Tujhi Majhi yaari - 10 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 10

अंजली सुदीप ला पाहून आली पणं तिने हे सरू ला सांगितलं च नाही.सरु ही थोडी उदास च असायची पणं ती ही अंजली ला तस्स जाणवू द्यायची नाही.अंजली ही तिची बेस्टी होती तिला कळत होत.दोन दिवसांनी शाळेला जाताना अंजली सरु सोबत बोलत होती पणं सुदीप चा विषय कसा काढायचा हे तिला कळत नव्हत.

अंजली : सरु...

सरु : ह...बोल..

अंजली : तू खरच नाही बोलत ना त्या सुदीप सोबत ?

सरु : अंजली तुला विश्वास नाही का माझ्या वर ? मी तुझी शप्पथ कशी मोडेन ? अग मी खरच नाही बोलत आता त्यांच्या सोबत..आणि सुदीप शिवाय राहू शकते मी पणं तुझ्या शिवाय नाही..

अंजली: खर सरु ?

सरू: ये अस का विचारत आहेस सारखं सारख ?

अंजली : सरु तू खरचं प्रेम करतेस का त्याच्या वर ?

सरु तिच्या कडे रोखून पाहते व बोलते ..

सरु : आता कशाला त्यांचा विषय काढत आहेस ?

अंजली : सांग ना सरु ..

सरु : हो ..

अंजली : मग त्याच्या सोबत बोलणं का सोडलस ?

सरु : कारण मला सुदीप पेक्षा जास्त आपली मैत्री महत्वाची वाटते .तुझ्या पेक्षा जास्त कोणावर च नाही माझं प्रेम ..सरु हसत अंजली ला सांगते.

अंजली : सरु..

सरु : अंजली ...काय सरु ..सरु लावलं आहेस आज ? अग बोल की पुढे..

अंजली : तू त्या सुदीप सोबत बोल..

सरु अंजली च बोलणं ऐकून चकित होऊन तिच्या कडे पहाते पणं नंतर आपल तोंड पाडून बोलते.

सरु : नको ..तू आपली मैत्री तोडतेस .तू माझ्या सोबत बोलणं ही बंद करतेस.

अंजली : अग आता नाही करणार..तू बोल त्याच्या सोबत मला चालेल.

सरु : खरचं अंजली ?

सरु खुश होऊन विचारते .

अंजली : हो ..तुला त्याच्या वर विश्वास आहे ना ?

अंजली ने अस विचारल्या वर सरु आपली मान होकारार्थी हलवते .

अंजली :मग झालं तुला त्याच्या वर विश्वास आहे आणि मला तुझ्या वर ...तू बोल त्याच्या सोबत.

सरु अंजली च बोलणं ऐकून हसत तिला मिठी मारते .. व थँक्यु थँक्यु बोलते.

सरु : थँक्यु ,थँक्यु ,थँक्यु अंजली..

अंजली तिला पटकन दूर करत बोलते.

अंजली : ये वेडी झालीस का ? रस्त्यावर आहे आपण अस मध्येच गळ्यात नको पडू लोक काय म्हणतील ? पोरींना लाज बीज आहे की नाही रस्त्यात मिठ्या मारत आहेत ?

अंजली च बोलणं ऐकून सरु ही हसते .

मग दोघी ही खुश होऊन शाळेकडे जातात ..सरु खुश असते की तिला आता सुदीप सोबत बोलता येईल म्हणून आणि अंजली खुश असते कारण सरु खुश असते .

सरु परत सुदीप सोबत बोलायला सुरुवात करते .आता प्रथम संत्र परीक्षा होऊन सर्वांना दिवाळी ची सुट्टी लागते .पणं सुट्टी लागण्या आधीच अंजली व तिच्या मैत्रिणी नी दिवाळी दिवशी भेटायचं ठरवलं होत.प्रत्येकाच्या घरी जाऊन दिवाळी फराळ करायची मस्त गप्पा मारायच्या खेळायच अस सर्वांच ठरल होत .

आज अंजली च्या घरी सर्व मैत्रिणी येणार होत्या . आज अंजली च्या घरी दिवाळीच्या फराळाचा बेत होता . नंतर सरु , निशा आणि रेखाच्या घरी जायचं अस ठरल होत .निशा ,रेखा व सरु ठरलेल्या वेळी अंजली च्या घरी आल्या सर्वांनी मिळून फराळ केलं .गप्पा मारल्या .कोणी कसला ड्रेस घेतला याची चर्चा ही झाली .नंतर सर्वजण सरुच्या घरी गेल्या तिथे सर्वांनी मिळून अंताक्षरी खेळली . त्यांनतर उद्या निशाच्या घरी भेटायच असं ठरवून सर्वजण आपआपल्या घरी निघून गेल्या .

दुसऱ्या दिवशी निशाच्या घरी सरु , अंजली व रेखा आल्या पहिल सर्वांनी मिळून फराळ केला नंतर सर्वजण मिळून निशाच्या घरासमोर असणाऱ्या शेतात फिरून आल्या . हिरवी झाड , डोलणारी पिक , झाडावरल्या चिमण्या अस निसर्गाच्या सानिध्यात सर्वांना खूप छान वाटू लागलं त्यांनी तिथे च थोडा वेळ लपाछपी ही खेळली व नतर रेखाच्या घरी गेल्या. रेखाच्या घरात त्याच्या गप्पा चालू होत्या .

निशाःअंजली तू दिवाळी अभ्यास करायला सुरू केला का ग ?

रेखा : अग तिला काय विचारते तिचा तर पूर्ण ही झाला असेल अभ्यासा शिवाय तिला काही सुचत का ?आपल बघा.

अंजली : ये नाही ग,मी पणं अजून नाही सुरू केला अभ्यास ..आता दिवाळी होती तर मम्मी ला मदत ही करायला लागत होत ना..पणं मी उद्या पासून सुरू करणार आहे अभ्यास...किती अभ्यास दिला आहे सरांनी व मॅडम नी ..मला तर वाटतं सुट्टी संपले पणं अभ्यास नाही..

सरु : तू तर करशील ही अंजली पणं आमचं कस होणार ?

अंजली : कस म्हणजे ...तुम्ही ही करायचा..आणि सर तर शाळेच्या पहिल्याच दिवशी अभ्यास तपासणार आहेत ...मग काय पहिल्याच दिवशी मार खाणार आहात काय ?

निशा : पाहिल्या दिवशी मार ? नाही बाई..मी तर करणार पूर्ण अभ्यास..

रेखा : मी तर पहिल्या दिवशी येणारच नाही..

सरु : नको येऊस..मग तर सर ज्या दिवशी येशील त्या दिवशी जास्त शिक्षा करतील..

सरु ने अस बोलताच सगळ्याच हसायला लागल्या.

निशा : अंजली अग पणं मॅडम नी कागदी फुले करून आणायला सांगितलं आहे मला तर अजिबात येत नाही..

सरु,रेखा ही बोलल्या." आम्हाला ही येत नाही."

सरु : अंजली पणं तुला येतात ना शिकव ना आम्हाला..

अंजली : अग त्यात काय सोप आहे,रेखा तुझ्या कडे जुना पेपर आणि कात्री असेल तर घेऊन ये ..

रेखा मग एक मोठा जुना पेपर व कात्री घेऊन आली..अंजली ने सगळ्यांना एक एक कागद दिला .. व ती त्यांना शिकवू लागली.

अंजली : हा आता हा कागद चौकोनी कापून घ्या..

बाकी तिघी मग अंजली सांगेल तस करू लागल्या.

अंजली : अग रेखा चौकोनी बोलले मी आयताकार नाही..

रेखा नीट घडी घालत नव्हती हे पाहून अंजली तिला बोलली ..मग रेखा ने ही सॉरी म्हणुन आपली जीभ चावत चौकोनी कागद कापून घेतला .

अंजली : हा आता चौकोनी कापून झालं ना मग ..त्या चौकोनाच्या मधोमध घडी घाला ..आणि परत जो आयता सारखा आकार तयार होतोय ..त्याची ही मधोमध घडी घालायची मग पुन्हा चौकोन होईल..

अंजली करत होती तस्स इतर ही सर्वजणी करत होत्या.

अंजली : आता कात्रीने चौकोनी घडीच्या आकाराला पाकळी सारख कापून नंतर मध्य भागेत ही एक छोटं होल बनवायचं ...निशा..हा तस्स च..

सगळ्या कृती करून झाल्यावर ..मग अंजली ने सर्वांना तो चौकोन पाकळी सारखा भाग उघडायला सांगितलं ..त्यांनी उघडला तेव्हा चार पाकळ्या च फुल तयार झालं होत.सर्व जण खुश झाल्या.

निशा : अरे वा हे तर किती सोप होत..

अंजली : हो पणं त्या साठी आधी करायला हवं ना ?मला येत नाही म्हणून बसल की सगळं कठीणच वाटत .
अंजली ने सर्वांना फुल शिकवलं ..नंतर निशा ,अंजली व सरु आप आपल्या घरी निघून गेल्या.

दुसऱ्या दिवशी सरु अंजलीच्या घरी आली .अंजली काम आवरून लिखाण करत बसली होती.सरु ला पाहून अंजली खुश झाली.

अंजली : सरु ,आज तू घरी कशी काय आलीस ? काल च तर आपण भेटलो होतो ना ..रेखाच्या घरी.

सरु : हो पणं तुझी आठवण आली म्हणून आले आज परत.

अंजली तिचं बोलण ऐकून हसते.

अंजली : मला उल्लू नको बनवू सरु ..माहित आहे काही तरी काम असेल म्हणून च आली असणार तू...आणि तो हातात बॉक्स कसला आहे ग ?

सरु आता थोडी ओशाळत बोलते.

सरु : ते..ते तुझ्या साठी गिफ्ट आणल आहे मी.

अंजली : माझ्या साठी ? अंजली खुश होते ..बघू ..

सरु तो बॉक्स अंजली समोर धरते ,अंजली तो बॉक्स उघडून पाहते तर त्यात सिरॅमिक च एक छोटंसं शो पीस होत..ज्यात एक मुलगा व मुलगी डान्स करत होते..खूप सुंदर होत ते..अंजली थोड चकित होऊन सरु ला विचारते.

अंजली : सरु गिफ्ट खूप छान आहे पणं हे गिफ्ट तू खरच माझ्या साठी आणल आहेस ?

अंजली अस विचारते तेव्हा सरु थोड अडखळत बोलते .

सरु : अंजली...म्हणजे..ते ..ते...

अंजली आता तिच्या कडे थोड रोखून पहाते तस्स सरु बोलायला चालू करते.

सरु : ते गिफ्ट मी सुदीप साठी घेतलं होत..पणं ते नाही भेटले आज. . आणि आता मी हे घरी नाही ना घेऊन जाऊ शकत ..म्हणून मग तुला द्यायला आले.

अंजली : अच्छा ,अस आहे तर..पणं तू त्याला देणार होतीस ते गिफ्ट मी घेऊन काय करू ?

सरु : अग पणं देणार होते ..दिलं नाही ना..आता तुला दिलं तर ते तुझं झाल.. प्लीज ठेव ना..

अंजली : बर ठीक आहे .

सरु : आता तुझी कोणती तरी वही दे...मला.

अंजली : कशाला ?

सरु : अग मम्मी येऊ देत नव्हती..मी तुझ्या कडून अभ्यासाची वही घेऊन येते म्हणून थाप मारून आले ..

अंजली : सरु...तू ना खूप खोटं बोलायला लागली आहेस.

सरु : सॉरी ना अंजली..

अंजली : ठीक आहे ही घे, इंग्लिश ची वही..आणि हो यात मी इंग्लिश चा अभ्यास केला आहे..तो पूर्ण कर तू ही पाहून..

सरु : थँक्यु अंजली...तू किती किती छान आहेस.

अंजली : हा..आता बास जास्त मस्का लाऊ नकोस ..

सरु थोडा वेळ थांबून घरी निघून जाते.

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED