शेवट गुन्हेगारीचा.. - (भाग -४ शेवटचा भाग) Sopandev Khambe द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेवट गुन्हेगारीचा.. - (भाग -४ शेवटचा भाग)

राघूभाईचे सर्व क्रियाकर्म विधिवत स्वतः व्यंकट करतो यादरम्यान त्याच्या घरी व्यंकटचे येणे जाणे वाढते, तो त्याची मुलगी रेवा जी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असते तिची आणि राघूभाईच्या पत्नीची रत्नमालाची जिला तो आंटी म्हणायचा त्यांची जबाबदारी स्वीकारतो. व्यंकटला ह्या धंद्याची काडीनकाडी माहिती असते त्यात राघूभाईने दिलेली शिकवण ह्याच्या जोरावर तो खूप कमी वेळात आपल्या गुन्हेगारी धंद्याचा पसारा संपूर्ण मुंबईभर पसरतो त्यात तो एका दुबईच्या ड्रगसच्या धंद्यातील मोठया डॉनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि तो आणि त्याचे साथीदार त्या धंद्यात बेसुमार पैसे कमावतात, त्या डॉनमुळेच तो फिल्म इंडस्ट्रितील लोकांच्या जवळ येतो त्यांना ड्रगस पुरवणे, त्यांच्या सुपार्या घेणे ही कामे तो करू लागला आणि गुन्हेगारी क्षेत्रात बादशाह बनला.
तो बऱ्याचदा राघूभाईच्या घरी जात असे आणि धंद्यात जे मिळेल त्याचा काही हिस्सा आंटीकडे देत असे ती शक्यतो नाकारत असे पण तो ऐकत नसे, त्यांची योग्य ती काळजी घेत असे, रेवाला (राघूभाईची मुलगी) काय हवे नको बघत असे. व्यंकटच्या वाढत्या गुन्हेगारी साम्राज्यामुळे त्याचे शत्रू वाढत असतात, पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये त्याचे नाव असते पण पोलिसांना गुंगारा देण्यात तो चपळ असतो, त्यात त्याच्या राजकीय क्षेत्रातील ओळखी त्याला उपयोगी पडत असतात. एकदा त्याला फिल्म इंडस्ट्रितुन मोठी सुपारी मिळते दोन फिल्म निर्मात्यांच्या आपापसातील वादातून ती सुपारी मिळालेली असते, त्यासाठी एका निर्मात्याला त्याला संपवायचे असते, तो ठराविक साथीदारांना घेऊन योजना आखतो, दिवस ठरतो त्या दिवशी व्यंकट सहित त्याचे पाच साथीदार वेष बदलून फिल्म स्टुडिओ समोर थांबतात तो निर्माता सिगारेट ओढायला स्टुडिओ समोर आला असता व्यंकट आणि त्याचे साथीदार पिस्तुलने त्याच्यावर हल्ला करून पळून जातात, अज्ञातांनी निर्मात्याचा खून केल्याची बातमी माध्यमांद्वारे सगळीकडे पसरते. पोलिसांवर तपासासाठी वरून जोरदार प्रेशर असतो, प्रकरण सुप्रसिध्द एन्काऊंटर स्पेशालिस्ट इन्स्पेक्टर विक्रम आजगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात येते, इन्स्पेक्टर विक्रम यांनी आजपर्येंत मोठं मोठ्या गुन्हेगारांना पाणी पाजलेले असते पोलीस दलात त्यांच्या नावाचा गाजावाजा असतो.
काही दिवसातच सदर प्रकरणात अज्ञात गुन्हेगार म्हणजे व्यंकी अण्णा असल्याचे समोर येते जवळच असलेल्या काही दुकानदारांनी त्याची ओळख पाटवलेली असते. ज्या निर्मात्याच खून केलेला असतो तो सिनेमा क्षेत्रातील नामवंत हस्ती असते, व्यंकी अण्णाची शूट ऍट साईटच्या ऑर्डर निघते, संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते आधीच व्यंकी अण्णाने पोलिसांना खूप त्रास दिलेला असतो त्यामुळे पोलीस आता त्याला मार्गी लावायला जंग जंग पछाडतात. निर्मात्याच्या खुनात व्यंकीचा हात आहे ही खबर पोलिसांना मिळाल्याची बातमी व्यंकी अण्णांच्या गोटात समजते सर्वजण त्याला काही दिवसांसाठी अंडर ग्राउंड होण्याचा सल्ला देतात त्यांच्या सल्ल्यानुसार तो गोव्याला निघून जातो पण तिथे त्याचे मन रमत नाही त्यात आई आजारी असल्याची बातमी त्याला मिळते तो सर्वानी विरोध करूनही मुंबईला निघून येतो, पोलिसांना खबर मिळते पण मुंबईला येऊन दोन दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागत नाही, त्याच्या सर्व अड्यांवर पोलीस धाड सत्र सुरू करतात पण काहीच फायदा होत नाही, त्यावर इन्स्पेक्टर विक्रम आजगावकर साहेब त्याच्या एका जवळच्या पंटरला उचलण्याचे आदेश देतात, त्यानुसार त्याला एका रात्री उचलतात पोलीस त्याला खूप चोपतात पण तो खूपच निष्ठावंत असतो शेवटी विक्रम सर येतात त्याला समजावतात "सून मुझे पाहचांता है," तो फक्त होकारार्थी मान हलवतो "मुझे एन्काऊंटर स्पेसिएलिस्ट बोलते है,देख अभि तक मॅटर हाथ मे है तू अगर सही मे तेरे व्यंकी अण्णा को बचना चाहता है तो उसका पता बता कुछ नही होगा उसको गरमा गरमी है तब तक अंदर रहेगा बाकी पॉलिटिक्स मे उसकी बहोत पहचान है बेल पे छुट जायेग पर अगर मुझे उपर से ऑर्डर आया तो मेरी गोली चलेगी, कब तक छुपेंगा चुहे को बिल से निकालने के काफी तरिके है हमारे पास पर हम अगर अपने तरिके आजमायेगे तो तुझे तो पता है अगर नही पता तो इधर किसीं को भी पुछ, चल निकलता हु सोच तुझे व्यंकी भाई जिंदा चाहीये या तेरी मनमानी करनी है" इतके बोलून साहेब निघायला उठतात इतक्यात पंटर तोंड उघडतो "साब सच बोल रहे हो आप" साहेब " देख जो बोलना था वो मैने बोला अब विश्वास रखना न रखना तेरे उपर है" पंटर " बताता हु साब" तो एक लांब श्वास घेतो साहेब हवालदाराला आवाज देतो "गायकवाड पाणी द्या ह्याला" गायकवाड पाणी घेऊन येतो पंटर घटाघाट पाणी पितो आणि बोलतो "अन्नापाडा और नायर नगर के बीच मे एक बडा नाला है उसके बीच मे नाले के साईड राघूभाई के जमानेसे एक छुपा अड्डा है जो किसीं को पता नही राघूभाई ने एक बार मुझे वहा छुपने भेजा था इसलीये मुझे पता है वही पर अण्णा है" त्यावर हवालदार गायकवाड बोलतो "कुठे रे त्या मोडक्या सुलभ शौचालयच्या इथे" पंटर "हा उधर एक दुकान है दुकान के बाजूसे एक नाले की तरफ एक गल्ली जाता है" गायकवाड "अरे बाप रे या उंदरानी कुठं कुठं बीळ उकरल्यात" आजगावकर साहेब "गायकवाड समजलं तुम्हाला" गायकवाड "येस सर" गायकवाड "करा मग तयारी,थांबून चालणार नाही" दुसरा एक हवालदार येऊन पंटरला ताब्यात घेतो "साब व्यंकी अण्णा को कुछ नही होगा ना?" साहेब त्याच्याकडे दुर्लक्ष करत गायकवाडसोबत बाहेर निघतात.
त्याच दिवशी रात्रीचे साडे बारा वाजलेले असतात आजगावकर साहेब आपल्या टीम सोबत पंटरने सांगितलेल्या ठिकाणी पोहचतात, पूर्ण प्लॅन ठरतो एक टीम
सुलभ शौचालयच्या दिशेने जायला निघते एक टीम आजगावकर सरांबरोबर नाल्यात उतरते, एक टीम प्रमुख रस्त्यावर थांबते आणि एक रस्त्याच्या पलीकडे, आजगावकर सर टीम सोबत अड्ड्याच्या खिडकी पर्येंत पोचतात आणि नाल्याच्या कठयावर चढून खिडकी जवळ पोहचतात, इकडे दुसरी टीम अड्ड्याच्या दरवाज्यापर्यंत पोहचते, खिडकीतून आजगावकर सर डोकावतात आत चारजण झोपलेले असतात आजगावकर सर इशारा देताच एक हवालदार शिट्टी वाजवतो शिट्टीचा आवाज ऐकताच दरवाजा जवळची टीम दरवाजा तोडण्यासाठी दरवाजावर लाथा घालतात आजगावकर सर खिडकीतून आत उडी मारतात मागून इतर चार हवालदार उड्या मारतात,आत व्यंकी अण्णा आणि तीन साथीदार सावध होतात एकजण ओरडतो "व्यंकी अण्णा पोलीस है" पोलिसांच्या बॅटरीचा प्रकाश व्यंकी अण्णाच्या तोंडावर पडतो त्याचे डोळे दिपतात ह्याच संधीचा फायदा घेत आजगावकर सर त्याच्यावर झडप घालतात दरवाज्याकडून आलेली टीम दरवाजा तोडून आत येते आणि बाकी तिघांनाही ताब्यात घेतात , दोन हवालदार पुढे होत आजगावकर सरांच्या मदतीला जातात कोणीतरी लाईटचे बटन दाबते सर्व रूममध्ये आता उजेड पसरतो चौघांच्या कमरेला लावलेले गावठी कट्टे काढून घेतले जातात मिशन यशस्वी झालेले असते त्यांना एका ठिकाणी बसवले जाते पोलिसांनी त्यांच्यावर बंदुका ताणलेल्या असतात ते शांत बसतात आजगावकर साहेब कडाडतात "क्या व्यंकी अण्णा आ गया आखीर चपेट मे" तो काहीच बोलत नाही,"ठोका साल्याना अटक केली तर ह्यांचे हितचिंतक सोडवतील यांना दोन दिवसात" साहेब एक गोळी व्यंकी अन्नावरवर झडतात इतर सर्व पोलीस फायरिंग करतात क्षणात गुन्हेगारीच्या बुरुजाला सुरुंग लागलेला असतो, व्यंकीअन्ना आणि त्याच्या साथीदारांच्या शरीराची पोलिसांच्या गोळ्यांनी चाळण झालेली असते.
दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांची पहिल्या पानावर बातमी "कुप्रसिद्ध गुंड व्यंकीअन्ना आणि तीन साथीदार पोलिसांच्या कार्यवाहीत ठार इन्स्पेक्टर आजगावकर आणि दोन पोलीस किरकोळ जखमी"
प्रत्येक गुन्हेगारी प्रवृत्तीचा शेवट हा असाच असतो....


समाप्त

(सम्पूर्ण कथा आणि त्यातील पात्र हे काल्पनिक आहेत, कथेचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन असून कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन हा कथेचा किंवा लेखकाचा उद्देश नाही)