Tujhi Majhi yaari - 13 books and stories free download online pdf in Marathi

तुझी माझी यारी - 13

सरु च लग्न झालं आणि अंजली व सरु च्या वाटा वेगळ्या झाल्या .अंजली आणि निशा सोबत कॉलेज ला जाऊ लागल्या.अंजली सरु ला खूप मिस करायची.निशा ला ते कळत होत.एकदा दोघी कॉलेज सुटून येताना निशा ने अंजली ला विचारल.

निशा : अंजली सरु ची खूप आठवण येते का ग?

अंजली : आठवण येते ..पणं त्या ही पेक्षा जास्त वाईट वाटत.

निशा : वाइट कशाच ?

अंजली : मी सरु साठी काहीच करू शकले नाही...याच ग..

निशा : जाऊ दे ना अंजली तुझ्या हातात काय होत ? असत तर तू हेल्प केली असतीस ना तिची ?

अंजली : हो..पणं निशा सगळे च कॉलेज ला असते ..सरु ,स्नेहा ,रेखा तर किती मज्जा आली असती ना ?

निशा : हो ना ..पणं आता आपण काय करू शकतो?

त्यानंतर दोघी ही घरी आल्या.काही दिवसांनी सरु माहेरी आली तेव्हा ती अंजली ला भेटायला तिच्या घरी आली.सरु ला पाहून अंजली ला खूप आनंद झाला.अंजली ने सरु ला पाहून मिठी मारली.

अंजली : सरु..I miss you ... तूझी खूप आठवण येते मला..

सरू ही अंजली भोवतीची आपली मिठी घट्ट करत बोलली.

सरु : मला ही तुझी खूप आठवण येते अंजली.

थोड्या वेळ दोघी ही काहीच बोलल्या नाहीत ..अंजली ने सरु ला निरखून पाहिले .. नेहमी ड्रेस मध्ये दिसणारी सरु आज साडी वर होती..हातात हात भरून हिरवा चुडा होता.गळ्यात छोटंसं मंगळ सूत्र..पायात जोडवी ..कपाळावर टिकली ...खूप वेगळी च दिसत होती सरु ..थोडी जाड ही झाली होती.

अंजली : सरु लग्न मानवल म्हणायच तुला जाडी झाली आहेस की..

सरु ने फक्त अंजली ला पाहून हसली..

सरु : अंजली ..कस चालू आहे कॉलेज? कोण कोण आहे अजून ?

अंजली: कॉलेज च सोड आधी सांग ..तुझ्या सासरचे कसे आहेत ? आणि नाव काय आहे भाऊजी च ? करतात काय ?ये सासू सांभाळून तर घेते ना?

सरु : अग किती प्रश्न विचारशील?

अंजली : नको का विचारायला ?लग्नाला तर मी येऊ शकले नाही आणि वरून तेव्हा ही काही माहित पडल नाही तुझं लग्न अचानक झालं त्यामुळे..

सरु : हम्म ..नाव हरीश एरणे आहे त्याचं आणि एका कंपनी मध्ये आहेत कामाला..आहेत सगळे चांगले घरचे ही ..एक नणंद आहे ..तिचं लग्न झालं आहे..आणि हे एकटेच आहेत..सासू ,सासरे मी आणि हे ..इतकेच आहोत..आणि अग हो चुलत दिर , नणंद ही आहे ..ते खूप चांगले आहेत .

अंजली : म्हणजे एकंदरीत तू खुश आहेस ?बर झाल मला वाटलं होत ..सरु च लग्न अस अचानक झालं काय होत काय माहीत ?आणि स्वयंपाक तर जमत नव्हता तुला..सासू ओरडते का ग ?

सरु : आता शिकतेय ...सासू शिकवतात..बर ते सोड ना तू सांग ना कॉलेज कस चालू आहे?

अंजली: कॉलेज छान ..निशा आणि मीच आहे फक्त ..रेखा नापास झाली आणि स्नेहा ने शाळा सोडली त्यामुळे आता आपल्या ग्रुप मधले तर फक्त मी आणि निशा च आहे..पणं तू असती ना सरु खूप मस्त वाटलं असत ..आपण किती स्वप्न पाहिली होती एकत्र कॉलेज ला जायची..

अंजली थोड उदास होत बोलली ..त्यावर सरु ही थोड दुखी होत बोलली.

सरु : सगळी च स्वप्न पूर्ण होत नसतात अंजली..

अंजली : हम्म ..बर जाऊ दे तो विषय..सरु चल ना एक फोटो काढू ..माझ्या कडे तुझा एक ही फोटो नाहीये..

सरु : अग पणं साडी वर ..नको आणि मी नीट तयार ही झाली नाही..

अंजली : अग त्यात काय तू माझा ड्रेस घाल ..

अंजली तिला आपला ड्रेस देते सरु तो घालून अंजली सोबत गावातल्या फोटो शॉप मध्ये जाऊन सोबत एक फोटो काढून येतात.त्यानंतर बराच वेळ गप्पा मारून सरु तिच्या घरी जाते .

दोन दिवसांनी सरु आपल्या सासरी निघून जाते.

अंजली संध्याकाळच्या वेळी कॉलेज वरून येऊन घरी पुस्तक वाचत बसली होती तेव्हा त्यांच्या घरच्या लॅन्ड लाईन वर फोन आला .अंजली ने फोन उचलला .

अंजली : हॅलो..कोण बोलतंय ?

अंजली ,मी सरु बोलतेय .

सरु चा आवाज ऐकून अंजली खुश होते .

अंजली : सरु तू ? आज फोन अचानक ? अग फोन आहे तर तू करत का नाही मला फोन ?

सरु : अंजली माझ्या कडे फोन नाही ..माझे चुलत दिर आहेत त्यांच्या कडे आहे फोन ..आज घरी कोणी नाही म्हणून मग मी त्यांचा फोन घेऊन केला आहे फोन..

अंजली : कशी आहेस ? कधी येणार आहेस सरु तू ? किती महिने झाले आपण भेटून ?

सरु : मी ठीक आहे..हो ग..पणं आता दिवाळी ला येणार आहे मी दोन दिवस तेव्हा भेटू..

दोघी थोडा वेळ गप्पा मारता त ..त्या नंतर सरु अंजली ला बोलते.

सरु : अंजली अग माझी चुलत नणंद आहे ना तिला तुझ्या सोबत बोलायचं आहे .. बोलती का देऊ का फोन तिला ?

अंजली : विचारते काय दे ना ..

सरु आपल्या नंदेला फोन देते .

अंजली : हॅलो नाव काय आहे तुझं ?

ती :शीतल ...अंजली दीदी वहिनी तुमच्या बद्दल खूप सांगते ..सारखं अंजली अशी अंजली तशी ..सांगत असतात.

अंजली : हो का सरु ला काही काम नाही..काय काय सांगते ग सरु माझ्या बद्दल शीतल ?

शीतल : तुम्ही वहिनीच्या जिवलग मैत्रीण आहे..तुम्ही शाळेत काय काय मज्जा करायचा...तुम्ही त्या नसीर ला कस मारल होत.

अंजली शीतल च बोलणं ऐकून हसायला लागते.

अंजली : अरे देवा सरु ने तर सर्वच सांगितलेलं दिसतंय ..

शीतल : हो मग ..वहिनी तर दिवस भरात किती तरी वेळा तुमचं नाव घेत असतात.

अंजली : बस बस किती माझं कौतुक ...बर शीतल शाळेला जातेस ना ?

शीतल : हो दीदी मी आता आठवीला आहे.

अंजली : हो का ? अभ्यास करत जा ..जास्त सरु सोबत गप्पा मारत जाऊ नको तिला काही काम नसत बोलायला लागली की बोलत च बसते.

अंजली च बोलणं ऐकून सरु ही हसते.

थोड्या वेळ बोलून झाल्यावर अंजली शीतल ला बोलते.

अंजली : शीतल सरु खूप भोळी आहे ग ..आणि तिचं अस अचानक लग्न झालं आहे तिला समजून घ्या थोड ..ती इथे आल्यावर सांगत होती माझी नणंद छान आहे म्हणून तू तिला विचारत जा ..तिला काही त्रास असला .. किंवा तिला कधी उदास वाटलं तर तू गप्पा मारत बसत जा.

शीतल : हो दीदी मी असते ना वहिनी सोबत तुम्ही काळजी करू नका.

अंजली मग फोन ठेवून देते .अधून मधून सरु आपल्या दिराच्या मोबाईल वरून अंजली ला फोन करत असे.शीतल आणि अंजली ची चांगली गट्टी जमली होती.

क्रमशः



इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED