Shevat Gunhegaricha - 3 books and stories free download online pdf in Marathi

शेवट गुन्हेगारीचा..….. - (भाग-३)

सकाळी व्यंकट घरी जातो झाल्या घटनेविषयी कोणालाच काहीही सांगत नाही, घरात अजून हैद्राबादला जाण्याच्या वार्ता सुरू असतात, इतक्यात तिथे विरुभाई येतो आणि हैदराबादचे सगळे पाहुणे आणि रमय्याला एकत्र बसवतो आणि त्यांना समजावतो इथे उभा केलेला धंदा, व्यंकटच भविष्य यासाठी मुंबईतच रहाणे कसे महत्वाचे आहे आणि राघूभाई कसे त्यांच्या सोबत आहेत हे सगळे समजावल्यावर रमय्या आणि व्यंकटला मुंबईत ठेवायला सगळे तयार होतात.दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे रमय्या आणि व्यंकटला निरोप देऊन परत जातात.
दोन दिवसांनी ते दोघे मिळून इडली वड्याची गाडी पुन्हा सुरू करतात, हॉटेल बंदच असते तीन चार दिवस झाले तरी हॉटेल बंदच होते म्हणून रमय्या सहजच व्यंकटजवळ विषय काढते तेव्हा व्यंकट तिला सांगतो हॉटेल आता कधीच उघडणार नाही आणि त्या दिवशी घडलेली घटना सांगतो ते ऐकून तिला दरदरून घाम फुटतो,अजून एक खुनी बाकी आहे त्याला संपवल्याशिवाय माझ्या बापाच्या आत्म्याला शांती भेटणार नाही असे तो तिला सांगतो, आपला मुलगा इतक्या लहान वयात गुन्हेगारीकडे वळला हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली, त्यापेक्षा आपण हैद्राबादला गेलो असत तर बरे झाले असते पण काहीही करून व्यंकट त्यासाठी तयार झाला नसता ह्याची तिला खात्री होती, आता जे काय घडतंय ते फक्त बघत बसने इतकाच पर्याय तिच्याकडे होता. पुढे व्यंकटने शाळा सोडली आणि जास्तीत जास्त वेळ अड्ड्यावर घालवू लागला सर्व बेकायदेशीर कामे करू लागला, गावठी कट्टे पोहचवणे हे त्याचे प्रमुख काम होते. पाच सहा महिन्यांनी मार्गो (ज्याने कृष्णाचा खून केलेला असतो) परत आल्याची बातमी मिळते त्याची खबर काढून एका रात्री काही पंटरसोबत त्याला त्याच्याच एरिया बाहेर गाठतो आणि त्याच्यावर चॉपरने सपासप वार करतो आणि बापाचा बदला पूर्ण करतो, पण तो खून केल्यावर त्याचे नाव पोलिसांच्या क्रिमिनल रेकॉर्डमध्ये दुसऱ्यांदा नोंदवले जाते पण तो पोलिसांच्या हाती लागत नाही.
पुढे जाऊन जसजसा तो मोठा होतो तसतसे त्याचे गुन्हेगारी कारनामे वाढत जातात गावठी कट्ट्यांचा व्यवसाय करणे, दारूचे बेकायदेशीर धंदे चालवणे, सुपारी घेऊन राडे करणे, धमक्या देणे, अपहरण, हाफ मर्डर तसेच एक दोन खुनाचे गुन्हे देखील त्याच्या नावावर होते, तो आता राघूभाईचा खास पंटर झाला होता त्याला सगळे "व्यंकी अण्णा" नावाने ओळखायला लागले होते, त्याने राघूभाईचा बेकायदेशीर धंदा चार पाच वर्षात मोठ्या प्रमाणात वाढवला आणि गुन्हेगारी विश्वात एक नवी ओळख निर्माण करायला सुरुवात केली. काही वर्षातच आजूबाजूच्या परिसरात त्याच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. पण तो राघूभाईची काही तत्वे आगदी तंतोतंत पाळत असे ती म्हणजे आपले ज्या एरियात धंदा चालतात त्या ठिकाणच्या राहिवाश्यांना त्यांच्या अडचणीत मदत करणे आणि स्त्रियांकडे वाईट नजरेने न पहाणे त्यांचा सन्मान करणे तसेच राजकारणातील व्यक्तींशी चांगले कनेक्शन ठेवणे. राघूभाईने त्याला बजावून सांगितले होते आयुष्यात हे उसुल पाळलेस तर ह्या धंद्यात तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही आणि व्यंकटने हे पक्के ध्यानात ठेवले होते, त्याचे स्वप्न होते एकदिवस मुंबईत गुन्हेगारी जगतात बेताज बादशहा बनायचे.
बेकायदेशीर धंद्यात तो भरपूर पैसे कमवत होता त्यात त्याने अन्नापाड्यातच बंगल्यासारखे टुमदार घर बांधले आपल्या अम्माला सर्व सर्व सुख देण्याचा तो प्रयत्न करत होते पण रमय्याला हे अजिबात पटत नव्हते, तिचे आणि कृष्णाचे स्वप्न व्यंकटला खूप शिकवून मोठा साहेब बनवायचं असे होते पण नियतीला ते मान्यच नव्हते असे समजून ती कसेतरी दिवस ढकलत होती, एकतर नवऱ्याचा खून झालेला त्यात मुलाने स्वीकारलेला गुन्हेगारीचा मार्ग यामुळे ती दिवसेंदिवस खचत चालली होती, जोपर्यंत इडली वडा सांभारची गाडी सुरू होती तोपर्येंत ती त्यात रमत होती पण जेव्हा व्यंकटला बऱ्यापैकी पैसे मिळायला लागले तेव्हा त्याने ती बंद करायला लावली, त्यात एवढे मोठे घर बांधले आणि तिथे पण तो कधीतरी यायचा, तशी व्यंकटने तिच्या सोबतीला आणि घरातली कामे करायला एक बाई कामाला ठेवली होती रमय्याच्या ओळखीतलीच होती.
जग्गुभाई ज्याला हॉटेलवल्याने कृष्णाच्या खुनाची सुपारी दिली होती त्याचा पंटर मार्गो ज्याला व्यंकटने संपवले तेव्हापासून जग्गुभाईचा खुनाच्या सुपार्या घेण्याचा धंदा कमी झाला होता कारण त्याला मार्गोसारखा दुसरा पंटर भेटला नाही, आणि याच गोष्टीमुळे तो राघूभाई आणि व्यंकटला संपवण्याची संधी शोधत होता पण ते दिवसेंदिवस अश्यक्य होत चालले होते कारण राघूभाईची ताकत वाढत होती त्यांच्यापर्यंत पोचणे जग्गुभाईल अवघड झाले होते पण त्याचे प्रयत्न सुरूच होते आणि एकदा त्याला ती संधी मिळाली राघूभाई सहसा एकटा बाहेर पडत नसे पण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो सकाळी लवकर एका महादेवाच्या मंदिरात एकटाच न चुकता पूजेला जात असे ही बातमी जग्गुभाईला मिळते आणि ह्या संधीचा फायदा घेऊन आज राघूभाईची गेम वाजवायची तो ठरवतो. सकाळी सहा वाजताची वेळ होती जग्गुभाई आणि त्याचे दोन साथीदार मंदिराच्या बाजूला दबा धरून बसलेले असतात त्यांच्याकडे गावठी कट्टे असतात , राघूभाई महादेवाच्या मंदिरासमोर गाडी थांबवतो दरवाजा उघडून बाहेर येतो समोरून मंदिरातील पुजारी येतो राघूभाईला बघून तो पुढे येऊन नमस्कार करतो राघूभाई देखील त्याला नमस्कार करतो, जग्गुभाई आणि त्याचे साथीदार सावधान होतात, जग्गुभाई पुजाऱ्याला बघून साथीदारांना थांबण्याचा इशारा करतो, राघूभाई तोपर्येंत मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करतो. जग्गुभाई साथीदारांना समजावतो तो बाहेर आल्यावर मी हल्ला करणार गरज पडली तरच तुम्ही या आणि गाडी तयार ठेवा, साधारण पंधरा वीस मिनिटाने राघूभाई बाहेर येतो तो एकटाच असतो मंदिराच्या पायऱ्या उतरून गाडीजवळ येताच संधीचा फायदा घेत जग्गुभाई त्याच्या दिशेनं पळत जातो राघूभाई बेसावध असतानाच त्याच्या पाठीमागून मानेला धरून गाडीवर रेटतो आणि त्याच्या डोक्यात गावठी कट्टा अक्खा रिकामा करतो त्याचे पंटर गाडी घेऊन त्याच्या जवळ येतात तो क्षणाचा विलंब न करता गाडीत बसतो इतक्यात बंदुकीच्या आवाजाने पुजारी बाहेर आला त्याने जग्गुभाईला गाडीत बसताना पाहिले डोळ्याची पापणी लावते न लावते तो त्यांची गाडी नजरेआड झाली नंतर पुजाऱ्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राघूभाईला पाहिले त्याला दरदरून घाम फुटला बोबडी वळली कसे तरी अंगात त्राण आणत बोंब ठोकली, लगेचच आजूबाजूची लोक जमा झाली काहींनी राघूभाईला त्याच्याच गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण गोळी मेंदूच्या आरपार गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता, बातमी पसरली अन्नापाडा आणि आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण झाली स्मशान शांतता पसरली, व्यंकट हॉस्पिटलमध्ये पोचला राघूभाईचा मृतदेह पाहून त्याचे डोकं सुन्न पडलं, डोळ्यात अश्रू तरळले पण त्याने आतल्या आत गिळले दुसऱ्यांदा बाप गमावल्याची भावना मनात दाटून येते. पोलिसांच्या कार्यवाही नंतर राघूभाईचा मृतदेह त्याच्या घरी घेऊन जातात त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि मुलगी इतकेचजण असतात, अंत्यसंस्करासाठी खूप गर्दी झालेली असते पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार होतात, व्यंकट पोलिसांना गुंगारा देत अंत्यसंस्कार करून अडयावर जातो, काही वेळाने राघूभाईची महत्वाची माणसे तिथे जमा होतात त्यात विरुभाई असतो तो व्यंकटला धीर देत असतो व्यंकट पिसाळलेला असतो, "भाई के चिता की आग बुजने से पाहिले अगर उनके मौत का बदला नही लुंगा तो भाई मुझे माफ नही करेंगे" भाईवर हल्ला कोणी केला त्याला खबर मिळालेली असते तो तडक निघतो त्याच्याबरोबर त्याचे तीन पंटर हत्यारे तलवारी आणि कट्टे घेऊन निघतात गाडी काढतात, गाडी जगगुभाईच्या अडयावर थांबते, व्यंकट आणि त्याचे तीन साथीदार एकदम फिल्मी स्टाईलमध्ये धडाधड आजूबाजूच्या पंटर लोकांवर गोळ्या झाडत अड्ड्यावर लपून बसलेल्या जग्गुभाईपर्येंत ते पोहचतात व्यंकट वाघासरखी झेप घेत त्याच्यावर उडी मारतो आणि त्याला खाली पाडतो व्यंकटचा एक पंटर त्याला तलवार देतो आणि त्या तलवारीने तो जगगुभाईवर एकामागे एक विद्युत गतीने वार करतो एक वार मुंडीवर करतो त्याची मुंडी जवळ जवळ धडापासून वेगळी झालेली असते नंतर व्यंकटचे पंटर व्यंकटला ओढुन गाडीत बसवुन घेऊन जातात दहा मिनिटात सर्व कार्यक्रम संपवून तिथून काढता पाय घेतात आणि सरळ अड्ड्यावर पोचतात विरुभाई आणि इतर मंडळी अजून अड्ड्यावर त्यांची वाट बघत थांबलेला असतो तो आल्यावर त्याचे रक्ताने माखलेले कपडे पाहून ते समजून जातात तो जगगुभाईचा खात्मा करूनच आलाय, विरुभाई त्याला मिठी मारतो "शाब्बास मेरे शेर मुझे पता था तू भाई का खून जाया नही जाने देगा, अब इस राघूभाई के साम्राज्य का तू ही वारीस है आज से व्यंकी अण्णा हमरा भाई है" सर्वजण मान्य करतात आणि राघूभाईच्या गुन्हेगारी साम्राज्याचा तो वारस बनतो, सगळे त्याच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतात.

क्रमशः

(कथा व कथेतील पात्र संपूर्णपणे काल्पनिक आहे, साधर्म्य सापडल्यास केवळ योगायोग समजावा, कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लेखक समर्थन करत नाही, कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED