अनोखे मिलन Suraj Kamble द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनोखे मिलन

आई मी शाळेत जातो,
असं म्हणत राजीव शाळेत जायला निघाला..

अरे थांब, आई जवळ येत म्हणाली,

मी दिलेला डब्बा पूर्ण खाशील
आणि राहूल ला देशील,
(राहुल-राजीव जिवलग मित्र,जीव की प्राण,
अभ्यास सोबतच करायचा,सोबतचं राहायचं,यांच्या मैत्रीला पाहून तर मुलं-मुलीही जळत असत)

कारण ही तसेचं होते,
एकमेकांच्या आयुष्यात एवढे खुश की कुठे काय चाललंय,
यांना अजिबात माहिती नसायचं,
बरं असो,
आईला हो म्हणत राजीव शाळेत🏛️ निघुन गेला...

अरे ये राजीव,
दुरूनच दिसताच राहुल ने त्याला हाक दिली,
मी तुझीचं वाट बघतोय!
अरे परीक्षा तोंडावर आली,आपल्याला अभ्यासाचा जोर
पुन्हा वाढवावा लागेलं नं...
जशी आपली मैत्री,👬
सगळ्यांना जळवीत असते,तसचं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत चांगल्याच मार्कांनी पास व्हावं लागेल,
तरचं आपल्या यारी दोस्तीची शान राहील..☺️

अरे छोड ना यार,
राहुलच्या हातातील परीक्षेचं वेळापत्रक घेत
स्मित हास्य करत राजीव म्हणाला...

तुला आपल्या दोस्तीवर विश्वास आहे नं?
मग आपल्याला परीक्षेतही चांगलेच मार्क्स मिळेल,
चल बरं आपण जेवण करून घेऊ,
आईने तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी डब्बा पाठवला,
असं म्हणत राहुल ला घेऊन तो जेवायला निघून गेला..

बरं ठीक आहे,
पण आता आपण जास्त seriously अभ्यास📖 करूया,

राहुल आणि राजीव आता अभ्यासाच्या तयारीला लागलेत,
एकमेकांना असणाऱ्या अडचणी हे सोडवत असत,
आणि एकमेकांना अभ्यासात मदत ही करत असत,
तसा राहुल हा राजीव पेक्षा थोडा जास्त हुशार..🙇

एकदाची परीक्षा संपली,
आता वाट होती ती निकालाची,
निकालाची म्हणण्यापेक्षा ही परीक्षा होती,
त्यांच्या यारी दोस्तीची...

निकालाचा दिवस आला,
दोघांच्याही मनात,थोडी भीती होती,
१४जून निकालाची तारीख असते,
आणि पुन्हा एकदा यांची आज यारी दोस्ती जिंकली असते,
राजीव ला ८६ टक्के,
आणि राहुल ला ८९ टक्के मिळतातं...
दोन्हीही मित्र आपल्या शाळेतून प्रथम आणि द्वितीय येतात,
सर्व शाळेत त्यांचं अभिनंदन होते,
या पोरांनो, हा घ्या पेढा,आज तुम्हीं आमची शान राखली,
याही पेक्षा मह्त्वाचे म्हणजे,यारी दोस्तीची शान राखली,
असं म्हणत बाबा दोघांनाही पेढे भरवतात..
राहुल आणि राजीव नमस्कार करतात,
आणि राहुलच्या घरी निघून जातात...

तसं राहुल च घर काही खूप मोठं नाही आणि मोलमजुरी करून राहुल ला शिकवीत असतात,
फारसे काही शिकलेले नसल्याने शिक्षणाने नोकरी लागते एवढंच यांना माहिती असते,
अहो🗣️ काकू,
राहुल वर्गात पहिल्या नंबरनी पास झाला,
असं म्हणत राजीव घरात येतो,
पहिल्या नंबरनी पास झाला एवढंच चांगलं त्यांना वाटते,
एवढाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य देऊन जाते...
अशीच काही वर्षे यांच्या मैत्रीची आणि जीवनातील निघून जातात..
यंदाचं हे अभियांत्रिकी📝 पदवी चं हे शेवटचं वर्ष असतं,
दोघेही एकाच महाविद्यालयात असतात,
नियमित कॉलेज ला जाणे,
अभ्यास करणे आणि परत आपल्या खोलीवर येणे,
एवढाच नित्यक्रम यांचा असतो..

(महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी यांना बाहेरगावी आणि चांगल्या महाविद्यालयात नंबर लागला म्हणून राहुल आणि राजीव दोघेही होस्टेल वर एकाच खोलीत राहत असतात)

एकेदिवशी,
राहुल मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचे आहे,
असं म्हणत सहिंता निघून गेली,

सहिंता ही पदवी अभ्यासक्रमाला यांच्यासोबत शिकत होती,अभ्यासात ही हुशार आणि पहायला ही देखणी अशी कुणाच्याही नजरेत भरावी अशी,
तिचे लांब कमरेपर्यंत केस,मध्यम उंची👰 आणि सुंदर असा शरीराला आकार असलेली ही मुलगी...
संहिता ला माझ्याशी काय बरं नेमकं बोलायचं असेल,
असा विचार राहुल आपल्या मनातच करू लागतो
अरे राहुल,
एवढा कसल्या विचारात मग्न आहे????

अरे ती सहिंता ओळखतोस का??
आपल्या वर्गातच शिकायला आहे,तू तिकडे गेला असता ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली,
की ,राहुल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे??
मग जा बोलून घे,
काय बोलायचं तिला तर,ऐकून घे असं राजीव उत्साहाने म्हणाला,

अरे मित्रा,तू चल ना सोबत,मला नाही जमणार एकट्याला!
तू चल बरं सोबत माझ्या?
असं तोंडावर प्रश्नांच्या घड्या येत राहुल म्हणाला..
पण मला नाही बोलावलं,बघ ना आपण नेहमी सोबत असतो,तिला जर मी असताना बोलायचं असतं तर कधीचीच बोलली असती ना ती..
मी कॉलेज लायब्ररी ला बुक📘 issue करायसाठी गेल्यावर एकट्यातच बोलली न तुझ्याशी ती,
तुझ्याशीच बोलायचं आहे तिला,
तूच जा बाबा,मी नाही येत...

हिंमत नाही होत आहे रे,पहिल्यांदा एवढ्या जिवलग मित्राला सोडून असं काही नवीनच करावं लागत आहे!!!

ऐकून घे काय म्हणणं आहे तिचं तर,
best of luck✌️
हे म्हणताना मात्र,राजीवचा चेहरा पूर्ण उतरून गेला होता...

दुसऱ्या दिवशी,
राहुल ,संहिता ला भेटायला आणि बोलायला तयार होतो,
राजीव ऊठ ना,कॉलेज ला नाही जायचं काय,
नाही यार आज बरं नाही वाटत आहे,
तू ये जाऊन,हळूच कॉट वर झोपेतच राजीव म्हणाला,
(मुद्दामच होत हे बरं नसणं,कारण राहुल आज राजीवला न सोबत घेता एकटाच एका मुलीशी बोलायला चालला होता,ते ही राजीव ला न घेता,या विचाराने मात्र राजीवचे डोळे पाणावले होते,एवढं खर)
बरं तू आराम कर,येताना मी तुझ्यासाठी tablets घेऊन येईल,
येतो मी कॉलेज ला जाऊन,असं म्हणत राहुल कॉलेज ला निघून गेला...

इकडे संहिता राहुल येण्याची वाटच पाहत
बसली होती,
अरे ये राहुल,मी तुझीचं वाट पाहत बसले होतें,
आणि तो तुझा मित्र राजीव कुठे दिसत नाही,
संहिता म्हणाली,
अगं त्याला आज बरं नाही,म्हणून तो झोपूनच आहे,
संहिता मनात मात्र भलतीच खुश झाली होती,कारण आज तिला राहुल सोबत मनोसक्त मनातलं बोलता येणार होतं,
राजीव विषयी थोडा रागचं तिच्या चेहऱ्यावर येतो,
प्रत्येक वेळेसचं तो आणि राहूल सोबतचं असायचा,आणि संहिता चं बोलन राहून जायचं,
पण आज मात्र राजीव सोबत नव्हता,
अगं बोल,
कुठल्या विचारात मग्न झाली आहेस,
काल म्हणाली होती न ,माझ्याशी बोलायचं आहे म्हणून,
लवकर काय बोलायचं ते बोल,
मग मला राजीव साठी tablets घेऊन जायच्या आहेत,
राजीवचं नाव काढताचं संहिता च्या चेहऱ्यावर रागाच्या छटा उमटल्या,
जिथं पाहिलं तिथं राजीवचं,राजीव,
दुसरं काही सुचत नाही का रे राहुल तुला,
एक सुंदर मुलगी तुझ्याशी बोलायला आली आणि तू फक्त त्या राजीवचं घेऊन बसला आहे,
चिडक्या स्वरात संहिता बोलत होती,
संहिता,
तू राजीव विषयी उगाच काही बोलू नकोस,
तुला नाही माहिती की तो माझ्यासाठी कोण आहेस,
बरं असो,
तुला जे काही बोलायचं ते स्पष्ट आणि जरा लवकर बोल,

बरं ठीक आहे सॉरी,
राहुल,मला तू जेव्हा कॉलेजमध्ये आला तेव्हापासून तू आवडत होता,
पण मी तुला हे कधी कळू दिलं नाही,
हे आपल्या पदवीचं शेवटचं वर्ष आहे ,आणि आज जर हिंमत नसती केली तर कदाचित,मी माझ्या मनातलं तुला कधी सांगितलं नसते,
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,
आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे,
माझ्याशी लग्न करशील का रे राहुल????
असं म्हणून संहिता मोकळी झाली...

संहिता च्या अश्या एकाएकी बोलण्याने राहुल ला काय बोलावे ,काही सुचत नव्हतें,
पण मी तर तुझ्याविषयी कधी असा विचार केला नाही,
आणि मी कधीही तुझ्याकडे या नजरेने👀 पाहिलं पण नाही,
आपण मित्र👫 राहू शकतो का??
आवडेल का तुला,
असा कोड्यात टाकणारा प्रश्न संहिता समोर राहुल ने टाकला..
पागल झालास काय राहुल???
मी तुझ्यावर प्रेम केलं आहे आणि तू मैत्रीची गोष्ट करतो आहे,
काय कमी आहे रे माझ्यात,
तुला मी सर्वस्व द्यायला तयार आहे आणि तू एक मैत्रीची अपेक्षा करत बसला आहे,
नामर्द आहेस का तू??
की तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही,
भावना नाहीत का तुझ्यात काहीचं,????
असं जिव्हारी झोम्बंणार संहिता बोलून गेली होती,

अगं पण,
मी तुझ्याविषयी असा कधीचं
विचार देखील केला नाही,
आज विचार कर,
नसेल केला विचार तर आणि मला मगच उत्तर दे,🤷
आणि राहील मैत्रीचं तर तो राजीव काही तुझ्यासाठी कमी नाही,
त्यालाचं ठेव आपला मित्र,
चिडून संहिता बोलत होती,

मी काहीच सांगू शकत नाही,
राजीव आणि माझ्यात कुणीच येऊ शकत नाही,
ना तूझं प्रेम ना कुणाची मैत्री,
एकाच श्वासात राहुलने धाडकन बोलून टाकून तो मोकळा झाला....
जाता जाता तो सॉरी म्हणत नाहीसा झाला,

संहितेच्या डोळ्यात मात्र फक्त आता अश्रू येत होते,कारण प्रेमात तिची हार💔 झाली होती,
त्या दोघांच्या मैत्रीमध्ये हिचा सपशेल असा पराभव झाला होता,
ती रडतचं एका जागेवर अश्रू भरल्या नजरेनी राहुलला नजरेसमोर नाहीशी होत पर्यंत पाहत राहिली...
मनात एक विचार घेऊन की राहुल ने असे का म्हटले असावे!!!
राजीव आणि माझ्यामध्ये कुणीच नाही येऊ शकणार ना तुझं प्रेम ना कुणाची मैत्री!!!!

खोलीवर आल्यानंतर,
अरे राजीव उठ,
चल जेवण करून घेऊ,
मग तू ही tablet खाऊन झोपून जा,
दोघेही मेस मध्ये जेवण करून येतात,

अरे राहुल,काय झालं???
संहिता बोलली की नाही तुझ्याशी,
हो बोलली ना मीही बोललो आणि ती ही बोलून गेली,
काय बोललीस रे ती??
सांग ना मला पण???
असू दे,ते एवढं काही मह्त्वाचे नाही...
तू आराम कर...राग चेहऱ्यावर येत म्हणाला,

सांग न राहुल,
नेमकं काय झालं,असा का रागावतो आहे,!!

नको(रागातच)
आणि यापुढे तिचा विषय निघता कामा नये,
दिलं मी उत्तर द्यायचं ते,तू स्वतःची काळजी घे अगोदर,
असं म्हणत राहुल बाहेर निघून गेला,..
सहितां चा विषय मग कधी दोघात रंगला नाही...

एकदाची पदवी परीक्षा संपली, निकाल ही लागला,राहुल आणि राजीव यांना चांगले मार्क्स मिळाले,घरचेही आनंदित होते,
दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखत🕴️ देत होते,
योगायोग असाच की एक चांगल्या शहरात यांना दोघांनाही वेगळ्या वेगळ्या कंपनी मध्ये चांगल्या पगाराचा जॉब पण मिळाला...

आता एकाच शहरात आणि नामांकित कंपनी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी असल्याने एकाच फ्लॅट मध्ये राहायचे ठरवले,
कारण एकमेकांशिवाय वेगळं राहन यांना तरी ते शक्य नव्हतं...
राहुलच्या घरची स्थिती आता बऱ्यापैकी सुधारली होती,
दिवसभर कंपनी मध्ये कामाला जायचे आणि संध्याकाळी एकमेकांना कामात मदत करायचे,कधी झगडायचे,असं सर्व ठीक चाललं होतं,
अशी ४-५ वर्षे कधी निघून गेले माहीती पडले नाही,

फोन📲 वाजतो,
हॅलो राजीव,
कसा आहेस???
राहुल कसा आहेस???
जॉब कसा सुरू आहे???
एका क्षणात आईने मोबाईल वरून प्रश्नांची ही झडी लावली...
सर्व मजेत आहे आई,...
तुम्ही कसे आहेत????
आम्ही सर्व मजेत आहे राजीव,

अरे ऐक ना,
बोल न गं आई,राजीव आईला म्हणाला,
आता आम्ही काय म्हणतोय,
आम्ही आता थकलो,
कामही पाहिजे तेवढे होत नाही,
बाबाही थकले आता,
आम्ही ठरवलंय,तुझ्यासाठी चांगले स्थळ येत आहे,तुझं या वर्षी लग्न करून टाकूया!!!
लग्न शब्द ऐकताच राजीव घामाघूम झाला,
काय बोलावे,
शब्दही तोंडून बाहेर पडत नव्हता,
तसाचं त्याने ठीक आहे म्हणत,
फोन📱 ठेवून दिला...

इकडे राहुलच्या घरीही असंच निरोप यायचे आणि लग्नाचा विषय आला की दोघेही चिंतातूर व्हायचे...
एक दिवस ऑफिस ला जात असताना ,
अरे राजीव!!!
तू राजीवचं ना???
ओळ्खलस का मला??
मी संहिता,आपण एकाच कॉलेज ला एकाच पदवी अभ्यासक्रमाला होतो,
संहिता तिची ओळख काढून देत होती..

हा अच्छा !!!आलं आलं लक्ष्यात,
बोल,कशी आहेस तू????
मी तर एकदम मजेत,लग्न करून याचं शहरात आहे,सहिंता गालावर स्मित हास्य करून सांगू लागली,
राहुल कसा आहे???
कुठे राहतो सध्या???
तो ही याचं शहरात आहे,आम्ही दोघेही वेगवेगळ्या कंपनी मध्ये कामाला आहो,पण एकाच फ्लॅट मध्ये राहत असतो....

आठवते का तुला राजीव!!!
आपण लास्ट इयर ला होतो,आणि मी राहुल ला भेटायला बोलवलं होतं!!
काही सांगितलं का त्याने या विषयी,
त्या दिवशी काय झालं होत तर?????
सहिंता अचुक बोलत होती,

नाही ,नाही,काहीच माहिती नाही
या विषयी,
त्या दिवसापासून कधी तुझा विषय रंगला नाही,
आणि त्यानेही या विषयी कधी विचारायचं नाही,
अशी सक्त ताकीद दिली होती....

पण मनात मात्र आता राजीवच्या खूप वर्षापासून अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नाच उत्तर,
कदाचित सहिंता देऊ शकेल अशी आशा राजीव ला तिच्या चेहऱ्याकडे पाहून वाटू लागली...

त्या दिवशी तू नाही आला,
मला फार आनंद झाला होता,कारण तुझा मला नेहमी राग यायचा,
सतत राहुल तुझ्याचं सोबत असायचा,आणि
मला त्याच्याशी बोलायचं राहून जायचं,
त्या दिवशी मी राहुलला लग्नासाठी मागणी घातली होती,
माझं त्याच्यावर प्रेम होते,
पहिल्या वर्षांपासून,तो मला आवडत होता,
पण????
पण काय???
अरे त्याने मला तेव्हाचं नकार दिला,
एकदाही विचार केला नाही,
आणि त्याने सरळ सरळ सांगून टाकले की,
राहुल आणि राजीव च्या मध्ये कुणीचं येऊ शकत नाही,
ना तुझं प्रेम
ना कुणाची दोस्ती....
बोलता बोलता सहिंतेच्या डोळ्यात अश्रु तरळले,
बरं असो,चल भेटू कधीतरी पुन्हा,
त्याला मी भेटली म्हणून सांगू नकोस,
bye म्हणत सहिंता निघून गेली...

राजीव आपल्या विचारातचं मग्न झाला

राहुलला संधी चालुन येऊन सुद्धा,
त्याने ही का नाकारावी???

मी जो विचार राहुल विषयी करतो,
कदाचित राहुल ही माझ्याविषयी तर करत असावा का???
या विचार चक्रात राजीव कधी फ्लॅट🏫 मध्ये पोहोचला त्यालाही कळलं नाही...
पण????
राहूल ला हे विचारणं योग्य राहील का??
माझ्या अश्या विचाराने कदाचित आपल्या दोस्तीत कायमचा दुरावा आला तर!!!!!
अरे राजीव,
कसल्या विचारात गुंग आहे,

can i help you???

अरे काहीच नाही....
आईचा कॉल☎️ आला होता,
लग्नासाठी मुलीचं स्थळ आले म्हणाले,
काय करावे,सुचत नाही???
राजीव चेहऱ्यावर गंभीर मुद्रा आणत म्हणाला,

dont worry!!!राजीव,

होईल सर्व व्यवस्थित,
but how राहुल???
अरे राजीव माझ्याही घरी तेचं चालू आहे,
पण माझी मुळात ईच्छा नाही!!!!
बरं यावर तोडगा माझ्याकडे आहे,

जर तुला वाईट वाटत नसेल तर मी बोलून दाखवू का???
असं म्हणत राहुल गप्प झाला
अरे बिंदास होऊन सांग...

बघ हे कठीण आहे,
पण अश्यक्य नाही आहे....
अरे पण तुला नेमकं काय म्हणायचे आहे,स्पष्ट स्पष्ट शब्दांत सांग मला!!
राजीव अधिकच आतुरतेने बोलला...
"आपण दोघांनी लग्न करायचं का???
तसंही लहानपणापासून आपण सोबत आहो,
तू माझ्यासाठी खूप काही करत आला आणि तसंही मला तुझा सहवास खूप आवडतो,
माझं तुझ्यावर प्रेम आहे!!"
आणि
आठवत असेल मी सहिंता ला तुझ्यासाठी नकार दिला ,
तिने मला लग्नासाठी प्रस्ताव घातला होता,
पण माझ्या आणि तुझ्यात कुणी दुसरं येणार
हेच मला आवडलं नाही,
म्हणून मी तात्काळ नकार दिला,,
न संकोचता राहुल मनातील सर्व बोलून गेला...🗣️

मोठा दिर्घ श्वास घेत,
अरे राहुल माझ्याही मनात तोच विचार केव्हापासून चालू होता,
पण आपल्यात दुरावा येऊ नये म्हणून मी बोलून दाखवला नाही,
आणि आठवत असेल,
तू संहिता ला भेटायला गेला आणि मी बर नाही असं सांगितलं होतं,
अरे ते सर्व खोटं होतं,
कारण माझं तेव्हापासूनचं तुझ्यावर प्रेम होतं आणि कुणीही मध्ये येऊ नये म्हणून मी आलो नाही,
एकटाच रडत राहिलो रूम वर...
राजीव बोलून गेला,

एक मोठं ओझं ह्रदयावरून हलकं झाल्यासारखं वाटत होतं,
पण राहुल,
हे सहज शक्य आहे का रे,आपल्या या संस्कृती मध्ये आणि आपल्या देशात???🇮🇳
का नाही शक्य!!!,
स्वीडन,
दक्षिण आफ्रिका,
नेदरलँड,
अमेरिकेत तर याची मोठी चळवळ आहे,
या देश्यात समलिंगी विवाहाला👬,
समलिंगी जोडप्यांना कायदेशीर मान्यता आहे,
मग आपल्या देशात मिळेल,
त्यासाठी थोडा त्याग आणि धेर्य असायला हवे,
राहुल काही क्षणात बोलून गेला,

पण???
तुझ्या घरचे,
माझ्या घरचे,
आपला हा समाज,
आणि आपण ज्या सोसायटी मध्ये राहतो,
तो याला स्वीकारेल का??
बोलता बोलता राजीवचा चेहरा पडला...
नक्कीच करेल स्वीकार
राहिला प्रश्न घरच्यांचा,
तर त्यांना आपण समजावून सांगू,
आपलं ऐकतील ते,
लहानपणापासून आपण सोबत आहे,समजतील ह्या आपल्या गोष्टी,
आणि राहिला मोठा प्रश्न समाजाचा,
एक दिवस हा ही समाज आपल्या नात्याला स्वीकारेल,
पण त्यासाठी आपल्या कडे पेशन्स आणि थोडा मानसिक त्रास घेण्याची तयारी असावी,
आणि लग्न फक्त स्त्री ने पुरुषा बरोबर केलंच पाहीजे असे कुठल्या शास्त्रात लिहून नाही,
समाजाने दिलेली ती एक प्रथा आहे,
आपण फक्त त्या प्रथेच्या विरोधात जात आहो,
लैंगिक आकर्षण आणि प्रजनन प्राप्तीसाठी लग्न 👨‍👩‍👧केल्या जाते,
आपल्यातही लैगिक आकर्षण असले तरीही,
आपण एकमेकांना समजतो,
एकमेकांवर प्रेम करतो,
हेच तर खरं महत्वाचे असते,अस म्हणत राहूल शांत झाला...

बरं ठीक आहे,
आपण घरच्यांना समजावून सांगू,या वेळेस गावाला गेलो की....

बरं राजीव,
आज जायचं का मुलगी पाहायला???

दिसायला सुंदर आहे,
शिकलेली आहे,
आणि विशेष म्हणजे आपल्या पाहणी देखणीतली आहे,
आई हळूचं राजीव ला म्हणाली..

आई मला हे लग्न करायचं नाही आहे,
माझं एकावर प्रेम आहे,राजीव चिडक्या स्वरात म्हणाला,
कोण आहे रे ती???
आपण जाऊ तिच्या घरी बोलणी करायला,
आई आनंदित होऊन म्हणाली,

ती नाही तो आहे...
आणि तुमच्या चांगल्या परिचयाचा आहे!!!!
राहुल🚶 आहे तो,
मी आणि राहुल एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे,
याला तुम्ही होकार द्यावा हीच अपेक्षा.
राजीव मनातलं सर्व बोलून मोकळा झाला,
हे ऐकताच,
आईला भुरळ आली,आणि ती चक्कर येऊन पडली,

अरे मूर्खां,
काय बोलतोस तू हे,
भानावर आहेस का???
लोक थु थू करतील आमच्यावर,
नामर्द मुलगा जन्माला घातला म्हणून टोचून बोलतील आम्हाला,
हसतील आमच्यावर,
बाबा रागात येऊन म्हणाले...

अहो बाबा,
पण मी नेमका कोणता गुन्हा केला,लहानपणापासून आम्ही सोबत मोठे झालो,
आम्हाला गरज आहे एकमेकांची,
मी आणि राहुल नि लग्न करायचं हे पक्क केलं आहे,
मग त्याला कितीही विरोध झाला तरी चालेल
राजीव ही जोशात येऊन बोलतो...

तेवढ्यात आई शुद्धीवर येते,
बहिणीच लग्न वायच आहे,
लहान आहे ती,
समोर जाऊन तिला पाहुने पाहायला येणार नाही,
समाज आम्हाला हाकलून लावेल,
तू एक काम कर,
आम्हा तिघांना ही विष पाजून मारून टाक,
मग तुला जे करायचं ते खुशाल कर,
असं म्हणत बाबाच्या डोळ्यात पाणी आलं...

राजीव च्या ही डोळ्यात
विष म्हणताच अश्रू आले,
तुम्ही खाली बसा,
मी नीट समजावून सांगतो ,
मगच करा काय ते???

बाबा आम्हाला लहानपणापासून मुलीचं आकर्षण नव्हतं,मैत्री करायला यायच्या पण आम्ही मुद्दाम टाळत असायचो...आम्ही समलिंगी आहो,आम्हाला एकमेकांचं आकर्षण आहे ,हे जर सगळीकडे माहिती झालं असत तर नाहक तुमची बदनामी झाली असती,आमचीही टिंगल उडवल्या गेली असती म्हणूनच आम्ही तुमच्याकडून लपवून ठेवलं...आम्हाला माहिती आहे हा समाज स्वीकार नाही करेल अशी जोडपी किव्हा आमचं प्रेम,तुमच्या प्रेमासाठी आजपर्यंत आम्ही लग्नासाठी टाळाटाळ करत आलो आहे ,आमचं जीवनच असत हो बाबा,आम्ही काही चांगलही केलं ना तरी हा समाज आम्हाला स्वीकारणार नाही... म्हणून हे सर्व तुमच्याकडे सांगितलं आम्ही की तुम्ही आम्हाला समजावं, आमच्या प्रेमला समजावं,कारण तुम्ही समजलात तर च आम्हीं ठीक राहू,अन्यथा आम्हाला ही जे लोकं करतात तेच करावं लागेल,जगाचा निरोप घ्यावा लागेल...

बाहेरच्या देश्यात अश्या समलिंगी विवाहाला,जोडप्याला मान्यता आहे,
आपल्याही देश्यात याला मान्यता मिळेल,
कलम ३७७ नुसार जरी हा गुन्हा असला तरी हा निर्णय अजून यायचा आहे,
मिळेल आपल्या उदारवादी देश्यात आमच्या सारख्या विवाहाला,जोडप्याना न्याय,
थोडे दिवस तुम्हाला,
मला,
राहुलच्या कुटुंबाला,
त्रास सहन करावा लागेल,बस!!!

आणि राहिला प्रश्न तुम्हाला भेडसावणारा,

वंशवाढीसाठीचा,
तर आम्ही एक मुलगा👨‍👨‍👧‍👦 ,
मुलगी दत्तक घेऊ,
तुम्हाला आजी आजोबा होण्याचं सुख मिळेल आणि आम्हाला आईबाबा होण्याचं...

आणि बाबा आमच्या शरीराची ठेवण जरी इतरासारखी असली तरी मुळात आम्हाला भिन्नलिंगी आकर्षण वाटत नाही,
नामर्द वैगरे मुलगा जन्माला घातला नाही तुम्ही,पण आम्ही तसे आहो,त्यात तुमचा ही दोष नाही आणि आमचाही दोष नाही,
जन्मदाते नाही समजतील तर आम्ही या जगण्याला पूर्णविराम द्यायचा का???
समाज तर चांगल्याही गोष्टीला नावे ठेवतो मग आम्ही तर तुमचीच लेकरे आहोत,
या ही पूर्वी आपल्या देशात शबनम मौसी या अश्याच गटातून खासदार राहिल्या आहे,
तुम्ही एवढा बळ आम्हाला द्याल की आम्ही हा भार उचलू शकू,
कदाचित आमच्यां नंतर जन्माला येणारी पिढीना हा मानसिक त्रास होणार नाही...

बरं ठीक आहे
तुम्ही म्हणता तसं करा,
शेवटी मुलाच्या खुशीसाठी,त्यांनी या अनोख्या विवाहाला होकार दिला,
इकडे राहुल ने ही घरच्यांची समजूत काढुन,
विवाहाला मान्यता मिळविली...

राहुल आणि राजीव जुने मित्र आज विवाहबद्ध झाले,
कुणाला ही न सांगता,समाजापासून लपवून ,
त्यांनी मैत्रीच्या नात्याला आता पती पत्नीचं नातं दिल,
नवीन सुरुवात यांची आज होत होती,
हे सर्व लपवूनच झालं कारण अजून समाजाला हा समलिंगी विवाह मान्य नव्हता...

परत राहुल,राजीव फ्लॅट मध्ये राहायला लागलेत
आता एक नवीन बंध त्यांच्यात निर्माण झाले होते,
आता राहुल आणि राजीव एकमेकांच्या कामात मदत करायचे,
कधी नवरा बायको प्रमाणे रागा रुसायचे,
अस सर्व व्यवस्थित चालले होते,...

पण मध्येच कधी कधी धमक्या यायच्या,
भीती वाटायची,
तुम्ही अनैसर्गिक रित्या विवाह केला,
आम्ही तुमची बदनामी करू,
पोलिसांना ही गोष्ट कळवू,
अश्या धमक्यांनी,
आम्ही घाबरून जात असे,

जिकडे तिकडे बदनामी चे घाव झेलावं लागत असे,

ऑफिस ला गेल्यावर ही आता आमचा विवाह
जो काही लपवून ठेवला तो उघड झाला,
तुम्हाला मिस्टर म्हणू
की मिस्ट्रेस.....
असं म्हणून सहकारी चिडवायचे,
खूप अपमान सहन करावा लागत असे,
एवढे बोल ऐकून कधी कधी दोघांनी स्वतःला संपवावे, असाही विचार मनात यायचा,
पण ,स्वतःला संपवलं असत तर आमच्या या त्यागाचा,काही अर्थ राहिला नसता,

नेमकं केलं तरी काय हो आम्ही,
जो समाजात विवाह असतो त्याच्या विरोधात जाऊन समलिंगी विवाह तर केला,
म्हणून एवढा त्रास या समाजानी द्यावा का???
एकमेकांबद्दल प्रेम होतं आमच्यात,
एकमेकांच्या गरजा समजत होतो आम्ही,
या मैत्रीच्या नात्याला विवाहाचं स्वरूप दिल,
आम्हाला लैंगिक आकर्षणाची एवढी भूक नव्हती,
आम्ही फक्त एकमेकांशिवाय राहू शकणार नव्हतो,
म्हणून हा निर्णय आम्ही घेतला होता!!!!
मग आमच्या सारख्या
समलिंगी आकर्षण,
प्रेम असणाऱ्या जोडप्याना,
समलिंगी विवाह करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही का???

आम्हीही शेवटी जिवंत आत्म्याचे,
आणि जिवंत भावना असणारेच ना??!!

विवाह म्हणजे फक्त स्त्री पुरुष मीलन असतं आणि संतती प्राप्त करनं हाच विवाहाचा उद्देश्य असेल तर,
त्या गोष्टी आम्ही ही करू शकतो नं,

एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेऊन,
त्याला प्रेम देऊन,
मग हा एक चांगला प्रयत्न राहील नाही का???

एकमेकात प्रेम,
भावना,
आकर्षण,
सामंजस्य होतं,
म्हणून चं हा निर्णय आम्ही घेतला न,
आमच्या घरच्यांनी ही आम्हाला स्वीकारले,
हा समाज कधी आम्हाला स्वीकारेल????

काही वर्षे मानसिक त्रासात गेल्यानंतर,
राहुल आणि राजीव आज दैनंदिन जीवन जगतात, तसे जीवन जगत आहे,
सुप्रिम कोर्टाने समलिंगी विवाहाला कलम ३७७ अंतर्गत कायदेशीर मान्यता मिळवून दिली आहे,

धन्यवाद त्या उदारवादी भारतीय राज्यघटनेचे,
जिने आमच्या सारख्या समलिंगी आकर्षण असणाऱ्या जोडप्यानी जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला,
आज मात्र राहुल,राजीव सुखाने जगत आहो,
समाजातही मनाने जगता येत आहे,
आता ना कुणाचे ऐकावे लागत आहे,
ना कुणी तिरस्कार म्हणून बोलत आहे,
आई बाबा ही आता हक्काने गर्व करत आहेत...

💐 समाप्त💐

टीप-
या कथेतील पात्र काल्पनिक असून या व्यक्तीचा जिवंत व्यक्तीशी संबंध आल्यास तो फक्त एक योगायोग समजावा...
तात्पर्य हेच की या समाजात अशी बरीच समलिंगी जोडपे आहेत,पण समाजाच्या भीती ने,कुटुंबाच्या बदनामीने,यांना लपून जीवन जगावे लागत आहे,
आज न्यायालयाने ३७७ कलम जरी स्वीकारले असले तरी हा समाज अश्या विवाहाला, अश्या जोडप्याना स्वीकारेल का???
हा एक मोठा गंभीर प्रश्न सुटावा यासाठीच हे अनोखे मीलन ही कथा होती....

धन्यवाद.....

✍️सुरज मुकींदराव कांबळे