Tujhi Majhi yaari - 11 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 11

दिवाळी नंतर शाळा सुरू झाली पणं आता सगळेच शिक्षक खूप स्ट्रिक्ट वागू लागले..बोर्ड एक्साम जवळ येत होत्या त्यामुळे ..सुट्टी दिवशी ही तास घेणं ..सराव पेपर सोडवून घेणं..फक्त अभ्यास एके अभ्यास सुरू होता...मुलांना थोडी ही उसंत मिळेनाशी झाली होती.अंजली व तिचा ग्रुप ही अभ्यासाच्या तयारीला लागला होता. पास होऊन सगळ्यांनी एकाच कॉलेज ला ॲडमीशन घ्यायच अस ठरल होत ... भले ही एकच शाखेला नसलं तरी कॉलेज एकच असल की सोबत जाता येईल ...कॉलेज मध्ये ही एकत्र असू अशी आशा.

बोर्ड एक्झाम अगोदर दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता .सर्व मुलींनी मिळून साडी घालायचं ठरवल होत.मुल आपली जीन्स टी शर्ट वर च खुश होती.अंजली ला ही तिच्या मम्मी ने त्यांची सुंदरशी साडी नेसवून तयार केलं होत सरु ही तिच्या मम्मी ची साडी घालून आली होती.

सरु : वाव अंजली किती मस्त दिसत आहेस तू..

सरु ने अंजली ला पाहून म्हंटले..अंजली तिच्या कडे पाहून हसत बोलली ..

अंजली : तू ही खूप छान दिसत आहेस सरु...तुझ्या सुदीप नी पाहिलं की नाही मग त्याच्या सरु ला साडी मध्ये?

अंजली सरु ला एक डोळा मारत बोलली...त्यावर सरु लाजली.

सरु : अंजली तू पणं ना..

अंजली : अरे बापरे ...आमची सरु लाजली..

दोघी ही हसतच शाळेकडे निघाल्या.शाळेत ही दहावी च्या सर्व मुलीनी साडी घातली होती . दररोज शाळेच्या ड्रेसमध्ये दिसणाऱ्या छोट्या छोट्या मुली आज जास्तच सुंदर व मोठ्या दिसत होत्या . मुले तर मुलींना पाहून कावरी बावरी झाली होती ..त्यांना तर खरचं वाटत नव्हत की ह्या त्याचं मुली आहेत ज्या आपल्या सोबत शिकत होत्या.मुली नच मात्र वेगळं च चालू होत ..कोणी कसली साडी घातली आहे ..कोणी केसाची वेणी कशी घेतली आहे ...वगेरे वगेरे

निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला आणि प्रथम बोलायला सुरुवात केली सगळ्यांच्या लाडक्या चव्हाण सरांनी..

चव्हाण सर : माझ्या लाडक्या मुलांनो...हा आज लाडक्या बोलतोय तर चकित झालात ना ? वर्ष भर मार मार मारल शिक्षा केल्या आणि आता जाताना लाडक्या बोलत आहेत सर असा विचार करताय ना ?
चव्हाण सरांनी अस बोलल्या वर सगळेच हसायला लागले ..सर ही थोड हसले व पुढे बोलू लागले.

जरी मी तुम्हाला शिक्षा करायचो ,तुम्हाला रागावत होतो तरी ते फक्त तुमच्या च भल्या साठी केलं बाळांनो ...माझ्या भीती पोटी का होईना तुम्ही अभ्यास पूर्ण करायचा...आणि त्याचा फायदा आता तुम्हाला तुमच्या परीक्षे मध्ये नक्की होईल.आम्ही शिक्षा केली म्हणजे शिक्षक वाइट आहेत अस वाटत ना ? पणं बाळांनो ..फक्त आपल्या विद्यार्थ्याल शिकवण आणि त्याला घोकमपट्टी करायला लावणं हे एका चांगल्या शिक्षकां च लक्षण नाही तर ... जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचे धडे देतो ,त्याला एक उत्तम नागरिक बनवतो .. समाजात वावरण्यासाठी त्याला तयार करतो तोच खरा शिक्षक असतो अस मला तरी वाटत..तुमच्या पैकी बरेच जन खूप समजूतदार आहे त...पणं अजून ही काही जण अल्लड आहेत पणं हळू हळू त्यांना ही समज यायला लागेल...

सर थोडा वेळ थांबून परत बोलतात ..खूप बोलतोय ना आज पणं आज तुमचा या शाळेतील शेवटचा दिवस त्यामुळे आज एक दिवस घ्या सांभाळून ..
तुमची बॅच खरच एक चांगली बॅच होती . तुमच्यात ले काही जण का होईना भविष्यात खूप नाव कमावतील व आपल्या या शाळेच नावही उज्ज्वल करतील अशी मला खात्री आहे.तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसेच ..तुमच्या परीक्षे साठी ही खूप खूप शुभेच्छा ..एवढं बोलून मी थांबतो मुलांनो..

चव्हाण सर बोलून थांबले त्यानंतर ..बाकी शिक्षक ही बोलले..आता मुलांची बारी होती ..दोन शब्द बोलण्याची त्यामुळे सगळे आप आपसात कुजबुज करायला लागले ..एक दोन जण पुढे जाऊन बोलून आले ..आता सगळ्यां शिक्षकांनी अंजली ला पुढे बोलावलं..अंजली ही पुढे गेली व बोलू लागली.

अंजली : खर तर आज काय बोलावं कळतच नाहीये सर,मॅडम ...आज शाळेतला शेवटचा दिवस आहे याचा विचार करूनच डोळे भरून येतात..इतके दिवस वाटायचं कधी या शाळेची कटकट जाणार मागून ...एक दिवस तरी आराम मिळावा पणं आता पुन्हा या शाळेत येऊन शिकता येणार नाही ...पाटील मॅडम च्या मराठीतील मधाळ कविता कानी पडणार नाहीत,शेख मॅडम सोबत हिंदी बोलताना आता अडखळणार नाही,इंग्लिश च्या वरदे सरांची उगाचच भिती वाटणार नाही ...प्रयोग शाळेत आता प्रयोग करताना चुका झाल्या म्हणून सरांचा ओरडा ही खायला मिळणार नाही,चव्हाण सरांनी इतिहासा मध्ये रंगवून सांगितलेले प्रसंग ऐकून अंगावर रोमांच उठणार नाहीत...किती किती आठवणी आहेत शाळेतल्या ...आता आम्ही हे सगळं खूप खूप मिस करणार ...शाळेच्या पहिल्या दिवशी जेव्हा मुल शाळेत येत त्या दिवशी ते खूप रडत असत कारण त्याच्या आई पासून ते पहिल्यांदा च अस दूर राहणार असत ना पणं जेव्हा शाळेचा शेवटचा दिवस येतो तेव्हा ही डोळ्यात अश्रू च असतात...कारण इतका लळा लागलेला असतो शाळेचा की आता या शाळेत येऊन पुन्हा शिकता येणार नाही याच खूप वाइट वाटत.

अंजली च बोलणं ऐकून सगळेच भावूक झाले होते .
अंजली पुढे बोलू लागली .

सर ,मॅडम आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं.चांगल्या वाईट गोष्टी शिकवल्या.वेळ प्रसंगी आमच्या चुकांवर रागवून आम्हाला चुका करण्यापासून परावृत्त केल.आमच्या चांगल्या कामासाठी आम्हाला शाबासकी दिली ..तुमचे ऋण फेडण्या इतपत आम्ही मोठे नाही तरी ही आमच्या वर्गाकडून एक छोटीशी भेट आम्ही शाळेला देत आहोत ती सरांनी स्वीकारावी मी अशी सर्वांच्या वतीने विनंती करते..

दहावीच्या मुला मुलींनी मिळून थोडे थोडे पैसे जमा करून शाळेसाठी एक छोटंसं गिफ्ट आणल होत तेच द्यायचं होत म्हणून अंजली ने आपल्या वर्गातील इतर मुला मुलींना ते गिफ्ट आणायला सांगितलं सगळ्यांनी मिळून ते गिफ्ट मुख्याध्यापक सरांनकडे सुपूर्द केलं .

त्यानंतर बऱ्याच गप्पा झाल्या .छोटासा नाश्त्याचा कार्यक्रम ही झाला सर्व शिक्षकांचा आशिर्वाद घेऊन मुल आपआपल्या घरी परतली . सरु, अंजली, निशा, रेखा सगळ्या मिळून अभ्यासाला लागल्या आणि एकदाच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु झाल्या . परिक्षा शेजारील गावात होत्या त्यामुळे सरु, अंजली व इतर मुली ही बस नी गेल्या..पाहिल्या दिवशी सर्व जनीच कमालीचा अस्वस्थ होत्या..कसा असेल पेपर? तिथले सर ही अनोळखी असणार ..नीट तर जाईल ना पेपर ...अभ्यास तर झालाय ना ? एक ना धड किती तरी प्रश्न डोक्यात गोंधळ करून बसले होते प्रत्येकाच्या .
धडधडत्या काळजाने सर्वांचा पहिला पेपर झाला ..तसा पेपर मराठी होता म्हणून छान च गेला सर्वांना ..अंजली ,रेखा ,सरु ,निशा चौघी ही वेगवेगळ्या ब्लॉक मध्ये होत्या.अंजली ज्या ब्लॉक मध्ये होती त्या मध्ये तिच्या शाळेची ती एकटीच होती अस तिला वाटल पणं पेपर सुरू होण्या पूर्वी तिला कळाल की योगा योगा ने नसीर ही तिच्या च ब्लॉक मध्ये आहे आणि ते ही तिच्या बाजूच्या बॅचवर ..पणं अंजली ने अजिबात त्याच्या कडे लक्ष दिलं नाही..नसीर ला आता पश्चाताप होत होता की आपण अंजली सोबत भांडलो नसतो तर निदान थोडी तरी मदत तिने आपल्याला पेपरला केली असती पण आता काय ती साध त्याच्या कडे पाहत ही नव्हती .

एकदाचे पेपर संपले आणि सगळे खुश झाले .अंजली ग्रुप चा तर पहिला विचार हा च चालू होता की पास झालं की कोणत्या कॉलेज ला अॅडमिशन घ्यायच.शेवटचा पेपर झाल्यावर सर्व जन मिळून शाळेजवळ असणाऱ्या छोट्या गाड्या जवळ वडापाव खाण्यासाठी थांबल्या होत्या आणि तिथेच त्यांच्या गप्पा सुरू होत्या.

रेखा : ये अंजली तू पास झालीस की कोणत्या कॉलेज ला अॅडमिशन घेणार ..

अंजली : अग बघू अजून काही ठरवल नाही.

निशा : ये तू कोणत्या ही कॉलेज ला घे पणं मला सांग आधी ..मी ही तू घेशील त्याचं कॉलेज ला घेणार आहे अॅडमिशन ..

स्नेहा : तूच नाही आम्ही पणं ..अंजली घेईल तिकडे च घेणार..

सरु : ये काय तुम्ही सगळ्या ..आजच तर ते पेपर संपले आणि तुम्ही आता परत तेच अभ्यासाच, कॉलेजच घेऊन बसला .. थोडा तरी धीर धरा ... आधी पास तर होऊ दे मग निकाल हातात मिळू दे मग ठरवायचं बाकी सगळ ... आता सुट्टी त कोण कुठे जाणार हे ठरवा ..

रेखा : होय ,सरु बरोबर बोलतेय ..

रेखा अस बोलताच निशा ने तिच्या डोक्यात एक टपली मारली व ती बोलली.

निशा : ये काय ती बरोबर बोलतेय ..तुला आणि सरु ला तर पहिल्या पासून च अभ्यासाची अॅलर्जी आहे ..

निशा आणि अंजली एक मेकिंग टाळी देऊन हसू लागल्या.

अंजली : सरु ,तू जाणार आहेस सुट्टीत कुठे ?

सरु : हो ग ..मी माझ्या मावशी कडे जाणार आहे ती मुंबई ला आहे ना..मग मावशी कडे ही जाण होईल आणि मुंबई ही पाहायला मिळेल ना ?

निशा : अरे वा सरु ची तर मज्जा आहे मग ?

अंजली : हो ना ...ये सरु पणं तू मला सोडून जाणार ?

सरु : अंजली मी लगेच परत येईन ...आणि तुला फोन करेन ना तुमच्या घरच्या फोन वर ..
( तेव्हा कोणा कडेच मोबाईल नव्हते बर का )

अशाच गप्पा मारून व खाऊन सर्वजणी घरी निघून आल्या .सरु चार दिवसांनी आपल्या मावशी कडे गेली जाण्या आधी अंजली ला भेटून गेली .अंजली मात्र सुट्टीत कुठेच गेली नाही.

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED