरोधात तिथे कोणीही बोलणारा नव्हता कारण तो राघूभाईचा माणूस होता आणि राघूभाई म्हणजे अन्नापड्यातील लोकांसाठी देव होता प्रत्येक अडचणीत राघूभाईच त्यांच्यासाठी धावून यायचा त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या पंटर विरोधात तिथे कोणीही जात नसे.इकडे राघूभैयाच्या अडयावर पंटर लोकांबरोबर व्यंकट चांगलाच रमला होता, तिथे सुरू असलेल्या कामाचे निरीक्षण करत होता, त्यांचे संवाद ऐकत होता, काही वेळाने राघूभाई तिथे येतो आणि व्यंकटला बोलावतो आणि विचारतो " छोकरे तेरा नाम क्या है?" त्यावर तो तेवढ्याच करारी आवाजात "व्यंकट नाडर नाम है मेरा भाई" राघूभाई,"क्या हूवा था कल?" त्यावर तो न घाबरत "भाई वो आदमीने मेरे माँ पर हाथ उठाया तो मेरी सटक गई मैने उसका सर फोडा" राघूभाई, "बहोत अच्छा किया ऐसें लोगो को जिंदा ही नही रखनेका जो औरोतो पे हाथ उठाताय" राघूभाई जरी गुंड असला तरी स्त्रियांचा मान सन्मान राखत असे पुढे म्हणाला "तो फिर इधर कैसे लगा कोई तकलीफ तो नही हूवा" तो "नही भाई सबकुछ एकदम मस्त खाली अम्मा और अप्पा का टेंशन हो रहा है" राघूभाई "उनका टेंशन मत ले विरु उधर उनका ख्याल रखेंगा वो उनका धंदा भी चालू किया है आज, तुने जो आदमी को मारा वो भी साला बच गया, ये थोडा पुलीस का झंझट खतम होने दे फिर तेरे अम्मा अप्पा से भी मीलना, हमारे साथ काम करेंगा?" तो " हा भाई मेरिको तो मजा आ रहा है इधर" राघूभाई "इधर का काम सिख ले, जा मजे कर, कुछ भी चाहीये तो अपने पंटर लोगो से मांग लेना" तो "जी भाई" म्हणतो आणि तिथून जातो.
पाच-सहा दिवसांनी पोलिसांचा तपास थांबला, कृष्णा आणि रमय्याला व्यंकटची काळजी लागली होती म्हणून विरुभाई त्यांना घेऊन राघूभाईच्या अडयावर गेला अर्थात राघूभाईचा परवानगी घेऊन, तिथे गेल्यावर मुलाला सुखरूप बघून त्यांच्या जीवात जीव आला रमय्याने त्याला मिठी मारली, त्यांचे बोलणे झाल्यावर विरु तिघांनाही घेऊन राघूभाई जिथे बसला होता तिथे घेऊन गेला राघूभाईला काहीसे घाबरत त्या दोघांनी हात जोडून नमस्कार केला त्यानंतर राघूभाई बोलायला लागला,"डरनेका नही तुम लोग अपने इलाके मे रहते हो तो अपनाच फॅमिली जैसा हो कुछ भी तकलीब है तो विरु को बोलने का, वीरू इन्का खयाला रख, और होश्यार है तुम्हारा छोकरा कुछ गलत नहीं किया उसने मां-बाप पे कोई हाथ डालेगा तो हर बच्चे ने यहीच करना चाहीये, शेर है बच्चा, थोडे दिन रुको वो जीसका इसने सर तोडा है ना वो ठीक होनेपर पोलीस स्टेशन भेजकार कामलेंट वापस लेने बोलेंगे तबतक छोकरे को इधरच रहने दो नही तो पोलीस उसको उठायेंगे" कृष्णा "चलेंगा मलिक जो आप ठीक समजे आपही का ही बच्चा है" राघूभाई रडवेल्या झालेल्या आणि भेदरलेल्या रमय्याकडे बघून, "देख बेहेन तू टेंशन मत ले तेरा छोकरा शेर है बहोत तरक्की करेंगा" त्यावर रमय्या "मेहेरबानी आपकी मालिक" पुन्हा त्याला नमस्कार करून ते निघतात ते जाता जाता राघूभाई पुन्हा बोलतो "और हां वो हॉटेलवाले शेठ ने कुछ गडबड किया तो विरु को बोलने का" दोघेही होकारार्थी मान हलवतात नंतर व्यंकटचा निरोप घेऊन अड्ड्यावरून घरी जातात. दोघेही आज थोडे निर्धास्त होतात, राघूभाईचा त्यांना मोठा आधार वाटतो.
दहा-पंधरा दिवसांनी व्यंकट घरी येतो, राघूभाईच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनमधली त्याची केस मिटलेली असते. हॉटेलवाला देखील आता कृष्णाच्या नादाला लागत नव्हता. व्यंकट शाळेत जायला लागतो पण तो आता बऱ्याचदा राघूभाईच्या अड्ड्यावर जात असे, तिथे त्याच्यासाठी काही बारीक सारीक कामे असतील तर तो करायचा, काही दिवसांनी त्याच्या आईवडीलांना ती गोष्ट खटकायला लागली मुलगा त्यामुळे वाईट वळणावर जाईल असे त्यांना वाटायला लागले पण राघूभाईने व्यंकटला वाचवून उपकाराचे ओझे त्यांच्यावर लादले होते आणि आता जर मुलाला तिकडे जायला बंदी घातली तर राघूभाईला राग येईल आणि त्याच्याशी पंगा घेऊन आपले इथे राहणे मुश्किल होईल म्हणून त्यांनी फक्त व्यंकटला समजावले, जास्त अडयावर जाऊ नको, गेलास तरी तिथे वाईट कामे चालतात ती आपली कामे नाहीत ती आपण शिकायची नाही असे बजावले. तो तेव्हढ्यापुरता त्यांचे ऐकला पण त्याला अड्ड्याची आणि तिथल्या वातावरणाची आवड निर्माण झाली होती त्यामुळे तो तिकडे जायचाच.
नववीचे वर्ष संपून मे महिन्याची व्यंकटला सुट्टी पडली होती तेव्हा तो आपला बहुतेक वेळ अड्ड्यावर घालवायला लागला आता त्याला तिथे कमाई देखील व्हायला लागली होती, तो राघूभाईच्या सर्वत्र पसरलेल्या अड्ड्यांवर निरोप पोहचवणे, वस्तू पोहचवणे अशी बरीच छोटी मोठी कामे करत असे तो काय पार्सल पोचवायचा हे मात्र त्याला माहित नव्हते आणि त्याने कधी जणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही, त्याचे आई वडीलही त्यांच्या कामात व्यस्त होते त्यामुळे त्याच्याकडे फारसा लक्ष देखील दिला नाही. हळू हळू व्यंकटला तिथले धंदे आणि बेकायदेशीर कामे याविषयी माहिती होत गेली पण त्यात त्याला भीती किंवा काहीच गैर वाटले नाही, त्यात राघूभाईचा तो खास माणूस बनत होता त्यामुळे तो जास्तीत जास्त त्या गुन्हेगारी साम्राज्याकडे आकर्षित होत होता त्यात त्याला तिथले पंटर लोक "व्यंकी भाई" म्हणून बोलायचे त्यामुळे त्याला आणखी भारी वाटायचे. काही दिवसांनी जिथे छोटे मोठे राडे घालायचे असतील तिथे पंटर लोकांबरोबर तो जायला लागला, त्याच्या इतक्या लहान वयात निडर स्वभावामुळे तो सगळ्यांना आवडत असे, त्याचे प्रताप हळू हळू कृष्णा आणि रमय्याला समजले त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही उलट मी घरी येणार नाही अड्ड्यावरच राहीन असे त्याने त्यांना धमकावले, म्हणून ते फारसे जास्त काही बोलत नसत. एकदा ही गोष्ट जाऊन त्यांनी विरुभाईला सांगितली पण त्यानेही त्यांची समजूत काढून "कुछ होगा नही जो भी होगा अच्छा होगा राघूभाई उसका आच्छाही करेंगे" असे सांगितले.
हॉटेलवाला आता तसा कृष्णाच्या नादाला लागत नव्हता पण त्यांच्यात धंद्यावरून वैर कायम होते आणि कृष्णाच्या इडली वड्याच्या गाडीमुळे त्याचा धंदा वाढत नव्हता त्यामुळे कृष्णा दिवसेंदिवस त्याच्या डोक्यात जात होता म्हणून त्याने त्याचा काटा काढायचा ठरवला त्यासाठी त्याने बाहेरच एका भाईला त्याची सुपारी दिली एकदा तो एकटाच धंद्यावर होता रमय्या घरी होती सकाळचे सात वाजले तो धंद्याची तयारी करत होता इतक्यात एक मोटार सायकल त्यावरून एकजण खाली उतरला त्याच्या हातात एक पिशवी होती कृष्णाचे लक्ष नसताना पिशवीतून चॉपर काढून त्याने कृष्णावर सपासप वार केले कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला तरीही तो वार करतच होता सकाळची वेळ असल्याने आजूबाजूला फार कोणीही नव्हते कृष्णा जीवानिशी मदतीसाठी ओरडत राहिला आणि तो त्याचा आवाज बंद होईपर्यंत वार करत राहिला इंडस्ट्रिमधून काही कामगार त्याचा आवाज ऐकून बाहेर आले पण तोपर्येंत मोटार सायकलवर आलेले खुनी आपले काम करून निघून गेले होते. हा हा म्हणता बातमी संपूर्ण परिसरात पसरली त्या कामगारांनी त्याला हॉस्पिटलमध्ये न्हेले पण त्याआधीच त्याची प्राणज्योत माळवली होती, रमय्या आणि व्यंकटला समजताच ते धावत पळत हॉस्पिटलला पोचतात पण काही फायदा न्हवता, रमय्या छाती बडवून रडत होती, व्यंकटही रडत होता तिथे विरुभाई पोहचतो व्यंकटला जवळ घेऊन धीर देतो "जीसने भी ये किया उसको छोडेंगे नही तू रो मत" त्यानंतर पोलीस आले खुनाचा गुन्हा नोंदवला गेला, बॉडी ताब्यात घेतली बॉडीच्या चिंध्या झाल्या होत्या रमय्या क्षणभरही शांत न रहाता रडत होती आणि एका क्षणी तिची दातखिळी बसली तिथल्या इतर स्त्रियांनी तिच्या तोंडात बोट घालून दातखिळी सोडवली आणि पाणी पाजले, तिच्या अंगात आता त्राण राहिले नव्हते, कसेतरी अंत्यसंस्कार उरकण्यात आले, स्मशानभूमीत राघूभाईदेखील आला होता त्याने व्यंकटला धीर दिला आणि कृष्णाला अग्नी दिल्यावर व्यंकटला स्वतःच्या गाडीतून अन्नापाड्यात घेऊन आला राघूभाईला बघून सर्व एरिया शांत झाला होता तो सहसा तिथे येत नसे तिथल्या पंटर लोकांमार्फत सगळी कामे होत असत. व्यंकटला हाताशी धरून ते घरात प्रवेश करतात रमय्या निस्तेज अवस्थेत पडलेली असते आजूबाजूच्या इतर स्त्रिया तिच्यासोबत असतात त्या तिला सावरतात, राघूभाईला बाहेरून एकजण बसायला खुर्ची आणून देतो भाई बसतो आणि रमय्याकडे पाहून तो बोलतो "बेहेन अब होनी को कोई टाल नही सकता पर तू डर मत जीसने भी ये किया है उसको पता नही उसने राघूभाई से पंगा लिया है छोडुंगा नही पाताल से भी धुंडके लाउंगा, व्यंकी अम्मा को संभाल तुम लोग की जिमेदारी अब मेरी है बेटा डर मत" धीर देऊन तो निघून जातो, त्यानंतर सर्व विधी होतात, हळूहळू रमय्या स्वतःला सावरते शेवटी मुलाची जबाबदारी असते तिच्यावर, पोलिसांची चौकशी सुरू असते जिथे खून झाला तिथे आजूबाजूला चौकशी होते पण अजून काही धागेदोरे त्यांच्या हाताला लागत नाही, कृष्णाला जाऊन पंधरा दिवस झालेले असतात हैद्राबादवरून कृष्णाचे नातेवाईक (त्याला आईवडील नसतात त्याचे काका,मामा) आणि रमय्याचे आईवडील आणि बहीण आलेले असतात आता मुंबई सोडून हैदराबादला जायचे असा निर्णय झालेला असतो जो व्यंकटला मान्य नसतो पण तो पडला लहान त्याला कोण विचारतो? त्याच दिवशी व्यंकटला अड्यावरून निरोप येतो राघूभाईने त्याला बोलावलं असते तो तडक अडयावर जातो राघूभाई त्याला जवळ बोलावतो आणि बोलतो "देख तेरे अप्पा के खुनी का पता चल गया है साला अब कही भाग गया है, लेकीन और एक बात पता चली है साले वो हॉटेलवालेने सुपारी दी थी,उसको ना अभी उठा के काटता लेकिन पहले तेरे से बात करनी थी" व्यंकट "नही भाई वो दोनो को मै हीच मारके अप्पा के खून का बदला लेंगा" त्यावर राघूभाई "शाबास मेरे शेर आज रातको तू इधरच रुक अपने पंटर लोग वो चौपाटी पे उसको उठा के लायेंगे उधरीच उसका गेम बाजा के समंदर मे फेक देंगे" तो "जी भाई पर और एक अडचण है वो अम्मा वापस हैदराबाद जाने का बोल रही है" त्यावर राघूभाई,"तू उसका टेंशन मत ले, आपुन उसको समजायेगा" व्यंकट त्या दिवशी घरी गेला नाही त्याने आज अड्ड्यावर काम आहे असा निरोप घरी दिला.

रात्री राघूभाईच्या गाडीत बसून व्यंकट चौपाटीवर गेला पंटर लोकांनी भाईंच्या आदेशाप्रमाणे काम केले होते हात पाय बांधून त्या हॉटेलवल्याला चौपाटीवर एका निर्जन ठिकाणी घेऊन आले व्यंकट राघूभाईसोबत तिथे पोहचतो, हॉटेलवल्याचे हात पाय आणि तोंड बांधलेले असतात पंटर लोक त्याला धरून उभे असतात, त्याला पाहून व्यंकटचे डोळे लालबुंद होतात, तळपायाची आग मस्तकात जाते, भाई हॉटेलवल्याला बोलतो, "देख तेरेको बचनेका एक मोका दे रहा हु तेरे मूह का पट्टी खोल रहा हु चिल्लाया तो मेरे आदमी तेरेको इधरही टपकायेगे, जो पुछ रहा हु उसका सही सही जवाब देना" भाईने इशारा करताच एकजण त्याच्या डोक्यावर गावठी कट्टा ताणतो आणि दुसरा तोंडावरची पट्टी काढतो, पट्टी काढल्यावर तो दीर्घ श्वास घेतो, भाई त्याला विचारतो " देख तुने क्या सुपारी दिया और कुछ किया उससे हमको लेना देना नही तू खाली इतना बता कृष्णा को मारनेवाला कौन था" हॉटेलवाला "भाई जग्गुभाई का आदमी मार्गो मैने सुपारी दिया था" पुन्हा भाई इशारा करतो तेव्हा पंटर त्याच्या तोंडावर पुन्हा पट्टी बांधतो तो तडफडतो पण तो पंटर एक जोरात त्याला चमट खेचतो तसा तो शांत होतो नंतर भाई व्यंकटला बोलतो, "व्यंकी ये तेरे बाप का पहेला दुश्मन है छोड मत इसको" व्यंकट ह्याच क्षणाची वाट बघत होता एक पंटर त्याच्या हातात एक तलवार देतो हत्यार हातात पडताच त्याच्या अंगात सैतान संचारतो आणि तो सपासप हॉटेलवाल्यावर वार करतो आणि वार करतच रहातो दम लागेपर्येंत थांबत नाही त्याच्या शरीराची रक्तबंबाळ करतो, तो थांबल्यावर पंटर त्याच्या हातातून तलवार घेतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या हॉटेलवल्याकडे पाहून तो जरा शांत होतो, भाई पंटर लोकांना त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावायला सांगतो आणि व्यंकटला घेऊन निघून जातो त्या रात्री व्यंकट अड्ड्यावर राहतो. राघूभाई आज खूप खुश असतो कारण आज त्याला गँगसाठी एक नवीन डॅशिंग पंटर भेटलेला असतो.

क्रमशः

(संपूर्ण कथा आणि कथेतील पात्र काल्पनिक आहेत, साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत.)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED