तुझी माझी यारी - 19 vidya,s world द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी यारी - 19

अंजली ने समजावून ही शितल तिची हेल्प करायला तयार होत नव्हती..त्यामुळे अंजली खूपच खचली होती ..इतका मोठा निर्णय तर घेतला परंतु त्या साठी आपण काहीच करू शकत नाही हा विचार राहून राहून तिला सतावत होता.केशव ही त्याची केस संपवून आज तिला भेटायला आला होता.दोघे आज ही त्याचं कॅफे मध्ये भेटत होते जिथे ते गेल्यावेळी भेटले होते...पणं आज अंजली लवकर आली होती व चेअर वर बसून विचारत हरवली होती .केशव येऊन तिच्या समोरच्या चेअर वर बसला तरी तिचं लक्ष नव्हत.शेवटी त्यानेच दोन तीन मिनिट वाट पाहून बोलायला सुरुवात केली.

केशव: hello madam... इतका कसला विचार करताय ?

केशव चा आवाज ऐकून अंजली भानावर आली त्याला समोर बसलेलं पाहून तिने नीट चेअर वर बसत त्याला विचारल.

अंजली : अरे ..तू केव्हा आलास ?

केशव : मी ...तेव्हाच आलो जेव्हा तू कोणाच्या तरी स्वप्नात हरवली होतीस..

केशव हसत बोलला पणं अंजली वर त्याच्या जोक चा काहीच असर झाला नाही हे पाहून त्याने आपलं हसू आवरलं व तिला विचारल.

केशव : अंजली ,काय झालं ? कसला विचार करते आहेस?

अंजली : केशव ,मला वाटतं ..नाही .. मला पूर्ण खात्री आहे...शितल ला नक्कीच सरु च्या मृत्यू बद्दल काही तरी माहिती आहे...पणं ती तिच्या चुलत भावाला ..हरीश ला घाबरते ....काहीच सांगत नाहीये..ती ...तिने आपली काहीच हेल्प नाही केली तर आपण कस सिद्ध करणार की सरु च्या मृत्यू मध्ये तिच्या नवऱ्याचा हात आहे ते...

अंजली हताश होत बोलली.

केशव : हम्म...पणं अस टेन्शन घेऊन काय होणार आहे का ? बघू आपण प्रयत्न करू...मी ही बोलेन तिच्या शी...एक से भले दो..बघू..तिने हेल्प केली तर आपली...

अंजली : खरचं तिने हेल्प केली पाहिजे ...सरु ला न्याय मिळायला हवा ...केशव...

केशव : नक्की मिळेल ..जिच्या साठी लढणारी तुझ्या सारखी मैत्रीण असेल तिला न्याय देव ही देईल अंजली..

अंजली च्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली.

अंजली : हा.. डायलॉग बाजी झाली असेल तर थोड कामाचं बोलूया का?

केशव : अरे मी खरचं बोललो..तुला काहीच खर वाटत नाही ना?

अंजली त्याची ॲक्टिंग पाहून हसू लागली.

केशव : चला मॅडम एकदा च्या हसल्या तरी...

अंजली : हम्म..

अंजली ने हसत मान डोलावली.

अंजली : शितल ला भेटायला जायचं का आता ? तू ही येतोय ना ?सध्या ती कॉलेज मध्ये असेल..

अंजली ने आपल्या हातातील वॉच मध्ये टाईम पाहत त्याला विचारल.

केशव : आज ..नको ..उद्या जाऊ...आज थोडी केस रीलेटेड इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे मला ...तू मला सरु च्या भावाचा अंड्रेस अथवा नंबर असेल तर दे..मी त्याला भेटुन थोडी चौकशी करतो .

अंजली : हो ओके...पंकज दादा याच सिटी मध्ये आहेत ..मी तुला त्यांचा ॲड्रेस व नंबर दोन्ही देते ...भेटून घे तू त्यांना.. काही समजलं अथवा हेल्प लागली तर मला कॉल कर.

अंजली केशव ला पंकज चा नंबर व अँड्रेस देते ..केशव त्याला भेटण्यासाठी निघून जातो ...अंजली हि ऑफिस ला येते.

दुसऱ्या दिवशी केशव आणि अंजली दोघे ही केशव च्या बाईक वरून शितल च्या कॉलेज ला तिला भेटण्यासाठी जातात..केशव बाईक पार्क करण्यासाठी जातो ...अंजली शितल ला शोधत होती ..तेवढ्यात तिला कॉलेज बाहेर थोडा गोंधळ दिसला...तिने तिकडे जाऊन पाहिलं तर शितल आणि एका मुलाची भांडण चालू होत...त्या मुलाने शितल चा हात पकडला होता व तो तिला ओरडत होता..मुलगा थोडा गुंड टाईप च वाटत होता..शितल च्या मैत्रिणी थोड लांब सर्व पाहत उभ्या होत्या...कॉलेज मधले इतर ही मुल मुली ते सर्व पाहत उभे होते...पणं कोणी त्या मुला ला थांबवायचा प्रयत्न करत नव्हते..अंजली शितल च्या एका मैत्रिणी जवळ गेली व तिने तिला विचारल.

अंजली : काय झालं ? त्या मुलाने शितल चा हात का पकडला आहे ?

शितल ची मैत्रीण : तो उम्या...तिला रोज छेडतो..आज तिला सहन झालं नाही म्हणून तिने त्याच्या कानाखाली मारली...म्हणून तो चिडला आहे..

अंजली : मग तुम्ही असे गप्प का बसलात ? कोणी त्याला थांबवत का नाही ?

शितल ची मैत्रीण: ओ ताई..त्याच्या कोण नादाला लागेल...गुंड आहे तो...जगणं अवघड करून सोडेल तो..

अंजली : हा...आता शितल आहे ...उद्या तुला छेडेल तेव्हा ही असाच विचार करून शांत बस..

अंजली च बोलणं ऐकून शितल च्या मैत्रिणीने आपली मान खालीच घातली..अंजली तिथून पुढे गेली व तिने उमेश च्या हातातून शितल चा हात सोडवून घेतला व त्याला बोलली.

अंजली : ही काय दादा गिरी आहे ? कॉलेज ला शिकायला येतोस का मुलींना छेडायला ?

अंजली च बोलणं ऐकून उमेश चिडला व अंजली कडे रागाने पाहात बोलला.

उमेश : मी काही ही करिन तू सांगणारी कोण ? आणि उगाच आमच्या मध्ये पडू नकोस...उमेश दादा म्हणतात मला..

अंजली : दादा म्हणतात ना तुला मग आपल्याच बहिणींना कस छेडातो तू ?

अंजली च बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले...उमेश ही सगळ्यांन कडे भांबावून पाहू लागला.

उमेश : ये...ये..दादा म्हणजे ...भाऊ वाला दादा नाही...उगाच आपल्या नादाला लागायचं नाही ह..नाही तर...

उमेश अंजली कडे बोट दाखवत बोलला तस्स अंजली त्याच्या कडे पुढे सरकत बोलली.

अंजली : नाही तर काय ? काय करशील सांग ?

अंजली पुढे येऊ लागली तस्सा उमेश च घाबरला..

उमेश : ये कोण आहेस तू ? जा ना तुझ्या तुझ्या वाटेने माझ्या शी का वैर घेत आहेस?

अंजली : शितल ची बहिण आहे मी...खूप हौस आहे ना तुला मुलींना छेडायची मग आता घाबरत आहेस...
ती उमेश ला बोलते आणि नंतर सर्व गर्दीला पाहून बोलते...

आणि तुम्हाला काहीच वाटत नाही का ? असे शांत तमाशा पाहत उभे राहतात..शीतलच्या ठिकाणी तुमची बहिण असती तरी असेच बसला असता का ? थोडी तरी लाज वाटू द्या....तुम्ही असे घाबरून राहता याचाच फायदा घेतात हे लोक...वेळीच यांना धडा शिकवला तर इथ पर्यंत गोष्ट येणारच नाही...

अंजली च बोलणं ऐकून सर्वजण खाली मान घालतात...तेवढ्यात केशव ही येतो व तो ही बोलतो.

केशव : बरोबर बोलतेय अंजली...

केशव उमेश कडे पाहत बोलतो..

काय रे तुला माहित नाही का ? मुलींची छेड काढणे कायद्याने गुन्हा आहे ? या साठी तुला जेल ची हवा खायला लागू शकते...शिकायला येता ना..मग करा ना अभ्यास ..नाही ते काम कशाला करत बसता?

आता सगळेच उमेश कडे रागाने पाहू लागतात तसा उमेश ही आपल्या मित्रांना घेऊन तिथून निसटतो.शितल अंजली जवळ येऊन तिचे आभार मानते.

शितल : थँक्यु दीदी ...आज तुम्ही त्या उमेश ला चांगलाच धडा शिकवला..

अंजली : आणि तू ही त्याच्या कानाखाली मारली म्हणे ?

शितल : मग काय करू दीदी ? रोज रोज त्याचा त्रास नकोसा झाला होता...नाही सहन झालं म्हणून लगावली एक ...

अंजली : केलीस ना आज हिम्मत ? फक्त अशीच थोडी हिंमत तुझ्या वहिनी ला न्याय मिळवून देण्यासाठी दाखव ..प्लीज सांग ना शितल सरु ला काय झालं होत ?

आता शितल नजर चोरत बोलते.

शितल : दिदी मला काहीच माहिती नाही... खरं..

केशव : ये बघ शितल मी वकील आहे...आणि मी गॅरटी देतो की तुला काहीच होणार नाही...तू तुझ्या भावाला घाबरत असशील तर तो तुला काहीच करू शकणार नाही..

शितल त्याला पाहत आपला चेहरा थोडा बारीक करत बोलते.

शितल : तुम्हाला नाही माहित ..हरीश दादा..खूप डेंजर आहे..त्याला कळलं ना मी तुमची हेल्प केली तर तो मला ही ..

अंजली : शितल ,माझ्या वर विश्वास ठेव ..आम्ही तुला काहीच होऊ देणार नाही..तुझ्या दादा पर्यंत तुझं नाव ही कळू देणार नाही .. सरु जर तुझी बहीण असती तरी तू आमची हेल्प केली नसती का?

शितल : दिदी ,मी वहिनी ला माझी मोठी बहीण च मनात होते..

अंजली : मग तुझ्या बहिणी ला न्याय मिळावा अस तुला वाटतं नाही का ?

शितल : पणं दीदी..

अंजली : पणं नाही ..प्लीज शितल सांग ना प्लीज .. काय झालं होत सरु सोबत ?

शितल विचार करत बोलली.

शितल : पणं दीदी मला काही होणार नाही ना ? आणि दादा त्याला समजणार नाही ना ?

अंजली व केशव दोघे हि एकदम बोलतात : हो..तुला काहीच होणार नाही..तुझा दादा ही तुला काही करू शकणार नाही.

शितल : ठीक आहे .. मी सांगते पणं दिदी प्रॉमिस करा तुम्ही माझं नाव दादा ला कळू देणार नाही.

अंजली : शितल तुला काहीच होणार नाही काळजी करू नकोस...आणि हो आम्ही तुला डायरेक्ट कोर्ट हेअरिंग दिवशीच कोर्ट मध्ये नेऊ..तो पर्यंत तुझ्या दादा ला काहीच माहिती पडणार नाही..तुझ्या बद्दल..

शितल ,अंजली व केशव तिघे ही कॉलेज पासून जवळ असणाऱ्या गणपती मंदिरात गेले तिथे ... मंदिरा भोवती बरीच झाडी होती...तिथल्याच एका झाडा खाली तिघे ही बसले..आणि शितल ने त्यांना सांगायला सुरवात केली.. जे सरु भाजली त्या दिवशी काय घडलं ..

क्रमशः