सरूची अवस्था पाहून अंजली ला काय करावं तेच कळत नव्हत पणं तरीही तिने सरु ला समजावलं होत. अंजली ने सरुसाठी काही तरी कराव इतकी ती काही मोठी नव्हती . पिढ्यान पिढ्या पुरुषी वर्चस्व माणणार्या समाजात त्या छोट्याशा अंजली च ऐकणार तरी कोण ? चूक जरी स्त्रीची नसली तरी समाज दोष मात्र नेहमी स्त्रीलाच देतो हे अंजली ला ही माहित होते .
सरु आपल्या सासरी गेली.अंजली ही आपल्या परीक्षा आणि अभ्यासात व्यस्त झाली.बारावी च वर्ष होत ...त्यामुळे अंजली जोमाने अभ्यासाला लागली होती.सरु ची आठवण तर येत असे परंतु त्या भेटी नंतर सरु व अंजली ची भेटच झाली नव्हती .सरु ही माहेरी आली नव्हती व तिचा फोन ही अंजली ला आला नव्हता. शेवटी एकदाची अंजली ची परीक्षा पार पडली व ती १२ वी ला उत्तम गुण मिळवून उतीर्ण ही झाली.पुढच्या शिक्षणा साठी अंजली आपल्या आत्याकडे शहरात गेली अन् तिचा सरु सोबतचा संपर्क च तुटला..तरीही मम्मी ला फोन केल्या नंतर ती आठवणी ने सरु बद्दल विचारत असे...पणं सरु एकदा ही अंजली च्या घरी आलीच नव्हती .शिक्षणा साठी आत्या कडे गेल्या नंतर ..दोन ..चार महिन्या मध्येच अंजली ला समजलं होत की सरु ची पूर्ण फॅमिली च ते राहत असलेले गाव सोडून गेली..पणं कुठे गेले हे मात्र कोणालाच माहीत नव्हत .अंजली ने गावी आल्या नंतर सरु बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच माहीत पडल नाही.
पाच वर्ष उलटून गेली होती.अंजली आपल शिक्षण पूर्ण करून जॉब ला लागली होती.या पाच वर्षात सरु चा मात्र कुठेच पत्ता नव्हता .अंजली व नेहा दोघी एकाच कंपनी मध्ये जॉब ला होत्या त्यामुळे दोघींची चांगली च मैत्री झाली होती.नेहा व अंजली त्यांच्या ऑफिस पासून थोड्या अंतरावर एक रूम रेंट वर घेऊन राहत होत्या.अंजली च्या स्टडी टेबल वर तिचा व सरु चा फोटो फ्रेम करून ठेवलेला होता.नेहा ला ही अंजली ने सरु बद्दल सांगितल होत.अंजली च्या सर्वच नवीन मैत्रिणी ना सरु बद्दल माहिती होत .
आज रविवार होता त्यामुळे अंजली व नेहा ला सुट्टी होती.दोघी आरामात उठून तयार झाल्या नाश्ता केला व अंजली आपल ऑफिस वर्क करत बसली होती.नेहा ची मात्र मस्ती चालली होती.
नेहा: अंजली काय ग तू पणं ? सुट्टी दिवशी कोण काम करत ? सोड ना ते ...
अंजली : नेहा तू कर तुला काय करायचं ते ..एक तर इतकं काम पेंडिग पडल आहे आणि तू अशी लहान मुलानं सारखं हट्ट करत बसली आहेस?
नेहा : मला बोर होतंय ना पणं ..काम उद्या करता येईल ना ..सुट्टी दिवशी तर ठेव ते काम बाजूला.
अंजली : आय सी...म्हणजे नेहा मॅडम ला बोर होतंय म्हणून मी काय करणं सोडून त्यांना एन्टरटेन करू अशी इच्छा आहे त्यांची?
अंजली आपल हसू दाबत बोलली .
नेहा : हो मग ..चल ना बाहेर जाऊन येऊ कुठे तरी.
अंजली : शांत बस नेहा ..मला काम करू दे ..तू तुझं डोकं घाल तुझ्या मोबाईल मध्ये..
नेहा : प्लीज ..प्लीज ना अंजली चल ना फिरून येऊ..
नेहा अंजली ला रिक्वेस्ट करत च बोलली.अंजली ला तिचा चेहरा पाहून हसू च आल.
अंजली : ओके ओके..फक्त अर्धा तास वेट कर मग जाऊ..
अंजली ने अस सांगून ही नेहा च आपल काही ना काही चालूच होत.
नेहा ने मोठ्याने मोबाईल वर गाणी सुरू केली होती व ती ही मोठ्याने गाणं म्हणत होती.
" सुन सायबा सुन...प्यार की धून ..मैने तुझे चुन लिया ..तू भी मुझे ..चुन .." नेहा
अंजली नेहा कडे रागाने पाहत बोलली.
अंजली : नेहा बंद कर तो मोबाईल ..मला काम आवरू दे नाही तर मी अजिबात येणार नाहीये बाहेर तुझ्या सोबत..
नेहा : ये मला बोर होतंय ऐकू दे ना तू कर ना काम ..
अंजली : पणं मला डिस्टर्ब होतंय ना ....नेहा मॅडम..
नेहा ने गाणं बंद करायला मोबाईल हातात घेतला तेवढयात गाणं चेंज झालं.
अक्सर इस दुनिया में...
अनजाने मिलते है ...
अंजली गाणं ऐकून नेहा ला बोलली.
अंजली : नेहा ..नेहा असू दे सुरू राहू दे गाणं..
नेहा : ये एक काय ते ठरव एकदा बोलते बंद कर एकदा बोलते ..चालू राहू दे..?
अंजली : हे गाणं राहू दे सुरू..
नेहा आपली एक भुवई उडवत व अंजली कडे पाहत विचारते ..
नेहा : या गाण्यात काय इतकं विशेष आहे ?
अंजली थोडी अपसेट झाली होती.
अंजली : हे गाणं सरू ला खूप आवडतं होत...
अंजली इतकं बोलून शांत च झाली नेहा ला ही अंजली ला अस अपसेट झालेलं पाहून वाईट वाटल.नेहा अंजली जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्या शेजारी बसत बोलली.
नेहा : सरु चा काहीच पत्ता लागला नाही का परत अंजली ?
अंजली : नाही ना ग..कुठे शोधू तिला ते ही समजत नाही..तिच्या सासरचा ही पत्ता नाही माझ्या कडे फक्त शहराच नाव माहित आहे ..त्या एवढ्या मोठ्या शहरात कुठे शोधायचं तिला ?
नेहा : ह..ते ही बरोबर आहे ..पणं तू तिचा फोन नंबर तरी घ्यायचं ना ?
अंजली : अहो नेहा मॅडम तेव्हा मोबाईल माझ्या कडे ही नव्हता आणि तिच्या कडे ही...ती कधी तरी तिच्या दिरा च्या फोन वरून फोन करत होती पण लॅन्ड लाईनवर तेव्हा नंबर नव्हता ना पडत आणि तिने ही मला कधी दिला नाही नंबर..आता भेटली ना..पाहिलं तर मी खूप खूप मारणार आणि शिव्या घालणार आहे मूर्ख सरु ला..माझ्या कडे तिचा पत्ता नाही पणं तिच्या कडे तरी माझा पत्ता होता आमच्या घरातील फोन चा नंबर ही होता एकदा तरी फोन करावा ना तिने ? पण नाही..अशी कशी संसारात बिझी झाली आहे काय माहित ...
नेहा अंजली च बोलणं ऐकून हसू च लागली..
अंजली : तुला काय झालंय हसायला ?
नेहा : एक तर तिला इतकं मिस करते आहेस आणि वरून भेटली तर मारणार बोलतेस..
अंजली : ते पाहीन माझं मी ..बर चल रेडी हो जाऊया बाहेर..
नेहा : हो..ये अंजली सरु तुला भेटली ना ..माझी ही भेट घालून दे हा..
अंजली : हो बाई ..हो..आवर आता..
दोघी आवरून बाहेर फिरायला गेल्या.नेहा पाहिलं अंजली ला घेऊन छोट्याशा नाश्ता सेंटर मध्ये गेली तिथे दोघी नी खाऊन घेतलं.नंतर दोघी मार्केट मध्ये गेल्या ...तिथे जाऊन त्यांनी त्यांना लागणार साहित्य घेतलं.परत येताना नेहा ला आइस क्रीम पार्लर दिसले तस्स ती अंजली ला तिकडे घेऊन गेली ..दोघी नी आइस क्रीम ची ऑर्डर दिली ..आणि मग आइस क्रीम खाऊ लागल्या.आइस क्रीम खाऊन झाल्यावर नेहा बिल पे करायला गेली ..आणि बाहेर येऊन पहाते तर अंजली तिथे नव्हती.नेहा अंजली ला इकडे तिकडे शोधू लागली...तेव्हा तिला ती मेन रोड क्रॉस करून पलीकडे जाताना दिसली.
नेहा.." अरे ही वेडी अंजली अशी रस्त्याच्या मधून च का पळते आहे ? "
नेहा ही तिच्या मागे मागे गेली... व अंजली ला आवाज देऊ लागली .
नेहा : अंजली ...अंजली... अग ये बाई... कुठे जात आहेस ?
अंजली : अग नेहा पंकज दादा दिसले होते मला..
नेहा : कोण पंकज दादा?
अंजली : सरु चा भाऊ ग... ते दिसले मला म्हणून मी इकडे आले पणं त्या आधीच ते निघून गेले रिक्षा मधून...
नेहा : अरे पणं आता गेले ना ते ...आता कुठे शोधणार आहेस त्यांना ?
अंजली : शिट यार...आज त्याची भेट झाली असती तर सरु बद्दल माहित झालं असत.
नेहा : इट्स ओके ग..आता जर ते याच शहरात असतील तर तुला पुन्हा नक्की भेटतील ..आणि तुला सरु बद्दल ही समजेल..
अंजली :काय माहित यार ..कधी समजेल ?
नेहा : ये अंजली अशी अपसेट नको होऊ ...चल आता रूम ला जाऊ..
अंजली व नेहा दोघी रूम ला निघून गेल्या.
क्रमशः